
लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................
दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.
भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.
दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.
लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.
ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :
१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................
वाट न पाहता जे मिळेल ते
वाट न पाहता जे मिळेल ते शस्त्र घेऊन लढणं आवश्यक आहे.>>>> +११
......
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
https://indianexpress.com/article/explained/explained-cleared-for-india-...
आता स्मार्टफोनवरून चेक करा
आता स्मार्टफोनवरून चेक करा ऑक्सिजन लेवल
https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/this-mobile-...
Corona वर उपचार करण्यासाठी
Corona वर उपचार करण्यासाठी भारतात कोण कोणत्या औषधांना परवानगी दिली आहे?
प्रतेक देशात वेगवेगळ्या औषधांना मान्यता दिली आहे एकमेकाचे बघून काही देशांनी मान्यता दिली आहे.
भारत विषयी बोलायचे झाले तर ज्या औषधांना सरकार नी परवानगी दिली आहे त्या औषधांची चाचणी किती लोकांवर घेतली .त्या औषध मुळे किती लोकं corona मुक्त झाली ह्याची माहिती सरकार नी जाहीर केलेली नाही.
खूप कमी प्रमाणात चाचण्या घेवून काही औषधांना च परवानगी दिली आहे .सर्व आंधळा कारभार आहे.
क्षय विषाणूमुळे होत नाही
क्षय विषाणूमुळे होत नाही जिवाणूमुळे होतो.
Who असू नाही तर कोणती ही
Who असू नाही तर कोणती ही संस्था त्यांनी निष्कर्ष कशावरून काढले.
किती लोकांच्या चाचण्या घेतल्या ,चाचण्या घेवून किती दिवस झाले जे सर्व जनतेसाठी प्रसिद्ध केले पाहिजे.
Who असू नाहीतर कोणती ही संस्था हीच औषध वापरा असे कोणत्या अभ्यास वरून सांगते त्याची सर्व detail सर्व भाषा मध्ये लोकांपर्यंत पोचले पाहिजे.
त्यांचे निर्णय चुकीचे ठरले असतील तर संबंधित लोकांना जबाबदार धरून शिक्षा झालीच पाहिजे.
चुकीच्या औषध उपचार मुळे लोकांचे जीव जात असतील तर त्याला जबाबदार ज्यांनी
औषध सुचवली तीच लोक आहेत.
प्रमाणित करणाऱ्या संस्था ह्या योग्यच निर्णय घेतात असे समजणे ही आधुनिक अंध श्रद्धा च आहे
>>>किती लोकांच्या चाचण्या
>>>किती लोकांच्या चाचण्या घेतल्या ,चाचण्या घेवून किती दिवस झाले जे सर्व जनतेसाठी प्रसिद्ध केले पाहिजे.>>>>
मला वाटते या साठी नियामक संस्था आहेत.
दरवर्षी अनेक गाड्या (कार्स) नवी मॉडेल्स रस्त्यावर येतात, त्यांचा असा विदा प्रकाशित होतो का? तो एआरएआय कडे असतो. सामान्य जनतेस ते तांत्रिक स्पेशिपिकेशन्स काय कळाणार?
परंतु नियामक संस्थेने मात्र ठाम राहूनच स्वीकृती दिलेली असते असे मी गृहित धरतो
>>>.casirivimab and imdevimab
>>>.casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला >>>>
याची किंमत रु. ६०,००० एका डोस साठी आहे.
https://www.livemint.com/companies/news/cipla-roche-launch-covid-19-anti...
एवढी महाग का असतात औषध .सोने
एवढी महाग का असतात औषध .सोने,चांदी, सारखे मौल्यवान धातू वापरतात काय औषध मध्ये.औषधं बनवण्यास कच्चा माल किती रुपयाचा लागला हे पण जाहीर करण्याची सक्ती च केली पाहिजे.
सोने,चांदी, सारखे मौल्यवान
सोने,चांदी, सारखे मौल्यवान धातू >> एवढे मौल्यवान का असतात हे धातू?
एक सुंदर लेखhttps://www
एक सुंदर लेख
https://www.aksharnama.com/client/article_detail/5180
डॉ. एम. सिद्धेश्वर आणि डॉ. त्रिशला शहा-सिंघवी यांच्या सद्यस्थितीतील कामाबद्दलचा.
त्यातले ‘वॉर अँड पीस’ मधले हे उद्धृत छानच ...
‘काळ आणि संयम हे जगातील सर्वात मोठे योद्धे आहेत'.
हेमंत म्हणताहेत तसं
हेमंत म्हणताहेत तसं लसीकरणामुळे करोना विषाणूत बदल होत आहेत असं नोबेल विजेत्या साथरोगतज्ञाने म्हटलंय
https://www.thenorthlines.com/nobel-prize-winner-mass-covid-vaccination-...
एक प्रश्न पडलाय, सगळे
एक प्रश्न पडलाय, सगळे variants हे लसीकरणाच्या आधिचेच आहेत ना. मग लसीकरणामुळेच virus बदलतो आहे अस कस म्हणता येइल.
असं नोबेल विजेत्या
असं नोबेल विजेत्या साथरोगतज्ञाने म्हटलंय >>>>
याच्या विरोधी मते अन्य तज्ञांनी व्यक्त केल्याचे मी मागच्या पानावर दिलेले आहे :
त्यांच्या मतांचे खंडन करणारी अन्य तज्ञांची मते इथे वाचता येतील :
https://www.euronews.com/2021/04/05/experts-debunk-claims-that-vaccines-...
त्यात विषाणूचे नवे उपप्रकार निर्माण होण्यामागचे विज्ञान समजावून सांगितलेले आहे.
Submitted by कुमार१ on 23 May, 2021 - 09:00
मतमतांतरांचा गलबला .
मतमतांतरांचा गलबला .
इतक्या गोष्टी इतक्या ठिकाणी वाचल्या जाताहेत की कुठे काय वाचलं ते लक्षात राहत नाही. धन्यवाद डॉक्टर.
मला एक शंका आहे
मला एक शंका आहे
सध्या पुण्यात कोव्हीशिल्ड पेड व्हॅकसीन दुसर्या डोस च्या खूप जागा 18-44 ला आहेत.जर 1 मे ला 18-44 चे चालू झाले, आणि कोव्हीशिल्ड ला 84 दिवस गॅप सक्तीचा आहे ही दोन्ही फॅक्ट एकत्र केली तर इतक्या जागांना 18-44 वाली गिऱ्हाईकं सेकंड डोस ला कशी मिळवणार?
काल या लेखमालेच्या मागील
काल या लेखमालेच्या मागील धाग्यावर रश्मी यांनी काळ्या बुरशीबाबत काही माहिती उद्धृत केलेली आहे. त्यासंबंधी काही उपयुक्त माहिती देतो.
या प्रकारची बुरशी (Mucorales) निसर्गात सर्वत्र असते. जास्त करून ती माती व कुजलेल्या पदार्थात आढळते. तिची एक विशिष्ट जात शिळ्या ब्रेडमध्ये तयार होते. आपण सर्वजण दैनंदिन जगण्यात या बुरशीच्या संपर्कात येत असतोच. परंतु, या जंतूंची घातकता मुळात सौम्य आहे. म्हणून आपल्याला त्यांच्यापासून आजार होत नाही. मात्र जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कुठल्या तरी कारणाने दुबळी झाली, की हे जंतू आपल्यावर झडप घालतात.
ते मुख्यत्वे नाकातून आत शिरतात. पुढे शरीरात ते फोफावतात आणि मग नाक, सायनसेस, डोळा, मेंदू, फुफ्फुस इत्यादी अवयवांना इजा करू शकतात. शरीरात या जंतूंशी आपल्या पांढऱ्यापेशी पैकी न्यूट्रोफिल्स या पेशी मुख्यत्वे लढा देतात. अनियंत्रित मधुमेह/ अन्य व्याधी/ स्टिरॉइड्सचा बराच वापर इत्यादी कारणांमुळे या पेशी कमकुवत होतात. म्हणून असे रुग्ण बुरशीजन्य आजाराला बळी पडतात.
सहव्याधी नसलेल्या सामान्य लोकांनी या बुरशीची अवास्तव भीती बाळगू नये. सध्या आपण वापरत असलेल्या मुखपट्टीची स्वच्छता, तसेच मूलभूत मुख व दंतारोग्य सांभाळावे. मुळात आपली प्रतिकारशक्ती मजबूत असते यावर भरोसा ठेवावा.
मात्र सहव्याधी असलेल्या रुग्णांनी अधिक सावधानता बाळगावी. मातीयुक्त वस्तू व कोंदट वातावरण यापासून स्वतःला जपावे.
सहव्याधी नसलेल्या सामान्य
सहव्याधी नसलेल्या सामान्य लोकांनी या बुरशीची अवास्तव भीती बाळगू नये. सध्या आपण वापरत असलेल्या मुखपट्टीची स्वच्छता, तसेच मूलभूत मुख व दंतारोग्य सांभाळावे. मुळात आपली प्रतिकारशक्ती मजबूत असते यावर भरोसा ठेवावा. >>> खूप उपयुक्त!!!
जास्त त्रास नसताना निव्वळ पॉझीटीव्ह असल्यामुळे अँटिबायोटीक्स आणि स्टेरॉईड्सचा सर्रास वापर होतो. त्याचा कोरोनावर किती आणि कसा परीणाम होतो हे अजून नक्की समजलेले नाही पण माणसाची प्रतिकारक्षमता मात्र नक्कीच खच्ची होते. मग त्यामुळे असे अजून भयानक आजार होण्याची शक्यता वाढते. दुष्टचक्र सुरूच राह्ते मग.
रोग जंतू,विषाणू,जिवाणू,बाकी
रोग जंतू,विषाणू,जिवाणू,बाकी रोग निर्माण करणारे घटक पाणी,हवा,खाद्य पदार्थ ह्या मध्ये असणारच शुध्द निर्जंतुक वातावरण असू शकत नाही..आता काळी बुरशी नी लोक आजारी पडत आहेत म्हणून आपण त्याचाच विचार करत आहे. जेव्हा काळी बुरशी नी लोक आजारी पडत नव्हती म्हणजे काळी बुरशी ची बीज वातावरण , माती,पाणी ह्या मध्ये नव्हते असे नाही.
ते होतेच फक्त रोग निर्माण करण्यास त्यांना शरीर अटकाव करत. होते.
छान माहिती डॉ. कुमार. ही
छान माहिती डॉ. कुमार. ही बुरशी एवढी सामान्य आहे माहीत नव्हते. म्हणजे काही ठराविक रिस्क फॅक्टर्स नसल्यास उगाच बाऊ करू नये.
>>> उगाच बाऊ करू नये. >>>
>>> उगाच बाऊ करू नये. >>> +११
चंडीगड : भारतात आज बहुचर्चित रोश ॲटीबॉडी कॉकटेलचा पहिला वापर हरियानातील ८४ वर्षाच्या कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकावर करण्यात आला.
https://www.esakal.com/desh/84-year-old-haryana-man-gets-roche-antibody-...
सारखा सारखा स्टरॉइड चा उल्लेख
सारखा सारखा स्टरॉइड चा उल्लेख आहे आणि त्यांना काळी. बुरशी साठी जबाबदार धरले जात ते नक्की काय औषध असते आणि त्याचा वापर कोविड साठी का केला जातो.
Steroid मुळे covid बरा होत होता का? काय आहे हा प्रकार.
हेमंत,‘स्टिरॉइड्स’ >>>
हेमंत,
‘स्टिरॉइड्स’ >>>
इथे मी सविस्तर लिहीले आहे :
https://www.maayboli.com/node/70934
त्यातले
"हॉर्मोन्सचे औषधी उपयोग" वाचावे.
झिंकच्या गोळ्यांचा
झिंकच्या गोळ्यांचा कोविडमध्ये मारा करू नये.
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/black-fungus-mucorm...
सौम्य ते मध्यम कोविडच्या
सौम्य ते मध्यम कोविडच्या उपचारांसाठी Sotrovimab या नव्या अँटीबॉडी इंजेक्शन उपचाराला अमेरिकी औषध प्रशासनाने नुकतीच आपत्कालीन मान्यता दिली.
गेल्या काही महिन्यात विषाणूचे जे नवे ६ उपप्रकार आलेले आहेत (भारतातील धरून) त्यांच्या विरोधात हे औषध चांगले काम करते असे अभ्यासात दिसले आहे.
GSK हा उद्योग लवकरच हे औषध भारतातही उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहे.
"नवी अँटिबॉडी थेरपी, 12 तासात
"नवी अँटिबॉडी थेरपी, 12 तासात कोरोना रुग्ण झाले ठणठणीत"
https://www.esakal.com/desh/covid-19-new-antibody-therapy-monoclonal-ant...
वा ! आशादायक!
वा ! आशादायक!
कुमार सर,
कुमार सर,
लहान मुलांना फ्लूची लस ही कोरोनासाठी कितपत उपयुक्त आहे?
सखोल प्रयोगाविना हे काहीसे
सखोल प्रयोगाविना हे काहीसे सनसनी़ पसरवणारे वाटत नाही का?
"नवी अँटिबॉडी थेरपी, 12 तासात कोरोना रुग्ण झाले ठणठणीत"
https://www.esakal.com/desh/covid-19-new-antibody-therapy-monoclonal-ant...
हे ते 60000 चं रोश फार्मा चं
हे ते 60000 चं रोश फार्मा चं कॉकटेल असेल तर त्याने 7 दिवसात रुग्ण बरा होणे फार मोठे आश्चर्य नाही.तसेही बरेच रुग्ण 12 दिवसात बरे होतात किंवा मग वरच्या रस्त्याला लागतात(हे मी नाही लक्षणांची माहिती म्हणते.)
तेही अगदी इनिशीयल स्टेजेस मध्ये द्यावे लागते ना?
माबोवा,
माबोवा,
फ्लूची लस ही कोरोनासाठी कितपत उपयुक्त आहे >>>
अजिबात नाही. गैरसमज आहे.
.......
नवी अँटिबॉडी थेरपी >>>
बरोबर, हे लवकरच्या स्थितीत द्यावे लागते. परदेशात याचे बरेच प्रयोग झालेले आहेत आणि ते यशस्वी ठरले आहे .
.
आपल्याकडे सुरुवातीची उत्साहवर्धक बातमी म्हणून त्याकडे बघता येईल..
Pages