कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना Happy
बाबा बरे झाले आहेत, weakness आहे. आता dr नी आराम करायला सांगितला आहे.
लगेच थकत आहेत ते म्हणून.

एक प्रश्न आहे, कोविड उपचार घेऊन बरे झाल्यानंतर अंगातील उष्णता खूप वाढते का? ह्यांना उष्णता वाढून skin वर लाल फोड आले आहेत, गरमीचा त्रास सुद्धा होतो आहे.
(नांदेड खरे तर उष्ण शहर आहे इथे आम्ही सुमारे १२वर्षानंतर राहायला आलो आहोत, आधी पुण्यात होतो.)

किल्ली....
लवकर बरे होऊदेत बाबा
ईश्वर चरणी हीच प्रार्थना

किल्ली,
करोना विषाणूच्या घातकतेमुळे त्वचेवर देखील विविध प्रकारचे पुरळ ( रॅश) येऊ शकतात. त्याचे अनेक प्रकार असतात.
covis skin d.jpg

अर्थात तुमच्या बाबांना जो त्रास झाला आहे त्याबद्दल त्यांच्यावर उपचार केलेले डॉक्टरच अधिक सांगू शकतील.
Remdesivir व Tocilizumab यांचा त्वचेवर पुरळ हा दुष्परिणाम अल्प प्रमाणात आढळतो ( २% रुग्ण)

(‘औषधे उष्ण पडणे’ ही आयुर्वेदिक संकल्पना असावी. माझा अभ्यास नाही).

दादर कोहिनुर square
कार मध्ये बसूनच लस मिळणार>>
ज्यांच्याकडे कार नाही त्यांनी काय करायच ? Wink

लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांना तिथे बाधा झाली अशा काही बातम्या ऐकल्या.
लस घेण्यासाठी जाणे तर टाळु नाही शकत. तर अशा वेळी काय आणि कशी काळजी घ्यायची स्वतःची याबद्दल सांगाल का डॉक्टर ?

हे खरच भयावह आहे का हे काळच सांगेल..... असं असू देऊ नको रे देवा!!!
COVID-19 | A.P. strain at least 15 times more virulent

The new variant has shorter incubation period and the progress of the disease is much rapid

While it is too early to state whether the new coronavirus variant discovered by CCMB (Centre for Cellular and Molecular Biology) N440K, is the variant that is creating havoc in Visakhapatnam and other parts of the State, experts say the new prevalent variant, which is being called as the AP strain as it was first discovered in Kurnool, is at least 15 times more virulent than the earlier ones, and may be even stronger than the Indian variants of B1.617 and B1.618.

“We are still to ascertain, which strain is in circulation right now, as samples have been sent to CCMB for analysis. But one thing is certain that the variant at present which is in circulation in Visakhapatnam is quite different from what we have seen during the first wave last year,” said District Collector V. Vinay Chand, who has been updated by senior doctors in the health department.

Confirming the enhanced power of the virus, District COVID Special Officer and Principal of Andhra Medical College P.V. Sudhakar said, “We have observed that the new variant has shorter incubation period and the progress of the disease is much rapid. In the earlier cases, a patient affected with the virus would take at least a week to reach the hypoxia or dyspnea stage. But in the present context, patients are reaching the serious condition stage within three or four days. And that is why there is heavy pressure on beds with oxygen or ICU beds,” he said.
According to the experts the bottomline is — this variant is highly unpredictable.

The best way to keep it at bay is to follow COVID-appropriate behaviour of wearing good mask, keeping away from gatherings, sanitising hands regularly and staying home as far as possible, said Hema Prakash, senior microbiologist from GITAM Institute of Medical Sciences and Research.

भीतीदायक आहे हे.
कायम घरात राहण्याची, कायम संपर्क टाळण्याची चैन डिलीव्हरी बॉईज, हाऊस किपींग, स्वच्छता कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा वाल्यांना कशी करता येणार?
देव करो आणि लवकर चांगली औषधं आणि व्हॅक्सीन्स सर्व जगाला मिळोत.

लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांना तिथे बाधा झाली अशा काही बातम्या ऐकल्या.
>>>
या 'ऐकीव' बातम्या आहेत. तसे सिद्ध करणे अवघड आहे. मागच्या भागात यावर चर्चा झाली होती. (कावळा बसायला अन... सारखे ? )
रांग/गर्दी होऊ न देणे इतकीच काळजी घेता येईल.

>>COVID-19 | A.P. strain at least 15 times more virulent>>
या बद्दल, असे असण्याच्या शक्यते बद्दल आपल्याला काय वाटते कुमार सर???

रांग/गर्दी होऊ न देणे इतकीच काळजी घेता येईल. >>
धन्यवाद डॉक्टर. लसिकरणासाठी जाताना लक्षात ठेवु.

रेव्यु,
मला असे वाटते की अशा वृत्तपत्रीय बातम्या आपण फार मनावर घेऊ नयेत. कारण या संदर्भातली ही बातमी पहा :
https://www.newindianexpress.com/states/andhra-pradesh/2021/may/03/no-ne...

इथले एक वैज्ञानिक म्हणत आहेत की त्या स्ट्रेनची काळजी करायचे काही कारण नाही. अजून या विषयावर मला वैद्यकीय स्त्रोतांमध्ये नवी माहिती किंवा चर्चा वाचायला मिळाली नाही. यानिमित्ताने एक सुचवतो.

गेल्या काही दिवसात आपण अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी या आजारावर उपचारांच्या मदतीने मात केल्याचे वाचत आहोत. वर किल्लीनी पण त्यांच्या घरचे उदाहरण दिले आहे. आपण त्रिसुत्री, लसीकरण वगैरे सगळ्या गोष्टी पाळत आहोत. त्या जोडीला मनाचा खंबीरपणा आवश्यक आहे. त्यासाठी यासंदर्भातील भीती पसरवणाऱ्या बातम्या खोलात जाऊन न वाचणे, त्यांची कुटुंबात चर्चा न करणे आणि “आपल्याला आजार झाला तरी आपण नक्कीच त्यातून बाहेर पडू”, असे स्वतःलाच मुद्दाम बजावायचे.

जेवढे आपण सकारात्मक राहू तेवढा आपल्याला त्याचा फायदाच होईल.

कुमार सर,
मी 13 एप्रिल ला कोविशिल्ड चा पहिला डोस घेतला. 20 तारखेला मी आणि मिस्टर पॉसिटीव्ह आलो. आज 14 दिवस पूर्ण झाले. मला आता दुसरा डोस कधी घेता येईल? तसेच मिस्टरांना पहिला डोस कधी घेता येईल?

सान्वी
अंगात कुठलेही रोगलक्षण नसेल तर दोघेही आजपासून महिनाभरात कधीही घेऊ शकता.

डॉक्टर आज काल जे वाचतो आहे ते असे कि बरेच तरुण लोक आजाराची सुरुवातीची लक्षणे घरी काढतात आणि आजार गंभीर झाल्यावर ऍडमिट होतात मग त्याने death risk वाढते . जर या आजाराची काही लक्षणे वाटली तर टेस्ट केव्हा करावी आणि +ve झाल्यावर कसे ठरवता येईल कि ऍडमिट होण्याची गरज आहे किंवा नाही. हे विचारचण्याचे कारण म्हणजे आमच्या ओळखीच्या एक काकू वय ६० पुढे high BP , Diabetic असून रिकव्हर झाल्या आणि निरोगी वय ३५ वर्षे असलेली मैत्रीण oxygen वर आहे.

अश्विनी,
ताप + अन्य एखादे लक्षण दिसल्यावर चाचणी करावी.
( बाधिताशी संपर्क आला असल्यास, लक्षणविरहित असूनही करावी).

रुग्णालयात दाखल कधी व्हायचे / गरज नाही यासंबंधी मार्गदर्शक तक्ता आधी इथे दिलाय :
https://www.maayboli.com/node/78455?page=5

हा प्रतिसाद :
Submitted by कुमार१ on 5 April, 2021 - 21:02

डॉक्टर, काही प्रश्नः

१. दोन्ही डोस घेऊन झाल्यावर लशीचे संरक्षण आपल्याला किती दिवस मिळणार आहे?
२. लशीनुसार (वॅक्सीन / शील्ड) यात काही फरक पडणार आहे का?
३. Herd immunity अशी गोष्ट अस्तित्वात असते का?
४. जसा कोरोना स्वतःला म्युटेट करतोय तशी मानवी पेशीही स्वतःत बदल करत असेलच ना? मग ते बदल अधिक प्रभावी होण्यासाठी काही करता येते का ?

झाला एकदाचा लसीकरणाचा पहिला डोस
फास्टेस्ट फींगर फर्स्ट खेळून लेकीने माझ्यासाठी स्लॉट पटकावला आणि आज कोवि शिल्डचा पहिला डोस मला मिळाला..

त्यावेळी लक्षात आलेल्या काही गोष्टींची नोंद इथे करते आहे
१- https://www.cowin.gov.in/home आणि आरोग्य सेतू ॲप, उमंग ॲप अशा तीन ठिकाणांहून लसीकरणाचा स्लॉट बुक करता येतो. उमंग ॲप मी वापरून पाहिलेलं नाही. मात्र आरोग्यसेतु ॲप पेक्षा cowin वेबसाइटवरून स्लॉट शोधणे जास्त सोप्पे आहे. आरोग्य सेतू ॲप मधून शोधताना पिनकोड नुसार शोधावं लागतं. त्यातही तो सर्च फक्त त्या पिनकोड मधलीच लसीकरण केंद्र शोधतो - जवळपासचे शोधत नाही. Cowin वेबसाईट मध्ये मात्र एका वेळेला जिल्ह्यातील सगळी लसीकरण केंद्र दिसतात

२- पहिल्या डोस साठी तरी एकाच आधार कार्डाची नोंदणी एका पेक्षा जास्ती मोबाईल नंबरवर करता येते आणि एका मोबाईल नंबर वर चार आधार कार्ड नोंदणी करता येतात. याचा फायदा घेऊन माझं आधार कार्ड आम्ही तीन-चार नंबर वर रजिस्टर केलं होतं आणि तीन किंवा चार वेगवेगळ्या लॅपटॉप वरून लसीकरणाचे केंद्र शोधत होतो.

३- 18 ते 44 वयोगटासाठी मुंबईमध्ये लसीकरण केंद्र हे गुलबकावली च्या फुलासारखे दुर्मिळ आहे त्यामुळे मी मुंबई, संपूर्ण ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि पालघर जिल्हा अशा माझ्या घरापासून दोन एक तास अंतरावर असलेल्या जागा सुद्धा शोधत होते

४- साधारणपणे सकाळी 9 आणि संध्याकाळी साडेसात वाजता हे स्लॉट उपलब्ध होतात असं शुक्रवारपासूनच निरीक्षण होतं. शनिवार रविवार सोमवार मात्र प्रयत्न करूनही स्लॉट मिळत नव्हता अगदी क्लिक केलं, तरी हे सेंटर बुक आहे असाच मेसेज येत होता.. आज सकाळी मात्र नऊ वाजताच्या सुमारास लेकीला पटकन स्लॉट मिळून गेला. हा स्लॉट आमच्या घरापासून दीडेक तास अंतरावर पेण मध्ये होता

५-संध्याकाळी चार चा स्लॉट असला तरी, टोकन सिस्टीम आहे का अशा काळजीपोटी आम्ही अकरा लाच मुलुंड मधून निघालो - जिल्हा क्रॉस करताना अडवतील अशी शंका होती. लसीकरणाच्या बुकिंग ची पावती घेतली होती मात्र जाऊ देतील का अशी खात्री नव्हती. प्रत्यक्षात कोणी सुद्धा अडवलं नाही

६-साधारण साडे बाराच्या सुमाराला मी लसीकरण केंद्रावर पोचले- तिथे अजिबात गर्दी नव्हती. आणि पाच मिनिटात माझं काम झालं सुद्धा. त्यानंतर अर्धा तास तिथे निरीक्षणासाठी थांबवलं होतं. एकंदरीत गर्दी अजिबात नसल्यामुळे सोशल डिस्टंसिंग व्यवस्थित पाळलं गेलं होतं

लसीकरण करण्यासाठी एवढा अट्टाहास करू नये, जवळच्या केंद्रात सहजपणे लस उपलब्ध होईपर्यंत थांबलेलं बरं असा अनेक जणांचा विचार असेल याची कल्पना आहे- मात्र सगळ सोशल डिस्टंसिंग पाळूनच लवकरात लवकर लस घेणे मला स्वतःसाठी आवश्यक वाटत असल्यामुळे हा आटापिटा मी केला होता

कार मध्ये बसूनच लस मिळणार >> हे जितके जास्त होईल तितके चांगले होईल. अर्थात जागा पण हवी. परंतु त्यामुळे किमान रांगेतली गर्दी विभागली जाईल.

>>परंतु त्यामुळे किमान रांगेतली गर्दी विभागली जाईल.<< +१
मुंबईत कदाचित हे शक्य होइल. इथे काहि ठिकाणी टेस्टिंग आणि शॉट्स ड्राइवथ्रुच होते. आपोआप, सोशल डिस्टंसिंग...

माधव, बऱ्याच काळानंतर तुमची भेट होते आहे आणि प्रश्नावली पाहून आनंद झाला !

१.दोन्ही डोस घेऊन झाल्यावर लशीचे संरक्षण आपल्याला किती दिवस मिळणार आहे?
नक्की माहित नाही; अंदाजे सहा ते आठ महिने.

२. लशीनुसार (वॅक्सीन / शील्ड) यात काही फरक पडणार आहे का?
बहुदा नाही. हे वर्ष या संबंधी विदा मिळवण्यात जाईल. त्यानंतरच काही बोलता येईल.

3. Herd immunity अशी गोष्ट अस्तित्वात असते का?
इतर आजारांच्या बाबतीत असते. या आजाराच्या बाबतीत मात्र बऱ्याच तज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.

.४. जसा कोरोना स्वतःला म्युटेट करतोय तशी मानवी पेशीही स्वतःत बदल करत असेलच ना? मग ते बदल अधिक प्रभावी होण्यासाठी काही करता येते का ?
सुयोग्य निसर्गस्नेही जीवनशैली : आहार, व्यायाम निकोप मन इत्यादी इत्यादी
Bw

ते ज्यांना चालताही येत नाही, त्यांच्यासाठी. >> ओके..

माझ्या मैत्रिणीच्या भावाबद्दल इथे विचारले होते. तो दवाखान्यातुन ३ दिवसांनी घरी आला. आता हळूहळू बरा होत आहे.

कुठला फॉरींनचा मोठा डॉकटर तिकडे दोन्ही डोस घेऊन इकडे सासर्याला बघायला आला म्हणे

आणि भारतात भारतीय कोविड होऊन मेला म्हणे

कुमार सर
कोवॆक्सिन बी १६१७ ला रोखू शकते असे वक्तव्य आहे
कोविशील्ड हे करते का?

Pages