खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सोलकढी Happy बरेच दिवस झाले बनवली नाही
वरच्या सर्वच जणांचे फोटो भारी आहेत.

IMG_20201124_131145.jpg
लेक्चर आज उशीरापर्यंत चालू असल्याने खायला पण उशीर..
खात असताना बाकी गोष्टींकडे मी लक्ष देत नसल्याने उगाच शिक्षकांचा ओरडा खाण्याची भीती..
त्यापेक्षा उशीरा जेवलेले परवडतं.

शनिवारी मुलाचा बड्डे होता. त्या निमित्ताने हे तीन केक घरी बनवले गेले. तिन्ही केक बायकोनेच बनवले. एक आदल्या रात्री बारा वाजता कापायला. दोन बड्डेच्या दिवशी दोन्ही पोरांमध्ये भांडणे नकोत म्हणून Happy
कार केक अर्थातच मुलासाठी. त्याला गाड्या आवडतात म्हणून. त्याचे ९० टक्के गिफ्ट खेळणी नेहमी तेच असते.

1606230730396.jpg
.
1606230763781.jpg
.
1606230791638.jpg

मेघावि
धन्यवाद Happy
हो डोळे छान आहेत तिचे. घरचे त्यामुळे ऐश्वर्या नाव सुचवत होते. पण आधीच अभिषेक होता घरात म्हणून टाळले Wink

@ VB
हो,अगदी. Happy
केक कापणे आणि खाणे त्यांचा सर्वात आवडीचा कार्यक्रम. त्यामुळे आमच्याकडे दोन्ही घरातील एकूण एक माणसांचे बड्डे साजरे केले जातात. ते सुद्धा आदल्या रात्रीही केक कापून साजरे केले जातात. Daughters Day, Children's Day, कधी मुलीला कसले प्राईज मिळाले, आता ख्रिसमस येईल.. काहीही कारण चालते Happy

जबरदस्त केक्स , काय केक तयार केलेत अस्मिताने... लगेहात स्वस्तुती Proud
ओरिजिनल ऋन्मेषला अनेक शुभेच्छा व आशीर्वाद. Happy

सुंदर केक!
साईड बिझिनेस म्हणुन तुम्ही बेकरी काढु शकता. टणाटण खपतील केक.

अफलातून ! लेकाला happywala birthday!

अस्मिता, निरंजनला वाढदिवसानिमित्त आशीर्वाद!

धन्यवाद अस्मिता, लावण्या, देवकी आणि मानवमामा...
ती बोलून तर तेच दाखवते. केक चॉकलेट कूकीजचा व्यवसाय.
मी सध्या तरी फारसा फेव्हरमध्ये नाहीये. तरी पुढे काय होतेय बघूया Happy

@ अस्मिता, आपल्याही निरंजनला हॅपी बड्डे Happy

केक सुंदरच!
छोट्या ऋन्मेषला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
@ अस्मिता - निरंजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

हेलो मला काहीही कळत नाहीये. अस्मिता धन्यवाद का देतेय??????
ऋन्मेष यांच्या मुलीचा बड्डे होता ना? त्यांच्या कुटुंबाने केक बनवलेत ना???

एक अस्मिता आहेत ज्या ऋन्मेषच्या आई आहेत. एक अस्मिता आहेत ज्या ऋन्मेषच्या पत्नी आहेत. एक अस्मिता आहेत ज्या अभिषेकच्या पत्नी आहेत. एक अस्मिता आहेत ज्या अभिषेकच्या बहीण आहेत. वरवर जरी या चार अस्मिता वाटत असल्या तरी मुळात आहेत दोनच अस्मिता. जसे ऋन्मेषही आहेत दोन.
तर आता यापैकी केक जरी एकाच अस्मितेने बनवला असला तरी वाढदिवस दोन्ही अस्मिता यांच्या मुलाचा आहे. त्यामुळे धन्यवाद कोणतीही अस्मिता देऊ शकते. आशा करतो आता आपला गोंधळ दूर झाला असेल सामो Happy

माझ्यातर्फेही वरील सर्व प्रतिसादांना धन्यवाद Happy

अरे काय हे Rofl
अवांतर पुरे... केक बघा !

आलू पराठा लोणी 20201125_145801.jpgKazumi mandeli fry आहे का? मस्त जेवण.
Mrunali manchurian मस्त आहे. वरची डिश पनीर आहे का?

IMG-20201124-WA0051[1].jpg

खूप दिवसांपासून माझी इच्छा होती हा पदार्थ बनवायची. मी हा उपासाच्या बटाटा चिवड्यासारखा दिसणारा पदार्थ इंडोनेशियात खाल्ला होता. नंतर शोधूनही कुठेही मिळाला नाही. शेवटी सुकट जवळा (मासा) दिसला आणि मग प्रयत्नांती परमेश्वर याचा प्रत्यय आला. एकदम टेस्टी, कुरकुरीत, आणि सुवास. Happy खोबरे, काजू माझे अ‍ॅडिशन. यात बारके झिंगे पण टाकता येतात. ते पुढच्या वेळी. Happy

Pages