युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख दिसतायत लाडू निल्सन!
माझं बेसनाच्या लाडवाचं मिश्रण कधी कधी अती सैल होतं. तूप जास्त होतं की काय माहिती नाही. मग रात्रभर तसंच ठेवून सकाळी वळले जातात. पण मग एकदा तूप कमी घातलं तर ते खूपच कमी पडलं आणि वर निल्सनने म्हटलंय तसे ते लाडू थोडे कच्चट लागले. पण मी परत भाजायचं धैर्य केलं नाही.

माझी आई डाळ भाजून करते. आता तो खटाटोप होत नाही मग जाड बेसन कोरडेच भाजून घेते मग कढलेले तूप लागेल तसे घालून भाजते.
मग जरासे गरम कडकड दूधाचा हबका मारते. बेसन कण शिजला की हलका लागतो हाताला परतताना. तूपकट लाडवापेक्षा सरसरीत दाणा शिजलेले लाडू मस्त लागतात.

छान झालेत लाडू नेल्सन. अभिनंदन. पेशन्स ठेवुन सुधार ले. ते एक लाडू बेसन मिळते तेच वापरले का?

अरे बापरे मला अगदी सुगरण असल्याचा फील आला Wink
धन्यवाद सगळ्यांना __/\__
@अमा, लाडू बेसन नाही वापरले, चणाडाळ चांगली भाजून रवाळ दळून आणली होती.
खरंतर 3-4 महीने झाले 1 किलो चणाडाळ सामानात भरली होती. पण तिचा वापर काही होत नव्हता. मग कशात वापरावी असे दोन चार पर्याय शोधल्यावर लेकीला लाडू आवडतात म्हणून शेवटी लाडू केले. Happy

मालवणी मसाला घालून नॅानव्हेजशिवाय कोणत्या भाज्या/रस्सा करता येतात?

मालवणी मसाला घालून नॅानव्हेजशिवाय कोणत्या भाज्या/रस्सा करता येतात?)))))

मालवणी मसाला म्हणजे मालवणी भाजलेल्या कांद्याखोबर्याचे वाटण म्हणायचे आहे का ??

तसे असेल तर चणे, काळे वाटणे चवळी वाल अशा जड कडधान्यांची उसळ, काजूची भाजी पालक ची वाल ची आमटी , अंड्याची आमटी , बटाटा रस्सा यामध्ये सर्रास वापरले जाते

कच्ची केळी, वांगी, भेंडी, कार्ली, बटन मश्रूम यांचे काप पण मालवणी मसाला घालून मस्त लागतात. हळद ,मीठ , मालवणी मसाला, चिमूट्भर हिंग लावून ठेवायचे १०-१५ मिनिटे आणि मंद आचेवर थोडे थोडे तेल घालून भाजायचे .

तसे असेल तर चणे, काळे वाटणे चवळी वाल अशा जड कडधान्यांची उसळ, काजूची भाजी पालक ची वाल ची आमटी , अंड्याची आमटी , बटाटा रस्सा यामध्ये सर्रास वापरले जाते..... +१.

मी भारतातून एका महिला उद्योगाचा आणते मालवणी मसाला, खूप मस्त आहे. पुणे-मुंबई हायवेवर मुंबईच्या दिशेनं जो नवा खाऊ-स्टॉप झाला आहे तिथे त्यांचा स्टॉल आहे. त्यांचे कोल्हापुरी मसाला, कुठल्या कुठल्या चटण्या, लोणची सगळेच प्रॉडक्ट्स चांगले आहेत.

मी ठाण्याच्या गोखले रोडवरच्या आशिर्वाद का अशाच नावाच्या दुकानातून आणतो. इकडे हल्ली बेडकरचा मालवणी मसाला बरेचदा मिळतो. तो आणलाय.

पुणे-मुंबई हायवेवर मुंबईच्या दिशेनं जो नवा खाऊ-स्टॉप झाला आहे तिथे त्यांचा स्टॉल आहे. त्यांचे कोल्हापुरी मसाला, कुठल्या कुठल्या चटण्या, लोणची सगळेच प्रॉडक्ट्स चांगले आहेत.>>>> सावजी मसाला चांगला आहे.

मी भारतातून एका महिला उद्योगाचा आणते मालवणी मसाला, खूप मस्त आहे. पुणे-मुंबई हायवेवर मुंबईच्या दिशेनं जो नवा खाऊ-स्टॉप झाला आहे तिथे त्यांचा स्टॉल आहे. त्यांचे कोल्हापुरी मसाला, कुठल्या कुठल्या चटण्या, लोणची सगळेच प्रॉडक्ट्स चांगले आहेत.>> माझा अनुभव थोडा वेगला आला या दुकानाचा.एकदा पुण्य वरुन येताना डांगर पिठ घेटले..कडू निघाले

दवे का दिव्य गरम मसाला असा एक मसाला अकोल्यात मिळतो. कुठे ऑनलाईन/ ऑफलाईन मिळाला तर नक्की वापरून पाहा. अप्रतिम भाज्या, उसळी आणि फोडणीची वरणं होतात यानी. नुसता वरून शिंपडणे इतकच करायला लागतं...

हो. असेच नाव आहे ते. मीही अकोल्याची च असल्याने, लगेच आठवले.
रिक्षाच्या मागे, पेपरमधे, दुकानांमधे जाहिरात असायची. Happy

Pages