क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

द्रवीडच्या वाट्याला नेहमी firefighting च का यावे?
कप्तान होताना दादा आणि चॅपेल वाद आणि आता कोच होताना दादा/BCCI आणि कोहली वाद!!

त्यात दादा हा कॉमन डीनॉमिनेटर आहे रे Wink

ॠ, राहूल हा एकमेव प्लेयर तीन्ही संघांमधे नाही. ह्याच लॉजिक ने बुमरा कप्तान हवा. एक वेळ राहुल नसू शकेल एखाद्या संघांमधे पण ओव्हरलोड ची भिती हा भाग वगळता बुमरा ला ड्रॉप नाही करता येत.

ओव्हरलोड ची भिती हा भाग वगळता बुमरा ला ड्रॉप नाही करता येत.
>>>>
वरची पोस्ट लिहितानाही माझ्या डोळ्यासमोर बुमराह आला जो तिन्ही फॉर्मेट आणि सर्वोच्च पगार श्रेणीत आहे. आणि सोबत ओव्हरलोड हेच कारण आले. त्याला गरजेनुसार विश्रांती देणे भाग आहे तसेच कप्तानीचा भार त्यावर न टाकणे हे स्वाभाविक आहे.

मला वाटते आता कोहली शर्मा हे रेड बॉल आणि व्हाईट बॉल कप्तान तसेच जेव्हा यापैकी कोणी उपलब्ध नसेल तेव्हा राहुल त्या फॉर्मेटचा कप्तान हे धोरण राबवतील.

अवांतर - या वर्षाने खूप छान टेस्ट क्रिकेट दाखवले. मजा आली. पण तरीही काल ८३ पाहिला आणि आज ते सगळे फिके वाटू लागले. वन डे क्रिकेटमध्ये उसळणारे बाऊन्सर, ईंग्लंडच्या वातावरणात स्विंग होणारे बॉल, दैत्यासमान भासणारे वेगवान गोलंदाज आणि आपले बिना जाळीच्या हेलमेटने खेळणारे फलंदाज.. कदाचित स्पेशल ईफेक्ट आणि वीएफक्सने वगैरे ते आणखी भारी वाटले असावे, पण तरीही आपण तो ८३ चा रोमांच अनुभवायला तिथे हवे होते असे वाटू लागले. Happy

ओव्हरलोड चा इंपॅक्ट बॅट्समन कॅप्टन ना अधिक भासतो अशी आजवर दिसत आलेली लक्षणे आहेत. राहुल तसाही फिनिकी आहे. त्यामूळे ओव्हरलोड चा धोका त्याला अधिक नाहि का ? Happy

राहूल च्या कप्तानीबद्दल असामीशी सहमत. एक प्लेयर म्हणून तो मला जितका आवडतो तितका कॅप्टन म्हणून फार भावला नाहीये अजून. कर्नाटक चा सुद्धा तो कधी कॅप्टन नव्हता. असो.

आज भारतीय बॅटींग पारच ढासळली. अफ्रिकेकडून प्रतिकार अपेक्षित होताच. पण तरीही भारताकडून जास्त टिच्चून खेळ बघायला मिळायला हवा होता. काही-काही शॉट्स-सिलेक्शन्स अगदीच questionable होते. सिराज चा जर हॅमस्ट्रींग पुल झाला असेल, तर आणखीन अवघड जाणार आहे.

तिकडे बांग्लादेश ने सरप्राइझिंगली न्यूझिलंड वर चांगला लीड घेतलाय.

ओव्हरलोड चा इंपॅक्ट बॅट्समन कॅप्टन ना अधिक भासतो
>>>>
आयपीएलमध्ये कप्तान असूनही तो दर सीजनला आपल्या धावा खोऱ्याने करत असतो. कप्तानीने त्याच्या धावा आटत नाहीत हे सिद्ध झालेले आहे. एखाद्या बुमराहबाबत ते चेक करायची का रिस्क घ्या? कोहली, शर्मा नंतर राहुल हे स्ट्रेट फॉर्वर्ड डिसीजन आहे. भले तो कप्तान म्हणून कितीही का साधारण असेना. आधीच संघात कप्तानीला घेऊन जे टेंशन चालूय त्यात ही माळ आणखी कोणाच्या गळ्यात घालून त्यालाही या आखाड्यात न उतरवतील तर तेच चांगले Happy
रहाणेने मात्र फॉर्म अगदीच घालवून आज कर्णधारपदाची संधीही घालवली. किमान फॉर्म जरी दाखवला असता तरी त्यात कप्तानी ॲड होत संघातले स्थानही टिकवता आले असते.

ठाकूरने आपला पार्टनरशीप ब्रेक करण्याचा लौकिक पुनः एकदा सिद्ध केला. पण राहूलचा त्याच्यावर फार विश्वास नाही असे दिसते.
आपण असलेल्या खेळाडूत सर्वोकृष्ट कर्णधार म्हणून रहाणेलाच कर्णधारपद द्यायला हवे होते या मताचा मी आहे. राहूल तिन्ही फॉर्म मधे खेळतो म्हणून त्याला कर्णधार करा हे म्हणणे हास्यास्पद आहे.
आश्विन मुख्य फलंदाजांच्या विकेटस कधी घेणार?. (फक्त आखाडा असेल तर?)
खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण पुनः वाढतेय का?.
आफ्रिकेला २५० मधे गुंडाळायला पाहिजे.

आश्विन मुख्य फलंदाजांच्या विकेटस कधी घेणार?. (फक्त आखाडा असेल तर?)
>>>

आश्विन ऑस्ट्रेलियात तीन सामने खेळला
त्यात स्मिथ पाच इनिंग खेळला
आश्विनने तीन वेळा बाद केले
एकदा बुमराहने बाद केले
एकदा रन आऊट झाला
तर लाबुशानेला आश्विनने दोन वेळा बाद केले

...

मागे व्हॉटसपग्रूपवरच्या चर्चेत हा विषय निघालेला तेव्हाची ही पोस्ट.
ईथे आश्विनला बिलकुल मदत नाही. याऊलट वेगवान गोलंदाजांना जी मदत मिळतेय ते पाहता आणि लो स्कोअरींग मॅचेस पाहता आश्विनला ईथे मोठे स्पेलही मिळणे अवघड. किंबहुना विकेट न पडल्यास त्याला सेट बॅटसमनसमोर यावे लागतेय.. कदाचित त्याला न घेणे उत्तम. ईंग्लंडला न घेतल्याने आता ईथे घेताहेत असे वाटतेय. जे चुकीचे आहे. कदाचित पुढच्या सामन्यात कोहली येईल तेव्हा आश्विन बसू शकतो. अर्थात खेळपट्टीवर अवलंबून आहे..

कोहली, शर्मा नंतर राहुल हे स्ट्रेट फॉर्वर्ड डिसीजन आहे. भले तो कप्तान म्हणून कितीही का साधारण असेना. >> ह्या दोन वाक्यांमधे किती असंबद्धतता आहे हे लक्षात घे. असो.

ठाकूरने आपला पार्टनरशीप ब्रेक करण्याचा लौकिक पुनः एकदा सिद्ध केला. >> +१. मला वाटते तो धावा लीक करतो मधेच त्यामूळे कोहली किंवा राहुल सुद्धा त्याला फारच जपून वापरत असावेत. पार्टनरशीप ब्रेक करण्याबाबत मला असे वाटते की समोरचे बुम्रा किंवा शमी ला अधिक काळजीने खेळत असणार. ठाकूर बॉलिंग ला आल्यावर त्यांचे काँसंट्रेशन कमी होत असल्यामूळे ठाकूरसारखा स्किलफूल प्लेयर त्याचा फायदा घेऊन बाद करू शकत असेल. त्यामूळे त्याला चेंज म्हणून वापरणे जरुरी आहे.

ह्या दोन वाक्यांमधे किती असंबद्धतता आहे हे लक्षात घे. >>> बिलकुल नाही. कारण मी राहुल कप्तान असायचा निर्णय का घेतला गेला याचे कारण त्याचे कप्तानी स्किल्स नाहीये, नसावे हे आधीच म्हटले आहे Happy

ठाकूरला बघून मला ईक्बालचा रितेश देशमुख आठवतो. चक्रव्यूह. मारायला देऊन विकेट काढणारा Lol
बाकी ओवरला एखाद दोन साधारण चेंडू टाकत रन्स लीक करणे आणि त्याच वेळी फलंदाजाला चकीत करायचीही क्षमता राखणे यावरून आगरकरही आठवतो Happy
पण ठाकूरच्या विकेट या टेस्ट विकेट्स आहेत. त्या सहजी येत नाहीत. ईतक्यात काही ठोस बोलू शकत नसलो तरी तो सातत्याने विकेट काढतोय हे कौतुकास्पद आहे. आज तर त्याला पुन्हा पुन्हा आणले तेव्हा तेव्हा विकेट काढेल असा विश्वास वाटत होता त्याच्याबद्दल. गरजेला एखादी चमकदार खेळी करायची क्षमता आणि मिडल स्टेजला जुन्या बॉलवर विकेटही काढू शकणारा शार्दुल परदेश दौर्‍यांवर बॅलन्स साधतोय या कसोटी संघात जे एखादा हार्दिक पांड्या नाही करू शकला.

बाकी ठाकूरची बॉलिंग आज अगदी कडक झाली.

राहुलची काय बडबड चालू होती आउट होऊन परत जाताना.... त्यावेळी कॅमेरा बरोबर द्रविडवर नेला होता Happy

रहाणे ला आता खेळवणे म्हणजेच हास्यास्पद आहे>>> हा , हा , हा.

आज रहाणे आणि पुजाराने सुरूवात कडक केली. ज्यांना स्टॅटच्या पलिकडे क्रिकेट कळते त्यांना रहाणेचा आजचा खेळ किती उच्च प्रतिचा होता आणि त्याला का घेतात हे कळेल. ज्या बॉलला रहाणे आउट झाला ते पहाता आफ्रिकेला २०० चे टार्गेट बास होइल असे वाटते.
पंत नॅचरल खेळायच्या लायसन्स खाली खूप वेळा वेड्यासारखा आउट होतो. नॅचरल खेळ म्हणजे वेडेपणा नाही हे त्याला सारख सारख कोण सांगणार.
अश्विन आणि शार्दूलला ऑस्ट्रेलियातला बॅटींग फॉर्म दाखवायला संधी.

शार्दुल परदेश दौर्‍यांवर बॅलन्स साधतोय या कसोटी संघात जे एखादा हार्दिक पांड्या नाही करू शकला.>> बरोबर.
आता हार्दीकला वेंकटेश अय्यरची कॉम्पीटीशन आहेच.

लॉर्ड शार्दुल.. सलामी अखेरीस तोडली.. काही कळतंच नव्हते मार्करमला.. वेल डिजर्व्हिंग विकेट ! काढ अजून चार.. जिंकव भारताला.. हो सामनावीर Happy

एल्गर एका बाजूनं किल्ला लढवतोय. चक्क बुमराह चा ऑफ-डे आहे आज आणि सिराज सुद्धा पूर्ण फिट नाहीये. एका तरी फ्रंटलाईन बॉलरला खेळ उंचावला पाहिजे.

इतक्या अनइव्हन बाऊन्स असलेल्या विकेटवर चौथ्या इनिंगमधे बॅत्समेन च्या अवती-भवती फिल्डर्स चं कोंडाळं हवं होतं असं वाटतंय. शॉर्टलेग, सिली पॉइंट वगैरे फिल्डर्समुळे कदाचित जास्त प्रेशर येऊ शकेल बॅट्समन वर.

पंत नॅचरल खेळायच्या लायसन्स खाली खूप वेळा वेड्यासारखा आउट होतो. नॅचरल खेळ म्हणजे वेडेपणा नाही हे त्याला सारख सारख कोण सांगणार. >> नॅचरक्ल खेळणे कि लॅक ऑफ काँफिडन्स असे वाटायला लागलय आता. बहुधा १-१ होणार असे वाटतय. सकाळ
२-३ विकेट्स जातील पटकन मग पिच थोडे ईझी होते नि तसेही त्यांची लोअर बॅटींग ऑर्डर खेळतेय नीट नि आपला तो नेहमीचाच वांदा आहे Sad

*बहुधा १-१ होणार असे वाटतय. * तसंच झालं. 7 विकेटसनने हरलो , हें जरा अनपेक्षित.
( मॅच पहातां नाहीं आली. 96 नाबाद एल्गारचं शतक कां हुकावं तें कळलं नाहीं)

शतकासाठी स्वत:ही फार प्रयत्न केला नाही. कुठल्याही स्टेजला अनावश्यक रिस्क न घेणे योग्य समजले वैयक्तिक शतकापेक्षा संघाचा विजय जास्त महत्वाचा हे कप्तानाने कृतीतून दाखवले Happy

अवघड खेळपट्टीवर टिकून कस रहाव, कसबस रहाव पण रहाव याचा उत्तम धडा दक्षिण आफ्रिकेने सगळ्यांना दिला. १०० वेळा चकून सुद्धा बाद मात्र झाले नाहीत. पण एकंदरीत खूपच छान खेळले.
मला अस वाटल की बूमरा आणि शमी दोघांनीहीआखूड टप्प्याचा मारा जरा जास्तच टाकला.

मला राहूल ची कॅप्टन्सी फारच defensive / unimaginative वाटली. तो काही 'घडवण्यापेक्षा', 'घडण्याची' वाट पहात होता असं वाटत होतं. इतक्या uneven bounce असलेल्या विकेटवर २४० चा स्कोअर डिफेंड करताना, बॅट्समनच्या समोर एखाद-दुसरा फिल्डर लावून pressure create केल्याचं कुठे दिसलं नाही.

द. अफ्रिका मात्र फारच जिगरीनं खेळली. एल्गर चा खेळ आकर्षक नसेलही कदाचित पण जबरदस्त प्रभावी होता.

*वैयक्तिक शतकापेक्षा संघाचा विजय जास्त महत्वाचा हे कप्तानाने कृतीतून दाखवले *- 7 विकेटने विरूद्ध संघाला हरवायाच्या स्थितीत असतांना 4 धांवांनी शतक हुकवण्याची गरज नव्हती असं आपलं मला वाटतं. शतकांचा हव्यास असूंच नये पण प्रत्येक शतकाला क्रिकेटमधे एक खास महत्व असतं हें नाकारण्यात काय हंशील आहे ? अप्रतिम खेळी केल्यावर त्यावर शतकाचा टिळा सहज लागत असेल तर व्हाय नाॅट ? पतिव्रतेचा आदर्श घालायला सती जाण्याचीच गरज नसावी ! Wink

आदर्श घालायला मुद्दाम शतक केले नाही असे आहे का? Happy
शतकासाठी मुद्दाम वेगळे प्रयत्न केले नाहीत ईतकेच..

त्यातही चारच धावा कमी पडल्या असे स्कोअरबोर्ड सांगत असला तरी ९२ ला विजयी चौकार मारल्यावर ९६ झाले आहेत. शतकाचा विचार केला असता तर तो एवढा विनिंग शॉटपर्यंत न ठेवता जिंकायला ३०-३५ धावा शिल्लक असल्यापासून केला गेला असता. मग तेव्हापासून स्वत:ही मारा वा समोरच्यालाही अप्रत्यक्षपणे सुचवा की तू दमाने घेत मला शतकाची संधी दे. स्वत:ही नॉर्मल खेळू नका की दुसऱ्यालाही खेळू देऊ नका. या शतकाच्या नादात विकेट आली असती तर हरले नसते, पण कदाचित आणखी एक दोन विकेट जात जे ७ विकेटने जिंकले ते चार-पाच विकेटने जिंकले असते. ईंडियन बॉलर जे काल हताश दिसत होते त्यांना पुढच्या सामन्यासाठी जरा मानसिक बळ मिळाले असते. हे सगळे मला तरी टीम स्पिरीटच्या विरुद्ध वाटते. शतक ईज जस्ट ए नंबर. ती रेकॉर्डबूकात मोजली जात असल्याने आपल्याकडे उगाच त्या आकड्याला महत्व देऊन ठेवलेय. असो, याबाबतीत माझे विचार वेगळे आहेत याची मला कल्पना आहे. मग ते योग्य असोत वा अयोग्य. पण काल आफ्रिकेच्या कप्तानाने माझ्यासारखा विचार केला हे मला तरी आवडले Happy

कारण या सामन्याचा काय असा निकाल बदलला असता असा विचार कदाचित काल आपल्या जागी योग्यही वाटला असता. पण हा शतकाचा विचार मग ईतर सामन्यातही पिच्छा सोडत नाही. क्लोज चेस चालू असतो. चांगली पार्टनरशिप होत असते. मग एकाचे शतक जवळ येते आणि अचानक शतकाचे विचार डोक्यात सुरू होत खेळ बदलतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना विकेट घ्यायची संधी उपलब्ध होते. बरेचदा जातेही. वैयक्तिक शतकाचा भुर्दंड संघाला. तेच समजा त्या मैदानावरच्या फलंदाजाला माहीतच नाही पडले की त्याचे शतक जवळ आलेय वा तो नर्व्हस नाईटीजला पोहोचला आहे तर तो नर्व्हस होणारच नाही. यात कदाचित त्याचाही फायदा होऊ शकतो. पण संघाचा हमखास होईल.

Pages