खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Wow!

<<< व्हीबी: कोथिंबीर वड्यांचा रस्सा मस्त आहे. कसा करतात? >>> माझेमन, खुप सोपा आहे. साधेसेच कांदा-लसुण-आल्याचे (आवड असेल तर शेंगदाणे किंवा ओले/सुके खोबरे वाटण सुद्धा घेऊ शकता ) वाटण घेतलय फोडणीला, आमच्या तिखटात गरम मसाला असतो म्हणुन वरुन वेगळा नाही घेत पण नुसती मिरची पुड असेल तर थोडा गरम मसाला घ्यायचा फोडणीत परतुन, हळद, मीठ, हिंग घालुन परतायचे अन हलकेसे तेल सुटु लागले की गरम पाणी घालुन ऊकळी येवु द्यायची, मग त्यात ऊकडलेल्या कोथींबीर वड्या घालुन मंद आचेवर शिजु द्यायचे. दाटपणासाठी दोनेक वड्या कुस्करुन घालायच्या. झाले.

Mazemann ☺️

अजून एक नुसताच सल्ला. कोथिंबीर वड्या तळायच्या भानगडीत न पडता, हिंग जिऱ्याच्या फोडणीवर खमंग परतून घ्यायच्या, कुरकुरीत होतात अन तेलही कमी लागते

Happy चिन्मयी
कोबी-बीट कोशिंबीर कशी केली होती ? मी केली नाही कधी पण करावी म्हणते.

धन्यवाद सगळ्यांना Happy चिन्मयी आंबा पल्प आहे fridge मध्ये ठेवलेला.
Mrunali पालक पनीर छान आहे. आणी भात पण मस्त आहे. कोणता तांदूळ आहे?

अर्र्र्र्र्र का आले रे देवा या धाग्यावर??? Sad मृणालिनी तो माशाच्या थाळिचा फोटो कातिल आहे.
वडे, शिरा, पालक पनीर यम यम!!!

अर्र्र्र्र्र का आले रे देवा या धाग्यावर??? Sad मृणालिनी तो माशाच्या थाळिचा फोटो कातिल आहे.
वडे, शिरा, पालक पनीर यम यम!!!

कोबी-बीट कोशिंबीर कशी केली होती ? मी केली नाही कधी पण करावी म्हणते.>>>> अग काही नविन नाही त्यात.
कोबीची पानं म्हंजे लेयर्स वेगळे काढते मी. ते नीट धुवून घ्यायचे. मग बारीक चिरुन पुन्हा एकदा धुवून घ्यायचं. यामुळे कोबीचा उग्रपणा निघूून जातो. मग बीट पण बारीक चिरून घ्यायचा. हिरवी मिरची, वाटलंच तर थोडी कोथिंबीर चिरून घ्यायची. सगळं एकत्र करून त्यात मीठ,साखर,दाण्याचं कुट घालून मिक्स करायचं. वरून लिंबू पिळायचं. झालं. Happy काही लोक वरून फोडणी पण घालतात मोहरीची. चा़ंगली लागत असावी. मी कधी ट्राय केलं नाही.

दही कोबी बरं नाही लागणार. दोन बेचव गोष्टी Happy
पण फोडणी घालून, कच्चा कोबी व कच्चे किसलेले बीट मस्त लागेल असे वाटते.

स्टिम राईस/हाफ बॉईल्ड राईस . ओके
पण प्रकार कोणता असे विचारायचे होते मला. जसे तांदूळ असतात ना अम्बेमोहोर,बासमती तसा हा कोणता तांदुळ आहे?

ओह मग मला पण आयडिया नाही.. कारण इकडे आंबेमोहोर,इंद्रायणी,बासमती तुकडा वगैरे नाही मिळत.पण कोलम, बिर्याणीचा बासमती, स्टिम, फुल बॉइल्ड, ईडली राईस, डोसा राईस,बुलेट राईस(वरायटी राईससाठी) इतके प्रकार मी सुपरमार्केट्स मधे पाहते.

Pages