युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

शू.. ssss कुणाला न सांगता चार बिया पेरून बघा.
रक्तात परसात रुजविल्या भांगेच्या मी बागा म्हणता येईल तुम्हाला. Proud

सर्द झालेले पापड किंवा मऊ पडलेला चिवडा परत खुसखुशीत कसा करता येईल?

तांदळाच्या नाहीतर साखरेच्या डब्यात नाहीतर एखाद धान्याच्या कोठीत थोडे दाबून ठेवा पापड पॅकेटला एक छोटे भोक पाडून, कुटकुटीत होतात,

आम्ही ह्या सेम प्रोसिजर ने आगपेट्या ड्राय अन् कुटकुटित ठेवत असू पावसाळ्यात.

भांगेच्या बी बद्दल झालेली चर्चा वाचून मजा आली.

आपण अफूचे बी खत असतोच. तसेच भांगेचे खात असतील अमेरिकेत. हाकानाका.

ओव्हन मध्ये गरम करून किंवा तव्यावर मंद आचेवर भाजून
आणि लगेच त्याचं पीठ करून भजी करायला वापरून टाका बेसना ऐवजी

डेसिकेटेड कोकोनट जेवणात वापरता येईल का वाटणासाठी पर्याय म्हणून? म्हणजे दाण्याचं कूट टाकतो ना आपण भरली वांगी वगैरे करताना, तसं. चव बिघडेल का?

हा वाटण प्रकार म्हणजे शत्रु होऊन बसलाय. >>>> हो ना. आमच्याकडे नाॅनव्हेज, कडधान्य वाटणाशिवाय आवडतच नाहीत. वाटण तेही खरपूस भाजलेले आणि ताजे, फारफार तर 3-4 दिवसाचे चालते. त्यामुळे बरेेचदा ऑफिसमधून आल्यावर वाटण बनवून नंतर स्वयंपाक करताना कंटाळा येतो. म्हणून असे वाटते की असं तयार ताजे वाटण बनवून मिळाले तर किती बरं होईल. म्हणजे अर्धा तास आधी ऑर्डर करा आणि तयार ताजे वाटण मिळवा. Proud

हा वाटण प्रकार म्हणजे शत्रु होऊन बसलाय. Uhoh>>> +100
खरंय. वाटण असेच हवे, तसेच हवे, खमंग भाजलेले हवे. तेल सुटलेले हवे,हिरवे हवे, लाल हवे. ब्ला ब्ला...
निल्सन ला मम

मग खोबरे टाकणे हा उपाय चांगला आहे की.
वाटण पाहिजेच म्हटलं की खोबरं घालायचं. चव बिघडली की सगळे म्हणतील नको हे वाटण, त्यापेक्षा साधंच करत जा. Wink

चव बिघडली की सगळे म्हणतील नको हे वाटण, त्यापेक्षा साधंच करत जा. Wink >>> हा उपाय मस्त आहे. करून बघावा. Lol
राधिका मसालेवाले यांनी नोंद घ्यायला हवी. तयार वाटण बाजारात आणा म्हणावं.

वाटणाचे पदार्थ फक्त सुट्टीच्या दिवशीच मिळतील असं डिक्लेअर करा. नाहीतर ‘वाटण तुम्ही करा, मी बाकीचं बघते’ अश्या वाटा(ण)घाटी करा. Happy

तसे मसाले मिळतात कि बाजारात. मसाला+पाणी/दही/टो प्यी+भाजी/पनीर/चिकन. पण रोजच्या भाज्या तश्या करता येत नाहीत.
आईस क्युब करतात तसे वाटणाचे क्युब्स करून ठेवायचे. लागतील तसे फ्रिझर मधून काढायचे.
चव बिघडली की सगळे म्हणतील नको हे वाटण, त्यापेक्षा साधंच करत जा.>>> मग स्वयंपाकच असा करावा कि लोक म्हणतील नकोच करू Proud

ठेचा करून फ्रीजर मध्ये ठेवता येईल. बराच काळ टिकतो. पटकन एखाद्या भाजीत वगैरे घालता येतो. असाच खायला घ्यायचा असेल तर हवा तेवढाच मावे करून घ्यायचा.

घरच्या बागेतल्या ताज्या लाल मिरच्या खूप आहेत. त्यांचे टिकाऊ असे काय करता येइल? लोणचे सोडून?>> शेजवान चटणी.

धन्यवाद!
फ्रीज केल्यावर चव बदलत नाही का?

फ्रीज केल्यावर चव बदलत नाही का?> ते क्युब करुन ठेवा म्हणतात मी ही हा सल्ला वाचला आहे. पण एकतर ते क्युब पाणथळ/ पांचट होतात व खोबरे वगैरे असेल तर चव नक्की बदलते.

मिरच्यांना उभी चीर देऊन त्या गरम केलेल्या तेलात घाला. तेल गार झालं की मिरच्यांसकट बाटलीत भरून ठेवा. स्वाद आवडत असेल तर तेल गरम असतानाच त्यात लसणीचे कापही घालू शकता.
कोरड्या चटण्यांत, किंवा अंबाडीसारख्या पालेभाज्यांवर वरून घ्यायला मस्त लागतं.
या तेलात आवडीनुसार ड्राइड हर्ब्ज घालून ब्रेडसाठी मस्त डिप होतो.

ठेचा खरा. मिरच्या,लसूण जिरे मीठ वाटून घ्यायचं टिकण्यासाठी लिंबाचा रस/व्हिनीगर
लोणचं : आंब्याच्या लोणच्याचा मसाला,कलोंजी व बडीशेप , धन्याची पूड व मीठ हा मसाला मिरचीत भरायचा बिया काढून. आवडीचे तेल उप, बिहारमध्ये सरसों तेल घालून करतात. तुमच्या आवडीचही तेल घालू शकता.

रोज रोज वाटपाचा कंटाळा येत असेल तर आठवड्यात दोन दिवस तीन दिवस वापरता येईल एवढे वाटण करून ठेवावे. चवीत खूप काही फरक पडत नाही. किंवा रविवारी आठवड्याभराचे वाटण करावे.
रोज कामावरून दमून आल्यावर साग्रसंगीत वाटण घाटणाचा स्वयंपाक करावा अशी अपेक्षा स्वतः कडूनच ठेवू नये. दुसऱ्या लोकांना पण जरा दमणूकीची कल्पना देऊन ऍडजस्ट करायला सांगावं.

फ्रीज केल्यावर चव बदलत नाही का? >>> नाही बदलत असा अनुभव आहे. मी ठेचा असा करते - मिरची, दाणे, लसूण, मीठ एकत्र भरडून घ्यायचे. तेलावर जिर्‍याची फोडणी करून ही भरड मंद आचेवर पूर्ण शिजेपर्यंत परतून घ्यायची. तेल थोडं जास्त असलेलं बरं. सगळं मिश्रण शिजल्यावर जरा गार होऊ द्यायचं आणि एखाद्या डब्यात भरून फ्रीजर मधे ठेवून द्यायचं. २-३ महिने तरी नक्कीच चांगला राहतो.

घट्ट झाकण असलेल्या डिस्पोजेबल डब्यात भरून केरात टाकते.
नुकतंच ऑइल सॉलिडिफायरबद्दल कळलं. मी अजून वापरून पाहिलेलं नाही, पण मला विश्वसनीय सूत्रांकडून फार रेकमेन्ड झालंय.
भारतात मिळतं का काही कल्पना नाही.

Deep frying नंतर उरलेल्या तेलाचं काय करता? >>>>> मी उरलेलं तेल बॉटल मधे भरून ठेवते आणि रोज संध्यकाळी देवासमोर दिवा लावते. दिवाळीत पणत्या लावयला वापरते. अर्थात तळणे पदार्थ अगदी क्वचित होतात आणि दिवाळी पदार्थ विकत आणते त्यामुळे quantity खुप कमी असते.
{हे मी पूर्वी लिहिलं होतं आणि माबोवर टीकाही ऐकली होती. पण लोक चालु होण्याअगोदर परत सांगते की देवासमोर दिवा पूजा /भक्तीभावाने लावण्यापेक्षा आई आणि आजीची आठवण आणि प्रसन्न वाटणे (mental conditioning मुळे) याच उद्देशाने लावलेला असतो. देवाची पूजा कधीही करत नाही, त्यामुळे खरकट तेल वगैरे विचार माझ्या कधीही डोक्यात आले नाहीत. आणि तेल ओतण्याच्या पापापेक्षा हे पाप (असेल तर) कमी आहे }

Dispose off करायचं तर कसं करावं? >>>> सगळे पर्याय प्रदुषण निर्माण करणारे आहेत, म्हणुन तर ओतुन देत नाही.

Pages