दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता 5मिनिटात कोड्याचा फडशा पडतो. सगळे एक्सपर्ट झाले आहेत.

त्या पेक्षा जास्त वेळ कोडे तयार करण्यात जातो.

आता 5मिनिटात कोड्याचा फडशा पडतो. सगळे एक्सपर्ट झाले आहेत. >>>> खरंय....
अपवाद अनुंची वंशवृक्ष फांद्यांवरून टपकणारी कोडी. माझ्याकडे ती नाहीत.
गेल्या कुठे मां खंग्री ?

कारवी, खंगरी नाही दिले त्याबद्दल खरचं धन्यवाद. छान होतं हे कोडं. सगळीच कोडी खंगरी झाली तर कसं चालेल. काही सुटली हा आनंद परत परत इथे यायला प्रेरणा (मोटीव्हेट) देतो. Happy

पुन्हा अजून एक सोपं. मूड फ्रेश होईल हे गाणं ऐकताना.
barsat.jpg

पाऊस आणि लताचा आवाज. अजून काय पाहीजे ? एका हातात का मावणार आहे ?
barsat2.jpg

ते पहिलं चित्र पुरेसं होतं >>>> अगदी.... ती मोठी पाने थेंब झेलताना दाखवली असती तरी पुरेशी होती...

@कोडे >>> रफी म्हणजे जुने गाणे आहे. मला ती तब्बू वाटली.
हे गाण्याचे दृश्य आहे की गाण्यातील पेंटिंग वगैरे?

गाण्यातले दृश्य आहे.
या गाण्यात चित्रपटाची श्रेयनामावली आहे.

- गाणे संदेशात्मक आहे. मोटीव्हेशनल आहे. सुख आणि दु:ख आपल्या हातात नसतं. ते तर निसर्गनियमाप्रमाणे लिखित असतं. असा संदेश आहे.

- या चित्रपटात अनेक मोठे स्टार आहेत. दोघांमधे नामसाधर्म्य आहे.

- यातली इतर गाणी प्रचंड गाजलेली आहेत.

या गाण्यात जे तीन मोठे हिरो आहेत त्यातल्या दोघांचे स्क्रीननेम प्रत्यक्ष नावापेक्षा वेगळे आहे. नामसाधर्म्यवाला एक हिरो त्यात आहे.

नाही.
आणखी एक क्ल्यू
यातले महत्वाच्या कलाकारांपैकी कुणीही एकमेकांचे रिअल लाईफ नातेवाईक नाहीत.

ताट भरगच्च वाढले आहे. मुखवास पण आहे.

Pages