युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद स्वाती आणि मीरा.
आता जे तेल आहे ते डब्यात भरून कचऱ्यात टाकतो.
दिवाळीचे तळण झाले तर तेच तेल पणत्यांसाठी वापरेन.

आम्ही वापरतो तळणीचं तेल दिव्यात(म्हणजे मीरा सारखंच. त्यातल्या त्यात तेल डिसपोज करण्याचा पर्यावरण ओके उपाय म्हणून),वास आलेला जाणवला नाही फारसा.
हल्ली जे काही थोडं तळण कधीतरी घरात होतं(भजी किंवा उडीद वडे), त्यात तेल कमी वापरून ते शोषत शोषत शेवटच्या वड्याला अगदीच 1 चमचा उरतं, आणि मग ते उरलेलं गेटच्या बिजागऱ्या किंवा दिवा असं करतो.

तेल डिस्पोजेबल डब्यात भरून टाकू नये असं वाचल्याचं आठवतं आहे. बाकी एवढ्या कमी क्वान्टिटीत उरलेलं तेल ओल्या कचर्‍यातच टाकावं असंच वाचलं आहे.

कमीत कमी उरवतो आणि पेपर टॉवेल, हात पुसायचे कागद असं जे कंपोस्ट मध्ये टाकणार असू ते टाकण्या पूर्वी तेलात भिजवून/ शोषून मग टाकतो.
ते शक्य नसेल तर योगर्ट ड्रिंक च्या बाटलीत भरून landfill कचऱ्यात टाकतो. आमची सिटी घेते पण त्याला बुदला भरावा लागतो. घरात ते शक्य नाही आणि नकोच.

राहिलेले तेल दिव्यात वापरले नाही.पण दिवाळीच्या तळणा चे तेल पणतीत घालते.अगदीच थोडेसे उरलेले तेल असेल तर वर amitav यांनी म्हटल्याप्रमाणे करते.

आपण इथे एव्हढी चर्चा करतो आहोत... ती कधीतरी होणार्‍या तळणीच्या तेलाबद्दल..
मग हे वडापाव वाले , हॉटेल वाले रोजच तळतात ते काय करत असतील?...

हे वडापाव वाले , हॉटेल वाले रोजच तळतात ते काय करत असतील?>> त्याच बायो डिझेल बनवता येत आणि बनवतात सुद्धा काही ठिकाणी.

आमच्या मालकीणबाई लाल मिरच्यांच (मोठ्या जाड आणि लांब ) लिंबू आणि साखर घालून मस्त स्प्रेड करतात. जामसारखा दिसत आणि मस्त लागत. लहान मिरच्यांच पण होइल पण तिखट होईल.

आपल्याकडे लोक तळणाला वापरलेले तेल फेकतच नाहीत, बरेच लोक वरून घ्यायला म्हणुन वापरत असावेत (चटणीवर, पीठल्यावर, वरणात), कुणी मोलकरीणीला वगैरे देत असावेत. त्यामुळे फेकणारे (डिस्पोज ऑफ करणे यासाठी फेकणे हा शब्द वापरत आहे) फार कमी असावेत.
(हा माझा अंदाज आहे.)
तेव्हा त्याचा रिसायकलिंग करण्याचा प्रकार फारसा सुरू झाला नसावा. अन्यथा विक्रम सिंह यांनी लिहिल्या प्रमाणे बायो डिझेल, साबण, पशु खाद्य वगैरे मध्ये त्याचा वापर करण्यास उरलेले तेल घरून गोळा करून तिकडे पोचवण्याचा उद्योग सुरू झाला असता.

फूड व्हिडीओ बघितले तर त्यातले तेल इतके भयानक दिसते की समोसा कचोरी काय असेल ते कितीही रुचकर असले तरी तब्येतीस वाइट. तेलाचा कमर्शिअल वापर ह्यात अनेक गैरप्रकार होत असतात. काळजी घ्या. जास्त तळण होत असेल तर एअर फ्रायर चांगला पर्याय आहे.

मी तळण कमीच करते, करते तेव्हा कमीत कमी तेल वापरते. पण काही पदार्थ उदा गुलाबजाम कमी तेलात होतच नाहीत तेव्हा तेल उरतं, ते रोज संध्याकाळी हॉल मध्ये दिवा लावते त्यात किंवा देवांच्या निरांजनात ही वापरते. दिवाळीतल तेल पणत्यात घालते.

सर्वांना शुभ दीपावली!!!
माझे रव्याचे लाडू फसले या वेळेस.... पाक एकदम पातळ झालाय......फ्रीजमध्ये ठेवून बघितलं मिश्रण ४ -५ तास..अजिबातच लाडू वळता येत नाहीयेत...काय करू?

मटण लवकर शिजावं म्हणून काही करता येईल का?
माहेरी चूल होती. त्यामुळे रटरटून शिजलेलं मटण खायची सवय आहे. मुळात चुलीवर जास्त वेळ शिजले तरी काही फरक पडत नाही पण इतका वेळ गॅस जाळायचा म्हणजे जीव पण जळतो. दही लावून मॅरिनेट केल्यावर लवकर शिजते असं ऐकलंय पण किती वेळ ठेवायचं मॅरिनेट व्हायला?

मटन एक तास तरी कमीत कमी मॅरिनेट करावे. व गॅस कमी जाळायचा असेल तर प्रेश र कुकर मध्ये चार शिट्ट्या आणून घ्या.

वरची कच्ची पपई टिप पण अगदी बरोबर आहे. दही हळद मीठ आले लसूण पेस्ट मटन मसाला. लाल तिखट. दही नसेल तर लि़म्बू रस.

मॅरिनेशन कमी वेळ झालं म्हणून बहूतेक कमी शिजले मटण. पपईची ट्रिक माहीती नव्हती. गावाकडे नारळाच्या करवंटीचा तुकडा टाकतात शिजवताना हे अगदी ताजं ताजं कळलंय.
Thank you भरत, अमा.

आज मटन आणून डिफ्रॉस्ट करून मॅरिनेट करून ठेवले व नेक्स्ट डे लंचला साडे अकराच्या सुमारास केले म्हणजे परफेक्ट होते साडॅबा रा परेन्त.

कणी क मटन शिजे परेन्त भिजवून ठेवायची. पुदिना कोथिंबीर कलौंजी मिक्स करुन ठेवायचे. भात चांगल्या प्रतीच्या तांदळाचा करायचा. तो ही पहिल्या वाफे चा हवा. काही ठिकाणी मौ असट तर काही ठिकाणी सुटा फडफडीत आवड तो. त्या प्रमाणे. भर्पूर कांदा लिंबू कापून ठेवायचे.
सर्व टेबलावर ठेवुन मग पोळ्या करायला घ्यायच्या. मंडळी पानावर बसली की पोळी तव्यावर. त्यात मध्ये तो वरील मसाला घालायचा कलुं जी वगैरे. मस्त बेत होतो.

हे मी अनेकदा केलेले आहे. खिमा पण मस्त करायचे मी. अनेक वर्शात केलेले नाही. नो मीट .

Induction cooktop वर तळणाचा अंदाज काही जमेना. कोथिंबीर वड्या कुरकुरीत तळता येतच नाहियेत. एकतर तेल प्रचंड तापते नाहीतर कमी. तळण नेहमी होत नाही,त्यामुळे सवयीने जमेल असे पण नाही. काही युक्ती आहे का?

पोळ्या जर नुसत्या लाटून फ्रीजमधे ठेवल्या आणि दोन तीन दिवसांनी काढून भाजल्या तर चालतं का? काय काळजी घ्यावी जेणेकरून चांगल्या होतील? (कशा ठेवायच्या, भाजण्यापूर्वी किती वेळ बाहेर काढायच्या?) इथे कुणीतरी हे लिहिलं होतं असं वाटतंय पण कुठे ते लक्षात नाही.

मी फ्रोजन चपात्या मागवत असे.
दोन चपात्यांच्या मध्ये आणि सगळ्यात वर व खाली बटर पेपर घालून झिपलॉक बॅग मध्ये यायच्या.

पोळ्या जर नुसत्या लाटून फ्रीजमधे ठेवल्या आणि दोन तीन दिवसांनी काढून भाजल्या तर ..
<<
थोड्या शेकून मग ठेवा. हलका रंग बदलला की थांबायचं.
म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत, तसेच वॉटर कंटेंट कमी झाल्याने खराब होण्याचे चान्सेसही कमी होतील.

इथे फ्रोझन मिळतात त्या बहुधा नुसत्या हवेवर वाळवून पॅक केलेल्या असतात. चिकटत नाहीत, आणि शेकल्यावर छान मऊ होतात.
अलीबाबा म्हणतात तसं अगदी किंचित शेकवूनही ठेवता येतील, पण शेकवायचं ॲडिशनल काम होईल आणि पुन्हा वाफ जायला हवेवर ठेवाव्याच लागतील.

(प्रयोग करून पाहा आणि निष्कर्ष शेअर करा नक्की.) Happy

कणिक कालवून फ्रीज मध्ये ठेवून किती दिवस वापरू शकतो?
तितके दिवस लाटलेल्या पोळ्या, वर भरत यांनी सांगितले तसे चिकटु नयेत म्हणुन दोन्ही बाजूंना बटर पेपर लावून मग झिप बॅग ठेवून टिकायला हव्यात?

त्या फ्रोजन चपात्या बाहेर काढल्यावर भाजण्यापूर्वी कीती वेळ जाऊ द्यायचे तुम्ही भरत?

Pages