समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................
>>कमाई (प्रॉफिट) वेगळी विक्री
>>कमाई (प्रॉफिट) वेगळी विक्री (सेल्स टर्नओव्हर) वेगळी >>> +११<<
कमाई = उत्पन्न (इन्कम) = विक्री + इतर मार्गाने आलेली आवक (बँक इंटरेस्ट इ.)
प्रॉफिट = फायदा, नफा = कमाई - खर्च
लोकसत्ताच्या ठळक चुका मी
लोकसत्ताच्या ठळक चुका मी काहीवेळा pratikriya@expressindia.com या मेल वर कळवल्या आहेत. त्यांचे उत्तर पण येते.
सर्वात विनोदी चुका सध्या
सर्वात विनोदी चुका सध्या सामना मध्ये सापडतात.
त्यांचे उत्तर पण येते. >>>
त्यांचे उत्तर पण येते. >>>
हे वाचून समाधान वाटले !
गुगलवर Baker's Alley शोधताना
गुगलवर Baker's Alley शोधताना आलेले मराठी भाषांतर....
https://www.saamtv.com/video
https://www.saamtv.com/video-there-are-deadly-insects-road-look-terrible...

.
अभिनव हे फारच अति आहे
अभिनव हे फारच अति आहे
हे म्हणजे शिक्षकाने 'लिहून घेऊ नका' म्हटलेले पण मुलांनी वहीत 'लिहून घेऊ नका' लिहिल्या सारखे.
>>>टीचर ने 'डोन्ट राईट'
>>>टीचर ने 'डोन्ट राईट' म्हटलेले वहीत 'डोन्ट राईट >>
निदान इथे माबोवर तरी नीट मराठीत लिहावे की....
बदलले बघा.
बदलले बघा.
शीतल आमटे यांची आत्महत्या
शीतल आमटे यांची आत्महत्या
शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती >>>
बरोबर १५ मिनिटांपूर्वी लोकसत्ताने 'झोपेच्या गोळ्या खाऊन" असे टंकले होते. मी ते वाचले होते.
बाकी सर्वत्र 'विषाचे इंजेक्शन' च होते.
वेगात बदलले हेही नसे....
सामना मध्ये बातम्या देणाऱ्या
सामना मध्ये बातम्या देणाऱ्या माणसाला मोठा दृष्टीदोष असावा.बऱ्याच अक्षरांचे घोळ असतात.

अगदीच साधी टायपो असली तरी गुन्ह्यातील ला गुह्यातील केल्यास अर्थाचा अगदीच बँड वाजतो हे यांना कोणी सांगावं.
शी
शी
.https://mangalwedhatimes.in
---
काय करावा बरे आता?
---
https://mangalwedhatimes.in/solapur-police-crackdown-police-seized-six-k...
---
1) passing through चे शब्दश: भाषांतर केले आहे का? निर्जीव सोने स्वतःहुन कसे कुठे जाईल? " सोलापूरमधून जाणारे तीन कोटीचे सहा किलो सोने पोलिसांनी केले जप्त" हे भाषांतर बरोबर आहे की चूक?
२) ते सोने तीन कोटींचे आहे म्हणुन सहा किलो नाही तर, सहा किलोचे आहे म्हणुन आजच्या भावानुसार तीन कोटींचे आहे. बातमीत उल्लेख केलेले "तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने ग्रामीण पोलिसांनी जप्त केले आहेत" योग्य आहे का?
दिव्य मराठी !!!
दिव्य मराठी !!!
(सहा किलोचे आहे म्हणुन आजच्या भावानुसार तीन कोटींचे आहे.) हे योग्य.
यांना निर्नायकी म्हणायचं
यांना निर्नायकी म्हणायचं असणार!

+ १
+ १
…….
चुकांचे गांभीर्य नसल्याचे उदा:
"समितीने १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना मॉडर्ना लस देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता. करोना लसीमुळे होणारे फायदे आणि संभाव्य धोकेही यावेळी सांगण्यात आले होते. यासंबंधी मतदानही करण्यात आलं. यावेळी २०-२० मतं मिळाली. यानंतर १८ डिसेंबरला मंजुरी देण्यात आली."
(https://www.loksatta.com/desh-videsh-news/us-doctor-suffers-severe-aller...)
योग्य असे हवे:
१५ वर्ष>>> १८ वर्षे
२०-२० मतं मिळाली.>>> २०-० असे मतदान
मंगळावेढा टाईम्स हे नावावरून
मंगळावेढा टाईम्स हे नावावरून तरी तालुका पातळीवरचे, बहुदा ऑनलाईन ओन्ली वृत्तपत्र वाटते. भाषेच्या चुका आहेत हे खरेच, पण लोकसत्ता, मटा सारखी वृत्तपत्रे मराठी भाषेच्या काळजात कट्यार खुपसत असताना मंगळावेढा टाईम्स ने फक्त हलकिशी चापट मारली यबद्दल अभारच मानायला हवेत.
कसे फसवे शीर्षक देतात बघा:
कसे फसवे शीर्षक देतात बघा:
जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुट्या
https://www-esakal-com.cdn.ampproject.org/v/s/www.esakal.com/arthavishwa...
या १४ (२शनि व सर्व रविवार धरून) मध्ये संपूर्ण देशाला फक्त ७ लागू आहेत!
बाकी स्थानिक शहरानुसार वेगवेगळ्या.
आजच्या पत्रकार दिनानिमित्त एक
आजच्या पत्रकार दिनानिमित्त एक परखड लेख
पत्रकारितेची वाताहत
इथे:
https://www.aksharnama.com/client/article_detail/4827
त्यातील काही निवडक :
• पत्रकांरांच्या स्कूलमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना गुणवत्तेचा कोणताही निकष तपासला न जाता पटापट नोकऱ्या मिळू लागल्या.
• ‘कोंबडा बोलतो’ ही बातमी वृत्तवाहिन्यांवर सगळ्यात महत्त्वाची बातमी होऊ शकते, इतका पत्रकारितेचा स्तर खालावला आहे!
(सौजन्य : अक्षरनामा)
२०-२० मतं मिळाली.>>> २०-० असे
२०-२० मतं मिळाली.>>> २०-० असे मतदान >>>> अगागागा! हे म्हणजे फारच झालं. अमृत मासिकाच्या भाषेत सांगायचं तर उपसंपादकांच्या डुलक्या नाही, उपसंपादक बेशुद्ध म्हणायला हवं.
अक्षरनामावरच हे देखिल वाचनीय
अक्षरनामावरच हे देखिल वाचनीय आहे: मी वर्तमानपत्र का वाचत नाही - https://www.aksharnama.com/client/article_detail/4828
हो, कालच वाचले !
हो, कालच वाचले !
पण त्यांनी फक्त मराठीला का दोष दिलाय ?
सगळेच तसे आहेत.
‘कबीर सिंह’ (Kabir Singh)
‘कबीर सिंह’ (Kabir Singh) चित्रपट हिट झाल्यानंतर शाहीद कपूर (Shahid Kapoor)चे स्टार झळकले आहेत.
https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/shahid-kapoors-post-g...
>>
शाहीदचे काय झाले आहेत म्हणे?
काही चांगल्याची दखल घेतो.
काही चांगल्याची दखल घेतो.
कोविडचर्चेदरम्यान अनेकदा 'co-morbid' हा शब्दप्रयोग यायचा. त्यासाठी सुटसुटीत मराठी शब्दाच्या शोधात होतो.
परवा लोकसत्तात 'अनियंत्रित सहव्याधी' वाचला आणि आवडला.
हे बघा फसवे शीर्षक.
हे बघा फसवे शीर्षक.
शीर्षक: देशातील ‘या’ रुग्णालयातील डॉक्टरांनी नाकारली मेड इन इंडिया लस, ‘कोव्हिशिल्ड’ लसीला प्राधान्य
आणि बातमी वाचल्यावर लक्षात येईल की या डॉक्टरांनी तिसऱ्या फेरीतील चाचण्या पूर्ण न झाल्याने लस नाकारलीय, ती भारतीय बनावटीची आहे म्हणुन नव्हे.
एक अक्षम्य चूक :
एक अक्षम्य चूक :
"कमला हॅरिस या नुकत्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे त्या अमेरिकेच्या ‘सेकंड लेडी’ आहेत."
https://www.loksatta.com/blogs-news/joe-biden-twitter-account-kamala-har...
मृतदेह विमानात टाकल्यानंतर ??
मृतदेह विमानात टाकल्यानंतर ??
कुणी वाचतं की नाही हे टाईप केल्यानंतर??
लोकसत्ता.
सामना वाले तर यापेक्षा बेकार
सामना वाले तर यापेक्षा बेकार आहेत.
+११टाकल्यावर >> हे फारच झाले.
+११
टाकल्यावर >> हे फारच झाले.
आजच्या सकाळ मधली ही राजीव कपूर यांच्या बद्दलची बातमी पहा :
https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=8
.. त्यांनी आर्किटेक्चर आरती सभरवाल यांच्याशी विवाह केला.
हसून माफ करून टाकायचे झालं !
प्रूफ रिडींग बजेट मुळे सर्वच
प्रूफ रिडींग बजेट मुळे सर्वच पेपरांनी कट केलेले दिसते.
लोक भावना समजून घेतील असे मानतात.
Pages