दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल ये बेचैन मध्ये लांब पांढरा ड्रेस आहे पण त्यालाही आता २० वर्ष झाली...
(पण क्ल्यू चांगला आहे. सुटेल वाटते आहे!)

मी टायगर च्या बाघी चं छम छम छम पाहिलं
पण त्यात उघडा पाय नाहीये, लाल पतियाळा मधला पाय आहे
जाम त्रास द्यायला लागलं हे गाणं.बऱ्याच बायकांचे पाय बघून झाले.

"ये पैर इस धरती पर नाद्यवेद है!"
असे नाचे मयुरी चित्रपटात लिहून येते त्याची आठवण झाली.
ये पैर इस धागे पर खांग्र्यवेद है.

गाण्याची सुरुवात केळीच्या पानावरून पाण्याचे थेंब पडतात, मग हा पाय मग तळहातावर पाण्याचे थेंब मग धबधबा....

__/\__

Pages