दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात
भाग्यश्री १२३, काल उत्तर दिले आहे मी. बरोबर आहे का ?

कुठेय अशोक कुमार?
अच्छा, ते वावेंचे कोडे होते? हल्ली जाहिराती पण दिसतात प्रतिसादात.
काही रंगीबेरंगी / माणूसकाणूस दिसले नाही, मी जाहिरात समजले.

हो रानभुली अगदी बरोबर.
या दृश्यात ऑलिंपिक पेक्षा वेगात पळालीये ती >>>> होना Lol
माई रे मै का से कहू प्रीत >>>> हे 'पीर' आहे ‌.

अरे हे बाकी आहे नाही का?
आईना वोही रहता है, चेहरे बदल जाते है - शालिमार. झीनत अमान, धर्मेंद्र.

आता है मुझको याद >>> भारी! हेच लिहायला आले होते. इतक्या लोकांना हे गाणं माहित्ये हे बघून ड्वाले पानावले Proud

7D5D97D9-320C-42CE-92CC-56417A55BE29.jpeg

या गाण्यात बाळाचा जन्मापासून ते ७-८ वर्षापर्यंतचा काळ दाखवला आहे.
चित्रपटात फॅमिली गाणे आहे(म्हणजे वेळप्रसंगी कुटुंबातले कोणीना कोणी तरी ते गाणे गात असतो). पण ते हे गाणे नाही.

ता.क. मुलांना असे वर फेकलेले मला अजिबात आवडत नाही. पण मी लहान असताना घरातले काका-मामा मला असे वर फेकून झेलायचे तेव्हा खूप मजा यायची Happy

हुश्श... Happy बाळाच्या कोड्यांना मी घाबरते. बाळुली वर्षानुवर्षे त्याच फॅशनची झबले, शर्ट-चड्डी घालतात त्यामुळे कधीचा सिनेमा ते ओळखता येत नाही.

ये फासले, मम्मो
संगीतकार - वनराज भाटिया
(क्ल्यु बद्दल आभार)

Pages