
लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................
दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.
भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.
दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.
लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.
ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :
१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................
Uk मध्ये ज्यांनी लस घेतली आहे
Uk मध्ये ज्यांनी लस घेतली आहे त्यांचेच मृत्यू चे प्रमाण जास्त आहे.तरी काही संशोधक त्याचे खंडन करून आपल्या मालकांचे हित जपत आहेत.
प्लेग काळात पण संशोधक लोकांचे निष्कर्ष एक सारखे असायचे.आता आधुनिक समजणाऱ्या जगात सतराशे साठ संशोधक आणि प्रत्येकाची मत एकमेकाच्या विरूद्ध.
लोकआता corona बाबतीत संशोधक लोकांच्या मताना काहीच किंमत देत नाहीत.
कोणी सिरीयस घेत नाही.
झ दा,
झ दा,
तुम्ही उपस्थित केलेला इंग्लंडचा मुद्दा बरोबर आहे. तिथल्या जेष्ठ तज्ज्ञांनी अजूनही सावधगिरी बाळगायला सांगितलेली आहे.
तिथल्या काही ठळक घडामोडी :
१. दर तीन आठवड्यांनी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दुप्पट होत आहे.
२. सध्याच्या त्यांच्या बाधितांमध्ये 99 टक्के डेल्टा प्रकाराचे आहेत. त्यात गेल्या आठवड्यात 17 टक्के वाढ झाली.
३. नव्या रुग्णांपैकी काही डेल्टा – AY १ या उप-उपप्रकारात मोडतात
>>>>Uk मध्ये ज्यांनी लस घेतली
>>>>Uk मध्ये ज्यांनी लस घेतली आहे त्यांचेच मृत्यू चे प्रमाण जास्त आहे.तरी काही संशोधक त्याचे खंडन करून आपल्या मालकांचे हित जपत आहेत.>>>>
कुमार सर, असे असेल तर पहिले पाढे पंचावन्न..... मग लसीकरणाच्या नावाने कशाला आक्रोश माजवायचा
रोज ऐकावे ते नवलच
आपले सरकारी दूत म्हणतात. लस घेतल्यांत मृत्यूदर ०.००००००००० ..... इत्यदि %
या बातमीत म्हटलंय की यु के
या बातमीत म्हटलंय की यु के मध्ये लसीकरण झालेले करोनाने मेले असले तरी त्यांचं वय अधिक होतं.
https://www.livemint.com/science/health/most-covid-deaths-in-england-now...
वयस्कर लोकांचे जास्त मृत्यू
वयस्कर लोकांचे जास्त मृत्यू झाले.
हे वाक्य म्हणजे रडी च डाव आहे.वयस्कर लोकांचे जास्त मृत्यू corona मुळे होतील असा अंदाज व्यक्त केला होता.पण भारतात तरुण लोक पण मृत्यू मुखी पडली आहेत.
युके मध्ये रुग्ण संख्या फारच
युके मध्ये रुग्ण संख्या फारच वेगाने वाढतेय गेल्या वीसेक दिवसांपासून. पण इतकी वाढ असूनही जमेची बाब म्हणजे त्यामानाने मृत्यू आणि सिरियसली ill रुग्णांचं प्रमाण खूप कमी आहे. तिथे vaccination खूप जास्त प्रमाणात झालंय त्याचा परिणाम असावा.
Monkey b व्हायरस डेंजर आहे का
Monkey b व्हायरस डेंजर आहे का?
'बी' विषाणू
'बी' विषाणू
होय, या विषाणूंच्या संसर्गनंतर सुरुवातीस फ्लुसारखा आजार होतो.
जर का आजार पुढे फोफावला तर मेंदू व मज्जारज्जूस इजा होते.
पण हा कोरोनासारखा फोफावण्याची
पण हा कोरोनासारखा फोफावण्याची शक्यता आहे का?
'बी' :
'बी' :
हा आजार विशिष्ट माकडांपासून माणसात येतो. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे त्याचा प्रसार होणे दुर्मिळ असते. (अनलाइकली).
एका माकडे हाताळणाऱ्या माणसाला हा आजार झाला होता. तो जखमांसाठी जे मलम लावत होता तेच त्याच्या बायकोने वापरले. पुढे तिला संसर्ग झाला, परंतु प्रत्यक्ष आजार काही झाला नाही अशी नोंद आहे.
https://www.cdc.gov/herpesbvirus/healthcare-providers.html
Ok म्हणजे याचा धोका नाही
Ok म्हणजे याचा धोका नाही तेव्हडा. न्युज आणि युट्युबवाले विनाकारण घाबरवतात.
खूपच उपयुक्त माहिती. प्रतिसाद
खूपच उपयुक्त माहिती. प्रतिसाद कांच्या शंका, प्रश्नांना दिलेल्या उत्तरांमुळे लेख अधिकच माहितीपूर्ण झाला आहे.
>>>>Some popular European
>>>>Some popular European destinations are tightening COVID-19 restrictions again>>>
Ireland has eased its restrictions on international travel विरोधाभास
+१.
+१.
..
फ्रान्सने त्यांच्याकडे ४थी लाट चालू असल्याचे सांगून निर्बंध अजून कडक केले आहेत.
त्यांनी प्रत्येक नागरिकासाठी आरोग्य पास योजना काढलेली असून बहुतेक सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देताना तो पास पहिला जातो.
त्यात लसीकरण वगैरेच्या नोंदी असतात.
पहिली लाट आणि ४, थ लाट ह्या
पहिली लाट आणि ४, थ लाट ह्या मध्ये काय फरक आहे.
WHO,. चे मत नको.
स्वतःचे मत असावे.
कोणत्याच लिंक देवू नको
डेल्टा उपप्रकाराच्या
डेल्टा उपप्रकाराच्या आगमनानंतर जो नव्याने धुमाकूळ झाला त्यासंदर्भात डेल्टाचा अधिक अभ्यास केल्यानंतर खालील गोष्टी समजल्या आहेत :
१. शरीरात विषाणूने प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष आजार होणे याचा कालावधी पूर्वीच्या प्रकारांच्या तुलनेत कमी आहे (साधारण चार दिवस).
२. या प्रकाराची प्रजननक्षमता वेगवान आहे.
३. डेल्टाबाधित व्यक्तीच्या शरीरात विषाणूची घनता पूर्वीच्या प्रकारांच्या तुलनेत १२६० पट अधिक आहे.
वरील सर्व कारणांमुळे डेल्टा प्रकार हा अधिक रोगप्रसारक ठरला आहे.
https://www.nature.com/articles/d41586-021-01986-w
>>>वरील सर्व कारणांमुळे
>>>वरील सर्व कारणांमुळे डेल्टा प्रकार हा अधिक रोगप्रसारक ठरला आहे.>>> अधिक मारक आहे का? प्राण घातक आहे का?
या लिंकमध्ये त्यावर काम चालू आहे असे म्हटले आहे
माहिती म्हणून चांगला आहे ले़ख
रे व्यु
रे व्यु
त्यावर अधिक अभ्यासाची गरज आहे
रे व्यु
दु प्र
रे व्यु
.
Delta भारतात येवून गेला पण
Delta भारतात येवून गेला पण आता डेल्टा प्लस ची वाट बघत आहोत पण आज पर्यंत आलाच नाही.
आज पर्यंत विषाणू जन्य साथीचे रोग जगात खूप आले पण corona सारखे त्यांचे विषाणू एक दोन महिन्यात स्वतः मध्ये बदल करत होते असे वाचनात आले नाही.
खोलीच्या सामान्य अथवा उष्ण
खोलीच्या सामान्य अथवा उष्ण तापमानात व्यवस्थित टिकून राहणाऱ्या लसीची निर्मिती करण्याचा प्रकल्प भारतात Mynvax यांनी IISc च्या सहकार्याने हाती घेतला आहे .
अशी लस यशस्वी झाल्यास तिची साठवण अतिशय सोपी राहील .
https://www.news18.com/news/india/what-is-a-warm-vaccine-how-can-india-b...
ICMR ने केलेल्या चौथ्या सेरो
ICMR ने केलेल्या चौथ्या सेरो सर्वे क्षणात संपूर्ण भारतात ६७ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. हे प्रमाण करोनाच्या सर्वाधिक केसेस नोंदल्या गेलेल्या केरळ आणि महाराष्ट्रात मात्र ४४% आणि ५८% आहे. संसर्गग्रस्त लोक शोधण्याचे (आणि त्यांचे विलगीकरण करण्याचे ) प्रमाण या राज्यांत जास्त असल्याने इतर राज्यांच्या प्रमाणात ( मध्य प्रदेश ७९%) लोकांना संसर्ग पसरला नाही ; तसंच करोनाला एक्स्पोज न झालेल्या लोकांचं प्रमाण या राज्यांत अधिक असल्याने अजूनही जास्त केसेस निघत आहेत असं विश्लेषक म्हणताहेत.
हा रिपोर्ट आय सी एम आर च्या संकेतस्थळावर दिसला नाही. पहिल्या की दुसर्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष तिथे पाहायला मिळाले.
या विश्लेषणाचा अर्थ करोनाला खुली सूट दिली तर त्याचा इतका प्रसार होतो की आणखी प्रसार व्हायला वाव नसल्याने नवे रुग्ण सापडणे आपोआप कमी होते असा लावायचा का? मात्र यात करोनामुळे मरण पावलेल्यांची नेमकी संख्या कळत नाही. मध्य प्रदेश इ. काही राज्यांतील एकंदरीत मृत्यूची सालागणिक आकडेवारी तपा सल्यास यंदा मरण पावलेल्यांचं प्रमाण खूप जास्त असल्याचं आणि त्या तुलनेत नोंदलेल्या करोनाबळींची संख्या नगण्य असल्याचं दिसतं.
६७% वाली बातमी वाचली होती.
६७% वाली बातमी वाचली होती.
'हिंदू' मध्ये अनेक राज्यांमधल्या अशा 'एक्सेस डेथ्स' ची आकडेवारी गेल्या काही दिवसांत येत आहे. मला नेमके आकडे सांगता येणार नाहीत पण काही काही राज्यांत (अधिकृत करोना मृत्यूंपेक्षा) सात-आठपटदेखील एक्सेस डेथ्स आहेत. लिंक सापडली.
https://www.thehindu.com/specials/coronavirus-spike-in-excess-deaths-dur...
सद्य लसींवर मात करणारे
सद्य लसींवर मात करणारे विषाणूचे नवे प्रकार का उद्भवतात, यावर सध्या अभ्यास चालू आहे. असे नवे प्रकार निर्माण होण्यामागे तीन महत्त्वाची कारणे अशी असतात :
1. लसीकरणाची गती मंद असणे
2. संसर्ग झालेल्या लोकांचे प्रमाण जास्त असणे
3. विषाणूच्या उत्परिवर्तनाची गती जास्त असणे.
हे विचारात घेता असे नवे उपप्रकार निर्माण होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो ?
1. लसीकरणाची गती शक्य तितकी वाढवणे
2. जरी एखाद्या प्रदेशात बहुसंख्यांचे लसीकरण झालेले असेल तरीसुद्धा मूलभूत त्रिसूत्रीचे पालन चालूच ठेवणे.
हे पालन जितके जास्त काळ आपण चालू ठेवू तितके फायदेशीर राहील.
https://www.nature.com/articles/s41598-021-95025-3
एकच डोस लसीसह 'जॉन्सन अँड
एकच डोस लसीसह 'जॉन्सन अँड जॉन्सन' सज्ज; परवानगीसाठी अर्ज
https://maharashtratimes.com/india-news/johnson-johnson-applies-for-emer...
पूर्ण लसीकरण झालेल्या
पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाही डेल्टा उपप्रकाराचा संसर्ग होतो हे खरे आहे. या संदर्भात एक अभ्यासपूर्ण लेख इथे (https://www.nature.com/articles/d41586-021-02187-1) आहे. त्यात जगातील चार प्रगत राष्ट्रांमधील काही संशोधन दिलेले आहे.
लस घेऊनही डेल्टाचा संसर्ग झालेल्या बऱ्याच लोकांचा विविध ठिकाणी अभ्यास होत आहे. त्यातील निष्कर्षांवर तसे एकमत नाही. तरीसुद्धा इंग्लंडमध्ये झालेल्या एक लाख लोकांचा अभ्यास मार्गदर्शक ठरेल. त्या अभ्यासामध्ये असे लक्षात आले, की लसीकरण झालेल्या ज्या लोकांना डेल्टा संसर्ग झाला त्यांच्या शरीरातील विषाणूची घनता ही (लसीकरण न झालेल्या लोकांच्या तुलनेत ) बरीच कमी होती. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे.
जितकी शरीरातील विषाणू-घनता कमी राहील तितका व्यक्तिगत त्रास आणि सामाजिक रोगप्रसारही आटोक्यात राहिल.
लस घेऊनही देशात किती जणांना
लस घेऊनही देशात किती जणांना झाला कोरोना?
https://www.esakal.com/desh/even-after-vaccination-how-many-people-got-i...
ताजी बातमी :
ताजी बातमी :
अमेरिकी औषध प्रशासनाने प्रतिकारशक्ती दुबळी झालेल्या लोकांसाठी covid-19 लसीच्या तिसऱ्या डोसची शिफारस केली आहे.
(https://www.fda.gov/news-events/press-announcements/coronavirus-covid-19...)
या प्रकारात खालील रुग्ण मोडतात :
१. इंद्रिय प्रत्यारोपण झालेले
२. कर्करोग उपचार घेत असलेले
३. विविध ऑटोइम्युन आजार असलेले
कुमार सर, डेल्टा आणि डेल्टा
कुमार सर, डेल्टा आणि डेल्टा प्लस या दोन व्हेरिअंट्स मध्ये नेमका काय फरक आहे? प्लस व्हेरिअंट भारतातच तयार झालाय का? भारतात व दुसरी लाट जर डेल्टा व्हेरिअंट मुळे आली होती असे मानले तर तिसरी लाट डेल्टा प्लस मुळे येण्याची शक्यता कितपत आहे?
Pages