कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आफ्रिकी देशां चे प्रमुख म्हणतात - पुरेशा लसी आणि त्या देण्यासाठी सामग्री मिळालेले नाहीत.
प्रगत देश व्हॅक्सिन हेजिटन्सीची टेप लावताहेत.

Faheem Younus, MD
@FaheemYounus
·
Never forget:

1. What creates variants?
Ongoing viral spread

2. Who’s most at risk?
Nations without access to test/drugs/vaccines or anti-science ppl

3. How/when will it end?
Vaccinate the world, equitably. Pandemic will end in different nations at different times

अतुल
सध्या मी एका महत्त्वाच्या कामासाठी आठवडाभर बाहेर आहे. त्यामुळे नवा धागा शक्य होणार नाही. तुकड्या-तुकड्यात अधिकृत माहिती मिळेल ती बघतो.
मुळात त्यावर आता दोन्ही बाजूंनी उलटसुलट बोलले जात आहे.
बघतो जरा सवडीने
धन्यवाद

Omicron बद्दल काही अधिकृत पत्रक वाचले असता, आतातरी ठाम उत्तरांपेक्षा वैज्ञानिकांना पडलेले प्रश्नच जास्त आहेत असे दिसते.
हा एक चांगला दुवा आहे
https://yourlocalepidemiologist.substack.com/p/omicron-update-nov-29

१. सध्या तरी या नव्या प्रकाराने आजारी पडलेल्या लोकांत लक्षणे सौम्य आहेत.

२. ज्यांना आधी कोविड होऊन गेला आहे त्यांची ती प्रतिकारशक्ती या नव्या प्रकारचा विरुद्ध लढण्यास बहुदा उपयुक्त नाही.

३. मात्र या नव्याची प्रसारक्षमता कमी असण्याची शक्यता आहे.

तुर्त इतकेच.

विशेषणांचा भडिमार शिकायचा असेल तर वर्तमानपत्रे व वाहिन्यांची शिकवणी घ्यावी.
भयंकर, थयथयाट, भीषण, संक्रमणात प्रचंड वाढ...... २२ लोकांना काल लागण झाली आणि आज ३३ झाले तर लगेच १५०% वाढ.... आणि २२ चे १५ झाले तर लक्षणीय घट.......
मला वाटत प्रत्यक्ष विदापेक्षा, या विशेषणांमुळे माणूस घाबरतो.....

कुमार सर
आप्ण दिलेल्या लिंकमधील लेख अ त्यंत संतुलित आहे

ही सगळी exersize मागे डेल्टा प्लस च्या वेळी पण झाली होती ना? त्यावेळी ही डेल्टाचा मोठा भाऊ आला असे सगळे म्हणत होते पण तो फक्त कागदावरच घातक होता. सगळी नासधूस डेल्टानेच केली.

कुमार सर
आप्ण दिलेल्या लिंकमधील लेख अ त्यंत संतुलित आहे

रे व्यु
होय, तिथले विश्लेषण अभ्यासपूर्ण वाटते.

Omicron बद्दल दक्षिण आफ्रिकी डॉ. ची आतापर्यंतची निरीक्षणे :

१. ज्याला लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत

३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

साथीच्या रोगांचा इतिहास.
1) लागण
२) प्रसार
३) उच्च पातळीवर .
४) उतरती कळा.
५) आणि साथ समाप्त असाच आहे.
जेव्हा डॉक्टर,उपचार नव्हते तेव्हा सुद्धा अनेक साथी आल्या आणि गेल्या सुद्धा.
मग प्रश्न.
लस न घेतल्या मुळे covid व्हायरस शरीरात खूप वेळ राहिला आणि त्याचे उत्परिवर्तं न होवून आताच varrient निर्माण झाला तो घातक होण्यास लस न घेतलेले जबाबदार आहेत असा दावा का?

>>>लस न घेतल्या मुळे covid व्हायरस शरीरात खूप वेळ राहिला आणि त्याचे उत्परिवर्तं न होवून आताच varrient निर्माण झाला तो घातक होण्यास लस न घेतलेले जबाबदार आहेत असा दावा का?>>>
हा दावा कोणी केला आहे?

१)South आफ्रिकेत हा नवीन varrient सापडला आहे.
२)तिथे लसीकरण खूप कमी झाले आहे.
३) ज्या ठिकाणी सापडला आहे तिथे तर अत्यंत कमी लसीकरण झालेले आहे.
अशी वर्णन प्रतेक संस्था करतात अगदी who सुद्धा.
Indirectly तेच सांगायचे असते लसीकरण न झाल्यामुळे हे घडले.

लस न घेतल्या मुळे covid व्हायरस शरीरात खूप वेळ राहिला आणि त्याचे उत्परिवर्तं न होवून आताच varrient निर्माण झाला तो घातक होण्यास लस न घेतलेले जबाबदार आहेत. >> हे सिद्ध झाले आहे का ते माहित नाही पण मला हे तर्कशुद्ध विधान वाटते. अठरा वर्षे पूर्ण झाली असूनही जर काही इतर शारीरिक समस्यांमुळे तुम्ही लस घेऊ शकत नसाल तर किमान घराबाहेर पडू नका. लस उपलब्धच नव्हती तेव्हा वेगळी गोष्ट होती. आता लस न घेणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.

Om बाधित दोन रुग्ण कर्नाटकात आढळले आहेत असे आत्ता बातम्यांमध्ये सांगितले
त्यामुळे महाराष्ट्र /कर्नाटक सीमा दोन्हीकडून ओलांडताना rt-pcr आणि तत्सम बंधने आली.

कोविड चा नवा वेरिअंट आला आहे एरिस. ए आर आइ एस बहु तेक. तर तो मला झाला आहे. परवा बुधवारी हॉस्पिटल मध्ये जाउन एक इंजेक्षन
घ्यायचे होते. कॅन्सर चे जे औ ष ध आहे ते रोज घ्यायचे असते पण त्यामुळे सेल काउं ट कमी कमी होतो. तो जाग्याव र राहावा म्हणून हे इंजेक्ष न दर आठव्ड्यात एक. ते काम बरोबर फिट झाले. दहा मिनि टा त. पण तेथील बराच स्टाफ ताप सलेला होता व डोके दुखी सर्दी खोकला ची लक्षणे दा खवत होता. मी बुधवारी गेले होते. गुरुवार पासून खालील लक्षणे आली.

१) रनी नोज सारखे नाक गळ णे.
२) संध्याकाळ परएन्त ताप आला. ९९.७ पासून १००.९ पुढे दोन दिवस १०१, १०२ १०३ ( शनिवारी काल) आता परत १००.९ ला आला आज सकाळी.
३) वासाचे सेन्सेशन जाणे हे झाले असावे कारन मी गुरुवारी परफ युम लावले होते त्याचा वास कमी झालेला वाटला.
४) भूक एकदम कमी होणे व तों डाची चव आजिबात जाणे. शुक्रवारी डब्यात साखी नेलेली पण अगदी कागदा सारखीच लागली. मी शुक्रवार पिझा नाइट म्हणून पिझा मागवला व उद्या काही स्वय्पाक जमणार नाही म्हणून एक जास्तिचा मागवला. ऑफिसात मायक्रो करुन घेइन म्हणून. १४ तारखेला कंपनीत सुट्टी आहे म्हणून शनिवारी वर्किन्ग होते. घरी बसून काय करायचे म्हणून गेले. माझी रूम एकदम कोपर्‍यात व आयसोलेटेड आहे. कोणी येत नाही. कोणाला इन्फेशन द्यायला. थोडे थोडे झोपत काम केले तीन परेन्त. पण मग अगदी बसवेना उठवेना. पण आटो करुन घरी आले. वेदर खूपच छान होती. प्रेम ळ उन्हे. मध्येच् ढगाळ वातावर्ण.

४) कुत्रा फिरवून मग पांघ रूण घेउन बसले पण ताप कमी होउ नाही. १०३ ला पोहोचला. अ एक झोप काढ ली. कुत्र्याची नखे कापायला जायचे होते पण डॉक्टरला इन्फेक्षन नको म्हनून तिला मेसेज केला. मग डोलो घेउन पॉड कास्ट ऐकत पडले. एनर्जी एकदम कमी झालेली.

५) भूक कमी कमी होते. बेन्ने डोसा व कांचिपुरम इडली मागवली पण अर्धीच खाल्ली. तिखट तोंडाला लागू देत नाही आहे.

६) आज थकवा कमी आहे पण आता मास्क सॅनिटायझर, ओक्सिमि टर घेउन बसले आहे. आम्ही नेहमी ड्रॉइन्ग रूम मध्ये झोपतो पण काल बेड्रूम मध्ये मुक्काम हलवला आहे. गर्ज पडेल तेवढेच बाहेर जाइन.

७) ताप कमी झाला की हॅकिन्ग कफ सुरू होतो हे पन झाले आज सकाळी.

हे सर्व लक्षणे ट्विटर वर द लिव्हर डॉक ह्यांनी लिहिली आहेत ती तंतोतंत बरोबर दिसली.

१६ परेन्त ठीक व्हावे. १७ ला एक हलाल ऑडिट आहे. झिन्दाबाद. माझी दोन व्हॅक्सिनेशन झालेली आहेत कोविडची.

Pages