Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ओके थँक्स वावे. ही रेसिपी
ओके थँक्स वावे. ही रेसिपी बघते.
वर्षा,
वर्षा,
मी घरीच वाटते. गणपतीचे दिवस आलेच आहेत म्हणून माझी लिंक देतेय इथे. https://youtu.be/sp_EHVdjDPI?si=i5VXUAUC57rImPi8
धन्यवाद देविका. बघते नक्की.
धन्यवाद देविका. बघते नक्की.
रोजच्या आहारात ताक प्यायला
रोजच्या आहारात ताक प्यायला सांगितले आहे . पण ऑफिसात एसी खूप आहे त्यामुळे ताक प्यायले की सर्दी आणि डोकेदुखी होते.
काहींनी ताकात मिरची टाकून पहा असा सल्ला दिला आहे. हे कितीपत योग्य आहे आणि दुसरा पर्याय काय आहे?
दही खाऊन पाणी प्यायले तर? ताक
दही खाऊन पाणी प्यायले तर? ताक ऑफिसमधून बाहेर पडल्यावर प्यायले तर? एसी कमी करता आला तर? का व्हेंट खाली कुडकुडायची शिक्षा आहे? ताक मोकळ्याहवेत पिऊन जरा फेरफटका मारून मग एसीत कामाला बसलं तर फरक पडतो का?
एसी कमी करता येणार .
एसी कमी करता येणार . सेंट्रलाइज्ड आहे
स्वेटर टोपी घालून बसणे. नवर्
स्वेटर टोपी घालून बसणे. नवर्याच्या ऑफिसात, थंड अति ठेवलं की लोक हे करतात.
ते इथे सगळेच करतात धनश्री
ते इथे सगळेच करतात धनश्री
ताक पिऊन त्यावर दोन घोट गरम
ताक पिऊन त्यावर दोन घोट गरम पाणी प्यायचं.
संध्याकाळी ऑफिसातून घरी
संध्याकाळी ऑफिसातून घरी जाताना किंवा रात्रीच्या जेवणात ताक प्यायले तर चालणार नाही का? की दुपारीच प्यायचे आहे?
१. ज्यांनी ताक प्यायला
१. ज्यांनी ताक प्यायला सांगितलं आहे त्यांनाच परिस्थितीपूरक पर्याय विचारा.
२. ताक घरी असतानाच प्या.
ग्रेट माइंड्स, माझेमन.
मी पण ताक आणते ऑफिसमध्ये,
मी पण ताक आणते ऑफिसमध्ये, काचेची छोटी बॉटल आणते. बहुतेक वेळा जेवणासोबत पिते . थोडे मीठ आणि मिरीपूड घालून आण . जास्त आंबट व्हायला देऊ नकोस.. ताक गोड्या दह्याचे असेल तर बांधणार नाही
रोजच्या आहारात ताक प्यायला
रोजच्या आहारात ताक प्यायला सांगितले आहे .
<<
कुणी?
कशाला?
नाही प्याल्यास काय आभाळ कोसळणार आहे?
आपण कढीलिंब फोडणीत घालतो ना,
आपण कढीलिंब फोडणीत घालतो ना, तसे नाही करायचे, आलं, मिरची , लसूण याचा जेव्हा आपण मिक्सरमधुन भरड वाटून घेउन, भाजीत टाकतो, तेव्हा त्यात भरड करायला कढीलिंबाची पाने टाकायची काय मस्त चव येते भाजीला व पानेही पोटात जातात - फायबर & ऑल.
आत्ता वेब एम डी वरती वाचून आले की अर्ली स्टडीज ऑन रॅट्स - कढीलिंबाची पाने अल्झाइमर्स पासून वाचवतातच पण आधी झालेली पेशींची तूटही भरुन काढतात.
मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर
मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीलिंब ठेचा करते. उपासाचा करून ठेवायचा असेल तर लसूण वजा करते. कोथिंबीर आमच्याकडे उपासाला चालते.
कढीलिंब पाने धुऊन वाळवून पूडही करून ठेवते कधी कधी मग ती घालते. तशी मी खाते कढीलिंब पाने पदार्थातली पण नवरा खातोच असं नाही, लेकही खात नाही म्हणून असं करते.
छान पोस्ट धनश्री, मला कॉलेस्ट्रोलसाठी चांगली असं विजय कदम यांनी सांगितलेलं आठवत होतं.
मी रस्साभाजीला वाटणामध्ये
मी रस्साभाजीला वाटणामध्ये घालते, पण पोहे, उपीट असेल तर वाटण नसते, आणि पूड केली की रंग बदलतो. म्हणून कढीलिंब कात्रीने बारीक कापते, कोथिंबिरीसारखा मिक्स होऊन जातो, आणि पोटात पण जातो (edited).
फक्त हा कापलेला कढीलिंब फोडणीच्या तेलात ना घालता, कांदा घातला की मग घालते, म्हणजे जळत नाही.
कोथिंबिरीसारखा मिक्स होऊन
कोथिंबिरीसारखा मिक्स होऊन जातो, आणि पोटात पण जात नाही>>>>
पोटात जावा म्हणुन करताय ना ही धडपड??? पोटात जाउ नये वाटते तर कशाला कापता, उगीच पोहे खाताना बारीक कापलेला कढीपत्ता काढुन टाकायची खटपट करत बसा.
रच्याकने, नावडते पाहुणे परत परत यायला नको असतील तर ही युक्ती उत्तम आहे. एकदोनदा पोह्यातले बारीक कापलेले तुकडे काढावे लागले की नंतर येणेच बंद करतील
माझेमन, स्वाती न्यूट्रिशियनना
माझेमन, स्वाती न्यूट्रिशियनना विचारते त्यांनीच सांगितलं होत.
सामी , हा उपाय चांगला आहे. ट्राय करून पाहते आणि इथे लिहिते .
दही गोड़ असेल तर ताक बाधणार
दही गोड़ असेल तर ताक बाधणार नाही . ताक आंबट होऊ नये म्हणून दोन गोष्टी करता येतील .
१ . ताक करून आणून , ऑफिसात टेबलवर तो टंब्लर स्थिर ठेवायचा , २ -३ तासात साका खाली बसतो , ऐन जेवताना वरचं सगळं पाणी काढून टाकायचं आणि फ्रेश रूम टेम्परेचर चं पण त्यात मिक्स करायचं . मी पण एसी ऑफिसात बसून असे ताक प्यायले आहे , त्या नंतर मी दुसरी आयडिया केली , (प्रवासात एकदा बॅगेत ताक सांडल्यावर सुचले )
२ . घरी दही आणि किंचित पाणी चांगलं घुसळून ते काँसंट्रेट फक्त टंब्लर मध्ये भरून आणायचं आणि जेवताना त्यात पाणी मिक्स करायचं .
माझ्या ऑफिसात एक जण दुध व
माझ्या ऑफिसात एक जण दुध व विरजण मिसळुन आणायचे व त्याचे दुपारपर्यंत दही व्हायचे. त्यात पाणी घुसळायला एक छोटीशी रवीही ते सोबत बाळगायचे. अर्थात हे आता करणे कठिण कारण एसीमध्ये दुध विरजणार नाही.
रात्री झोपताना एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा बाटलीत दही लावावे. सकाळी तो डबा उचलुन ऑफिसात आणावा व दुपारी पाणी घालुन ताक करावे. ऑफिसात दही जास्त आंबणार नाही.
१ . ताक करून आणून , ऑफिसात
१ . ताक करून आणून , ऑफिसात टेबलवर तो टंब्लर स्थिर ठेवायचा , २ -३ तासात साका खाली बसतो , ऐन जेवताना वरचं सगळं पाणी काढून टाकायचं आणि फ्रेश रूम टेम्परेचर चं पण त्यात मिक्स करायचं .
>>> हा उपाय मलाही आयुर्वेदिक डॉ मैत्रिणीने सुचवला होता.
आम्ही ह्याला ताक धुणे असं
आम्ही ह्याला ताक धुणे असं म्हणतो. घरी वापरायचं ताक ही काही कारणाने आंबट झालं असेल तर भरपूर पाणी घालून फ्रीज मध्ये ठेवायचं , संथावल की वरचं पाणी काढून टाकायचं. खूपच आंबट झालं असेल तर हीच प्रोसेस रिपिट करायची. सगळा आंबटपणा निघून जातो.
दक्षिणा, थँक्स
दक्षिणा, थँक्स
हे उद्याच करून बघेन
जाई जरूर .
जाई जरूर .
मला माझ्या न्यूट्रिशनिस्ट ने आणखीन एक सल्ला दिला होता तो न मागता इथे देतेय . मला ताक जेवण झाल्या झाल्या प्यायची सवय होती . आणि मी काही वाटीभर वगैरे नाही चांगला भला मोठा टंब्लर भरून पिते . तिने सांगितलं कि जेवण झालं कि अर्ध्या तासाने ताक प्यायचं त्याने पचनाला खूप मदत होते आणि मला ते जाणवलं . जेवणाच्या शेवटी ताक प्यायल्याने पोट फार जड व्हायचं . अर्ध्या तासाची गॅप घ्यायला लागल्यापासून तसं होत नाही .
दक्स व्हेरी युजफुल टिप्स गं.
दक्स व्हेरी युजफुल टिप्स गं.
२५ लोकांना पुरेल इतका पांढरा
२५ लोकांना पुरेल इतका पांढरा भात उरला आहे. काय करावे ?
सांडगे ?
सांडगे ?
त्यात उकडलेले बटाटे मिसळून ,
त्यात उकडलेले बटाटे मिसळून , तिखट मीठ, जिरे घालून चकल्या करून उन्हात वाळवा.
किंवा, आता घरात जितके लोक आहेत, त्यांच्यापुरता फोडणीचा भात, काही भाताच्या चकल्या आणि काही भातात ज्वारीचे पीठ , कांदा आदी घालून थालिपीठे लावा.
त्याच पंचवीस लोकांना फोडणीचा
त्याच पंचवीस लोकांना फोडणीचा भात करून घाला
२५ लोकांना पुरेल इतका पांढरा
२५ लोकांना पुरेल इतका पांढरा भात उरला आहे. काय करावे ? >>>
शिजलेल्या भाताचा चिवडा अप्रतिम होतो. मी खाल्लाय. काश्मिर ट्रीपला एका वहिनीने करुन आणला होता.
तिने तो भात घरातच पंख्याखाली सुकवला होता कुडकुडीत. नंतर तळून घेतला. परातीत घेवून त्यावर तिखट, मीठ, किंचित पिठीसाखर घालून नीट मिक्स केले. आवडत असेल तर चाट मसाला किंवा आमचूर घाला. भात तळून घ्यायच्या आधी थोडया तेलात दाणे, सुकं खोबरं व कढीपत्ता परतवून बाजूला काढून ठेवला. भात तळून त्यात दाणे, खोबऱ्याचे काप, कढीपत्ता मिक्स करा.
तुमच्याकडे २५ माणसांचा भात उरलाय तर सगळा सुकवून तळून हवाबंद डब्यात ठेवा. लागेल तसा चिवडा करा. हे प्रकरण लोळत पडायला नको असेल तर सगळा चिवडा करा आणि वाटून टाका.
Pages