दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्वंद्वगीत आहे. गायक गायिका प्रसिद्ध.. ७०-८० च्या दशकातील चित्रपट.

अजून एक चित्र घ्या गाण्यातील

आता सोपे होईल....

trial2_0.jpg

कह दु तुम्हे>>
नाही!

या वेळी कुणी नसतं इथे. थोड्या वेळाने सगळे येतील तेव्हां मला येता येणार नाही. Happy
नवीन कोडं. मी नसताना सुटलं तर पुढचं कोडं घ्या.
चेहरे झाकले असतील तरी त्यावरचे हावभाव कायम ठेवले आहेत. Lol

bhopale.jpg

काय कपडे
काय कलरस्कीम
अजून क्लू देऊन जागं Happy

या गाण्यात जे पात्रं नाही ते चित्रपटात महत्वाचं पात्र आहे.
सासरा सून एकत्र आहेत या चित्रपटात. सूनेचा मुलगा चित्रपटसृष्टीत.

क्या मौसम है............ चल कही दूर निकल जाये - दूसरा आदमी

सियोना - एकदम सही उत्तर.
हे दोघे आणि बर्फ यावरून अंदाज बांधता आलाच असेल.
चांगला चित्रपट.

ही एका सुप्रसिद्ध गझलकाराची एक गझल आहे. ऊर्दू शब्दांची रेलचैल आहे.
सामान्यां मधे खूपशी प्रसिद्ध नाही. चित्रपट गाजलेला आहे.

Picture1.jpg

बाजार नाही.
२ ,३ चा क्ल्यु घेऊन दिशा पकडली तर योग्य मुक्कामी पोहोचाल.
( २ आणि ३ हे रस्त्यात लागणारे योग्य स्टेशन्स आहेत. )

Pages