युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

मानव, पण भिजवलेली कणीक फ्रीझ करत नाही ना आपण? नुसती रेफ्रिजरेट करतो. फ्रोझन कच्च्या पोळ्या जास्त टिकतात.

हो, बरोबर.
पण वावे दोन तीन दिवस टिकण्या बद्दल विचारत आहेत तेव्हा मी फ्रिज करण्या ऐवजी रेफ्रिजरेट करण्याची शक्यता गृहीत धरत आहे.
फ्रोजन चपात्या भाजण्यापूर्वी किती वेळ बाहेर काढुन ठेवाव्या लागतात यावरून रेफ्रिजरेट केलेल्या किती वेळ ठेवाव्यात अंदाज येईल असे वाटले.

मी घ्यायचो त्या चपात्या पॅक केल्या दिवसापासून सात दिवस टिकतील असं सांगितलं होतं.
चपात्या किंचित शेकलेल्या असतं.
फुलके पूर्ण कच्चे.
मी खायच्या जस्ट आधी फ्रीजमधून काढत असे.
फ्रीझर नव्हे. फ्रीज.

बिग बास्केटवर फ्रोजन चपात्या आहेत. एका ब्रॅंडच्या चपात्या फ्रीझरमधून काढून थॉ न करताच शेका असं म्हटलंय. वेळ जास्त दिला आहे.
आमच्या काही सेकंदात व्हायच्या.

वावे,माझी मैत्रीण 2-३ दिवस बाहेरगावी जायची तर साबा साबुकरिता चपात्या बनवून फ्रीजमध्ये ठेवायची.ते मग लागतील तेवढ्या जेवणाआधी काढायचे.

माझाही प्रयोग जवळजवळ यशस्वी झाला.
परवा सकाळी चार पोळ्या लाटून आणि हलक्या भाजून गार करून डब्यात खाली मऊ फडकं घालून फ्रीजमध्ये ठेवल्या. काल सकाळी त्यापैकी दोन पोळ्या नवऱ्याने भाजून मुलांना डब्यात दिल्या. (त्या थोड्या चिवट लागत होत्या असं मुलं म्हणाली नंतर. ) पण नवऱ्याने दुपारी जेवण्यापूर्वी एक पोळी भाजून घेतली ती गरम गरम चांगली लागली. उरलेली एक पोळी मी आज सकाळी भाजून लगेच खाल्ली, तीही गरम गरम चांगली लागली.
एकंदरीत गरज भागली.

अळूवडी कुकरमधे वाफवायची झाली तर किती शिट्ट्या काढायच्या?>> मी वरण भाताच्या बरोबरीने लावते. पण खाली वरण मग भात व त्यावर ताटलीत अळुवडी रोल. म्हणजे जास्त पाणचट होणार नाही. मग दोन शिट्ट्या व थोडे थांबून बंद. कुकर मुरायला ठेवायचा. पूर्ण गार होउ द्यायचा.

तेच केलं आज भरत. आयत्या वेळेची फर्माईश होती म्हणून शॉर्टकट बघत होते.
अमा, पुढच्या वेळी तुमची ट्रिक वापरेन. थँक्यू.

इथे almond पावडर पासून बदामाची बर्फी/कतलीचा धागा होता का? मला सापडत नाहीए. कॉस्टकोमधून आणलेल्या almond पावडरच्या पॅकेट पासून बनवायची आहे. मिल्क पावडर वापरून कशी बनवता येईल ?

गुळ तुपात विरघळून लाडू कसे करतात? म्हणजे मेथी+पोहे+चणाडाळ असं पीठ तयार आहे. त्यात नेहमी प्रमाणे गुळ बारीक करून लाडू होतात पण ते मिक्स करण्यात हात दुखतो. पातळ गुळ लवकर मिक्स होईल असे वाटते. पण मग नंतर लाडू कडक होतील का? आणि साधारण किती वेळ गुळ परतायचा तुपात?

गूळ तुपात विरघळवून लाडू करायचे असतील तर तूप खूप म्हणजे खूप लागत. तुपच binding च काम करत , त्यामुळे तूप कमी झालं तर लाडू चा भसका होतो. मला स्वतःला एवढे तुपकट, तूप तोंडात येणारे लाडू आवडत नाहीत.
त्यामुळे मी गुळात थोडं पाणी घालून तो गॅसवर ठेवून विरघळवून घेते आणि एक दोन मिनिटात गॅस बंद करून मिश्रण त्यात घालते, साधारण गार झालं की लाडू वळते.
असे केले तर भरमसाट तूप लागत नाही करताना पण गुळात पाणी घातल्याने ते तुपात केलेल्या लाडवा एवढे टिकत मात्र नाहीत. आठ दहा दिवस छान टिकतात. किंवा मग फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे आणि रोज चार चार / हवे असतील तेवढे बाहेर काढून ठेवायचे. पाच सहा तासात नॉर्मल होतात.

घरात Nestle milkmaid आहे ते संपवायचं आहे.. फक्त milkmaid ani दूध वापरून कुल्फी बनवता येईल का??
YouTube रेसिपीज मध्ये दूध पावडर कम्पल्सरी आहे

घरात Nestle milkmaid आहे ते संपवायचं आहे >>

सायोच्या रेसिपीने मलई बर्फी करा. थोडी मिल्क पावडर आणावी लागेल. घरात असेल तर अनसॉल्टेड बटर नाहीतर घरचे तूप चालेल. सोप्पी आणि हिट रेसिपी आहे.

कच्चा पाक केला तर फार तूप लागत नाही. १ वाटी गूळ, १ मोठा चमचा (टेबल स्पून) तूप हे प्रमाण वापरते मी. सगळा गूळ संपूर्ण वितळला की लगेच गॅस बंद करायचा आणि लाडवाचं मिश्रण त्यात घालायचं. मी एवढ्यातच दाकु, तीकु आणि हेम्प सीड्सचे अशा पद्धतीनं लाडू केले. नीट बांधले जातात.

>>> फक्त milkmaid ani दूध वापरून कुल्फी बनवता येईल का??
मिल्कमेड आणि एव्हापोरेटेड मिल्क (आटवलेलं दूध) वापरून केली आहे (१:२ प्रमाण), ती छान होते.
दूध न आटवता ट्राय केलेलं नाही मी, १:१ घालून ट्राय करता येईल.

धन्यवाद
मिल्कमेड, दूध पावडर आणि दूध हे सर्व एकत्र करून आटवून कुल्फी बनवली चव खूप छान झाली आहे पण कुल्फी फ्रिज मधे १२ तास ठेवून सुद्धा घट्ट नाही झाली.. प्रमाण चुकले का माझे?

माझ्याकडे ताजा,गावरान, कोवळा खूप कडिपत्ता आला आहे..सोपं काय करता येईल? >>> मला धाड मृणाली. आमच्या बाजारात सदैव जरठ कढीपत्ता मिळतो. ज्याला काहीही सुंगध नसतो आणि जरा सुकल्यानंतर कोण्या झाडाचा पालापाचोळाच वाटतो. नागपूरला घरी बागेत कढीपत्त्याचे झाड असल्याने फोडणी देतांना लगेच जाऊन हवा तेवढाच तोडून टाकायची सवय आहे.

Pages