समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................
कटर आणि अटकर(अतिरेक्यांचा
कटर आणि अटकर(अतिरेक्यांचा बांधा अटकर नसावा
)

जाऊ दे, त्याचा खांदा गोरा
(मागे कुठल्या धाग्यावर संध्याचा डान्स ह्यावर चर्चा झाली होती; कुठे ते लक्षात नाही. तिचा 'मला लागली कुणाची उचकी' एकदम बेष्ट डान्स आहे!)
जाऊ दे, त्याचा खांदा गोरा
जाऊ दे, त्याचा खांदा गोरा गोरा असेल आणि त्याला बघून उरात धडकी भरत असेल... >>>
(No subject)
मागच्या आठवड्यातील माझ्या
मागच्या आठवड्यातील माझ्या भाकरी अशा:
१. ‘मटा’ला निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी अवेळी ( घटनेच्या काही तास आधी) छापल्याबद्दल.
२. ‘सकाळ’ला एका अशुद्ध लेखनाबद्दल.
दोघांना ईमेल केल्या
या भाकरीतील त्रुटी शोधा.
http://dhunt.in/aIUD9?s=a&ss=wsp
या भाकरीतील त्रुटी शोधा.
एकाच दिसतेय
एकाच दिसतेय
व्यापारींना
पण हल्लीच्या चुकांच्या मानाने ही खूपच क्युट आणि फुटकळ चूक आहे.
व्यवसायिकांचे
व्यवसायिकांचे
व्यापारींना .......निवडू शकले
व्यापारींना .......निवडू शकले ...
ही वाक्यरचना चुकली
>>> व्यापाऱ्यांना हवे
बरोबर.
बरोबर.
पण मुख्य चूक तांत्रिक आहे.
ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ४० लाख आहे असे लिहिलेय त्या ऐवजी वार्षिक उलाढाल असे हवे.
हीच चूक पुढे सुद्धा आहे.
करून टाका त्यांना इ मेल
करून टाका त्यांना इ मेल
एक मुद्दा सर्वांच्या लक्षात
एक मुद्दा सर्वांच्या लक्षात येतोय का ?
पेपरमधल्या मजकुराचे फोटो काढून इथे पेस्ट करणे हे प्रताधिकाराचा भंग होऊ शकते. एक प्रकारे हे फोटोकॉपी करणेच नाही का?
मला असं वाटतं की ज्या चुका आपल्याला दाखवून द्यायच्या आहेत त्या पेपराच्या पानाची इथे फक्त लिंक द्यावी.
योग्य मुद्दा साद.
योग्य मुद्दा साद.
मी बदल करू शकतो संपादनाची वेळ शिल्लक असल्याने.
धन्यवाद, मानव.
धन्यवाद, मानव.
ओके
ओके
मला बातमी म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी याबद्दल किंचित शंका आहे.पण मुद्दा बरोबर असू शकतो.
यापुढे लिंक्स देत जाऊ आपण
किंवा मूळ बातमीच्या 10% कंटेंट चाच स्क्रीनशॉट
साद, योग्यच.त्या पेपराच्या
साद, योग्यच.
त्या पेपराच्या पानाची इथे फक्त लिंक द्यावी. >>> +१११
कुठल्याही नोंदणीकृत
कुठल्याही नोंदणीकृत प्रकाशनातील मजकुराचा फोटो काढणे अयोग्य. तिथला दुवा देऊन फार तर एखादे दुसरे वाक्य उद्धृत करावे असे वाटते.
जेव्हा आपण चुका दाखवतोय तेव्हा शुद्धलेखन किंवा वाक्यरचना इथपर्यंत ठीक आहे.
जर आपण तपशीलाबाबत चूक मांडणार असू तर आपल्याला पुराव्यानिशी शंभर टक्के खात्री पाहिजे.
अन्यथा आपण गोत्यात येऊ शकतो.
ओके पटतंय.
ओके पटतंय.
@साद
@साद
१) इथं बातम्या किंवा त्यांची छायाचित्रं दिली म्हणून प्रताधिकाराचा भंग होण्याची शक्यता नाही. शक्यता एकच आहे की एखादं वर्तमानपत्र आपल्यावर दावा ठोकू शकतं की "आमची चुका करायची विशेष हातोटी आहे, पण यांनी वारंवार ती पद्धत लोकांच्या निदर्शनास आणून दिल्याने आमच्या बौद्धिक संपदेची हानी झाली."
२) तपशीलाबाबत मांडलेली चूकच चुकीची निघाली तर गोत्यात कसे काय येणार? एखादा मजकूर विशिष्ट पद्धतीने छापल्याबाबतचं हे आपलं-आपलं मतप्रदर्शन आहे. मत चुकू शकतं. अतिशय गंभीर किंवा मानहानीकारक वक्तव्याबाबत / आरोपाबाबत मी समजू शकतो, पण बातमी / लेखन चुकीचं आहे इतकं म्हटल्यानं गोत्यात येऊ अशी शक्यता नाही.
३) कोणताही मजकूर अन्यत्र वापरला गेला असेल तर त्यामागचा हेतू आणि इतर अनुषंगिक गोष्टी पाहिल्या जातील.
४) समजा भारतात एक स्पर्धा आयोजित केली, ' वर्तमानपत्रात छापून आलेली या वर्षातली सर्वात विनोदी बातमी पाठवा.' तर भारतातून काही लाख (किंवा कोटीसुद्धा) लोक वर्तमानपत्राच्या बातमीची छायांकित प्रत स्पर्धेसाठी पाठवतील. कदाचित सर्वात विनोदी एकच विशिष्ट बातमी ही लाखो लोकांनी पाठवली असेल. इथं प्रताधिकाराचा भंग होईल का?
त्यामुळं इथंही प्रताधिकार कायद्याचा भंग होण्याची भीती नाही.
"आमची चुका करायची विशेष
"आमची चुका करायची विशेष हातोटी आहे, पण यांनी वारंवार ती पद्धत लोकांच्या निदर्शनास आणून दिल्याने आमच्या बौद्धिक संपदेची हानी झाली." >>
अतिरेक्यांचा अटकर बांधा हे
अतिरेक्यांचा अटकर बांधा हे महान आहे
या चुकांच्या बाबतीत एखाद्या पेपर ने "इंटलेक्च्युअल" प्रॉपर्टी दावा केला तर तो मोठा विनोद असेल. कक्काजी कहिन या सिरीजमधला एक कोट आहे - "इस फिलम मा एण्टरटेनमेण्टही नाही, तो एण्टरटेनमेण्ट टकसवा काहेका" - तो आठवला.
सामना वाल्यानी कटर आणि अटकर
सामना वाल्यानी कटर आणि अटकर वाल्या टायपो दुरुस्त केल्यात बरं का
(इतकी फोटो शॉप मधली अक्कल आणि वेळ कोणाकडे आहे इथे)
नाहीतर म्हणाल मी फोटोशॉप केले
_/\_
_/\_
यावरून सुमारे ३०
यावरून सुमारे ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. एका नावाजलेल्या मराठी मासिकाच्या दिवाळी अंकासाठी एका प्रथितयश लेखकाचा "माधवराव पेशवे" या विषयावरचा अभ्यासपूर्ण लेख आला होता. कार्यालयात काम करणार्या लेडी टायपिस्टने "माधव" हा शब्द बर्याच ठिकाणी "माXव" (च, छ, ज नंतरचे चौथे अक्षर) असे टाईप केले होते. अंक छपाईला जाण्यापूर्वी काही तास अगोदर चूक लक्षात येऊन सुधारली गेली खरी, पण मोठा अनुभव देऊन गेली. बरं त्या काळातले वाचक आजच्यासारखे "लेखकाला यातून काय म्हणायचे असेल" हे लक्षात घेऊन वाचन करण्याइतपत सुजाण नव्हते. शुद्धलेखनातील अगदी टोकाच्या चुकांनी लेखनाचे गांभीर्य नष्ट होऊ शकते असे या लेखात (सेफ्टी / सेप्टिक संदर्भात) म्हटले गेले आहे, त्यांच्याशी सहमत.
शंतनू , धन्यवाद.
शंतनू , धन्यवाद.
यावरून जुन्या जमान्यातील छपाईचा एक किस्सा आठवला. नामवंत प्रकाशन होते. त्यांनी छापलेल्या एका पुस्तकाच्या संपूर्ण आवृत्तीमध्ये एक महत्त्वाची तपशीलाची चूक राहून गेली होती. त्याकाळी खिळे जुळवून छपाईचे काम चाले. त्यामुळे मुद्रितशोधन खूप किचकट आणि वेळखाऊ असे. काही दर्दी मुद्रितशोधक डोळ्यात तेल घालून काम करीत. हे जरी खरे असले तरी कधी तरी अशी एखादी चूक राहून जाई.
त्या प्रकाशनाने नंतर ती चूक सुधारून तो छोटासा मजकूर स्वतंत्रपणे छापला. त्याच्या बारीक चकत्या कापून त्या आवृत्तीच्या सर्व प्रतींवर योग्य तिथे चिकटवल्या होत्या. तेव्हा ‘शुद्धीपत्र’ असा प्रकार रूढ होता.
अडचणीच्या केळी सर्वांनी धीर
https://www.saamana.com/coronavirus-lockdown-ashok-shinde/
अडचणीच्या केळी सर्वांनी धीर धरून प्रयत्नांची रांग लाकली तर आपल्या सर्वांची स्कप्ने नक्कीच पूर्ण होणार आहेत.
.... अडचणीच्या केळी सर्वांनी
.... अडचणीच्या केळी सर्वांनी धीर धरून प्रयत्नांची रांग लाकली तर आपल्या सर्वांची स्कप्ने नक्कीच पूर्ण होणार आहेत......
बापरे, परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली आहे जणू
हल्ली लोकांचे कश्यातूनही
हल्ली लोकांचे कश्यातूनही मोरंजन होते.
https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/video-going-be-...
बाप रे एवढा गाजला का तो
बाप रे एवढा गाजला का तो व्हिडिओ?
लोक काय डोक्यावर घेतील सांगता येत नाही.
अमेरिकेतपण मातीच्याच चुली आणि
अमेरिकेतपण मातीच्याच चुली आणि तीवर लष्करच्या भाकर्या
https://twitter.com/nyttypos
Pages