चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताने २०१८ ला शत्रू राष्ट्र संपत्ती बाबत च्या कायद्यात ( १९६८ ला झालेला तो कायदा काँग्रेसने कधी वापरला नाही) जे बदल केले त्याबाबत ग्लोबल टाइम्स मध्ये आलेला खालील लेख.

http://www.globaltimes.cn/content/1085319.shtml

आजच्या परिस्थितीच श्रेय नेहरूंना द्यायला लोकं का लाजताहेत ते कळत नाही. चिनी सैनिक १९६२ ला गलावान , पंगोंग लेकपर्यंत आले ते पर्यटनाला तर आले नव्हते ना ?

बाकी आता केंद्रातील फक्त एकच विरोधी पक्ष आणि त्याचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत चे गुलाम डराव डराव करत असल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

मी माझा,
तुम्ही सनव, राज, वटवृक्ष, रश्मी या सगळ्यांना "डराव डराव करणारे गुलाम" म्हंटल्याचे मला अजिबात आवडले नाही.

सर्व ऍप चींन नी च बनवले आहेत तर आपले 99.99 टक्के मार्क घेवून बारावी झालेले आणि नंतर सॉफ्टवेअर अभियांत्रिकी केलेले काय केळीच्या साली सोलत आहेत का?

भारताने २०१८ ला शत्रू राष्ट्र संपत्ती बाबत च्या कायद्यात ( १९६८ ला झालेला तो कायदा काँग्रेसने कधी वापरला नाही) जे बदल केले त्याबाबत ग्लोबल टाइम्स मध्ये
>>>>>>>
असे कित्तेक बाण योग्य ठिकाणी लागलेत म्हणून तर भारतातील चायना गॅंग ची किरकिर चालू झाली आहे !

सध्या चिनशी आपला सिमेवरून वाद चालला आहे , तसा तो नेहमी चालू असतोच .
पण सध्याच्या वादात सतत चीन धर्जिणी भूमिका घेणार कम्युनिस्ट पक्ष शांत आहे आणि युवराज भान हरपून रोज ट्विट करत सुटले आहेत.
सध्याच्या वादामुळे काही संदर्भ सापडले .

१९६२ साली असेच झाले होते आणि त्या वेळी सर्वात वादग्रस्त पक्ष कम्युनिस्ट होता , त्यांनी उघड उघड देश विरोधी भूमिका घेतली होती.

१९६२ साली कम्युनिस्टांच्या भूमिकेमुळे पॉलिटब्युरोच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना तिरुवनंतपुरमच्या तुरुंगात टाकण्यात आले होते. १९६२ साली कम्युनिस्टांनी चीनला पाठिंबा दिला होता हे सत्य आता सगळ्यांनाच माहीत आहे. हे जे पदाधिकारी तुरुंगात गेले त्यात मला वाटते केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन ही होते. हे त्या काळात पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे तुरुंगात गेल्यावर त्यांनी तेथे लगेचच एक समिती स्थापन केली. याचे सेक्रेटरी किंवा अध्यक्ष म्हणा होते एक अट्टल कम्युनिस्ट ‘‘जोसेफ.’’ हे नंतर लोकसभेचे सदस्यही झाले होते. या समितीसमोर श्री अच्युतानंदन यानी एक कल्पना मांडली की आपल्यावर चीनी एजंट असल्याचा जो आरोप केला जातो तो सौम्य करण्यासाठी आपण भारतीय सैनिकांसाठी रक्तदान शिबीर भरवूया. जोसेफ यांनी लगेचच तो ठराव फेटाळला. त्यांनी जे कारण दिले होते ते मित्रहो आपण लक्षात ठेवले पाहिजे. पार्टीचे हित हे देशहितापेक्षा वरच्या पातळीवर आहे. त्यामुळे जे सैनिक चीन बरोबर युद्ध करीत आहेत त्यांच्यासाठी रक्तदान करण्याची आवश्यकता नाही.’’ श्री अच्युतानंदन यांनी परत परत हा ठराव मांडला. शेवटी प्रकरण हातघाईवर आले आणि अजून एक कम्युनिस्ट अनिरुद्धन यांनी तुरुंगाधिकाऱ्याकडे हे प्रकरण नेले. दुसऱ्या दिवशी ही बातमी बाहेर फुटली.

बंगालचे ज्योती बसू यांनी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते नंबुद्रिपाद यांना याचा अहवाल दिला. त्यांनी के पी आर यांना या प्रकरणाविषयी चौकशी करण्यास सांगितली. हे प्रकरण एवढे चिघळल्यावर अच्युतानंदन यांनी हे रक्तदान शिबीर रद्द केले. लक्षात घ्या त्यांनी सीपीआयचा राजिनामा देण्याचे धाडस दाखवले नाही. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने कोणाच्यातरी सांगण्यावरून पार्टीकडे अच्युतानंद हे पक्षविघातक कारवाया करत आहेत अशी तक्रार केली. त्यात या रक्तदान प्रकरणाचाही उल्लेख होता. एक चौकशी समिती नेमण्यात आली आणि त्यांना खालच्या पदावर पाठविण्यात आले.

सध्या फरक इतकाच कि ओरिजीनाल कम्युनिस्ट शांत आहेत !!!!

https://indianexpress.com/article/news-archive/web/during-china-war-comr...

मी माझा,
तुम्ही सनव, राज, वटवृक्ष, रश्मी या सगळ्यांना "डराव डराव करणारे गुलाम" म्हंटल्याचे मला अजिबात आवडले नाही.>>>>> Proud बघा, त्यांनी विरोध पण किती हृदयाच्या अंतःस्तरातुन केला आहे. Proud

मी- माझा, तुम्ही आम्हाला डराव डराव करणरे बेडुक म्हणले ते मला आवडले, पण तुम्ही सिंबा आणी इतर राजमाता व युवराज भक्तांना त्यांचे भाट म्हणाल तर खबरदार ! असे खरे खरे बोल कधी बोलु नये. Biggrin

https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-lockdown-congress-...>>>>>> युवराज बरळले. आता हॉर्वर्ड मध्ये भारतीय प्रश्नांचा अभ्यास होते असेल ( चक्क ट्रंपुल्याला डावलुन ?) तर भारीचे की. माणसाला ना आपण कुठे काय बरळतो आहे हे बोलण्याचे भान / तारतम्य असावे. आपण बाहेर जाऊन आपल्याच देशाला नावे ठेवत आहोत व विरोधी देश त्याचा फायदा घेत आहेत एवढे पण या मंदाला समजत नाही. Angry

‪Three Biggest Lies of PM Modi till now - ‬

‪- Black Money will be back in 100 days ‬
‪- Demonetisation problems will be over in 50 days ‬
‪- Battle against Corona will be won in 21 days ‬

‪Three Future Lies that will be exposed with time - ‬

‪- Indian Economy will be $5 Trilion by 2025‬
‪- Every Indian will have a House by 2022‬
- 100 Smart Cities and clean Ganga by 2022

बॉर्डरवर?
t Col Anil Duhoon (Veteran)
@anilduhoon
Since when #Nimu has become a forward post? It’s a tourist spot. Person who couldn’t say #China even once is only busy in PR excel use and nothing more. Rubbish

Biggrin

तिबेट आणि उत्तर-पूर्व भारत यांच्यादरम्यान आखलेली सीमारेखा ही मॅकमोहन लाईन नावाने ओळखली जाते. १९१४ च्या सिमला करारानुसार ब्रिटीश प्रशासक हेनरी मॅकमोहन आणि तिबेटियन प्रतिनिधी लोनचेन सत्रा यांच्यात ही सीमारेखा मान्य करण्यात आली.
भारत सरकार मॅकमोहन सीमारेखा मान्य करते परंतु चीन मात्र मॅकमोहन सीमारेखेला मान्यता देत नाही आणि सिमला करार अमान्य करतो. चीनच्या मतानुसार तिबेट हा कधीही सार्वभौम प्रदेश नव्हता आणि म्हणून तिबेटला कोणताही करार करण्याचा अधिकार नव्हता. भारतीय स्वातंत्र्यानंतर आपण कधीही आपल्या सीमारेखा निश्चित करण्यात लक्ष दिले नाही, परिणाम १९६२.

भाऊ तोरसेकर यांच्या जगात पहारा मधील काही लेख
अनुभव ही सर्वोत्तम शाळा
चिनी सेनेशी झटापट झाली तर त्यांनी कुठवर आक्रमण केले होते? त्यांना परतून लावले तर ते आत कुठेपर्यंत घुसले होते? चिनने भारताची जमिन बळकावलेली नाही तर माघारी परतवले याचा अर्थ काय? असे शेकडो प्रश्न विचारता येतात. पण पुढे येणे वा मागे परतवून लावणे ह्याचा खुलासा करण्यासाठी कुठली तरी एक सीमारेषा असावी लागते. दोन्ही देशांमध्ये अशी कुठली सीमा रेषा नक्की झालेली आहे काय? नसेल तर इतकी वर्षे ती निश्चीत करण्यासाठी तात्कालीन भारतीय राज्यकर्त्यांनी कोणता प्रयास केला होता? नसेल तर त्यांनी कशाला सीमा निश्चीत केल्या नाहीत? हा खरा प्रश्न आहे आणि त्याचेच उत्तर नसल्याने नसते प्रश्न विचारून गोंधळ घातला जात आहे. दोन देशातली झटापट ही सीमा निश्चीत नसल्यानेच झालेली आहे आणि आजवर त्या झटापटी टाळण्याला सुरक्षा मानले जात होते. पण त्या बोटचेपेपणाचा गैरफ़ायदा घेऊन चीन कायम दादागिरी करीत राहिला आणि अखेरीस त्याला ठाम उत्तर देण्याची वेळ आली. त्यातली आपली म्हणजे कॉग्रेसकालीन नाकर्तेपणाची कबुली अन्थोनी नावाच्या संरक्षण मंत्र्यांनी संसदेत दिली आहे.

दगडफ़ेक्यांचे राष्ट्रीय नेतृत्व
लोकशाहीत विरोधकांनी प्रश्न विचारायचे असतात. पण प्रश्न आणि निरर्थक आरोप यात फ़रक असतो, हे कोणी कोणाला समजवायचे? अखेरीस ज्याला समजूनच घ्यायचे नसते, त्याला समजावणेही अशक्यच असते ना?
हळुहळू हा सगळा प्रकार काश्मिरातील त्या दगडफ़ेक्यांसारखा होऊन गेला आहे. ह्या मंडळींचे बोलणे युक्तीवाद ऐकला तर त्यांच्यातला तो काश्मिरी दगडफ़ेक्या आपल्याला स्पष्टपणे ओळखता येऊ शकतो.
राहुल गांधी व त्यांच्या माध्यमातून चिनी कम्युनिस्टांनी तशीच फ़ौज आता राष्ट्रीय आघाडीवर मैदानात आणलेली आहे. ती चिनने बळकावलेल्या जमिनीचा सवाल उभा करीत असते. पण खुद्द कॉग्रेस पक्षच चीनने कधी व कसा बळकावला, त्यावर चकार शब्द बोलत नाही. राहुलच्या रुपाने म्हणूनच दगडफ़ेक्यांना राष्ट्रीय नेतृत्व बहाल करण्यात आले आहे.

जाऊ दे जास्त काही बोलू नका. आपण पडलो सर्वसामान्य गरीब माणसं. आपल्या बोलण्याचा राग बिग आला तर बंगल्यावर नेऊन मारतील आपल्याला.

जाऊ दे जास्त काही बोलू नका. आपण पडलो सर्वसामान्य गरीब माणसं. आपल्या बोलण्याचा राग बिग आला तर बंगल्यावर नेऊन मारतील आपल्याला.>>>>> Lol
एक मान्य करेन की काँग्रेसीवाले नाही हाणणार कोणाला. तेवढे ते मुर्ख नाहीत, तो अजेंडा राष्ट्रवादीचा आहे.

उडाणटप्पुला काहीही करुन आपली फजिती चार लोकात दाखवायची हौस आहे. मोदींविरुद्ध जरुर बोला. ते चुकतायत ना मग बोला. पण त्या आधी आपले राज्य होते तेव्हा काय चालले होते ते पण आठवा. आम्ही आतापर्यंत नुसते डझनभर खलितेच पाठवले. सैन्याला तेव्हा आदेश होते का? की जाऊन त्यांना चोपा. मग आता ते पाकडे आणी पिचपिचे चोपले जातायत तर यांना उमाळे यायला लागलेय.

मोदींनी काय केले यापेक्षा आपण पत्रकारांना बाईट देऊन काय काय बरळतोय हे जरी यांनी लक्षात ठेवले तरी बरे. भाऊ-बहीण मध्यंतरी सारखे विचारत होते की सैनिकांना शस्त्रे का नाही दिली? अरे मग काका तर तुमचे पार्टनर आहेत ना सत्तेतले, त्यांना का नाही विचारले? त्यांनीच तर करार केला होता ना त्या वेळी की दोन्ही बाजूचे सैनिक निशस्त्र राहतील.

बालिश बहु पत्रकारांसमोर बडबडला.

Pages