कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीटी स्कॅन आणि स्टिरॉइड्सच्या कोविड रुग्णांसाठीच्या वापराबद्दलचा आणि चुकीच्या वापराच्या दुष्परिणामांबद्दलचा हा लेख आज 'हिंदू'मध्ये वाचला.
https://www.thehindu.com/sci-tech/health/explained-why-have-doctors-caut...

वावे,
चांगला लेख. त्यातील दोनन मुद्दे अधोरेखित करतो.

१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.

२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.

एक प्रेरणादायी उद्योजक
नागपूरमधील सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्यारे खान यांनी आतापर्यंत तब्बल 85 लाख रुपये खर्च केले आहेत
https://marathi.abplive.com/news/mumbai/on-majha-katta-businessman-pyare...

>>>A 48-year-old head constable posted at Dahisar police station succumbed to Covid-19 on Saturday, after taking>> आपल्याला काय अभिप्रेत आहे?

एक डॉक्टर पण corona चे दोन्ही डोस घेतले असून सुद्धा corona ni गेले. अशी बातमी आज वाचली आणि अनंत प्रश्न मनात आले.
1)लस घेतल्या नंतर COVID झाला तरी गंभीर होणार नाही .हे अर्ध सत्य आहे ह्या वर पूर्ण अभ्यास झालेला नाही
२) COVID मुळे फुफुस बाधित होतात हे पण अर्ध सत्य आहे शरीरातील विविध संस्था वर त्याचा परिणाम होतो आणि तो कसा होतो हे माहीत नसल्याने अनेक ज्यांचा तुटवडा आहे म्हणून बातम्या असतात ती दोन इंजेक्शन फक्त प्रयोग म्हणून दिली जातात ती covid बरा करतील ह्या विषयी काहीच खात्री नाही.
३) corona पेशा उपचार म्हणून जी औषध दिली जात आहेत त्या मुळे लोक मृत्यू पावत आहेत.
कारण जी औषध दिली जात आहे त्या विषयी काहीच अभ्यास झाला नसून फक्त who सांगते म्हणून ती दिली जात आहेत.

याव्यतिरिक्त महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर यापूर्वी मी एक प्रतिसाद लिहीलेला >>>हा प्रतिसाद कुठे लिहिलाय डॉक्टर ?

जाई,
छान.
Submitted by कुमार१ on 22 April, 2021 - 16:29 (मागचा भाग )

माझा रिपोर्ट आज positive आला आहे. 3 दिवस झाले 100 पर्यन्त ताप होता आणि घसादुखी. शनिवार पासून घरीच आयसोलेशन मधे आहे. तर आयसोलेशन मधे एकटीच असताना पण सतत मास्क लावावा का? तसेच माझी मुलगी 4.5 वर्षे वय आहे. तिची टेस्ट negative आली. घरी आई बाबा दोघेही 60+ दोन्ही vaccines झालेली आहेत. काय कालजी घ्यावी

खोलीत एकटे असताना मास्कची गरज नाही.
मुलीला लांबूनच बघा.
भरपूर पाणी पिणे, चांगला प्रथिनयुक्त आहार व लिंबू खाण्यात ठेवणे आणि विश्रांती
शुभेच्छा !

मागच्या पानावर व्हीबी यांनी दंतचिकित्सेसंबंधी काही प्रश्न विचारला होता. ही माहिती उपयुक्त ठरू शकेल.

‘डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777

काही दिवसांपुर्वी, ऑस्ट्रेलियातील एका स्त्री आयडीने त्यांच्या मिस्टरांबद्दल लिहिले होते. त्या नंतर काही कळले नाही त्यांच्याकडून. कसे आहेत आता तुमचे मिस्टर? आशा आहे ते घरी सुखरूप परत आले.

इथे संशोधनानुसार आइव्हरमेक्टीनच्या नियमित वापराने कोव्हिड संसर्गाची शक्यता कमी होते असे म्हटलं आहे.

अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊन नये.

धन्यवाद सुनिधी , माझा नवरा रविवारी घरी पोचला, त्याला अजून कोरड्या खोकल्याचा खूप त्रास आहे. तो covid चा UK variant ने इन्फेक्ट झाला होता. आणि इथल्या डॉक्टरांच्या मते त्याला झालेल्या कोविड ला ते long covid म्हणतात आणि हा बरा व्हायला खूप काळ जाऊ शकतो .

काल बिहार मध्ये बक्सर इथे गंगेच्या काठी उत्तर प्रदेशातले मृत देह वाहत आले ते बघून फार वाइट वाटले. धक्का तर बसलाच.

मीरत मध्ये अशी परिस्थिती आहे की मृत देह जाळायची फ्रिक्वेन्सी वाढल्याने रोज दहा च्या जागी १०० त्यामुळे जास्त जागा लागत आहे व ती सर्व चिता धूळ काळी राख लोकांच्या घरात जात आहे अन्नावर बसत आहे. अति भया नक सद्यस्थिती.

सरकार ने किती ही प्रयत्न केले तरी खरे मृत्यु प्रमाण झाकले जात नाही आहे.

>>>सहमत.
WHO च्या डॉ स्वामिनाथन यांनी भारतातील परिस्थितीचे इथे विश्लेषण केले आहे>>
हा सविस्तर वाचला तसेच त्यांची मुलाखात सुध्दा एनडीटिव्ही वर पाहिली.
मला एक मात्र कळले नाही, आपल्या कडील लशीकरणाचे प्रमाण एवढे असूनही , त्यांच्या मते नवे म्यूटेशन “आपल्या लशीला “इव्हेड’ करत असेल असे असू शकते”.
या वर संशोधन होण्याएवढे नमुने (लस झाली व गंभीर रित्या बाधित झाले) आहेत का?
कारण ज्यांनी दोन्ही लशी घेतल्या, उदा: मी, त्यांना याचा उपयोग, नवीन म्युटेशनच्या बाबतीत नगण्य आहे का?
आणि थोडा विरोधाभास असा की तरीही सध्याचीच (नवीन आवृत्ती नव्हे) लस देण्याचा वेग वाढला पाहिजे असा सल्ला.
जरा गोंधळात पडलोय!

रेव्यु
सहमत आहे. बऱ्याच तज्ञांच्या मुलाखतींमध्ये अजून ‘जर-तर, कदाचित, शक्यता ’ अशी शब्दपेरणी असते. विषाणूचे नवे अवतार आणि सध्याच्या लसी याबाबत भारतातीलच नव्हे तर परदेशातील लसीसंबंधीचे लेखही काहीसे संदिग्ध वाटतात.

सध्या कोणतेही विधान केले तर ते युट्युब आणि इतर मीडिया वर पिढ्यानपिढ्या राहील, त्यामुळे रोगावर अजून संशोधन चालू असताना काही ठाम विधाने करणे नको वाटत असेल.उद्या एखाद्या शोधाने हे विधान चूक ठरले तर वर्षानुवर्षे अपरेजल आणि फंडिंग गंडेल.

भविष्यातील करोना लस : नवे संशोधन

गेल्या काही महिन्यांत या विषाणूचे नवनवे अवतार अस्तित्वात आले. त्यामुळे आधी तयार केलेल्या लसी त्यांच्याविरोधात उपयुक्त ठरणार का, हा लाखमोलाचा प्रश्न खूप चर्चिला जातोय. या संदर्भातील काही नवे संशोधन :

या विषाणूचे प्रमुख अस्त्र म्हणजे त्याचे टोकदार प्रथिन. हे प्रथिन एखाद्या छत्रीसारखे आहे- त्याचा मुख्य अग्रभाग आणि दांडा असे दोन विभाग आहेत.

सद्य लस टोचल्यावर शरीरात ज्या अँटीबॉडीज निर्माण होतात त्या अग्रभागाशी झुंज देतात. विषाणूच्या उत्क्रांतीनुसार हा अग्रभाग सतत बदलतो व नवे अवतार निर्माण होतात. मग ते जुन्या लसिंना निष्प्रभ करू शकतात.

पण, या प्रथिनाचा जो दांड्याचा भाग आहे हा उत्क्रांतीत सहसा बदलत नाही. त्यामुळे भविष्यातील लस तयार करताना या भागाला लक्ष्य केले जाईल. त्यामुळे नव्या लसी दीर्घकाळ उपयुक्त ठराव्यात. इतकेच नाही तर बहुदा त्या करोनाच्या सर्व ज्ञात जाती-जमातींच्या विरोधात उपयुक्त ठरु शकतील.

Pages