नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव क्षिती
गाव क्षेत्र महाबळेश्वर, राक्षसभुवन, आक्षी
लेखक क्षेत्रमाडे सुमती
पुस्तक क्षत्रियकुलावतंस
फळ अक्षफल
प्राणी वृक्षमंडूक (treefrog)
पक्षी वृक्ष-पाकोळी (treeswift)

जबरदस्त
क्ष म्हणजे कठीणच

चाफा मधला फ
फरझाना
फळ :फणस
फूल :फायरबॉल
लेखक: फ्रांझ काफका, फ्रॅंकलिन रुझवेल्ट
पुस्तक: फिरस्ता
प्राणी : फुरसे
पक्षी: फिनिक्स

मस्त नाबुआबुनमा !

फिनिक्स : क्स - क्ष:

नाव: क्षमा
गाव: कुरुक्षेत्र
फळ: रुद्राक्ष
फुल: द्राक्षफुल
लेखक: क्षीरसागर श. दे.
पुस्तक: क्षितिजस्पर्श
प्राणी: उक्षन
पक्षी: मक्षिका

सहीच खेळताय सगळे .

क्षिप्रा
तक्षशिला
फळ
फूल
लेखक क्षेमेंद्र
पुस्तक क्षुधित पाषाण
प्राणी लिक्षा ( ऊवा आणि लिखा मधली लीख)
पक्षी रक्षक?
गाळलेल्या जागा भरा.

का बरं
त्यांना मन नाही का, भावना नाहीत का Happy

अगदी बाल नवजात उवा म्हणजेसुद्धा लिखा. त्या चामडीला घट्ट चिकटून असतात. हालचाल करीत नाहीत. त्यांचे पातळ आवरण तुटलेले दिसते. आणि त्यांना मन असते, भावना असतात, बुद्धीही असते. Lol

अगदी बाल नवजात उवा म्हणजेसुद्धा लिखा.......नक्की?कारण त्याला खरडू,खरdu va म्हणताना ऐकलंय लहानपणी.

खरडू किंवा खरडुवा का? चला. 'ख' सा ठी बरा प्राणी मिळाला.
आता ख घ्या रे कुणीतरी !
कुणी खारडूंगला घ्या, कुणी खार्टुम ला घ्या. निदान खारदांडा तरी घ्याच घ्या
कुणी खरे घ्या कुणी खोटे घ्या
कुणी खोंड घ्या कुणी खिलारी घ्या
कुणी खिरणी घ्या कुणी खारवेल घ्या .....

Pages