नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाली थँक्यू, वांगं माझ्या साठीच सांगितलय ना

बदाम : म
मोहम्मद
मुर्तजापुर
मिरची
मोगरा
माचीवरचा बुधा
मधुकर धोंड
मांजर
मोर

अक्षर ट
टीना
टिटवाळा
टरबूज
ट्युलिप
टॉम रॉबिन्स
टॉम & जेरी
टॉमी डॉग
टिटवी

आमच्याकडे कुत्र्याला टॉमी डॉग म्हणतात..खरंच..आणि बकरी काळी पांढरी. करडी. राखाडी असते. पण पांढरी बकरी टेस्टी असते..


जिना
जमशेदपूर
जरदाळू
जॅकरांडा
जे के रोलिंग
जिराफ
जमैकन कावळा

रोलिंग मधला ग
नाव: गायत्री
गाव: गाणगापूर
फळ: गाजर, गावरान शेंग
फुल: गोकर्ण
लेखक: गो पू देशपांडे
पुस्तक: गिधाडे
प्राणी: गाय
पक्षी: गिधाड

अक्षर गाय वरून य
घेतलं खरं पण काहीच येत नाहीये Sad गाळलेल्या जागा भरा प्लीजच

नाव: यश
गाव: यवत
फळ:
फुल:
लेखक:
पुस्तक: ययाती
प्राणी: याक
पक्षी:

फळ: युझु
फुल: यारो
लेखक: यदुनाथ थत्ते
पक्षी: येमेनी पारवा

Orage चे ऑरेंज
Guava चे गुवा
आणि कहर म्हणजे Date चे तारीख Lol

मानव थँक्यू, परत मदतीला धावून आलात Happy देवासारखे . यदुनाथ थत्ते सोडून बाकी ची नावं माहीत नव्हती.
भरत सगळ्यात भारी तारीख आहे Lol

यदुनाथ थत्ते सोडून बाकी ची नावं माहीत नव्हती.>>> येमेनी पारवा मलाही माहीत नव्हते. म्हणजे अजूनही माहित नाहीय Wink

मी श वरून चालू यश च्या
नाव: शीला
गाव: शेगाव
फळ: शहाळं
फुल: शेवंती
लेखक: शं ना नवरे
पुस्तक: शब्दबंध
प्राणी: शेकरू
पक्षी: शहामृग

Pages