युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

Chaokoh coconut milk चा उरलेला कॅन संपवायच्या (सोप्या) आयडिया सांगा

Chaokoh coconut milk चा उरलेला कॅन संपवायच्या >>> कोळाचे पोहे करा. मस्त होतात एकदम.

श्रीम्प करी पण चांगली होईल. किंवा ग्रीन / रेड करी पेस्ट आणून मस्त थाई करी करा.

व्हेज स्ट्यू रेसीपी लिहिली आहे. ते ही करता येइल वरील पर्याय ही बेस्ट. आंबोळ्या केल्यातर बरोबर नारळ दूध व गुळ प्लस वेलची पूड असे करून खाता येते.

Make Chia pudding .. Soak 2 tbs chia pudding in 200ml coconut milk, leave it for atleast 2hrs or overnight. Add ur favorite chopped fruits and dryfruits.. Honey or jaggery for more sweetness. Enjoy healthy breakfast..

Yachyapeksha easy kahi nahi

माझ्याकडे 1 किलो मनुका च पाकीट आलं आहे,खूप आंबट आहेत पण मनुका
त्याचा लाडू वगैरे सोडून पौष्टिक असं काय करता येईल??

शिऱ्यात, पुलावात घालून संपव.झालेच तर लाडू कर घरी आवडत असतील तर किंवा मनुकाचा मुरंबा ही चांगला लागेल.रेसिपी माहीत नाही.यू tyube var paha.

मनुका भिजवून ठेवून फुगून मऊ झाल्यावर गुळ, लाल तिखट, भाजलेले जिरे, मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटून चटणी करुन बघा.

मनुका , खजुर मिक्सर मध्ये फिरवुन घ्या. त्यात हवे ते ड्राय फ्रुट्स घालुन परत एकदा मिक्सर मध्ये फिरवा. गोळा थापुन छान बाऱ कट करुन घ्या.

मी आंबट मनुका मागे खजुराच्या लोणच्यात ढकललया होत्या, मस्त झालं होतं लोणचे. सोबत थोड्या गोड मनुका पण मिक्स केल्या. खजुर लोणचे दरवर्षी मी करते थंडीत (ती रेसिपी मि पा वर वाचली होती) .

1 kg आहेत
पण थोडी थोडी चटणी करून बघते
धन्यवाद

कॅन मधील नारळाचे दूध वापरून सोलकढी केली तर चांगली लागेल का?>>> अजिबात चांगली लागत नाही .. मी जरा त्रास घेऊन नारळ आणूनच बनवते

इथल्या इंग्रो मघला नारळ नेहमी खराब निघाला आहे. त्यामुळे फ्रोझन वापरते. त्याची सोलकढी केली होती. चांगली झाली होती पण ताकात जसे लोणी वर येते तसे खोबऱ्याचे तेल लोण्यासारखे आळले होते.

तो प्रॅाब्लेम कॅन्ड कोकोनट मिल्कचाही आहे आणि चवही भलतीच लागते.. मी दोन्ही प्रयोग करून झाल्यावर नारळ आणून बनवायला लागले.

कॅन मधील नारळाचे दूध वापरून सोलकढी केली तर चांगली लागेल का? > चांगली लागते . मी कायम 'कारा ' चे नारळाचे दूध वापरते. झटपट सोलकढी होते.

Pages