युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

दाल मखणी, माह की दाल (यात थोडा राजमा असतो)

भाजणीत घालता येतील विबी. मी भाजणी घरी करायचे तेव्हा एक किलो तांदुळाला अर्धा किलो आख्खे सालासह उडीद घ्यायचे आणि बाकी पाव पाव किलो इतर काहीबाही. आमच्याकडे (माहेरी) भाजणीत आख्खे उडीद जास्त घालण्याची पद्धत आहे.

बाकी इडली, डोसे पण होतील चांगले, फक्त रंग शुभ्र पांढरा नसेल. इतर डाळी मिक्स करून भजीही करता येतील. दळून आणले तरी हयात त्यात घालून संपवता येईल पिठ. इतर पिठाबरोबर धिरडी वगैरे. इतर पिठाबरोबर लाडू वगैरे करता येतील.

1.अंजू म्हणाली तसे भाजणीत घालता येतील.उलट भाजणी टेस्टी लागते.मी अर्धा किलो ज्वारीमध्ये पाव किलो अख्खे उडीद किंवा सालासकट डाळ+ इतर डाळी घालते.
2.जेम्स बाँड यांची फौजदारी डाळ वाच.

थँक्यु, अस्मिता, देवकीताई, अंजुताई Happy

दाल मखणी / मोह की दाल रेसिपी आहे का? कि तुनळीवर बघु?

भाजणीची कल्पना चांगलीये, दुसरे काही सुचल नाही तर हे करु शकतो.

थोडे कडक होतात बिस्कीट्स

त्यापेक्षा त्यात थोडे दुध, हवी असल्यास साखर अन चिमुटभर फ्रुटसॉल्ट घालुन ब्राऊनी करायची. छान लागते गरम खायला

कुठे विचारायचे न कळल्यान एइथे विचारतोय.
इथे अमेरिकेत कुठले दुध वापरल्यास चहा चांगला होईल? मी २% दुध वापरतोय मात्र चहाला एक विचित्र चव येते. आजिबात प्यावासा वाटत नाही.

दुधाचा ब्रँड बदलून पहा. ऑर्गॅनिक ट्राय करून पहा. २% ऑर्गॅनिक मधे 365(whole foods), Organic Valley, Trader Joes या तिन्हींची चव चांगली वाटली. Trader Joes थोडं स्वस्त देखील आहे.
horizon चे दूधही चवीला चांगले आहे.

ब्रँड बदला. अमेरिकेत दूध पिऊन अनेकदा पोटात दुखलेलं आहे. लॅक्टोज इनटॉलरंटचं लेबल लावतील त्यामुळे डॉ. कडे गेलो नाही. कारण मला दुध आणि दुधाचे पदार्थ आवडतात. असा अचानक अमेरिकेत येऊन इन-टॉलरंस वाढणार नाही. अर्थात वाढेलही.. भारतात नाही वाढलाय! Wink Proud
तर ते जाऊद्या!
ट्रेडर जोजचं ऑर्गॅनिक २% हिरव्या झाकणाच्या गॅलन मधलं आवडायचं आणि सूट झालेलं.
कॉस्को/ होरायझन मला नाही आवडायचं. ट्रेडर जोज नसेल तर ऑर्गॅनिक व्हॅली (वॉलमार्ट, सेफवे, टार्गेट) वापरायचो.
अमेरिकेत ग्रोथ हार्मोन इ. इ. बरेच गोंधळ असल्याने ऑरगॅनिक वापरायचा प्रयत्न करायचो.

कॅनडात ऑरगॅनिकच्या वाट्याला जात नाही कारण ग्रोथ हार्मोन दुध देणार्‍या गाईंना देत नाहीत. साधं पिशवी मधलं सीलटेस्ट, नील्सन जे मिळेल ते वापरतो. कधी २% कधी आमच्या त्या ह्या म्हणतात तसं लाडात आलो तर ३.२५%! Proud

मोरोबा +१ चहाच्या पुड्यावर ऑरेंज पिको असे काही लिहीले आहे का? साधा रेड लेबल आणा.
https://www.amazon.com/Brooke-Bond-Label-Black-Quality/dp/B06XCDYZCY
हा बंडल लागतो - https://www.amazon.com/Brooke-Bond-Label-Orange-Pekoe/dp/B00FY4I022

माझे काँबिनेशन देशातलेच आहे . सोसाय टी टी दीड चमचा प्लस एक चमचा साखर. आणि मी नेस्लेची एव्हरीडे मिल्क पावडर एक सव्वा चमचा घालते. गोरा चहा होउ देत नाही. एव्हरी डे मिल्क पाव डर ने मस्त होतो चहा. हे नेस्लेचे आहे जगात कोठे पण मिळेल. रेड लेबल बद्दल प्लस वन्न

जगातील 70 % दूध हे कृत्रिम आहे , अशी मला शंका आहे

लहानपणी मिळत होते त्याची चव भिन्न होती , म्हशीचे दूध समोरच काढत असत , तेच मोजून देत असत तेंव्हा

खानदेशी स्टाईल भेसळीची आमटी होईल कि काळ्या डाळीची. आमच्याकडे तेवढ्यासाठी विकर आणतात काळी डाळ.>>>
https://www.maayboli.com/node/4966
नेहमिच्या इडली डोसा अडईला वापरुन पण सन्पवता येइल, डाळ ३-४ तासाने चोळुन धुतली की बरिचशी साल निघुन येतिल.काहि राहिली तरी चवित फार फरक पडत नाही

Pages