कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad
आता आणखी धागा काढावा न लागो.
"महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे."
दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी आहे म्हणून समाधान मानायचे की प्रत्यक्ष आकडे विक्रमी आहेत म्हणून वाईट वाटून घ्यायचं? अशी परिस्थिती आहे.

त्यात लॉकडाउनचा भाग आहे. सध्या लसीकरणाचा बोऱ्या वाजलाय.
कोविनवर तारखा नाहीत. Walk in ला गर्दी.
मुंबैचे आयुक्त आणि पालकमंत्री म्हणताहेत, तिसरी लाट येईल अथवा येणार नाही, आम्ही त्या दृष्टीने तयारी करतोय.

१८ ते ४५ वाल्यांना वॉक इन चा पर्याय नाही आहे, ऑनलाईन नोंदणी करावी लागेल अन जिथली अपॉइंटमेंट मिळेल तिथेच फक्त लस मिळेल असे काल बातम्यांमध्ये सांगितले. हे एक बरे थोडी तरी गर्दी कमी असेल अशी आशा

हो, कोव्हीड आजाराचे स्वरूपच असे आहे की जागतिक स्तरावर ही कोव्हीड-२२ ची तयारी चालू आहे. मुंबईचे पालक मंत्री हे भान ठेवून असतील तर बरेच आहे. लॉकडाऊन संपल्यावर नियमावली हवी आहे आणि लोकांनी ती पाळायला हवी आहे. लसीकरणात शिस्त हवी. गणपती मंडळांना योग्य ते प्रशिक्षण देवून कामाला लावायला हवे. त्यांना घरोघरी वर्गणी वसूलीचा अनुभव आहे. ह्या वर्षी घरोघरी जाऊन लस द्यावी. (जस्ट एक कल्पना आहे, पटली नाही तर द्या सोडून).

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.>>>> खरच.
सध्याच लसींचा तुटवडा जाणवतोय, १ मे नंतर काय परिस्थिती असेल?

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.>> कोविडवर हा शेवटचा धागा ठरो अशी भाबडी अपेक्षा आहे.

आज च आमच्या कंपनी ने माहिती मागवली आहे. कंपनी मधील कर्मचारी व त्यांच्या घरच्यांसाठी लसीकरणाची सोय करणार आहेत.

सर्वांशी सहमत.
आपले मनोधैर्य टिकवूया एवढेच म्हणतो.

आजच आरोग्य सचिव श्री पॉल यांनी (कदाचित वेगळे काही असतील) सूचनावजा भाष्य केले आहे की घरी देखील मास्क परिधान केला पाहिजे... कारण ( हवेतून सुध्दा विषाणू) पसरण्याची शक्यता. त्याच बरोबर घरी संशयित असलयस मास्क घालावा. यातील दुसरा भाग समजू शकतो परम्तू पहिला भाग कळणे अवघड आहे.... या तून भय पसरण्याची शक्यता अधिक.... या मागे वैज्ञानिक आणि तर्कसंगत कारण...... अतिव पूर्व सावधगिरी नव्हे .... असल्यास येथील निष्णात व्यक्ती सांगतील का ? कारण आज पर्यंत दिलेल्या सूचनात ( अगदी युरोप मधील गंभीर परिस्थितीत सुध्दा) असे काही सांगितले नव्हते...
अन हे व्यवहार्य आहे का? झोपतांना सुध्दा घालायचा का? माझ्या सारख्या व्यक्तींना बराच वेळ घातल्या नंतर थोडा वेळ काढून ठेवावा लागतो....

Dr कुमार.
विषयांतर होते आहे पण तरी सल्ला हवय.
Oxymeter कोणत्या कंपनीचं उत्तम दर्जा च आहे?

आपले मनोधैर्य टिकवूया एवढेच म्हणतो.>>
(सगळे नियम पाळून , लस घेऊन, शक्य ती मदत इतरांना करून, आपापल्या परिने योगदान देत )
हर हर महादेव म्हणून तुटून पडू..... वीरश्री संचारणारच.
वीरांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे महाराष्ट्राला, आपल्याला नाही जमणार तर कुणाला जमणार. Happy
धन्यवाद कुमारसर. नेहमीप्रमाणेच सकारात्मक व माहितीपूर्ण.

मास्क खूप वेळ वापरला की अस्वस्थ वाटायला लागते . continue खूप वेळ वापरल्या मुळे विपरीत परिणाम तर होणार नाहीत ना.

* घरी संशयित असलयस मास्क घालावा >>> इतकेच ठीक आहे. अतिरेक पटत नाही.

* Oxymeter कोणत्या कंपनीचं उत्तम दर्जा >>
हा तंत्रज्ञानाचा भाग असल्याने तुलनात्मक अनुभव नाही. माझा अभियंता मित्र म्हणतो की जर्मन बनावटीचे चांगले.

संशयित आणि असंषयीत हे कसे ओळखणार ? हे एवढे सोपे असते तर इतके महाभारत घडलेच नसते ना ?

म्हणून घरातही वापरल्यास अजून 2,4 लोक वाचतील म्हणून ते सांगितले आहे , ह्यात भय वगैरे काही नाही

सांगणारे कायपण सांगत असतातच
3 दा गरम पाण्याने आंघोळ करा
5 दा वाफ घ्या
7 वेळा गुळण्या करा

अमुक करा , तमुक करा
जे जमते ते करणे

आम्ही तर रोज 2 दवाखान्यात मिळून 120 पेशन्ट पहातो
फक्त मास्क वापरतो , N95. तेही प्रत्येकाला महिन्याला 5,10 येतात

आम्ही 4 ते 5 मास्क एकेक करत वापरतो , मग पुन्हा पहिला मास्क
अशा प्रकारे महिना जातो
ग्लोज नाही , शिल्ड नाही

कधी कधी फक्त सर्जिकल मास्क येतात

कापडी मास्क हॉस्पिटल स्टाफने वापरू नयेत असे आमचे वरिष्ठ अगदी दरडावून बोलले आहेत , कुणी स्टाफ मेला कोविडने तर इन्शुरन्स वाले सीसीटीव्ही चेक करतात म्हणे , मास्क नसेल किंवा कापडी मास्क असेल तर क्लेम रिजेकट करतात म्हणे

कोविडने नवीन नॉर्मस् तयार होत आहेत

Hindsight is always 20-20. आपल्या सगळ्यांचे अंदाज चुकवत कोव्हिडची त्सुनामी भारतात उसळली आहे. मीही याच कल्पनेत होते की आता 2021 मध्ये सगळे सुरळीत सुरू होईल. आता असे वाटते की आपण माणूस म्हणून विचार केला. आपण कोव्हिड च्या विषाणूच्या डोक्याने विचार केला पाहिजे. शत्रूची पुढची चाल ओळखायची असेल तर त्याच्या strategy चा अभ्यास करायला हवा.
पुढचे विचार इंग्रजीत आहेत कारण मराठीत हा विचार करायला वेळ लागतो.
The RNA viruses love to mutate often. The first time Corona virus found human hosts it hadn't adapted itself to infecting humans so the spread was relatively slow and the disease was also relatively mild. The virus mutates when it replicates. And the virus can replicate only inside the host. So as the number of people getting Corona increases, the speed at which virus mutates also increases - some of these mutations will be beneficial to the virus and those mutant strains will spread more. This is exactly where we are now. The Corona virus has found its heaven in India. With such huge population that loves to gather in large crowds, India will be the breeding ground for the future deadlier strains of Corona. The second wave itself is far from over.
To me, it looks like we are in for a long haul with Corona.
The only way out as I see is large-scale and diversified vaccination program. Get all possible working vaccines to India and get everyone vaccinated on fast track. A mixed vaccinated population will be a good deterrent for spreading of new mutant strains.
At the same time, maintaining face masks, social distancing, and hand washing practices is a must. No social gatherings for at least another year.
And most importantly, keeping track of the virus - frequent, random sequencing of samples of Covid patients to look at any changes at the sequence level. If we are able to correlate these with worsening of symptoms then it may forewarn us of the new wave. India does not have any infrastructure to support such tracking. Indian government should request global support and funding for this initiative. We can work in collaboration with epidemiologists across the world for this program. The world will be definitely interested in this as any new wave will have global impact.
I am sure, I am not alone who is thinking on these lines. But the real question is, are the people who are powerful enough to execute these plans thinking about it?

ब्लॅककॅट >> हे सरकारी मानाच्या अन अधिकाराच्या खुर्चीवरचे अधिकृत वक्तव्य देणारे आहेत. व्हॉट्स ॲप विश्वविद्यालयातील नाहीत म्हणून विचारले....

@जिज्ञासा, माहितीपूर्ण पोस्ट. पूर्ण पटली.
भारताबाहेर राहणारे सामान्य भारतीय कशी आणि काय मदत करु शकतील? असा विचार आणि प्रयत्न करते आहे.

सध्या खरे आकडे आणि महत्वाचा डाटा लोकांपर्यंत पोचत नाही त्या मुळे खरी स्थिती काय आहे ह्याची माहिती ना मीडिया ला आहे ना लोकांना.
त्या मधील काही शंका.
१) देशात रोज covid positive report kiti
लोकांचे आले ह्याचे आकडे येतात .
आणि ते भीतीदायक आहेत.
२), पण.
जे covid positive आलेले आहेत त्या मध्ये गंभीर लक्षण किती लोकांना आहेत , मध्यम लक्षण किती लोकांना आहेत,आणि बिलकुल लक्षण किती लोकांना आहेत hyachi माहिती लोकांना दिली जात नाही..सरकार जवळ तरी नक्की ही माहिती आहे का ह्या विषयी शंका आहे.
३) जी लोक admit आहेत त्यांना admit होण्याची नक्की गरज आहे का? ह्याची चोकशी नाही.
४) बिलकुल गरज नसलेल्या लोकांना हॉस्पिटल मध्ये admit करून ठेवल्या मुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना बेड मिळत नाही.
५), काही केसेस बघण्यात आहेत.
बाधित बरा झाला तरी त्याला डिस्चार्ज दिला जात नाही.
बेड अडवून ठेवला जातो.
अगदी कसलीच लक्षण नसताना सुद्धा वीस पंचवीस दिवस परत टेस्ट करत नाहीत आणि जागा अडवून ठेवलं जाते.
नवीन बाधित लोकांची ट्रीट मेंट करण्यापेक्षा काहीच करायची गरज नाही अशीच लोक हॉस्पिटल मध्ये च ठेवून जबाबदारी टळली जात आहे..आणि ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आता ची गोंधळाची स्थिती आहे.

ज्यांना काहीच लक्षण नाहीत त्यांचे आकडे वेगळे देण्यास सुरुवात केली तर आता जी गंभीर स्थिती वाटत आहे ती तशी राहणार नाही.
असे पण कोणतीच लक्षण नसलेल्या बाधित व्यक्ती वर काहीच उपचार नाहीत.
किरकोळ सोडले तर ..
तो व्यक्ती असाच वीस पंचवीस दिवसात covid निगेटिव्ह येतों

आम्ही 4 ते 5 मास्क एकेक करत वापरतो , मग पुन्हा पहिला मास्क
अशा प्रकारे महिना जातो
ग्लोज नाही , शिल्ड नाही>> बापरे.

हात तुटलेला रुग्ण >> ११ तास शस्त्रक्रिया >> नंतर रुग्णाला covid-19 बाधा >> यशस्वी उपचार.

मुंबईच्या जे जे हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर चमूचे हार्दिक अभिनंदन !
https://www.loksatta.com/mumbai-news/j-j-doctors-showed-the-skill-for-at...

अभिनंदन सर्व चमुचे!अगदी ज्यांनी अजित आणि त्याचा तुटलेला हात जे.जे मध्ये नेण्याचे प्रसंगावधान दाखवले त्यांचेही अभिनंदन!

कुमार सर, tocilizumab हे ईंजेक्शन कधी आणि कशासाठी दिले जाते याची माहिती मिळेल का ?

Pages