कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्लू ची लस कोरोना साठी नाही परंतु सध्या च्या वातावरणात साधा फ्लू झाला तरी मुले आणि पालक घाबरून जातील..तसे घडू नये यासाठी ही लस द्यायला डॉक्टर सुचवत आहेत.
कोरोना आणि फ्लू ची लक्षणे साधारणपणे सारखीच असतात. त्यामुळे मुलांना साधा फ्लू झाला तरी दवाखाने कोविड टेस्ट हे सर्व चक्र सुरू होईल. हे काही प्रमाणात टाळण्यासाठी फ्लू ची लस घ्यायला सुचवले गेले आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
फ्लू ची लस घेतली तरी कोविड साठी संपूर्ण काळजी घ्यावीच लागेल.

पहाडमूळ (म्हणजेच व्हेलव्हेटलीफ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा सार्स -२ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो.
- भारतामधील केंद्र सरकाच्या अखत्यारित असणाऱ्या औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे संशोधन चालू.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-plant-extract-used...

<<पहाडमूळ (म्हणजेच व्हेलव्हेटलीफ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा सार्स -२ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो.<<
स्तुत्यच
परंतु असे अनेक शोध गेल्या काही महिन्यात प्रकाशित झाले आहेत..... प्रत्येकाची प्रत्यक्ष उपचार करण्यात स्वीकृतीची स्थिती एकत्र कोठे मिळू शकते?

मला कोविड होऊन आज दहा दिवस झालेत. अजून थोडा ताप येत आहे. मी घरीच क्वारंटीन आहे. माझा प्रश्न असा आहे कि मी आता आऊट ऑफ डेंजर आहेका?

विलगीकरण व्यवस्थित 17 दिवस होऊ द्या आणि नंतरही त्रिसुत्री पाळत रहा.
तब्येतीला झेपेल एवढेच काम करा.
कोविडचे दीर्घकालीन परिणाम कमीअधिक प्रमाणात दिसतात. काळजी घ्यावीच.

माझ्या तर्फे शुभेच्छा !

लसीकरण झाले आहे ना इंग्लंड मध्ये.लसीकरण मुळे दोन आजार जगातून नष्ट झाले आहेत.
तिसरी ,चोधी,पाचवी कितवी ही लाट येवू ध्या .आता भीती कसली.
लसीकरण झालेय

मी अजूनही लस घेतलेली नाहीये. सरकारी मजुर असल्याने वर्कफ्रॉम होमची सवलत नाहीये. दोन लाटा सरल्या आता तिसरीत करोना गाठतोय का याची उत्सुकता आहे ?

डेल्टा प्लस वरीएन्टवर लस प्रभावी नाही असे WHO ने म्हटले आहे. ज्याची भीती होती तेच घडत आहे का?

https://www.livemint.com/news/world/covid-vaccines-against-delta-variant-seen-losing-efficacy-who-epidemiologist-11624293720873.html

ग्लास अर्धा भरला आहे की रिकामा आहे ते तुम्ही ठरवा झम्पू दामलू
"WHO epidemiologist said, 'Seeing some reduced efficacy of vaccines against delta coronavirus variant but they still effective at preventing severe disease and death'"

दोन डोस दोन भिन्न प्रकारच्या लसीचे देणे, या मुद्द्यावर बरेच संशोधन चालू आहे.
कोणत्या २ लसी अशा प्रकारे द्यायच्या हाही मुद्दा त्यात येईल.

यावर अधिक खात्रीशीर नवीन माहिती मिळाल्यावर भर घालेन.

hello everyone , i need your help .i am going through depression after recovering from corona. dont know what happend to me but thinking about suicide all time .i have huge responsibility of my son nd facing crucial financial problem . never find myself in such negative vibes ,.what to do ??? I am very much disturb..

कृपया मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा.
मानसोपचार तज्ञांकडे जाणे कमीपणाचे मानू नये.
>>> +१००

शुभेच्छा.

ग्लास अर्धा भरला आहे की रिकामा आहे ते तुम्ही ठरवा झम्पू दामलू
हे आता भारत सरकारला पण सांगा. त्यांना ग्लास अर्धा रिकामा दिसतोय. त्यांच्या मते हा resistance to vaccines आहे.
https://www.thehindu.com/news/national/coronavirus-delta-plus-is-a-variant-of-concern-says-government/article34911668.ece

A variant of concern (VoC) carries the highest threat perception of a coronavirus variant, which is characterised by increased infectivity, transmissibility or resistance to vaccines and treatment

Vandrevala Foundation for Mental Health 1860-2662-345 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)

इथे फोन करा मिआरिस. जीव देण्याचा विचार सोडून द्या. एकेक दिवस मोजून घालवा हळू हळू परिस्थिती आटोक्यात येत आहे.

आज पर्यंत corona बाबत प्रसार माध्यमांनी तज्ञा चा हवाला देवून प्रसारित केलेली माहिती.
1) बचाव करण्यासाठी मास्क वापरा.
मास्क मुळे संसर्ग होण्याचे टाळता येणार नाही विषाणू चा आकार खूप लहान असतो.
२) corona व्हायरस हवेतून पसरत नाही आणि दहा बारा फुटापर्यंत च तो संक्रमण करू शकतो.
Corona व्हायरस हवेतून पसरतो.
३) corona व्हायरस जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात जिवंत राहणार नाही
हे साफ चुकीचं ठरले.
४) समाजातील जास्तीत जास्त लोकांना corona झाला की सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण होवून जग corona मुक्त होईल.
असे काही घडले नाही सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण च झाली नाही.
दावे करणारे संशोधक गायब आहेत.
५) लस घेतली की corona होणार नाही.
लस घेवून पण corona झाला.
लस घेतल्यावर होणार नाही हा दावा साफ चुकीचा निघाला.

मग सुधारित दावा लस घेतली को लोक मरणार नाहीत.
दोन्ही डोस घेतलेली लोक पण corona चे बळी ठरले.
आता डेल्टा पुराण चालू आहे.लसी चे तीन तेरा बाजू नयेत म्हणून डेल्टा कसा खतरनाक आहे ह्याचे पारायण चालू आहे
Corona बद्घल Aaj पर्यंत संशोधक मंडळी नी केलेले सर्व दावे चुकीचं ठरले आहेत.
इतिहास आठवा आणि खरे की खोटे ते सांगा
जगाच्या इतिहासात उलट सुलट दावे संशोधक मंडळी करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

४) समाजातील जास्तीत जास्त लोकांना corona झाला की सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण होवून जग corona मुक्त होईल. >> ७०-८०% लोकांना करोना होई पर्यंत थांबा आणि बघा.
५) लस घेतली की corona होणार नाही.>> असं कोणीही जबाबदार माणूस कधीच म्हणणार नाही. लक्षणे सौम्य असतील, हॉस्पिटल मध्ये भरती व्हायची शक्यता कमी होईल, जीव जाण्याची शक्यता खूप कमी असेल, दुसर्‍यास संसर्ग करण्याची शक्यता कमी असेल. अशी विधाने होती.
तुम्ही सायन्स फील्ड मध्ये व्यवसायाने नसलात तर बरं. आधी अनुमान आणि मग निरिक्षण असला प्रकार आहे तुमची पोस्ट म्हणजे.
सायन्स म्हणजे काही गीता, बायबल, कुराण नाही की ती काळ्या दगडावरची रेघ होईल. ते बदलत असते, नवी माहिती समजली ती तावुनसुलाखुन घेतली की ती खरी. त्यात परत काही खोट निघाली की काय चुकलं ते शोधून परत बदल हे अव्याहत चालू असते.
पहिली वेळ वगैरे काही नाही. आपले ते हे म्हणाले असते वाचन वाढवा. Proud

अमीतव.
तुम्ही जे सांगत आहात ते संशोधन कसे चालते ,विज्ञान कसे काम करते ह्याची स्टँडर्ड व्याख्या आहे.
आणि त्याच व्याख्ये नुसार आता corona विषयी माहिती संबंधित संशोधक लोकांनी दिली असती तर एवढं गोंधळ निर्माण झालाच नसता.
अभ्यास पूर्ण होण्याच्या अगोदर च संशोधक मीडिया ला माहिती पुरवत असावेत असाच प्रकार चालू आहे.
लस तिचे दुष्परिणाम,तिची कार्य क्षमता ह्या विषयी च पूर्ण माहिती नसताना डेल्टा varient लसी ला दाद देणार नाही हे कसे ठरले.
Delta माहीत झालं त्याला किती दिवस झाले.
त्या विषयी पूर्ण संशोधन तरी झाले आहे का?
तरी मीडिया ला संशोधक मंडळी , who अपुर्या माहिती वर निष्कर्ष प्रसारित करत आहे.

ताजी गोष्ट.
महाबळेश्वर मध्ये वटवाघूळ मध्ये निपाह व्हायरस सापडला ज्यांना सापडला त्यांनी स्वतः ची लाल करण्यासाठी मीडिया ला न्यूज दिली त्यांनी आता गुऱ्हाळ चालू केले आहे.
देशातील प्रतेक वटवाघूळ पकडुन चेक केले तर भारत देशात मध्ये सर्व प्रांतात वटवाघूळ मध्ये nipah व्हायरस सापडेल.
अगदी जागतिक लेव्हल ला पण सापडेल.
हे सर्व माहीत असताना संशोधक,मीडिया ह्यांना पुढे धावयची काय गरज आहे.
आणि मला नाही वाटत हे विज्ञाना च्या व्याख्येत बसत आहे

Tocilizumab या दाहप्रतिबंधक औषधाला रुग्णालयात दाखल असलेल्या (तीव्र) covid-19 रुग्णांच्या उपचारासाठी अमेरिकी औषध प्रशासनाने आज मान्यता दिली. (आपत्कालीन वापर )

यापूर्वी हे औषध वापरले जातच आहे. आज त्याच्यावर कोविडसाठी मान्यतेची मोहर उमटवली गेली. हे जुने औषध असून यापूर्वी संधिवात आणि अन्य काही तत्सम आजारांसाठी वापरले जाते.
सध्या भारतात हे आयात करावे लागते.

https://www.fda.gov/news-events/press-announcements/coronavirus-covid-19...

Pages