चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी myboli वर भारत इंग्लिश दुवे का देत असतात.
मराठी भाषा पुरेशी परिपक्व आहे कोणत्या ही विषयात व्यक्त होण्यासाठी.
कशाला प्रतेक प्रतिसाद ला इंग्लिश पाहिजे

मोदींनी कोणाला दोषी धरले की नाही या बद्दल
करात , युवराज , पिरियन यांच्या कडे शुअर शॉट डिटेल्स असतील Happy
आर्थिक आणि सामरिक तडाखे यांच्या पर्यंत नक्कीच बसले असतील !!!
आज तर म्हणे ' कम्युनिस्टांचे दैवत ' केरळ च्या मुख्यमंत्री ची सेक्रेटरी ' बावनकशी सोन ' स्वप्ना सुरेश सोने स्मगलींग अडकली !!!!
आता यात पिरियन चा हात नाही अशी पिरपिर
केरळी कम्युनिस्ट नी चालू केली आहे .

भाजपे आणि चायनी,

बोफोर्स ते राफेल सगळे मोदीच्या हातात आहे अन तरी हे राहुल गाँधीच्या नावाने रडत असतात
>>>>>
भाजपचे ठीक आहे हो , पण चायनी पण राहुल च्या नावाने रडत असतात ?
कहना क्या चाहते हो भाई ?
Happy
कम्युनिस्ट च्या ऐवजी काँग्रेसी उघडकीस आला म्हणून ?

लोक इतके बिनडोक सारखे का लिहितात?

चीन आक्रमनाबद्दल मोदिना कोणी जबाबदार धरले नाहीये,
त्या नंतर च्या गुळमुळीत हाताळणी साठी जबाबदार धरले आहे. आणि खुद्द मोदी CM असताना त्यांना देखील अशी हाताळणी पटत नव्हती ( अनि त्यांना पटत नव्हती म्हणून इकडच्या बेडकांना पटत नव्हती, )आता तेच बेडूक मोदी करतायत ते कित्ती बरोबर हे घसा फाडून सांगत बसलेत.
मात्र तेव्हा मनमोहन सिंग सरकार असेच वागत होते ते खुपत होते त्यांना.

आपल्या येथील विरोधी पक्षांना उल्लेखून एकदा सकाळ मध्ये हे लिहिले होते असे स्मरते. बरबाद-ए-गुलिस्तान करनेको बस एक उल्लू काफी था I यहां हर शाखपर उल्लू बैठा है अंजामे गुलिस्तानका क्या होगा I (उल्लू म्हणजे घुबड). हे येथे मजा म्हणुन लिहिले आहे कुणाला उद्देशून लिहिलेले नाही.

दुसरी गोष्ट,
भारत सरकार जे सबुरीचे धोरण ठेऊन आहे ते आत्ता तरी योग्य आहे. ( होपिंग, स्वतःच्या क्षमता/ अलटर्ननेट सप्लाय चेन विकसित करण्यासाठी ही सबुरी ठेवली असेल, आणि ते उद्दिष्ट्य साध्य झाल्यावर काही ऍक्शन घेतली जाईल)

इकडे रेवडी उडवली जाते आहे ती बेअक्कल भक्तांची,

आज जी कारणांची जंत्री घेऊन हे भक्त भारत सरकारचा निर्णय डिफेन्ड करत आहेत, त्यांना पूर्वी भारत गप्पा राहण्याची हीच, कदाचित याहून जास्त कारणे असतील इतपत कल्पना आली तरी हे ट्रोलिंग सत्कारणी लागले असे मी समजेन.

वर, भरत, अमित, जिद्दु यांनी या भावनेवर अचूक बोट ठेवले आहे.

Submitted by सिम्बा on 1 July, 2020 - 11:4

ही सिम्बा यांची पोस्ट ! भारत सरकारचं धोरण त्यांना योग्यच वाटतंय.

तरीही ट्रोलिंग करायची त्यांची काय मजबूरी असेल ते असो. या सर्व हुशार व्यक्तींना राहुलजी गांधीजींना केवळ जन्मदत्त उच्चकुलीन वारसाहक्कामुळे आपला नेता म्हणून सिरियसली घ्यावं लागतं त्यामुळे त्यांच्या ट्रोलिंगकडे सर्वांनी सहानुभूतीने बघावं. Biggrin

When everything else fails, which usually does, you jump on Rahul Gandhi.
Thats your STREANH Wink

काँगि सापाला पुन्हा जिवंत करण्यासाठी
चिनी युवराज ची अती शहाणी गॅंग अथक प्रयत्न करत असली तरी आता ते शक्य नसल्याने होणारा जळफळाट लक्षात येत आहे !
आणि अशाच निर्बुद्ध वागण्याने ४४ वर आले होते .

वो चले गए।

कोई आया था?

आया कोई नहीं।

आया नहीं?

हाँ।

लेकिन चला गया?

हाँ।

कहाँ से?

वहाँ से।

वहाँ कहाँ?

जहाँ से वो चला गया।

मतलब जहाँ पे वो आया था।

नहीं आया नहीं था।

(थप्पड़)

थप्पड़ क्यूँ मारा?

तुमने भी मारा।

मैंने कब मारा।

मारा नहीं था लेकिन लग गया।

राहिले स्वाभिमानी म मो बद्दल !
म मो निषेधाचे खलिते पाठविणे या शिवाय काय करत होते ?
ममो बुद्धिमान होते पण पंतप्रधान पदी बसविल्यामुळे सिंग साहेबांचे मायनो प्रती उपकृत वागण्याचे फुटेज याची देही याची डोळा भारतातील तमाम जनतेने सतत १० वर्ष बघितले . कित्तेक वेळा मीटिंग मध्ये म मो बाजूला आज्ञाधारक भाव घेवून उभे राहायचे , पण लोकशाही भारता चे म मो पंतप्रधान असल्याची अचानक आठवण राजमाता आणि युवराज ला व्हायची तेंव्हा ते त्यांना " या ! या !! इकडे बसा "
सांगायचे . म मो सुद्धा पडत्या फळाची अज्ञा मानून स्थानापन्न व्हायचे !!!
अशा या पंतप्रधान ची आज्ञाधारक कामसू वृत्ती भांजाळ लेली काँगी ला आणि लायकी नसलेले पण पद्मभूषण अवॉर्ड देवून गळ्यात पट्टा बांधलेले न्यूज चॅनेल वाल्यांना कधीच दिसली नाही .
ना कधी त्यावर चर्चा झाल्या , ना कधी म मो त्या वेळी १२० करोड लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे पी एम म्हणून कोणाला सामोरे गेले !
सतत मालकिणी बाबत उपकृत भाव !!!!!

एकी कडे असे पंतप्रधान पदी कणाहीन नेतृत्व आणि दुसरी कडे अपंग संरक्षण मंत्री !
ज्यांना उचलून नेण्याचे काम सुध्दा एस पी जी करत होती .
तर त्या संरक्षण मंत्र्यांनी भर लोकसभेत लेह लडाख मध्ये चीन ने बळाच्या जोरावर केलेल्या विकास कामाची लिस्ट वाचून दाखवली होती , आणि आपण काहीही करू शकलो नसल्याची जाहीर कबुली लोकसभेत दिली होती . आणि चीन च्या भीती ने काँग्रेस करू इच्छित ही नव्हती .
त्या काळात चिनी नेते भारतातील सरकार च्या बुळचाट ध्येय धोरणावर नक्कीच फिदी फिदि हसत असतील .

२०१४ पासून मोदींनी सर्वात प्रथम लष्कराची ती अडचण ओळखून सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करायला सुर वात केली . पाहिले आक्रमण आपले लष्कर करणार नाही पण पायाभूत सुविधा मुळे वेगवान हालचाली करून शत्रू ला वेळीच प्रतिबंध तरी करू शकते .

शेवटी काय
डबक्यात ड राव ड राव करणाऱ्या बेडकाना कोंगि च्या पलीकडे जग दिसणारच नाही .

बाई बाई बाई,
झोपाळ्यावर झुलताना ते xi वरात घेऊन आलेले,
मोदींजींनी काय केले? काही vantage पॉईंट्स आंदण देऊन मांडव परतणी केली .
आता ही नक्की किती भु प्रदेश गेला हे गुलदस्त्यात आहे, करण मुळात कोणी आलंच नाही असा दावा आहे.

नफ़रत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको
ज़िद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो
देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों ...

https://youtu.be/qglvU19g0kA

सावरकर, कोरोना आणि गिधाडे !!*
आज ८ जुलै २०२०. ह्याच तारखेला बरोबर ११० वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका बोटीतून समुद्रात उडी मारून फ्रान्सचा मार्सेलिस किनारा गाठला होता. ह्या अतुलनीय आणि अद्भुत अशा घटनेची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेतली गेली. ह्या दिवशी सावरकरांनी दाखवलेल्या विराट देशप्रेमाचे स्मरण करायचा सर्व देशप्रेमी आणि सावरकरप्रेमी लोकांचा मानस असतो. इतिहासात नोंदवलेली गेलेली ही घटना केवळ एक उडी न राहता ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात एका सच्च्या देशभक्ताने दाखवलेला तो उत्कट आणि प्रेरणादायी मार्ग होता. आयुष्यात येणारी सुलतानी संकटे परतवून लावण्यासाठी सावरकरांची जीवनगाथा हा अनेकांचा जगण्याचा आधार आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी अशा परिस्थितीत धीर न सोडता, परिस्थितीला शरण न जाता आपले कर्तव्य बजावत राहणे आणि संकटांचे देखील संधीत रूपांतर करून त्यावर मात करणे हा ह्या आधाराचा गाभा.
पण आज झालेल्या सावरकर स्मरणाला एक दुःखाची किनार आहे. माझा फेसबुकवरील मित्र, लेखक आणि सावरकरप्रेमी असणाऱ्या जयेश मेस्त्रीच्या (
) वडिलांचे कोरोनामुळे काल रात्री दुःखद निधन झाले. साधारण एक आठवड्यापूर्वी जयेश, त्याची पत्नी आणि त्याचे वडील अशा तिघांच्याही कोरोना चाचण्या पॉसिटीव्ह आल्या आणि संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले. ह्या संक्रमणात त्याचा लहान मुलगा बचावला पण घरातील तिघांना quarantine आणि उपचार घ्यावेच लागले. तिघांना तीन वेगळ्या ठिकाणी उपचारवजा quarantine करावे लागले. ह्या कठीण काळात जयेशने स्वतः बरोबर नेलेली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित "माझी जन्मठेप" हे पुस्तक. हे पुस्तकच ह्या कठीण काळात आपल्याला योग्य तो मार्ग दाखवेल आणि आपले मनोबल उंच ठेवेल ह्याची जयेशला खात्री होती. काल रात्री त्याच्या वडीलांचे मुंबईच्या KEM रुग्णालयात दुःखद निधन झाले आणि ही बातमी आज सकाळी अनेकांना समजली.
तत्पूर्वी quarantine सेन्टरमध्ये दाखल झाल्यावर तिथली एकंदर अव्यवस्था, मुंबई आणि इतर भागातील कोरोनामुळे झालेली वाताहत, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, त्याला सर्वस्वी जबाबदार असलेली मुंबई महानगरपालिका आणि तेथील सत्ताधारी शिवसेना, निर्ढावलेले राज्य सरकार आणि बेमुर्वतखोर सत्ताधारी ह्यांच्यावर जयेशने एक भलीमोठी आणि तथ्यपूर्ण अशी पोस्ट लिहिली होती. ह्या पोस्टमध्ये त्याने शब्दशः सोदाहरण व्यवस्थेचे, शासनाचे आणि त्याला जबाबदार असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले होते. ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आणि परिणामी जयेशला सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्चानी शिव्यांची लाखोली वाहिली. त्याला अर्वाच्च्य शिव्या दिल्या. त्याच्या आई,वडील,बहीण आणि बायकोवरून त्याला प्रचंड मनस्ताप दिला. तरीही तो डगमगला नाही.
झालेले हे ट्रोलिंग हे अत्यंत नीच प्रकारचे, नीच पातळीचे आणि द्वेषाच्या सर्व सीमा ओलांडून केले होते. ह्या सगळ्यांचे स्क्रीनशॉट्स सोशल मेडिया आणि फेसबुकवर फिरत आहेत. ट्रोलिंग करणारी गिधाडे ही सत्ताधारी पक्षांची खरकटे काढणारी आणि पूर्णपणे वैफल्यग्रस्त आहेत. नेहमी मराठी लोकांचा कैवारी असल्याची भूलथापा मारणारी सत्ताधारी जमात जेव्हा जयेश सारख्या मराठी माणसाच्याच अंगावर धावून जाते तेव्हा ती आपण मुदलातच पोकळ होतो आणि आहोत ह्याची प्रत्यक्ष ग्वाही देत असते.
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेल्या योग्य पावलांनी अजूनही (भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात) कोरोना संकट आटोक्यात आहे. ह्याचे संपूर्ण श्रेय निःसंशयपणे केंद्र सरकारचेच होते आणि आहे. देशव्यापी लॉकडाउन घोषित करून त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्यांची होती. रुग्णांना लागणारी सर्व मदत, व्हेंटीलेटर्स, मेडिकल स्टाफला लागणारी ppe किट्स, त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, हॉस्पिटलची सज्जता ह्यासाठी केंद्राने सर्वतोपरी मदत सर्व राज्य सरकारांना केली होती अजूनही करत आहेत.
परंतु महाराष्ट्रातील जनतेची अक्षम्य फसवणूक करून सत्तेत आलेले सरकार केवळ राजकारण करण्यात गुंग आहे. सामान्य लोंकाना दंडुक्याचा धाक दाखवणारे पोलीस खाते मानवतेच्या आधारे करोडो रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेल्या आरोपीना महाबळेश्वर येथे जायची परवानगी देते. त्याच काळात पालघरमध्ये २ साधूंची मॉब लिंचिंगने निर्घृण हत्या होते. संकटकाळात जनतेने ज्यांच्याकडे आशेने बघावे असे मुख्यमंत्रीच घरात स्वात:'ला कोंडून घेतात आणि देवानेच चमत्कार घडवून आणण्याची भाषा करतात मात्र स्वतःच्या आमदारकी साठी मात्र ३ वेळा राजभवनाचे उंबरठे झिजवतात. त्याचवेळी सत्ताधारी पक्षातील लोक जनतेला दिलासा द्यायचे सोडून विरोधी पक्षावर आपल्या अपयशाचे खापर फोडतात. कोरोनामुळे मृत पावलेल्या लोकांचे मृतदेह गुंडाळायची ६०० रुपयांची बॅग ६००० रुपयात खरेदी करायचे मनसुबे सत्ताधारी पक्ष रचतो आणि चोरी उघड होताना पुन्हा पहारेकऱ्यांच्या नावानेच शिमगा करतो. तात्पुरते बनवलेले हॉस्पिटल देखील रातोरात गुंडाळून टाकून जनतेच्या पैशांचा चुराडा केला. कोरोनाच्या चाचण्या करत नाहीत, रुग्णाचे खरे आकडे जनतेला कळू दिले जात नाहीत, कोरोना चाचण्यांचे निकष बदलले जातात, रिपोर्ट्स रुग्णांना न देता थेट हॉस्पिटलला दिला जातो. रुग्णवाहिका मिळत नाहीत. बेड्स मिळत नाहीत. अगोदरच चुकीचे आकडे देऊन मृतांचे नवीन आकडे (तेही विरोधी पक्षाने उताणे पाडल्यावर) घोषित करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली. वेळेत हॉस्पिटल न गाठल्याने लोक किड्या मुंगीसारखे मरत आहेत आणि सत्ताधारी गिधाडे आणि त्यांचे बगलबच्चे अव्यवस्थेवर बोट ठेवणाऱ्या जयेशवर खालच्या पातळीवर येऊन नीच शेरेबाजी करत आहेत. लोकांना मरणाच्या तोंडी देऊन सत्ताधाऱ्यांना १२ आमदारांच्या नेमणुकीची जास्त चिंता आहे. सत्ताधारी मुलाखती देण्यात आणि घेण्यात व्यग्र आहेत.
व्यवस्थेतील ह्या अपयशाचा पाढा वाचणाऱ्या विरोधी पक्षाला "अशावेळी राजकारण करू नका" वावदूक सल्ला दिला जातो मात्र सत्ताधारी मात्र २४ तास मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मग्न आहेत. सत्ताधाऱ्यांचे जे पाठीराखे चढ्या आवाजात जयेशवर तुटून पडले आहेत त्यांना त्याच्या घरी कोरोना प्रादुर्भाव होऊन कोणी मेल्याशिवाय अक्कल येणार नाहीय. सत्ताधारी आमदार आणि मंत्री कोरोना झाल्यावर मुंबईच्या आलिशान फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जनतेच्या पैशाने उपचार घेत आहेत. पण त्यांच्या पाठिराख्यांची हे लक्षात ठेवावं की त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना जेव्हा कोरोना होईल तेव्हा हॉस्पिटल तर सोडाच तर मेल्यावर शववाहिकासुद्धा त्यांचे साहेब (मोठे,छोटे,मध्यम) देणार नाहीयेत. सत्ताधाऱ्यांच्या ह्या अशा DNA मुळेच त्यांच्या अनुयायांचा हा मस्तवालपणा आहे आणि हा मस्तवालपणाच सध्याच्या सत्ताधाऱ्यांना नामशेष करणार आहे. ज्यांच्या जीवावर आणि ज्यांच्या पाठिंब्याने तुम्ही निवडून आलाय अशा लोकांच्या पाठीत तुम्ही आज खंजीर खुपसून सत्तेची खुर्ची मिळवली आहे. तुमचा हाच DNA महाराष्ट्राने ओळखून तुमचा वेळोवेळी बोन्साय केलाय.
सावरकरांची शिकवण आत्मसात करणारा जयेश "मारिता मारिता मरेतो झुंजेन" ह्या वृत्तीने ह्या संकटाला सामोरे जाईल आणि त्यावर विजय देखील मिळवेल पण सत्ताधारी आणि त्यांचे चमचे लढायच्या योग्यतेचेही राहणार नाहीयेत. देवाच्या काठीला आवाज नाही हे लक्षात असू दे.
जयेशच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली !

वॉट्स अ‍ॅप साभार

भक्तीमध्ये लोक इतके आंधळे झालेत की चीन च्या धाग्यावर करोना व सावरकर लिहून बसलेत, लडाख कुठे , अंदमान कुठे .. काही समजेनासे झाले आहे त्यांना.

Proud

काँग्रेस वाईट , राष्ट्रवादी वाईट , आता 35 वर्षे मित्र असलेली सेनाही वाईट

मग आता भाजपाला स्व बळावर यावे लागेल .

4 पेशंट होते म्हणे , एक मेला म्हणे, तो काँग्रेस सेनेच्या हॉस्पिटल मुळे मेला म्हणे,

आणि मग जे 3 जगले , ते कुणामुळे जगले ? मोदींचे आशीर्वाद की सावरकर नाम जप ?

https://twitter.com/ANI/status/1281227694441549827
ANI
@ANI
Nepali Cable TV providers tell ANI, signals for Indian news channels have been switched off in the country. No official government order of the same till now.

नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण बंद.

अरे वा.. केंद्रातील विरोधी पक्षांमध्ये चीनबरोबर mou असणारा आणि एकटाच कोकलणार्या पक्षाच्या समर्थकांची डरावडराव अजूनही सुरूच आहे?

भारताने २०१८ साली शत्रू राष्ट्र संपत्ती कायद्या त केलेल्या बदलाला घाबरून तुमचा तो मित्रदेश गप्प बसला आहे. तुम्हीपण शांत बसा.

बादवे अचानक एव्हढी डराव डराव करायला अक्साई चीनमध्ये गवत उगवायला सुरुवात झाली की काय?

नोव्हेंबर २०१४ मध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींचं एक मंडळ चीनच्या कम्युनिस्ट पक्षाक डून धडे घ्यायला चीनला गेले होते. या प्रति निधी मंडळाचे प्रमुख होते महाराष्ट्राचे आताचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी. दोन्ही दे शांतील सत्ताधारी पक्षांतील संबंध दृढ करणे हाही या भेटीचा उद्देश होता.

<भारताने २०१८ साली शत्रू राष्ट्र संपत्ती कायद्या त केलेल्या बदलाला घाबरून तुमचा तो मित्रदेश गप्प बसला आहे>

हे बघा भाजपच्या पाठिराख्यांकडून २० सैनिकां च्या हत्याप्रकरणी चीनला क्लीन चिट. मोदी देशातील सर्वात मोठे चीनधार्जिणे नेते आणि भाजपचे समर्थक मायबोलीवरचे सर्वाधिक चीनधार्जिणे फूट सोल्जर्स.

तो विकास दुबे नक्कीच मोठा समाज सेवक असावा , ज्या साठी राजकुमारी नी तत्पर्ते ने लक्ष घातले : )

भारताने आपला जुना मित्र इराणला वार्‍यावर सोडलं. आता चीनने तिथेही बस्तान मांडलं.
https://www.wionews.com/india-news/as-china-eyes-multi-billion-dollar-ir...

भाजपवाले विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांत लक्ष्मीवरदहस्त दाखवून आमदार फितवतात. चीन भारताच्या मित्रांना फितवतो.

भाजपवाले विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांत लक्ष्मीवरदहस्त दाखवून आमदार फितवतात. >>> मनाची अशी खोटी समजूत करून घेतली की जी खरीखुरी समस्या आहे तिच्याबाबतीत डोळ्यावर कातडं पांघरून बसणं सोपं जातं. ज्या संजय झांनी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी योग्य सुचना केल्या त्यांना प्रवक्तापदावरून काढून टाकलं.

सोनिया आणि राहूल गांधींचे पाय हेच जर काँग्रेसपक्षातील ग्लास सिलिंग असेल तर तरूण, धडाडीचे आणि खरेखुरे नेते, कार्यकर्ते निराश होणारच. राजकारण ही देखिल एक करीयर आहे आणि इतर क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रात काम करत असलेल्या तरुण, महत्त्वाकांक्षी नेत्यांना इतकी वर्षं निष्ठेनं काम केल्यावरही जर पुढे जाता येणार नसेल तर त्यांनी यापुढे पक्षावर निष्ठा कशी ठेवायची?

राहूलला स्वतःला पूर्णवेळ राजकारणात रस नाही हे उघड आहे. पण तरीही अजूनही त्यालाच काँग्रेस पक्षाचा सर्वेसर्वा करण्याचा सोनियाचा हट्ट काही संपत नाही. अशा दुराग्रहामुळे पूर्ण पक्षाची वाताहात होत आहे. अजूनही काँग्रेसमधील तरूण नेते एकत्र येऊन जर नव्या दमाच्या काँग्रेसकरता प्रयत्न करतील तर पक्ष वाचू शकतो आणि प्रगतीही करू शकतो. एका देशव्यापी सशक्त विरोधी पक्षाची गरज आहे जी सध्याच्या परिस्थितीत केवळ काँग्रेस पक्षच देऊ शकतो.

खोटी समजूत? कर्नाटकात ऑडियो रेकॉर्डिंग आहे. त्या आमदारांची अ‍ॅफिडेव्हिट्स आहेत. कर्नाटक , मध्य प्रदेशात मंत्रीपदं दिलीत. राजस्थानात ही एफ आय आर नोंदवला गेला.

बाकी काँग्रेसबद्दल जितकं भरभरून बोलता त्याच्या एक दशांश तरी मोदींच्या विदेशनीतीतल्या देदीप्यमान यशाबद्दल बोलाल तर?

मोदींच्या सक्षम नेतृत्वाखा ली भारताची प्रत्येक आघाडीवर अधोगती होते आहे आणि यांना विरोधी पक्षाची पडली आहे.

सक्षम विरोधी पक्ष असेल तरच मोदींना रोखता येणे शक्य आहे
मोदी नाहीत तर दुसरे कोण ही परिस्थिती भयानक आहे
नुसते नागरिकांनी किंवा नेत्यांनी टीका करून काहीही साध्य होत नाही

सोनिया आणि राहूल गांधींचे पाय हेच जर काँग्रेसपक्षातील ग्लास सिलिंग असेल तर तरूण, धडाडीचे आणि खरेखुरे नेते, कार्यकर्ते निराश होणारच. राजकारण ही देखिल एक करीयर आहे आणि इतर क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रात काम करत असलेल्या तरुण, महत्त्वाकांक्षी नेत्यांना इतकी वर्षं निष्ठेनं काम केल्यावरही जर पुढे जाता येणार नसेल तर त्यांनी यापुढे पक्षावर निष्ठा कशी ठेवायची?

राहूलला स्वतःला पूर्णवेळ राजकारणात रस नाही हे उघड आहे. पण तरीही अजूनही त्यालाच काँग्रेस पक्षाचा सर्वेसर्वा करण्याचा सोनियाचा हट्ट काही संपत नाही. अशा दुराग्रहामुळे पूर्ण पक्षाची वाताहात होत आहे. अजूनही काँग्रेसमधील तरूण नेते एकत्र येऊन जर नव्या दमाच्या काँग्रेसकरता प्रयत्न करतील तर पक्ष वाचू शकतो आणि प्रगतीही करू शकतो. एका सशक्त देशव्यापी विरोधी पक्षाची गरज आहे जी सध्याच्या परिस्थितीत केवळ काँग्रेस पक्षच देऊ शकतो.>> मामी १००% अनुमोदन

मोदींनी असं काय केलंय की ते हवेत?
ते नकोत असं म्हणायला हजार कारणं आहेत. - आर्थिक, सामाजिक, विदेशनीती सगळीकडे बिगेस्ट फेल्युअर एव्हर. पण हिंदुत्ववादाचा चष्मा आणि प्रचाराचा धुरळा यापुढे लोकांना काही दिसेनासं झालंय. किंवा पाहायचं नाहीए.

एकटा राहुलच मोदी -भाजप -संघाच्या फॅसिस्ट अजेंड्याबद्दल बोलतोय.

Pages