लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण रोजच्या बातम्यातल्या चुका असा वेगळा धागा काढुया का(पेपर मालक निरपेक्ष)
कोणत्याही वर्तमानपत्रात चुका दिसल्यास स्क्रीनशॉट टाकायचे
कधीतरी कोणीतरी वर्तमानपत्र वाल्याने धागा वाचल्यास बदल घडेलही.

भरत +११
माझ्या मते छोटीशी का होईना (इमेल / ट्वीट) कृती करणे महत्वाचे .
अन्यथा निव्वळ दोषदर्शन असे स्वरूप येते धाग्याला.
प्रत्येकाच्या कृतीचा उल्लेख आल्यास बरे वाटेल.

लोकसत्तेच्या कृपेने हा धागा कायम चालताबोलता रहाणार बहुतेक.
आजच्या छापील अंकात --- कर्करोगावरील प्रोटॉन उपचारपद्धती या बातमीत डॉ राजेंद्र बडवे सरांचे नव्याने बारसे केलेय.

मी आधीही म्हणलं आहे
ऑनलाइन एडिशन च्या चुका काढत बसलो तर जन्म पुरणार नाही
रोज ढीगभर असतात आणि त्याचे त्यांना काहीही नसते
त्यांना फक्त क्लिकबेट हवं असतं
टीका करा, शिव्या द्या काय वाट्टेल ते करा पण क्लिक करा आणि आकडा वाढवा

इथे माबोवर पण हा प्रकार दिसून येतो

म्हणजे प्रिंट एडिशन मध्ये तरी या बातम्या बिन चुका असतात का?अनेक वर्षात प्रिंट एडिशन वाचलीच नाहीये.
क्लिक बेट चा मुद्दा खरा आहे.

नाही प्रिंट ला पण असतात
पूर्वी वृत्तपत्रात प्रूफ रिडींग नामक पोस्ट असे आणि ते लोकं डोळ्यात तेल घालून वाचत असत
तेव्हा पत्रकारही अर्ध्या हळकुंडाने पिवळे नसत
बातमीदार काय आणि कसा लिहितो यावर त्याचे मूल्यमापन होत असे
आज काय लिहितो यापेक्षाही किती लिहितो, किती फास्ट लिहून पाठवतो आणि दिवसभर किती बातम्या टाकतो यावर ठरतात
मार्केटिंग सारखे पत्रकारांना इतकया बातम्या टाकायचे टार्गेट दिली जातात
त्यामुळे हे होणे स्वाभाविक आहे

अजून काही शब्द :
हॉरिजन - हॅरिसन
सर्वेत्कृष्ट - सर्वोत्कृष्ट
एकटय़ासाठी - एकट्यासाठी

शेमलेस प्लगः फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन वापरा सर्व समस्यांपासून त्वरित आराम मिळवा.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/

यासाठी मी आणखीन एक सुविधा बनविलेली आहे. खाली दिलेल्या साईटवर जाऊन आपल्याला जे पान तपासायचे आहे त्याचा ऍड्रेस टाकायचा आहे.

http://shantanuoak.com:5000/

उदा. खाली दिलेले पान कॉपी पेस्ट करून पाहू.

https://www.loksatta.com/trending-news/viral-video-a-collector-bought-al...

आता हे पान सबमिट केल्यावर डिक्शनरीत नसलेले शब्द आणि त्यांना सुचविलेले पर्याय दिसतील. त्यावरून किती प्रमाणात कोणते शब्द चुकले आहेत ते लगेच समजते. उदा.

तात्कळा रक्ताळा
जिल्हाध्याक्ष जिल्हाध्यक्षा
ऐवढ्यावरच एवढ्यावरच
पूर्वरत पूर्व रत
आधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या
तात्काळ तत्काळ

“याचा विश्वास दिला”, "फिदा झाले” अशा वाक्प्रचारातील स्पेलिंग चुकलेले नाही. भाषाशैलीचा दोष असला तरी तो स्पेल चेक सॉफ्टवेअरमधून समजणार नाही. त्यासाठी मशिन लर्निंगचे मॉडेल बनवावे लागेल. ते मोठे काम असेल.
_____

ही सुविधा कोणीही आपल्या साईटवरून उपलब्ध करून देऊ शकतो. त्यासाठी आपल्या सर्व्हरवर खाली दिलेली कमांड टाईप करावी लागेल.

docker run -p 5000:5000 -d shantanuo/flaskspell

या सॉफ्टवेअरचा सोर्स कोणीही पाहू शकतो किंवा त्यात बदलही करू शकतो.

https://github.com/KriAga/Spell-Checker

शंतनू, मराठी फॉण्ट वर आपले काम बरीच वर्षे आणि सर्व विचार करून चालू आहे.याचा उपयोग अधिकाधिक लोकांनी करावा.

१) शंतनू धन्यवाद! उपयुक्त माहिती. एकूण ह्या धाग्याचे फलित चांगलेच ठरले. बातम्यांचे लक्ष्य ज्यांना पूर्ण करायचे आहे अशा बातमीदारांना याचा विशेष उपयोग होईल.

२) मजेदार स्क्रीनशॉटसचा धागा काढू याला अनुमोदन. मला यात 'दोषदर्शन' हा उद्देश नसून परिवर्तनाला स्फूर्ती असा उद्देश आहे असे वाटते. मुन्नाभाई व अमृतचे उपसंपादकाच्या डुलक्या ह्या दोन्हीला मनात ठेवून - उपसंपादकाला कॉफी असे काहीसे नाव धाग्याला असावे. म्हणजे "बाबारे, काढलीस डुलकी म्हणून रागावणार नाही पण व्हर्च्युअल कॉफी देवू. घे आणि नीट काम कर. " Happy त्यांनाही ह्यात गंमत वाटावी. शुद्धलेखनाचा "क्वालिटी कंट्रोल" करताना जरा हसलो तर ते त्या एका व्यक्तीला उद्देशून नाही. कधी कधी लेख लिहीताना इ जेव्हा आपल्याही हातून चूक घडेल तेव्हा स्वतःला "चुकलो" म्हणून वेठीस न धरता हसत-खेळत बदल घडवायला व्यासपीठ होईल.

३) इमेल लिहावी/ ट्विट ह्यालाही अनुमोदन. कशी पाठवायची ते नक्की लक्षात आले नाही मात्र. सामनाचा इमेल शोधते. "व" चा "क" बद्दल एक इमेल सामनाला पाठवते. वचक बसेल बहुतेक. काय उत्तर येईल ते अपडेट इथे देते. इतरांनी ही करावे ही विनंती. "भाकरी"धाग्यातर्फे अशी सामुदायिक इमेल पाठवायची असल्यास त्यालाही तयारी आहे.

४) क्लिक बेट मुद्दा आहे खरा. पण क्लिक बेट टाकून १०० वाचक आज क्लिक करतील उद्या विसरतील. अचूक लिहीले तर इथले १०-१५ वाचक आज वाचतील आणि उद्याही वाचतील हा लेखकांना आश्वस्त करणारा विचार ठरावा. अटेंशन इकॉनॉमी किंवा इंस्टंट प्रसिद्धीवाल्यांना उपयोगी नाही म्हणून शुद्धलेखनाचा/ प्रूफरिडींगचा आग्रह टाकाऊ नाही. अशुद्धलेखन = क्लिक बेट= इंस्टंट प्रसिद्धी भुकेला समीकरण रूजेल तर बरे.

+११
इमेल लिहावी ह्यालाही अनुमोदन. कशी पाठवायची ते नक्की लक्षात आले नाही >>>>

दैनिकाच्या छापील अंकांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात तळाशी ई-मेल पत्ता असतो. त्याचे संपादक आणि मंडळी इ आवृत्त्यांपेक्षा अधिक जबाबदार वागतात असा माझा थोडाफार अनुभव.

>>>वर्तमानपत्रात चुका दिसल्यास स्क्रीनशॉट टाकायचे >>> हे त्यांच्यापर्यंत पोचेल असे वाटत नाही .

>>>"भाकरी"धाग्यातर्फे अशी सामुदायिक इमेल पाठवायची असल्यास त्यालाही तयारी आहे.>>
सामुदायिक ला +७८६.

हे भाकरी" काय आहे ?

IMG_20200804_111818.jpg

कंबर बांधणे वाचून मुद्दाम व्हिडीओ बघितला तर कबर निघाली। Uhoh

Lol

Biggrin ट्विस्ट कमरिया, ट्विस्ट कमरिया मारे रे.... दोषदर्शन नाही हो पण असल्या चूका गाणे लावून गणपती डान्स करून "सेलेब्रेट" कराव्या. एवढ्या कॅलर्‍या जळतात ना. काहीतरी फलित...

मी_अनु, तू पुणेकर आहेस की नाही माहीत नाही. पण याबद्दल समस्त पुणेकरांतर्फे मानपत्र. मधला तो करोना बद्द्लचा ठळक निळ्या अक्षरांमधला धडधडीत चुकीचा क्लेम दुर्लक्षित करून उर्वरित मजकुरातील व्याकरणाच्या चुका शोधल्याबद्दल Wink

तो मधे एक विनोद फिरत होता तो आठवला. कोणीतरी एका पुणेकराला मी आत्महत्या करणार आहे असे काहीतरी, पण चुकीच्या भाषेत सांगतो. त्यावर तो पुणेकर त्याचे व्याकरण दुरूस्त करतो.

मी तारापूरकर आहे
पण आता बरीच वर्षे पुण्यात.
बोलीभाषा बोलताना काही शब्द आपल्या स्टाईल ने बोलणे वेगळे, आणि ते शब्द तसेच ऑन पेपर लिहिणे वेगळे.साधं गुगल इंडिक पण चांगला मराठी शब्द सुचवतं. अशुद्ध लिहायचं तर मुद्दाम सर्व सजेशन दुर्लक्षित करून लिहावं लागतं.
उद्या भाषा विषय लिहिताना हे शब्द कसे लिहायचे याबद्दल किती गोंधळ असेल?काही मुलं आणि पालक 'वर्तमानपत्रात पण असंच लिहितात.हा बरोबर शब्द आहे.मार्क द्या' म्हणून भांडतील.
मी बोलते ती भाषा ऑन पेपर सगळ्यांनी लिहा असं पण म्हणत नाही.सगळ्यांनी किमान एक शब्द एकाच प्रकारे लिहावा.(पुढे तळहातावर मूठ वापरून डॅम ईट!! उदगार स्वगत) Happy
प्रस्तावणा ऑन पेपर लिहायचं नक्की झालं तर ती भाषा लिहिणाऱ्या सगळ्यांनी प्रस्तावणा लिहावं.

अरारा
तो क्लेम आताच पाहिला
मुळात व्हॉटसपवरच्या सुविचाराचं पुस्तक बनवणं इतकी अफाट योजना आहे की त्यापुढे मला आजूबाजूच्या बातम्या दिसल्याच नाहीयेत.पुस्तकात व्हॉटसप सारखे फूल, मांजरीची पावलं वगैरे इमोजी पण असतील का 5 ओळीनंतर?

करोना बद्द्लचा ठळक निळ्या अक्षरांमधला धडधडीत चुकीचा क्लेम दुर्लक्षित करून >>>
अशा दाव्यांची एवढी सवय झालीय की ते सोमी, वर्तमानपत्रात रोज न दिसल्यास चुकल्यासारखे वाटते.

काही मुलं आणि पालक 'वर्तमानपत्रात पण असंच लिहितात.हा बरोबर शब्द आहे.मार्क द्या' म्हणून भांडतील. >> Sad आमच्या बाई असत्या तर "पेपरात असंच लिहीतात मग ते वर्तमानपत्र भेळेच्या पुड्या बांधायला वापरतात. असं लिहायचं असेल तर आताच तुमच्या पाल्याला भेळ बांधायला पाठवा. चार पैसे कमावेल, मला शिकवायची डोकेदुखी नाही, तुम्हाला फ्री भेळ मिळेल"
(मुले अचूक मराठी उशीरा शिकणार हा मुद्दा कळला आणि अगदी योग्य आहे. Happy )

Pages