दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे सीमंतिनी.. मी मनोरमेचे सिनेमे शोधता शोधता गाणी ऐकत बसले Happy
मुझको अपने गले लगा लो हे सुंदर गाणं किती तरी दिवसांनी ऐकलं या निमित्ताने!

पाठीमागे हात आहे. सावरले आहे. मी जे जे जुने चित्रपट पाहिलेत त्यात हे काम करण्यात नासीर हुसेन आणि अजून एक जण आहेत त्यांची स्पेशालिटी होती. शक्यतो मुलीच्या पित्याची भूमिका.

भोगीची मिश्र भाजी, तिळाची बाजरीची भाकरी, लोण्याचा गोळा, मसालेभात, कढी, पापड... आदी खाऊन मी सुस्तावलोय पण तुम्हाला हे गाणे सापडेना?
गाण्याचा गायक प्रसिद्ध एकदम...अनेक भाषात गाणी गायलेला...

गायक महेंद्र कपूर किंवा मोहम्मद रफी.
जुने आता राजेन्द्र कुमार, दिलीप कुमार आणि मनोज कुमार उरले.

संजीव कुमार तनुजा अनुभव आहे का?
फिर कहीं कोई फूल खिला --- मन्ना डे

हो तेच आहे. त्या दोघांना मी ओळखले दुपारी + भिंतीवरचा घोडा चित्र.
पण संकु चा सॅटीन नाईट वेअर वेष कसा असेल त्या टाईपच्या सिनेमात? म्हणून सोडून दिले.
चष्मा सदरा आठ्वत होता. तो आता दिसला. एकदा व्हीडीओ बघायला हवा होता.

Pages