नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षर र
नाव राधिका
गाव रत्नागिरी
फळ पपई
फुल पारिजातक
लेखक पु ल देशपांडे
पुस्तक बटाट्याची चाळ
प्राणी पाणगेंडा
पक्षी पोप
जमले की ..

अक्षर : तगर मधलं ग

नाव: गिरीजा
गाव: गणपतीपुळे
फळ: गुळवेल चं फळ असतं का?
फूल: गोकर्ण
पुस्तक: गारंबी चा बापू
लेखिका: गौरी देशपांडे
प्राणी: गेंडा
पक्षी: गरूड

अक्षर : गिरीजा मधील ज

नाव: जाई
गाव: जबलपूर
फळ: जांभूळ
फूल: जुई
पुस्तक: जिवलग
लेखक: जयंत नारळीकर
प्राणी: जिराफ

जे लेखक किवां लेखिका त्यांचंच पुस्तक लिहिणे बंधनकारक नाही ना? >>> संयोजकांनी सांगितले नाहीय ना? मग कशाला आपणच उगाच नियम वाढवायचा? Wink

सॉरी पुस्तक चुकले
>> र अक्षर ना? फळापासून सगळेच चुकले. आता असू द्या. नेक्स्ट टाइम.

सॉरी पुस्तक चुकले र अक्षर ना? फळापासून सगळेच चुकले. आता असू द्या. नेक्स्ट टाइम.>>>>>>>> अरे हो की, वाचूनही लक्षात नाही आलं. तुम्ही एकदम जागरुक मानव आहात Happy
माझ्या एन्ट्री मध्ये कोणाला ग वरून फळ आठवते का?


गिरीशा
गंगटोक
गुवा
गुलाब
गुरूनाथ आबाजी कुलकर्णी
गीतारहस्य
गाढव
गरुड

अक्षर: गुलाब मधील ब

नाव: बकुळा
गाव: बोरिवली
फळ: बोर
फूल: बकुळ
लेखक: बाबासाहेब आंबेडकर
पुस्तक: बुद्ध ऑर कार्ल मार्क्स.
प्राणी: बकरा
पक्षी: बगळा

बकर्‍यातला ब

नाव..बीना
गाव.. बेळगाव
फळ.. बदाम
फुल.. बाभूळ
लेखक ..बा.भ.बोरकर
पुस्तक .. बेला
प्राणी.. बोकड
पक्षी..बगळा

अक्षर बोरिवलीत ला व

नाव: वरदा
गाव : वैतरणा
फळ : विलायती फणस
फूल : वांग्याचे फूल
लेखिका : डॉ विजया वाड
पुस्तक : वा-यावरची वरात
प्राणी : वानर
पक्षी : वेडा राघू

पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी.

असा नियम आहे. असो.

अक्षर: बकरा (मानव) बोरकर (देवकी) वानर (धनुडी) मधील र

नाव: राम
गाव: रामपूर
फळ: रामफळ
फूल: रातराणी
लेखक: राम गणेश गडकरी
पुस्तक: रामप्रहर (तेंडुलकर)
प्राणी: रातकिडा
पक्षी रोहित

अक्षर - लिची मधील च
नाव - चिंतामणी
गाव - चिखली
फळ - चिक्कू
फुल - चमेली
लेखक - चिं . वी .जोशी
पुस्तक - चिमणराव गुंड्याभाऊ
प्राणी - चित्ता
पक्षी - चिमणी

ड आणि ळ असे अक्षर आले तर ? >>>

सगळीकडेच असे अक्षर कसे येईल.

नियम असा आहे.
पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी.

पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी.

असा नियम आहे. असो.>>>>अक्षर रिपीट झालं तर चालेल का? र ,ल आधी झाला होता आणि ळ वरून काय लिहीणार म्हणून मधलंच अक्षर घेतलं. पण तुमचं बरोबर आहे कि शेवटच्या अक्षरापासून सुरू करायला पाहिजे,.

पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी.

हो मी असंच केल आहे.
पण आता अक्षरं रिपीट होताएत आणि ती अक्षरं उरताएत आणि अधलेमधले अक्षरे घेतली जाताएत म्हणून एक शंका.

रोहितमधील त
नाव: तुषार
गाव: तळेगाव
फळ: तोरिंजन(पपनसाला कोकणात म्हणतात),नाहीच चालले तर तोतापुरी आंबे
फूल: तेरडा
लेखक: तेंडुलकर
पुस्तक: तें नावाचे बाबा (सुषमा तेंडुलकर)
प्राणी:
पक्षी :

णी - न

पण दुसरा शब्द घेऊन त्याचे शेवटचे अक्षर घेऊ शकता.

अक्षर न
नाव नयना
गाव नांदेड
फळ नासपती
फुल नेवाळी
लेखक ना सी फडके
पुस्तक निरंजन
प्राणी नीलगाय
पक्षी नर्तक

अक्षर तुषार वरून र
नाव - रचना
गाव - रांजणगाव
फळ - रामफळ
फुल - रजनीगंधा
लेखक - राजा मंगळवेढेकर
पुस्तक - रारंगढांग
प्राणी - रेडा
पक्षी - रोहित पक्षी

Pages