दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातल्या नायिकेच्या सौंदर्याला केवळ सम्राज्ञीची उपमा दिली गेली आहे.
या सिनेमाचे संगीत पोषाखी सिनेमाला साजेसे आहे. त्या दृष्टीने २ आणि ३ ची तुलना होऊ शकते. इस्लामिक वातावरण आहे.
मात्र यातली नायिका गुलाम नाही.
नायक सामाजिक, आर्थिक अथवा कोणत्याही अर्थाने तिच्या पासंगालाही पुरत नाही. त्याचे स्थान तिच्या पायाशी. पण तो तिची स्वप्ने पाहतो. या गाण्यात त्याचे हे स्वप्न दिसते.

बाजार आणि उमराव जानचं संगीत या चित्रपटाशी जवळीक साधणारं म्हणता येईल. तर पाकिजाची दृश्यश्रीमंती.
या दृश्यातल्या गाण्याचा गायक फक्त दर्दी लोकांना माहीत असेल. सामान्यांना हे नाव माहीत असण्याची शक्यताच नाही. गाणीही अशीच आहेत.

आता एव्हढे जास्त क्ल्यु झाले आहेत की सिरीयसली ज्यांना गाठी सोडवण्यात गंमत वाटते त्यांचं या खेळातलं स्वारस्य कमी होऊ शकेल.

लंपन बिंगो.
निदा फाजलीची गजल आहे. रजिया सुल्तान.
गायक कब्बन मिर्जा. रेडीओवर छायागीत कार्यक्रमाचे निवेदक होते.

मधोमध फूटबॉलसारखं काय आहे ? इमेज ब्लॉक केलीय का ?
(पुन्हा स्क्रीनशॉट टाकता आला तर बरं होईल. दिसत नाही)

७. यशोमति मैय्या से बोले नंदलाला - झीनत अमान (लहानपणीची पद्मिनी कोल्हापुरे) आणि गावकरी
६. कान्हा कान्हा आन पडी मै तेरे द्वार - सायरा बानू

चित्रांना नंबर्स आहेत हे नंतर पाहिले. Happy

एक मिनीट -- अगदी उजवीकडचे दोन ७-८ क्रमांक आहेत. नंतर वाढवले.
गाणी बरोबर, क्रमांक सुधारा सियोना, रानभुली...

बरोबर सियोना, सीमंतिनी, रेणु, रानभुली.... Happy
१,२,३,६,७,८ झाली. ४ व ५ राहिले

५ ची नायिका रिपीट झाली कोड्यात;
४ ची नेहमीची देव-आळवणी स्पेशल.

क्ल्यू देईस्तोवर संपले कोडे; बरोबर सीमंतिनी, अस्मिता;
@ रानभुली ४ वाली मीनाकुमारी; ५ मधे नंदा
करायच्या एक दशांश वेळात संपलेही सोडवून.

Pages