चिकन मऊ नरम कसे शिजवावे.

Submitted by तनमयी on 3 January, 2019 - 04:50

चिकन
कुठलेही chicken आणा,अगदी निट निगुतीने करून पहा
पण माझा प्रॉब्लेम असा होत आहे कि chicken निट शिजत नाही
वातड ,रबरा सारखे किवा fibary होत आहे
तर हॉटेल सारखे चिकन मऊ नरम कसे शिजवावे.
काय चुकत असावे . chicken बरोबर नाही का.
किती वेळ कसे तापमान हवे
पध्दत कुठली वापरू
http://www.bharatzkitchen.com/recipe/dhabha-style-chicken-curry/
इथे chicken brine करा म्हणत आहेत
आपल्याला एवढा कुठला वेळ आणि धीर .
तुमच्या टिप्स सांगा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकन मऊ नरम कसे शिजवावे.
<<

कच्चा पपईचा किस चिकनला चोळून, अर्धातास मॅरिनेट केल्यास चिकन/मटण अगदी मऊ शिजते.
कबाब करताना हिच पद्दत वापरतात.

दही, ताक, लिंबू, टोमॅटो, वाईन, व्हिनेगर, पपई, अननस प्रत्येक टेंडरायझरची केमिस्ट्री वेगळी आहे. कसे शिजवणार आणि चव कशी हवी ह्यानुसार तुम्ही टेंडरायझर निवडू शकता. मॅरिनेशन चा वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. चिकनचा कट आणि वयानुसार देखील चवीत फरक पडतो.

चिकनचा कट आणि वयानुसार देखील चवीत फरक पडतो. >>>>> हे सगळ्यात महत्त्वाचं, बाकी मॅरीनेशन वगैरे ठीक. तुम्ही चिकन नेहमी एकाच दुकानातून आणता का? तिथे कदाचित जाड जून कोंबडया विकत असतील. दुकान बदलून बघा.

पुण्यात असाल तर दोराबाजी बेस्ट. स्वच्छ फ्रेश आणि टेंडर चिकन असतं.

चिकनचा कट आणि वयानुसार देखील चवीत फरक पडतो. >>>>> हे सगळ्यात महत्त्वाचं>>>>+१.

तसेही चिकन १० मिनिटात मऊ शिजते.प्रेशरपॅनमधे ,वाटण वगैरे घालून ३ शिट्यांत शिजते.मी कधीही मॅरिनेट केले नाही,कारण चिकन पटकन शिजतेच.तुमचा चिकनवाला बदलून पहा.
माझ्या शेजारणीचाही हा प्रॉब्लेम आहे.ती पण म्हणते की ७-८ शिट्या दिल्या तरी चिकन शिजत नाही,असे तिच्या घरचे म्हणतात.त्यावर चिकनवाल्याची कॉमेंट 'अरे क्या बैल बील पका रहे हो?"सॉरी फॉर अवांतर.

ओव्हर कुक = कोरडे फ्लेकी चिकन. यासाठी +१
खास करून तंदुरी/ओव्हन बेक्ड डिशेस मधे.

भाजीचे चिकन गळेपर्यंत शिजवता येते, पण सगळी कोंबडी एकाच वेळी शिजवायची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजेच ब्रेस्ट (सीना/पंखाचा भाग) तंगडी, (लेगपिस) व इतर मुंडी,स्पाईन चॉप्स इत्यादि. यातील प्रत्येक भागाचा शिजण्याचा वेळ वेगवेगळा असतो. त्यामुळे भाजीतले पिसेस कमीअधिक चवीचे शिजलेले आढळतात.

रश्श्यात शिजवताना कमी आचेवर हळूहळू लक्ष ठेवून शिजवले तर चिकनचा अंदाज येईल. यात चिकन ड्राय होत नाही, कारण पाण्यातच शिजत असते. तरीही ज्यूसेस बाहेर पडतातच, अन मुलांसाठी सूप काढून घेऊन मग पाणी/मसाल्यात शिजवले तर पिसेस कोरडेच लागतात.

कोवळे, व जून चिकन शिजताना वेळ वेगळा लागतोच लागतो, तसाच तो गावराणी/कॉकरेल्/सगुणा/ब्रॉयलर इ. प्रकारानुसारही बदलत जातो. मोठ्या आचेवर घाईत शिजवले तर चिकन चामट होते.

दुसरे, पहिल्या फोडणीत पिसेस चांगले परतून घेणे व नंतर शिजवणे हे केले, तर पिसेस्चा बाहेरील भाग आधी शिजून ज्यूसेस आत लॉक होतात, अन मग नंतर मंद आचेवर आपल्या रसात शिजते. ते जास्त टेस्टी लागते.

मॅरिनेशन अन ब्रायनिंग दोन्ही टेक्निक मऊ शिजवण्यासाठी उपयोगी आहेत, पण चिकन तुलनेने लवकर शिजत असल्याने आधी मॅरिनेट केलेच पाहिजे असे नाही. मॅरिनेशनने चव खुलते हे नक्कीच. अख्खी कोंबडी ओव्हनमधे शिजवताना ब्रायनिंग अतिशय उपयुक्त. याचा इंजेक्शन शॉर्टकट मी पूर्वी माबोवर लिहिलेला आहे.

कच्ची पपई किसून किलोला चहाचा एक चमचा या प्रमाणात वापरली, तर मटण भलतेच सुंदर होते, पण चिकनला हे वापरून एकदा रश्श्यात फक्त स्वच्छ हाडे दिसत होती, चिकन गळून अगदी छोटे फ्लेक्स बनले होते. Lol तेव्हापासून चिकनसाठी पपईच्या वाट्यास गेलो नाही.

ता.क.
मॅरिनेट करून चिकन फ्रीजमधे ठेवण्याची पद्धत आहे. बाहेर काढून आधी रूम टेंपरेचरला येऊ द्यायला हवे. नाही तर कुकिंग टाईम्स व क्वालिटीत फरक पडतो.

रच्याकने:
धाग्यातल्या रेस्पीत टमाटे अन दही सुद्धा आहे. प्लस लिंबू / व्हिनेगर मॅरिनेशनला!! बाप्रे.
भाजी अत्यंत आंबट होण्याची दाट शक्यता वाटते. दह्याची/ टमाट्याची आधी चव घेऊन मग वापरा. अन्यथा प्रमाण कमी करा असे सुचवतो.

कच्ची पपई किसून किलोला चहाचा एक चमचा या प्रमाणात वापरली, तर मटण भलतेच सुंदर होते, पण चिकनला हे वापरून एकदा रश्श्यात फक्त स्वच्छ हाडे दिसत होती, चिकन गळून अगदी छोटे फ्लेक्स बनले होते.
<<

मग चांगलेच आहे की, मस्त चिकन सुप म्हणून खाता येईल. Happy
साधरण गावठी कोबंडी करता कच्च्या पपईचा किस आमच्या इथे वापरतात. मात्र पपईच्या किसाने कोबंडीचे मास गळल्याचे आजवर कधी पाहिले नाही. कदाचीत जास्तवेळ किस लावून ठेवल्याने असे झाले असावे.

बहुतेक तरी तुमचा प्रॉब्लेम हा तुम्ही चिकन ओव्हर कुक करता आहात असा आहे. आरारांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे शिजवून पहा.

जर तुम्ही बोनलेस ब्रेस्ट पिस आणत असाल तर ते ओव्हन मध्ये ३५० - ३७५ फॅ ला २५ - २८ मिनीटे शिजवले की नीट शिजेन.

जर कढई / पॅन मध्ये शिजवत असाल तर ते १५ / २० मिनीटांमध्ये मिडीयम फ्लेम वर शिजेल. यापेक्षा जास्ती वेळ ठेवले तर वातड होईल.

जर हाडे असलेले असेल तर आरारांची कृती वापरा.

तेलामध्ये वाटण टाकून थोड fry नंन्तर पाणी टाकून अर्धा ते पावून तास कमी flame वर शिजवते
काही तुकडे बोन ला असलेले मऊ होतात पण मोठे चामट व रबरी होतात
दुकान बदलले तुकडे छोटे ठेवले एकदा दोनदा बरे शिजले पण नंतर येरे माझ्या मागल्या
नकोच ते chicken त्यापेक्षा मटण बरे होते माझ्याच्याने त्याचा काही प्रोब्लेम येत नाही

तसेही चिकन १० मिनिटात मऊ शिजते.प्रेशरपॅनमधे ,वाटण वगैरे घालून ३ शिट्यांत शिजते.मी कधीही मॅरिनेट केले नाही,कारण चिकन पटकन शिजतेच >>>>> देवकी
किती lucky

तसेही चिकन १० मिनिटात मऊ शिजते.प्रेशरपॅनमधे ,वाटण वगैरे घालून ३ शिट्यांत शिजते.मी कधीही मॅरिनेट केले नाही,कारण चिकन पटकन शिजतेच >>>>> देवकी
किती lucky

तसेही चिकन १० मिनिटात मऊ शिजते.प्रेशरपॅनमधे ,वाटण वगैरे घालून ३ शिट्यांत शिजते.मी कधीही मॅरिनेट केले नाही,कारण चिकन पटकन शिजतेच >>>>> देवकी
किती lucky

तसेही चिकन १० मिनिटात मऊ शिजते.प्रेशरपॅनमधे ,वाटण वगैरे घालून ३ शिट्यांत शिजते.मी कधीही मॅरिनेट केले नाही,कारण चिकन पटकन शिजतेच >>>>> देवकी
किती lucky

चिकन लवकर शिजत नाही हे वाचुन नवल वाटले, कारण चिकन शिजायला १०-१५ मिनिटे सगळ्यांनाच लागत असतील असे वाटायचे मला.

मी पण चिकन फोडणीत घालुन करते , १० मिनीटात शिजते

हे मऊ बिऊ बद्दल नाही पण आता विषय निघालाय म्हणून सांगतो. खाली दिलेली रेसिपी ही स्टीम्ड चिकनची आहे. मॅरिनेटेड . एक थेंब तेल न वापरले ले चिकन इतके खूब सूरत लागते की यंव रे यंव. पहिल्या प्रयत्नात चिकन हार्ड फायब्रस झाले होते.ते बहुधा जून चिकन असल्याने झाले असावे. नन्तर सक्सेस्फुल.
आता विडिओ बद्दल . हा विडीओ पाकिस्तानी पंजाब्याने टाकला आहे. त्याचा पंजाबी लेहजाची उर्दू ऐकायला मजा येतेच पन यज्ञात समिधा टाकताना मंत्र म्हनावे तसे तो चिकनचे प्रत्येक कृतीला ' बिसमिल्ला हिर रहिम निर रहिम ' म्हनत वस्तू टाकतो ते यज्ञात समिधा टाकल्यासारखेच वाटते.
अगदी गावरान घरगुतीवार्तावरणात कुठल्याही फॉर्मल वस्तू न वापरता चुलीवर केलेले स्टीम्ड चिकनचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल
मी अ‍ॅल्युमिनिअम फॉईल वापरून हे करून पाहिले आहे
अप्रतिम....
https://www.youtube.com/watch?v=b4NfirsDaJY&t=266s

VB, Lol

तेलामध्ये वाटण टाकून थोड fry नंन्तर पाणी टाकून अर्धा ते पावून तास>>>>>> तेलात वाटण न घालता,त्यात चिकन शिजवू नका.
हळद्,मीठ,आ.ल.पेस्ट,मसाला लावलेले चिकनचे तुकडे ३=४ मिनिटे परतवा.नंतर त्यात थोडे पाणी टाकून १० मिनिटे शिजवा. थोडे आधीच चिकनच्या एका पिसमधे काटा,आगपेटीची काडी वगैरेने टोचून पहा. काटा, काडी पटकन आत गेली तर चिकन शिजले.मग वाटण घालायचे.पाहिजे असल्यास वाटण दुसर्‍या भांड्यात परतवा.चिकन शिजल्यावर एकत्र करा.
प्रे.पॅमधे करायचे असेल तर सेम,फक्त पाणी घायचे नाही.चिकनचे तुकडे परतल्यावर वाटण घालून ३ शिट्यात चिकन तयार होते.
मातीच्या भांड्यात तेल,पाणी,वाटण वगैरेटाकता वरील साहित्य फासलले चिकनचे तुकडे
नुसत्या वाफेवर शिजतात.आधण वगैरे नाही.

बाबा कामदेव, तो कूक माझ्याही आवडीचा आहे.कॄती करून कधीच पाहिली नाही.पण ज्या तन्मयतेने तो अन्न शिजवतो ते आवडते.

आगपेटीची काडी वगैरेने टोचून पहा.
<<
आगपेटीची काडी टाळा.
तिला बरीच केमिकल्स लावलेली असतात. साधी टूथपिक वापरलेली बरी.

आगपेटीची काडी टाळा.>>>> गुल लावलेला भाग अर्थातच टोचायचा नाही.बाकी काडीला केमिकल्स असतात हे माहीत नव्हते.

बाकीची काडी चावून चोखून पहा>>>>गरज वाटत नाही.एवढ्याश्या काडीतून, एवढ्याश्या तुकड्याला टोचून(तेही फार क्वचित) काय केमिकल्स पोटात जातील ती जावोत. Wink

देवकी ,पिकू , आ.रा.रा.बेस्ट .
मी करून बघते .
chicken पण आमच्या भागात निट मिळत नसावे.
थोड दुरून आणेन.
देवकी माझी आई असेच करते .
तिचे नीट शिजते, २० मिनटे लागतात.
आ.रा.रा. स्लो flame मध्ये ३० min लागत असावी
आम्ही आपल सगळे chicken चे पार्ट घेतो त्यात विंग वैगरे स्पेसिफिक नाही
जे खाटिक देतो ते मुकाट्याने घेतो.

मी वरील पाकिस्तानी पद्धतीने करतो . स्टीम वर. झाकणामुळे स्टीमवर जास्तीत जास्त १२० से. पर्यन्त तापमान मिळत असावे. एरव्ही तेलाचे तापमान ३०० से पर्यन्त असावे. त्यामुळे लवकर शिजत असावे. वाफेवर १२० से मध्ये वेळ लागेल म्हणून मी १ तास इण्डक्शन १०० से वर लावतो.कारण अगदी २८५ से लावले तरी वाफेचे तापमान १२० च्या पुढे जाउच शकणार नाही. फक्त पाणी लवकर आटेल. दोनदा तरी प्रयोग यशस्वी. नीलम कंपनीने एक स्टेनलेस स्टीलची मल्टी कढाइ आणली आहे त्यात करतो. त्यात छिद्राण्ची प्लेट आहे. इडली पात्र, ढोकळा पात्र आहे , शिवाय रेग्युलर कढ इ म्हणूनही वापरता येते.

you are overcooking chicken. 10 15 min max it takes. Do you use country chicken or broiler like godrej or zorabian?

पुण्यात असाल तर दोराबाजी बेस्ट. स्वच्छ फ्रेश आणि टेंडर चिकन असतं. >>+111111 हे मात्र खरं आहे. बेस्ट क्वालिटी

अक्खी चिकन शिजवता का?

चिकनचे ब्रेस्ट मीट ज्यास्त शिजवले तर चिवट होते. त्यात जर त्याच्यात दही, लिंबु आणि टोमॅटॉ असे असीडीक टाकले तर नक्कीच होणार. एकहीच पे टिको ना.. दही तर दही नाहितार लिंबु. दोन्ही टाकले तरी इतका वेळ शिजुन कोरडे रब्बर होणार.
पाणी टाकून सुद्धा शिजवु नये.
चिकनचा डार्क मीट( तंगड्या) वगैरे लवकर ड्राय होत नाहीत. पण ज्यास्त शिजवले तर होते. आणि वरचे प्रोटीन ब्रेक डॉऊन कारणारे एसीडीक घटक असतील तर वाटच लागेल.

अक्खी कोंबडी असेल तर साधारण सारखे तुकडॅ करून आधी ज्यास्त आचेवर पहिली ५-७ मिनिटी परतावे फोडणीत( कांद्या लसूणाच्या). मग झाकण लावून शिजवावे. १५-१७ मिनुटे मॉप आहेत.

भांड काय वापरता? त्या नॉनस्टीक सारख्या भांड्यात ज्यास्त शिजवलात लिंबु वगैरे टाकून तर कोंबडी पण माफ करणार नाही.

एसिडिक जर चालत नसेल तर मॅरिनेशनला काही अर्थच उरत नाही... मॅरिनेशनशिवाय चव तर नाही.

सगळे आहे नाहि ते ( दही, लिंबु, टॉमॅटो) गोळा करून कशाला टाका? दह्याचे प्रमाण ज्यास्त असेल तर एखाद दुसरा लिंबु थेंब पुरेसा आहे. टोमॅटो नंतर तरी टाकावा नाहितर आधीच तेलात गळवावा. मग उच्च आचेवर चिकन परतावे.
तंदूरी चिकन बनवताना ठिक आहे. हे फोडी केलेल चिकनल इतकं सजवा कशाला? नुसत्या दह्यात पण शिजते. नाहितर टोमॅटो परतुन.( अ. आ. म.)

देवकी, मी सुद्धा काहीही मरीनेशन न करता करते.

सगळे आहे नाहि ते ( दही, लिंबु, टॉमॅटो) गोळा करून कशाला टाका?>>>>>> हे एवढं एकसाथ कोण घालतं?
पाणी टाकून सुद्धा शिजवु नये.>>>>> ग्रेव्ही कशी होणार मग?
मी कांदा टोमॅटो फोडणी करते मग हळ्द, लाल मालवणी मसाला. एव्हरेस्ट चिकन मसाला घालुन त्यात वाटण घालते.
ते थोडावेळ परतुन मग चिकन घालुन ५ मिनिट परतते.
मग जेव्हढा थिकनेस हवाय तेवढं पाणी घालते आणि २० मिनिट शिजवते.
कधी मऊ टेंडर शिजतं चिकन कधी रब्बरी होतात काही पिस.

वाटण -- ह्यामध्ये कांदा खोबर (तेलात brown परतून नंतर वाटणात टाकते)आल लसून कोथींबीर थोडे गरम मसाले असते
ते फोडणी टाकून नंतर तिखट ,हळद, chicken मसाला टाकून त्यात chicken परतून पाणी टाकून लो फ्लेम वर अर्धा तास शिजवते
टोमाटो ,लिंबू नसतो.जेवताना घेतो.