युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटल योकुला नक्की नाव आठवत नाही म्हणून दवे किवा दिव्य अस काहितरी नाव आहे अस सान्गतोय....बाकी नाव भारी आहे.

मालवणी भाजलेल्या कांद्याखोबर्याचे वाटण >>वाटण नाही आपल्या चटणीसारखा लाल मसाला आहे.
धन्यावाद लोकहो! उसळ करायला हा मसाला वापरून बघते.

माबोवर साधनाने कृती लिहिलेय मालवणी मसाल्याची. मी तिखट, हळद आणि खसखस न घालता करते. मस्त होतो. पाव किलो धणे प्रमाणात आमच्यासाठी आणि लेकाला द्यायला असा वर्षभराचा मसाला होतो.

मुलांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत चॉकलेट्स वाटू नका, घरी केलेला काही तरी गोड पदार्थ द्या असं शाळा नेहमी सांगत असते, पण सोपं म्हणून नेहमी चॉकलेटच दिलं जातं. यावेळी जमल्यास घरी करून काही तरी द्यायचा विचार आहे. साधारण पन्नास नग होतील असं सोपं काय करता येईल? वड्या मला फक्त गूळपापडीच्या करता येतात. (बाकी कुठल्या कधी करून बघितल्याच नाहीत )
नाहीच काही जमलं तर शेवटी चॉकलेट आहेच.

ओल्या नारळाच्या वड्या/लाडू
आंबा बर्फी
मलई बर्फी
बेसनाचे लाडू
अनंत प्रकार आहेत, मुलं जे खातील/खाऊ शकतील असे प्रकार जरा सर्चून करता येतील. हे प्रकार कागदी तुकड्यात / कप मध्ये दिलेत तर मेसी नही होगा... लई कट्टाळा आला टैपायचा... जराश्यानं लिवतो.

सायोच्या रेसिपीने मलई बर्फी करा. कुकी कटरने वेगवेगळ्या शेप्समधे कापा. पूजेच्या प्रसादाच्या द्रोणातून

ओल्या नारळाच्या वड्या, केशर किंवा बीट घालून करता येतील. थोड्या जाड थापून ओल्या असतानाच एकेक टूथपिक खोचून ठेवून

मिनी ड्रायफुट व ओटसचे लाडू

गुळ मखाने करून ओलसर असतानाच ४-५ मखाने लाडूसारखे करून मखाणा पॉप्स म्हणून

मिनी साटोर्या, शेंगदाण्याच्या/गुळाच्या पुरीएवढ्या पोळ्या

भोपळ्याचे घारगे
काकडीचे धोंडस

तिळगुळाचे लाडू

देता येतील

सर्वात सोपं
फायरलेस शेंगदाणे गूळ लाडू
शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये थोडे बारीक करायचे.मग गूळ कापलेला आणि अगदी थोडं तूप घालून परत मिक्सरमध्ये फिरवायचे.आणि लाडू घट्ट वळायचे.पटकन होतात.

येस अनु, असंच काही तरी सोपं हवं होतं. प्रमाण सांगशील का अंदाजे?
वरचे पण सगळे पदार्थ मला खायला आवडतील पण करायला कठीण वाटतायत. सगळ्यांना धन्यवाद. कमी प्रमाणात वड्या/बर्फी करून बघितल्याच पाहिजेत एकदा.

प्रमाण: साधारण छोटी वाटीभर शेंगदाणे घेतले तर अर्धी वाटी चिरलेला गूळ(किंवा गोडाच्या आवडीनुसार) आणि 1 चमचा तूप.तुपाचा उद्देश फक्त लाडू वळण्या इतके बाईंडिंग मिळवणे हा आहे.जर गुळच पातळ असेल, ओला असेल तर तूप कमी करता येईल.थोडं अजून पौष्टिक इलेमेंट पाहिजे असेल तर शेंगदाणे बारीक करताना 3 बदाम किंवा एखादा सोललेला आक्रोड.
माझ्यासारख्या लाडू चॅलेंजड लोकांना हा प्रकार खूप उपयोगी पडतो.

नाचणी चे चिंटू लाडू हा एक पर्याय आहे. दिसतात चॉकलेट सारखे. विशेषतः गुळाचे असतील तर. (वडी चॅलेंज्ड गटातील मीही. वडी म्हणजे एकदम इक्लेअर वडीच बनते )

वाढदिवसाला लाडू पेक्षा पेढा चांगला वाटेल का? ईबांच्या रेसिपीज बदाम पेढे.
( मला पण गणपतीसाठी करायचे आहेत. त्याआधी चॅलैंज्ड लोकांनी केले की मला धीर आणि जास्तीच्या टीपा मिळतील)

वाढदिवसाला लाडू पेक्षा पेढा चांगला वाटेल का? ..... माझ्या मते पेढा.तसेही हल्ली बरेचजण कॅलरी conscious असल्याने गोडाला नको म्हणतात किंवा चिमूटभर उचलून खातात.

>>>>>>>शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये थोडे बारीक करायचे.मग गूळ कापलेला आणि अगदी थोडं तूप घालून परत मिक्सरमध्ये फिरवायचे.आणि लाडू घट्ट वळायचे.पटकन होतात.

वाह वाह. अनु तुला खूप आशीर्वाद Wink ही सोप्पी पद्धत बरी वाटतेय.

<<<नारळाची बर्फी
रिक्षा फिरवते आहे पण करून बघ सोपी आहे आणि मस्तच लागते.

नवीन Submitted by मनीमोहोर o>>>

मी पण हेच लिहिणार होते. मस्तच होतात. छोट्या रंगीत पेपरकप/ सत्यनारायणाचा प्रसाद देतात त्या पेपरवाटीत एक एक द्यायची... वर एक एक जेम्स लावायची जर चालत असेल तर..

दाण्याचे नो कुक लाडू फार बोअर लागतात. भाजलेले दाणे किंवा बाजारात लाइटली सॉल्टेड भाजलेले दाणे मिळतात त्याचे असे इन्स्टन्ट लाडू मस्त खमंग लागतात.

चॅलेन्ज्ड शब्द फार जुना आहे. टेक्निकली चॅलेन्ज्ड आठवतोय का?

हो भाजलेले दाणेच(मी फायरलेस लिहिलं आहे पण दाणे भाजलेले लिहिलंय, तेव्हा दाणे (आधी फायर लावली होती तेव्हा भाजून ठेवलेलेच) वापरा Happy
माझा नाही बरं चॅलेंजड शब्द.माबोवरच वाचलाय. नॉट टेकिंग क्रेडिट.

खजूर, भाजलेले दाणे आणि थोडी भरड ड्रायफुट पावडर घालून मिक्सर मधे एक घुर्र करुन वळायचे. तुप पण नाही लागत. खजूर सिडलेस थोडा चिकट असतो तो मेजदूल वापरते मी. सगळं प्रमाण अंदाजपंचे.

एकदम random पण माझा मुलगा आणि त्याचे मित्र मंडळ राजगिरा लाडू/ वडी पण आवडीने खातात. बाहेर विकत मिळते शिवाय फार महाग ही नसते

वाढदिवसाला पौष्टिक खाणे, इतरांना देणे हा दखलपात्र गुन्हा होता ना? का गुन्हेगार बनताय?
शिक्षक काय वाट्टेल ते सांगतील, आपण ऐकायचं थोडी! चॉकलेटच द्यावे. ते नको तर कॅंडी द्यावी. गोड नको असेल तर सावर पॅच द्यावे. स्टारबर्स्ट द्यावे. अगदी आईसब्रेकर्सची एक गोळी दिलीत तरी पोरं खुष होतात. किंवा रॉकेटच्या बारक्या गोळ्या/ ब्रेसलेट.
मला तर हालोईनला पोरांना कँड्या सोडून काही देणार्‍या केरन लोकांचाही फार राग येतो. हेल्दी देताहेत लेकाचे! Proud

अमित Lol
बरोबर आहे Lol

भारतात somehow शिक्षक बिचाऱ्या मुलांचं वा दि दिवशी पॅकेज काढतात त्यांचं नाही ऐकलं की.
एका मैत्रिणीच्या मुलांचे शिक्षक तर चॉकलेट्स वाटू च देत नाहीत. मग ती मुलं एवढीशी तोंड करून बसतात त्यापेक्षा खा healthy जाऊ देत असं वाटतं.

Pages