दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णा
तुमच्या गाण्याचा शोध घेता घेता मला सारीका पहायला मिळाली. हे ही नसे थोडके Lol

सॉरी वावे, मी दोन चित्रे साम्य पहा करून, कॅन्व्हास स्टँड नाही केस इथवर गेले.... गाणे लिहीले
तुमचे अंदाज / उत्तर पाहिले नाही, नाहीतर थांबले असते.

या चित्रपटातली इतर सर्वच्या सर्व गाणी सुपर हिट होती. दृश्यात नायक नाही. तो रफीच्या आवाजात गातोय.
Screenshot_20210112-132829~2.png

क्या बात है !
श्रद्धाताई - आता मी भक्त तुमची.

कायच्या काय कथा, नयनरम्य सीनरी आणि नयनरम्य लोक असलेला हा चित्रपट तुम्ही नक्की पाहिला असेल.
यात तसं म्हटलं तर बरेच मुख्य कलाकार, आणि तसं म्हटलं तर ५ मुख्य कलाकार(किंवा री)
puzzle1.PNG

येस
हा सगळा वर्ग अतिशय हुशार होत चालला आहे. सगळे बदामाचा शिरा आणि शंखपुष्पी घेतात बहुतेक.

Screenshot_20210112-225044~2.png थोडी गंम्मत, हे एका मराठी मालिकेतील अप्रतिम गाणे आहे. इथल्या चाणाक्ष लोकांना नक्कीच माहीत असेल.

बिंगो कारवी मला पूर्ण खात्री होती की लगेच येणार ह्याचं उत्तर, हे विभावरी आपटेने गायलं होतं सा रे ग म मध्ये. काय अप्रतिम गायलंय. एकदा ऐकले की सलग 5/6 वेळा ऐकले जातेच. तरी सर्वांनी प्लिज हे युट्युब वर तिच्या आवाजातील एका.

मार डाला मध्ये माधुरी ने क्रिम कलर चा घागरा घातलेला नाही. पूर्ण गाणं बहुतेक हिरवा घागरा आहे.
या पायल ची लाऊड स्टाईल कुठेतरी रामलीला ची आठवण देतेय. पण रामलीला मध्ये शरारे डार्क रंगाचे आहेत.
हा पाय ओळखीचा आहे माझ्या.

दोन्ही नाही. हे एक धमाल गाणं आहे , जबरदस्त न्रुत्य... मुद्राभिनय, अलिकडचचं आहे. (१०-१२ वर्षे ?) सिनेमा नाही चालला. हे गाणं मला अंडररेटेड वाटते. तितकं कौतुक नाही झालं. हिरो मख्ख वाटतो. नाचत नाही गात नाही. उगाच बॉडी दाखवत फिरतो. फारसा चर्चेत नाही. नटी आता , तेवढे काम करत नाही. हिरो गायब आहे.

Pages