नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षर र
रेवती
रांजणगाव
राजेळी केळी
रातराणी
राजेंद्र बनहट्टी
राऊ
रेडा
रातकिडा

अहो मानव सगळयांनी इतक्यावेळा रोहित लिहिलंय..ना ..उचक्या नाही तर त्याला आता आचके येतील
मीच रावा..राघू लिहिलेय..
आणि रातकिडा उडतो..

"राउ "तला उ

नाव: उमाजी
गाव: उदयाचल
फळ: उंबर
फुल: उंबर
लेखिका: उषा किरण
पुस्तक: उल्का ( वि स खांडेकर)
प्राणी: उंदीर
पक्षी: उल्लू

उल्का : क
कलिका
कोपर खैरणे
कोहळा
कातरी जास्वंद
कमल पाध्ये
काळा पहाड
कांडेचोर/ कांदे चोर
कीर

अहो हिरा ते कांदे चोर नाही. कांडोर आहे. ते.. तुंबाडचे खोत पुस्तकात त्याचा उल्लेख आहे.. कांडोर चावला कि माणूस मरतो.

काळा पहाड - ड
डिंपल
डहाणू
डाळिंब
डेलिया
वसंत आबाजी डहाके
डोंगरी ते दुबई
डुक्कर
डोमकावळा

अक्षर च
चंदना
चांदवड
चिबूड
चमेली
चंद्रशेखर गोखले
चिमणरावाचं चऱ्हाट
चित्ता
चिमणी

हिहीही
पंख असल्याने झुरळ प्राणी वर्गात घातले

परी Lol
माझ्या एका भावाने लहानपणी क वरून पक्षी म्हणून केंबरं लिहिलं होतं ( केंबरं म्हणजे चिलटं )

धन्यवाद वावे. मी हा प्राणी पाहिलेला नाही. गूगल केले असते तर
कळले असते मला ऑफिशिअल नाव . पण मग मजा जाते ना!

परी, पंख वाले घेतले तर क्यूपिड
तसं तर सैतानाला शिंग असतात, त्यामुळे प्राणी म्हणून सैतान/डेव्हील पण चालेल Happy
स्काय इज द लिमिट
जरा कठीण कठीण अक्षरं पाहिजेत आता
क्ष, भ, घ, ध, ज्ञ असे

कांडेचोर चा च घेतला >> शेवटचं अक्षर घ्यायचं आहे.

मी_अनु , मारुतीची सगळी नावे पण चालतील, उड्डाण करतो म्हणुन. मग त्या अर्थी विमान, रॉकेट पण चालेल.
असो, खूप झालं अवांतर.

पण मी र आताच तर घेतला होता.. त्यावर तुम्ही रातकिडा वर आक्षेप घेतला होतात ना..
आता किती नवीन प्राणी.. पक्षी तयार करायचे ?

त्यातच तर मज्जा
अगदीच काही सुचले नाही तर झानझिबार चा कावळा, स्वीडन चा बगळा वगैरे प्रांत वादात शिरू.

येमेनी बदक, झुलू पारवा असं बेमालूमपणे ठोकून द्यायचं, समोरच्यालाही आक्षेप घेण्यापूर्वी विचार करावा लागतो.

Pages