नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users


नाव- नचिकेत
गाव- नेवासा
फळ- नारिंग
फूल- ििििििििििििििििििििििििििििििििििििििििि निशिगंध
पुस्तक- निशाणी डावा अंगठा
लेखक- नेमाडे
प्राणी- नीलगाय
पक्षी- नीलंबरी, निळा राघू

नीळा राघूतील घ:
नाव: घनश्याम
गाव: घाटंजी
फळ: घंटा
फुल: घंटा
लेखक: घनश्याम चौरसिया
पुस्तक: घोडदौड संताजीची (प्रभाकर भावे)
प्राणी: घोडा
पक्षी: घुबड

घुबड ड
नाव: डोथराकी
गाव: डोंबिवली
फळ: ड्रॅगन फ्रूट
फुल: डेलिया
लेखक: डहाके
पुस्तक: डॉकटर तुम्ही सुध्दा/ डोह
प्राणी: डोंगळा, डायनासोर
पक्षी: डोमकावळा

अक्षर ट
नाव: टिना
गाव: टेम्भुर्णी
फळ: टरबूज
फुल: ट्युलिप
लेखक: टॉम शार्पे
पुस्तक: टारझन
प्राणी: टेपवर्म
पक्षी: टोकन(पक्षी)

Tulip प
नाव: पूनम पांडे
गाव: पनवेल
फळ: पेरू
फुल: पारिजात
लेखक: पाडगावकर
पुस्तक: पक्षी जाय दिगंतरा (मारुती चितमपल्ली)
प्राणी: पाल
पक्षी: पाकोळी

पांडेतील ड:

नाव: डोरोथी
गाव: डोंगरगाव
फळ: डांगर
फुल: डच इरिस
लेखक: डेव्हिड बाल्डाची
पुस्तक: डोंगर म्हातारा झाला
प्राणी: डुक्कर
पक्षी: डोंबारी चंडोल

मृणाली आणि मानव तुमचे झाल्यावर मी करेन म्हणून वाट बघतेय.. तोपर्यंत मसाल्याच्या बाफ वरून जाऊन आले.

सलमा
सोलापूर
संत्रे
सोनटक्का
सुरेश खरे

सांजशकुन
साळिंदर
साळुंकी

अक्षर ल
१. नाव लतिका
२. गाव लांजा
३.फळ लिची
४.फुल लिली
५.लेखक लिओ टॉल्स्टॉय
६.पुस्तक लाल किल्ला
७.प्राणी लांडगा
८.पक्षी लांडोर

अक्षर र
१. नाव राधिका
२. गाव रत्नागिरी
३.फळ रातांबा
४.फुल रातराणी
५.लेखक राजन खान
६.पुस्तक राधेय
७.प्राणी रानडुक्कर
८.पक्षी रानभाई

अक्षर क
नाव- कारवी
गाव- काशी
फळ- करवंद
फूल कमळ
पुस्तक- किमयागार
लेखक / कवि- केशवसूत
प्राणी- कोल्हा
पक्षी- करकोचा


नाव: काशिनाथ
गाव: कळवा
फळ: कलिंगड
फुल: कोरांटी
लेखक: केळुसकर
पुस्तक: केतकी पिवळी पडली Wink
प्राणी: कोल्हा
पक्षी: करकोचा

अक्षर च
नाव चांदणी
गाव चिंचवड
फळ चिक्कू
फुल चमेली
पुस्तक चंद्रगुप्त
लेखक चि वि जोशी
प्राणी चित्ता
पक्षी चकोर

धनुडी च्या कारवी तला व... अरे तुम्ही कारवी काढून टाकली Biggrin
नाव: विचित्रवीर्या
गाव: वेसाव
फळ: वेखंड
फुल: वेत (बांबूला वेत म्हणतात त्याला फूल येतंच असेल ना)
लेखक: वि स खांडेकर
पुस्तक: वेताळ पंचविशी, विचुरणीचे धडे
प्राणी: विंचू
पक्षी: वेडा राघू

Pages