
लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................
दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.
भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.
दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.
लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.
ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :
१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................
भरत जी, सगळी चर्चा टक्केवारीत
भरत जी, सगळी चर्चा टक्केवारीत आणि प्रत्यक्ष आकड्यात झाली तर बरे...... टीव्ही वर तरी चाचण्या आणि केसेस दोन्ही मी तरी क्वचितच ऐकलेत
जी नको प्लीज.
जी नको प्लीज.
आजची इं.ए.ची हेडलाइन पहा.
A glimmer, positivity declines
पण या आठवड्यात मृत्यूचे प्रमाण वाढू लागल़य. महाराष्ट्राचा मृत्यू दर वाढू लागलाय.
वैद्यकीय ऑक्सिजनची बचत करणारे
वैद्यकीय ऑक्सिजनची बचत करणारे आय आय टीचे नवे संशोधन :
प्रारूप तयार. अभियंत्यांना आवाहन.
https://timesofindia.indiatimes.com/india/iit-bombay-devises-method-to-r...
सध्या कोविडची महासाथ असल्याने
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.>>>
धन्यवाद डॉक्टर .
आज टीव्ही वर आरोग्य मंत्री मा. टोपे यांनी म्युकर मायकोसिस वरील उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत होणार असे सांगितले. त्याच सोबत सद्यस्थितीत या आजाराचे साधारण 1500 रुग्ण राज्यात असून 500 रुग्ण बरे झालेत असेही सांगितले.
या आजारातून दृष्टी वा एखादा अवयव गमावणे , किंवा इतर विकालांगता न निर्माण होता रुग्ण बरा होऊ शकतो का?
या अशा अभूतपूर्व आजारांमुळे मन भयग्रस्त होऊन जाते आहे...
स्वा सु
स्वा सु
हा आजार तसा गंभीर आहे. तुम्ही लिहिल्याप्रमाणे जर एक तृतीयांश रुग्ण एव्हाना बरे झाले असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे.
या आजाराचे भवितव्य रुग्णांच्या मूळ सहव्याधी, कोविडची तीव्रता व रुग्णालयातील वास्तव्य इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते. आजार वेळीच लक्षात आल्यास आणि प्रभावी उपचार लागू पडल्यास काही रुग्ण बरे होतात.
आजार शरीरात किती पसरतो यावर रुग्णाचे भवितव्य अवलंबून असते.
प्रभावशीलता सामान्यतः: पुढे
प्रभावशीलता सामान्यतः: पुढे कदाचित विकसित होणार्या विषाणूंचा धोका आधीच ध्यानात ठेवऊन आता लशी विकसित केल्या जातात का , म्हणजेच विषाणू कसे वागतील याचे काही प्रारूप उपलब्ध आहेत का?
Submitted by mi_anu on 18 May
Submitted by mi_anu on 18 May, 2021 - 16:57
Submitted by कुमार१ on 18 May, 2021 - 17:58
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद मी_अनु आणि डॉक्टर कुमार. उत्तर सरळसोपे नसणार याबद्दल शंकाच नाही. इतक्या अथक प्रयत्न करूनही कोविडशी लढाई जिंकून शेवट असा दुर्दैवी होण्याबद्दल वाईट वाटते आणि काळजीही.
रेव्यु"भविष्यातील करोना लस :
रेव्यु
"भविष्यातील करोना लस : नवे संशोधन" असा एक सविस्तर प्र मी आधी लिहिलाय.
शोधणार का ?
डॉ कुमार:
डॉ कुमार:
अजून एक प्रश्न
करोना संसर्ग, स्टिरॉइड, ऑक्सिजन, कॅन्सर,डायबिटीस हे सर्व नसतानाही म्युकर मायकोसिस संसर्गाची शक्यता आहे का?राजस्थान सरकार ने याला संसर्गजन्य रोग म्हणून जाहीर केले आहे त्यामुळे शंका.
राजस्थान सरकार ने याला
राजस्थान सरकार ने याला संसर्गजन्य रोग म्हणून जाहीर केले आहे त्यामुळे शंका.
>>>
इथे दिलेल्या शास्त्रीय माहितीनुसार हा बुरशीजन्य आजार व्यक्तीपासून व्यक्तीस अशाप्रकारे संक्रमित होत नाही
Mucormycosis can’t spread between people or between people and animals.
https://www.cdc.gov/fungal/diseases/mucormycosis/risk-prevention.html
.................
राजस्थानने असे का म्हटले आहे याचा मी देखील शोध घेत आहे....
अनु,
अनु,
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
(Mycoses. 2007; 50(4):290-6 (ISSN: 0933-7407))
धन्यवाद डॉ कुमार.
धन्यवाद डॉ कुमार.
राजस्थान ने एपिडेमिक म्हणून जाहीर केलाय
बहुधा प्रत्येक आयत हा चौकोन असतो पण प्रत्येक चौकोन हा आयत नव्हे, तसे हा महामारी संसर्गजन्य (प्रत्यक्ष श्वास, हवा, स्पर्श, उत्सर्जन यातून न पसरणारा) नसून आणि तरीही वेगाने रुग्णसंख्या वाढणारा रोग असेल.
पांढऱ्या बुरशीचा आजार
पांढऱ्या बुरशीचा आजार (Candidiasis)
प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या रुग्णांमध्ये या प्रकारचा आजार होऊ शकतो. असे काही मोजके रुग्ण सध्या बिहार मध्ये आढळले आहेत( https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-black-fungus-mucormycosi...).
कोविड रुग्णांना याचा धोका होऊ शकतो.
या आजारात घशामध्ये असे चित्र दिसते
याच्या उपचारासाठी clotrimazole, miconazole, nystatin, fluconazole
या प्रकारची औषधे वापरली जातात.
ब्लॅक फंगसच्या
ब्लॅक फंगसच्या प्रादुर्भावामागे औ द्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी घेताना पुरेशी काळजी - निर्जंतुकीकरण न घेणं, द्र्व ऑकिजनसाठी शुद्ध केलेलं पाणीच वापरण्याकडे दुर्लक्ष ही कारणं असू शकतील असं काल एन डी टी व्हीवर ऐकलं.
दवा के नाम पे जहर ?
लाळ वापरुन करता येणार करोना
लाळ वापरुन करता येणार करोना चाचणी
https://maharashtratimes.com/international/international-news/coronaviru...
सोपे होइल मग.
आता ही जी नवीन दोन डोस
आता ही जी नवीन दोन डोस दरम्यानची दिवस संख्या ठरवली गेली आहे त्याचे काही संशोधनात्मक संदर्भ आहेत का?
कोविशील्डच्या अधिकृत
कोविशील्डच्या अधिकृत माहितीपत्रकानुसार सुरुवातीस दोन मात्रामधले अंतर चार ते सहा आठवडे असे होते. परंतु परदेशात झालेल्या अभ्यासानुसार, ते बारा आठवड्यांपर्यंत ठेवल्यास अधिक प्रतिकारशक्ती मिळते असा विदा त्यांच्याकडे होता.
(https://www.seruminstitute.com/pdf/covishield_fact_sheet.pdf).
मात्र आता आपल्याकडे जे अंतर वाढवले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही. तसा संदर्भ माझ्या पाहण्यात नाही.
>>मात्र आता आपल्याकडे जे अंतर
>>मात्र आता आपल्याकडे जे अंतर वाढवले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही. तसा संदर्भ माझ्या पाहण्यात नाही.>>
लशीचा तुटवडा आणि त्या मुळे पुढे ढक ल ले?
लशीचा तुटवडा आणि त्या मुळे
लशीचा तुटवडा आणि त्या मुळे पुढे ढक ल ले?>>>>>मलाही तसच वाटतं, पण शास्त्रीय आधार नसताना अस करू शकतो का?
दुसरा काही उपाय आहे का?
दुसरा काही उपाय आहे का?
डोळ्यात आयुर्वेदिक औषध टाकूण
डोळ्यात आयुर्वेदिक औषध टाकूण ऑक्सिजन लेवल वाढत असल्याचा दावा
https://www.esakal.com/desh/andhra-pradesh-krishnapatnam-ayurvedic-medic...
ज्येष्ठ पर्यावरणवादी
ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी करोना संसर्गाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
आदरांजली !
“वृक्ष म्हणजे प्राणवायूची बँक” असे त्यांचे वचन आहे.
>>आदरांजली !>> +११
>>आदरांजली !>> +११
ज्या भारतीय नागरिकांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतलेत, त्यांना सुरुवातीचे काही महिने आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही.
https://www.esakal.com/desh/indians-global-trips-may-be-hit-as-covaxin-n...
Remdisiver covid वर वापरा असा
Remdisiver covid वर वापरा असा विदा त्या वेळेस दिला जात होता.
आता ते औषध corona उपचार वर काही कामाचे नाही असा पण विदा दिला जातो.
कोणत्याच विदा वर विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही .arthvat अभ्यासावर आणि सत्य लपवून जाहीर केलेले निष्कर्ष ह्याचेच स्तोम जास्त आहे.
आता ब्लॅक fugas अचानक कोठून उगवले.
नक्की काय जबाबदार आहे त्या गोष्टी ल ते कधीच सांगितले जाणार नाही.
बऱ्याच औषधांचे आंधळे प्रयोग ह्या covid काळात केले गेले आहेत.आणि त्या मुळेच व्हायरस धोकादायक झाला हे पण कबूल केले जाणार नाही.लस अजुन काय गुण उधळणार आहे हे वर्षभरात दिसेलच.
आता लस घ्यावी की नाही ...?
आता लस घ्यावी की नाही ...??
https://youtu.be/qAKGBMatmqU
तेजो,
तेजो,
वरील व्हिडीओतील मतांचे खंडन करणारी अन्य तज्ञांची मते इथे वाचता येतील :
https://www.euronews.com/2021/04/05/experts-debunk-claims-that-vaccines-...
त्यात विषाणूचे नवे उपप्रकार निर्माण होण्यामागचे विज्ञान समजावून सांगितलेले आहे.
क्षय रोगाचे विषाणू.
क्षय रोगाचे विषाणू.
पोलिओ चे विषाणू
कांजण्या,देवी ,गोवर,स्वाइन फ्ल्यू,hepatasis,rubela,एड्स.
हे सर्व विषाणू मुळेच होणारे आजार आहेत ह्यांचे विषाणू का mutated झाले नाहीत वेगाने ज्या वेगाने corona च विषाणू mutated होत आहे.
वय वर्ष एक असलेल्या विषाणू जन्य रोगावर मानवी इतिहासात कधी लस निर्माण केली गेली आहे का?
क्षय असेल किंवा पोलिओ हजारो वर्षा पूर्वी पासून अस्तित्वात आहेत त्यांचा विषाणू आता किती घातक झाला पाहिजे होता का नाही झाला?
क्षय रोगावर जी औषध वापरली जातात ती एक एक महिन्यांनी बदलली आहेत का? जशी corona ची बदलली गेली.
गेली कित्येक वर्ष एकच प्रकारची औषध क्षय रोगावर दिली जातात आणि ती काम सुद्धा करतात.
तुम्ही drug resistant t b
तुम्ही drug resistant t b बद्दल ऐकलेलं दिसत नाही.
तेच तर मला सांगायचे आहे .
तेच तर मला सांगायचे आहे .
Tb वर पूर्ण उपचार न करता अर्धवट उपचार केल्यामुळे औषध ना tb चे विषाणू दाद देत नाहीत त्यांच्या मध्ये हा बदल अर्धवट औषध उपचार मुळे होतो.
Corona वर कोणते औषध लागू पडेल ह्याची पूर्ण खात्री नसल्या मुळे विविध औषध वापरली म्हणूनच तो जास्त घातक झाला हे लॉजिक चुकीचं वाटत नाही.
एक वर्ष वय असलेल्या विषाणू वर लस पण निघाली आन ती लोकांना पण दिली त्या मुळे विषाणू नी स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतः मध्ये बदल केला हे पण लॉजिक चुकीचं वाटत नाही.
पूर्ण अभ्यास करून च उपचार पद्धती ठरवणे गरजेचे होते.लस तर सखोल अभ्यास शिवाय बाजारात आलीच नव्हती पाहिजे होती..
कोणते विषाणू म्युटेट होतात
कोणते विषाणू म्युटेट होतात आणि कोणते नाही याबद्दल डॉ कुमार यांनी आधीच लिहिलं आहे, असं आठवतं.
म्युटेशनचा लसीकरणाशी काही संबंध सिद्ध झालेला नाही. लशी आल्या नसत्या तरीही विषाणू म्युटेट झालेच असते.
इतक्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने प्रसार पावणार्या रोगाला आवर घालण्यासाठी लसीकरण हा एक महत्त्वाचा उपाय आहे. म्हणूनच आणीबाणीच्या परिस्थितीत या लसींना परवानगी दिली गेली आहे.
पर्फेक्ट शस्त्र मिळायची वाट न पाहता जे मिळेल ते शस्त्र घेऊन लढणं आवश्यक आहे.
Pages