वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वूटवर अर्जुन रामपाल ची लंडन फाइल्स पाहिली ( का? का? का?)
इनामदार, हुशार, मनस्वी पण दुःखी भूतकाळ असलेला, व्यसनी पोलिस ऑफिसर बघून बघून कंटाळा आला. सगळीकडेच तेच ते तेच ते. Sad

मी आहे ब्रुकलिन नाईन नाईनचा फॅन. प्रचंड मोठा फॅन. मायकल शरच्या चारही मालिका मी सतत बघत असतो. ऑफिस, पार्क्स ॲण्ड रिक्रिएशन, ब्रुकलिन नाईन नाईन आणि द गुड प्लेस.

कॅप्टन होल्ट हा जगातला बेस्ट बॉस आहे.

ब्रेकिंग बॅड फॅन्स साठी

बेटर कॉल सॉल च्या फायनल सीझन चे पहिले दोन एपिसोड्स AMC आणि नेट्फ्लिक्स वर आलेत...

guilty minds ना? की क्रिमिनल माइंडस् पण आहे?>>>> तीच तीच. Guilty minds. क्रिमिनल माइंडस् चं भूत उतरत नाही डोक्यावरून.

मला अधूनमधून साऊथ पार्क बघायला आवडतं.
त्यातले काही एपिसोड इतके रिस्की असतात की बस्स.
हे अतिशय ऑफेंसिव्ह गाणे खूपच आवडले आहे.
https://youtu.be/i9AT3jjAP0Y

साऊथ पार्क मस्त आहे एकदम. पूर्वी मी family guy चा फॅन होतो पण साऊथ पार्कपुढे ते एकदम बालिश आहे. साऊथ पार्कचे जुने episode खतरनाक होते (मोहांमद कार्टून) आता जरा intensity कमी वाटते. Butters एकदम भारी.

अ‍ॅनटॉमी ऑफ स्कँडल नेफ्लीने आग्रहाने दाखवली नसेल तर बघा. वीकेंडला बिंज केली. लेडी मेरी क्रॉली आहे. ती तोंडावरुन माशी हलू न देता नेहेमी प्रमाणे वावरते. ते सोडा.
पण बाकी ब्रिटिश राजकारण, क्राईम, कोर्टरुम (विदाऊट) ड्रामा, क्राईम-कोर्ट असूनही शून्य पुलिस प्रेझेंस कारण फोकस वेगळा आहे, आणि अर्थात ब्रिटिशनेस! मला सगळ्यात जास्त आवडलं ते दिग्दर्शन/ एडिटिंग. भूतकाळ ते वर्तमानकाळ ट्रांझिशन्स अफाट टेक्निकने घेतली आहेत. एक पात्र वर्तमानात बोलत असताना अचानक भूतकाळातील वाक्ये बोलू लागतं. बॅकग्राऊंड बदलते किंवा नाही. टिपिलली सीन सुरू व्हायच्या आधी आवाज ऐकू येणे इ. असते, पण इथे काळ, व्यक्ती, त्यांचा प्रेझेन्स, कपडे, आजूबाजूचा परिसर हे इतकं फ्लुईड आहे, सीन चालू असतानाच आपल्याला मागचं आठवलं तर ते काहीसं असंच असेल. फारच मस्त वापर केला आहे. असं पहिल्यांदाच बघितलं.
किंवा आजच्या वयातील पात्राचा भूतकाळ दाखवताना जनरली लहान वयाच्या पात्राने साकारलेली दृष्ये दाखवतात. इथेही एकाच पात्राची लहान आणि मोठी कॅरेक्टर वेगवेगळ्या कलाकारांनी साकारली आहेत. पण कधी वयस्क पात्रच भूतकाळातील लहान वयाचे सीन्स करतं. ते फार मस्त हायलाईट होतं. तो प्रसंग जरी लहान असताना घडला असेल तरी तो जेव्हा आज आपण आठवू तेव्हा आपल्याला आपण आजचेच दिसू. आपलं पर्स्पेक्टिव्हही बहुतेक आजचंच असेल, जरी पूर्वी घडलेली घटना असली तरी! हे दाखवायचा ब्रिलियंट प्रकार आहे.

अमितव +१
भूतकाळ - वर्तमान काळ ट्रान्झिशन्स एकदम स्मूथ आहेत. गडबडायला होत नाही. कथा विस्कळीत होत नाही. मलाही हे आवडलं.

भूतकाळ - वर्तमान काळ ट्रान्झिशन खूप स्मूथ आहेत >>> हो

बाय द वे त्या जेम्सच्या आईचा रोल करणारी नटी डाउनटन अ‍ॅबी मधे एकदम खत्रूट रोल मधे होती Happy

अ‍ॅनटॉमी ऑफ स्कँडल नेफ्लीने आग्रहाने दाखवली नसेल तर बघा. वीकेंडला बिंज केली. >>>> बघितली . जाम आवडली . भूतकाळ - वर्तमान काळाबद्दल अनुमोदन . तरूण सोफी एक्दम क्युट आहे. जेम्स नाही आवडला . शेवटपर्यंत कोण खरं - कोणं खोटं - नक्की काय घडलं - गोष्ट बर्यापैकी गुंतवून ठेवते.
बाय द वे त्या जेम्सच्या आईचा रोल करणारी नटी डाउनटन अ‍ॅबी मधे एकदम खत्रूट रोल मधे होती >>> हो , हो . खूप ओळखीची वाटली . मग गूगल बाबा म्हणाले - ही तर श्रीम्पीची बायको , रोझची आई.

मी स्ट्रेंजर बघून संपवली. ( के ड्रामा) जबरदस्त आहे. खुप ट्विस्ट टर्नस. मला हिरो आणि ती लेडी इन्स्पेक्टर आवडले. रुढ अर्थाने हिरो हिरॉइन नव्हेत, पण लिड रोल करणारे म्हणू शकू.
पण सिझन 2 काही एवढी खास वाटत नाहीये, तरी 2 एपिसोड बघितले. ( नेफ्ली वर)

Legends of ramayana with amish - Discovery+

आवडले..छान...नवीन दृष्टीकोन आणि संशोधन

Guilty minds बघते आहे. 6 एपिसोड झाले पाहून, आवडली आहे, ग्रीपिंग आणि वेगवान आहे. वकील आणि कोर्टरूम drama असेल आणि बोरिंग असेल असे सुरुवातीला वाटले होते पण तशी बिलकुल नाही. प्रत्येक एपिसोड म्हणजे वेगळी केस आहे. श्रिया पिळगावकर चांगला अभिनय करते एकदम सहज आणि नैसर्गिक. सगळ्यांचीच कामं आवडली खरंतर.

रिक अँड मॉर्टी सिझन पाच बघितला. चौथ्या सिझन मध्ये वाटलेलं आता R&M बोगस झालय. पण पाचवा आवडला. रिकची पूर्वकथा समजते. थोडे पहिल्या तीन सिझनचा फील असणारे एपिसोड होते.

Guilty minds छान आहे..श्रिया पेक्षा ती दुसरी मुलगी शी वकिल आहे, शुभांगी ती अगदी डोळ्यांतून वगैरे अभिनय करते ..मस्त आहे ती.
सर्व लीड कॅरॅक्टर्स अगदी प्रेक्षणीय आहेत Wink

मी आर्याचा दुसरा सिझन बघायला सुरुवात केली, समहाऊ मला अजून फार भावला नाही हा सिझन, दोन एपिसोडस बघितले, ती कोर्टात साक्ष देते तो भाग पटलाच नाही.

पहिल्या सिझनला पुढचा एपिसोड लवकर बघावा असं वाटत रहायचं, ते नाही वाटत.

अंजू.. आपण सेम एपिसोडवर आहोत आणि मलाही हा सिझन अजूनतरी भावलेला नाहीये.

आर्या 2 बघितलेल्या लोकांना तो (सिझन) आर्या 1 इतकाच आवडला का?

सेम नोटवर आहोत आपण तिघं.

पहील्या सीझनलाच संपवायला हवी होती. ते फॉरेनला सेटल्ड आणि कोणाला समजत नाही, दी एन्ड .

मी स्ट्रेंजर बघून संपवली. ( के ड्रामा) जबरदस्त आहे. खुप ट्विस्ट टर्नस. मला हिरो आणि ती लेडी इन्स्पेक्टर आवडले >>> मी पण बघायला चालू केली आहे . मूळ कथानक अजून नीटस कळलं नाही . तो मि. पार्क एवढा महत्वाचा का आहे , त्या हिरोच नक्की काय झालयं भूतकाळात , ऑफिसमधले सगळे त्याच्यावर ईतके का उखडलेले आहेत , त्या कॉलगर्ल च काय ? जरा गोंधळ आहे माझ्या डोक्यात . पण सिरीज आहे मस्त . हिरो पण छान आहे . सीरीजच "टेकिन्ग " मस्त आहे . विशेषतः काय घडलं असेल त्याचा विचार हिरो करतो तेन्व्हा . कॉफी शॉप शोधताना , खून नक्की किती मिनिटात झाला ते शोधताना ....... छान घेतले आहेत ते सीन्स .

पेट पुराण मऽऽस्त आहे.
ललित प्रभाकर आणि सई ने काम मस्त केले आहे.
व्यंकु आणि बकूनी पण Proud

Pages