दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरुण धवन नाही. हा एका गाजलेल्या हॉलिवुड सिनेमाचा रिमेक आहे. हे दृश्य एका गाण्याची सुरुवात आहे. त्या बँड चे सिनेमात काही काम नाही. लागले तर अजून क्लू देईन.

हा एका गाजलेल्या हॉलिवुड सिनेमाचा रिमेक आहे. हे दृश्य एका गाण्याची सुरुवात आहे. >>> अरे, काय क्लू आहेत... अर्धे सिनेमे रिमेक असतात Sad आता गिटार वाजवतो म्हणजे गाणे म्हणेलच ना कुणी... बंडल क्ल्यू नको, बरे दे गं...

यातील हिरोचा मागच्या आठवड्यात एक सिनेमा आला आहे. त्या नवीन सिनेमात त्याने जी भुमिका केली आहे तशी सेम वरिल चित्रपटात आहे पण व्हीलन ने साकारली आहे.

या नावाचा चित्रपट 60च्या दशकात पण येऊन गेला होता.

हा चित्रपट सीरियल किलिंगवर आधारित आहे.

खूप झाले क्लू.

अह्ह्हा, माहिती होते पण विसरून गेले. मी दुष्मन बघत राहिले. जुना दुष्मन होता, नवा ही होता. नवा सिरीयल किलींग होते. संजय दत्तचा सडक पण नुकताच रिलीज झाला, पण तो मागच्या आठवड्यात नव्हता Happy असं सगळं शोधेपर्यंत अमुपरीने सोडवले कोडे ते बरे झाले Happy

Pages