चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता चीन हेच विधान उचलून "बघा काही झालेच नाही" म्हणते आहे.ऑफिशियल मंचावर केलेल्या विधानाचा असा उपयोग होऊ शकतो हे आपल्या दूरदर्शी, धूर्त, राजकारणात मुरलेल्या इत्यादी इत्यादी असणाऱ्या नरेंद्रजींना उमगले नसेल का?///

चीन तर करोनाबद्दल पण 'बघा काही झालेच नाही' म्हणतोय! चीनची जगातली पत आणि विश्वासार्हता आता याक्षणी झिरोच नाही तर मायनस मध्ये आहे. चीन कधी कोणत्या बाबतीत काही खरं बोलला तरी कोणी आता विश्वास ठेवत नाही.
ऑफ़कोर्स काही जिनपिंगप्रेमी लोक आहेत ज्यांना अजुनही असं वाटतं की जिंगपिंग गंगा की तरह पवित्र है आणि त्याच्या कोणत्याही स्टेटमेंटला जगात सत्य म्हणून घेतले जाईल.

बाई, आंतरराष्ट्रीय न्यायालये वगैरे प्रकार विश्वास, फीलिंग वगैरे गोष्टींवर चालत नाही,
जर देशाचा पंतप्रधान, ऑल पार्टी मीट मध्ये जे विधान करतो ते देशाची ऑफिशियल भूमिका म्हणून समजले जाते.

तरीही काही धुतल्या मेंदूचे भक्त लोक आहेत ज्यांना " हो ते स्टेटमेंट चुकीचे होते, त्याने भारताच्या भुमीकेला बाधा पोहोचते" हे कबुल करण्या ऐवजी तो मास्टरस्ट्रोक कसा होता हे समजावून सांगण्यात धन्यता वाटते

जवान प्राणपणाने संरक्षण करतच आहेत, काही चीन च्या कच्छपी लागलेले देशद्रोही लोक आहेत जे अधिकृत मंचावरून कोणी आत घुसलेच नाही असे म्हणतात. >>>>>
अगदी खर !
देशातील लोकांची वक्तव्य चुकली असतील पण त्या साठी चीन ची भलामन करण्यात काय हशील ?
अशा आहे ग्लोबल टाइम्स , चीन च्या परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ता , आणि भारतातील चिनी राजदूत ला मराठी येत नसेल , नाही तर लष्कर आणि मोदी ला टार्गेट करणारे बघून त्यांना हर्ष वायू झाला असता .

आता मात्र तुम्हाला मराठी येतंय की नाही या बद्दल शंका येतेय,
चीन ची भलामण कुठे दिसली तुम्हाला?

देशातील लोकांची वक्तव्य चुकली असतील >>>>>

धन्यवाद,
आता एकदा नीट म्हणा पाहू,
मोदींनी ऑल पार्टी मीट मध्ये चुकीची माहिती दिली, त्यांच्या या विधानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला फटका बसू शकतो.

मग पुढे बोलू आपण

आज तर काँग्रेस च्या भावी पंतप्रधान नी लडाख मधील काही लोकांचे व्हिडिओ ट्विटर वर प्रसारित करून चीन ने आपली भूमी बळकावली आहे याचे पुरावे दिले !
तेच रिट्विट चिदंबरम आणि आझाद यांनी केले ,पण इथून पुढे रिट्विट करताना दहा वेळा विचार करतील .
कारण ते लोक लडाख मधील काँग्रेसचेच कार्यकर्ते असल्याचे सिद्ध झाले आणि भावी पंतप्रधान ची पुन्हा एकदा नामुष्की झाली .

चीन नी जी सीमेवर आगळीक केली(तसा तो नेहमीच करत असतो) त्या बध्दल भारत तीव्र नाराज आहे असा संदेश चीन ला ऍप बंदी करून दिला गेला आणि तो त्यांना व्यवस्थित समजला पण असेल
नाराजी म्हणून भारताने युद्ध पुकारले नाही किंवा तसा इशारा पण दिला नाही शक्य होईल तेवढं संयम पाळला आहे
मध्ये पाकिस्तानी अतिरेक्याला जागतिक दहशत वादी घोषित होवू नये म्हणून त्यांनी नकार अधिकार वापरला .
तरी भारताने काहीच प्रत्युत्तर देवू नये असं वाटत आहे का?

आता मात्र तुम्हाला मराठी येतंय की नाही या बद्दल शंका येतेय,
चीन ची भलामण कुठे दिसली तुम्हाला?>>>
तुम्ही चीन चे गुण गात नाही , म्हणून ते
*तुम्हाला उद्देशून नाही*

चीनने केलेल्या घुसखोरीबद्दल आता हेच होते आहे. ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की, चीनने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली आहे. गलवान खोरे हा भारताचा भाग आहे. इथेच चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये हाणामारी झाली, ज्यात आपले २० जवान मारले गेले. जोवर हे वीस जवान मारले गेले नव्हते, तोवर भारत सरकारने चीनकडून झालेल्या घुसखोरीबद्दल ब्र उच्चारला नव्हता. जवान मारले गेल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत वादग्रस्त विधान केले की, कोणी आपल्या देशात घुसखोरी केलीच नाही. नंतर मोदींचे ते वक्तव्य पीएमओच्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवरून काढून टाकण्याची नामुष्की आली. इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अशी वेळ आपल्यावर येणे ही भयंकर लाजिरवाणी आणि संतापजनक गोष्ट आहे. आणि ही वेळ आपल्यावर का आली? स्ट्रॉंग लीडर ही इमेज टिकवण्याच्या अट्टाहासापोटी!
.......
.....

खरेतर, चीनच्या घुसखोरीवर मोदी सरकार असे म्हणू शकले असते की, आम्ही मैत्रीचे प्रयत्न केले पण चीनला त्याचे गांभीर्य समजले नाही आणि त्यांनी आताची घुसखोरी केली आहे. हे वस्तुस्थितीच्या अधिक जवळ जाणारे ठरलं असते. पण, इथे (आणि नेहमीच!) वरचढ ठरली ती इमेजची काळजी!

एकीकडे घुसखोरी झाली आहे, असे मान्य केले की स्ट्रॉंग लीडरशिप ह्या इमेजला धक्का लागतो. दुसरीकडे चीनबद्दल जनमताचा दबाव वाढतो आणि तिसरीकडे आपण हतबल आहोत हेही उघडे पडते. हे सगळे होऊ न देण्यासाठी म्हणून ‘फॅक्ट’पासून समाजाला, देशाला दूर नेणे सुरू आहे. मीडिया, काही राजकीय पक्ष आणि भाजपने सांभाळलेले बेसुमार ट्रोल्स यांच्या माध्यमातून इमेज काही काळ सांभाळली जाईलही पण त्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. उलट ती चिघळेल. पण, हे भान ना सरकारला आहे ना त्यांच्या समर्थकांना!

*अमेय तिरोडकर यांच्या लेखा मधून

लडाख मधील नागरिक काँग्रेस कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांनी सांगितलेली माहिती खोटी ठरते का?

तुम्ही नक्की ठरवा बाबा काय ते,
आधी म्हणायचे आक्रमण झाले, मग कोणी लडाखी पण तेच म्हंटला की म्हणायचे तो काँग्रेसी आहे, त्याचा व्हिडीओ ट्विट केल्याने नाचक्की होतेय,

या तो घोडा बोलो या चतुर बोलो

अंतर राष्ट्रीय न्यायालय ?म्हणजे नेहरूंनी काश्मीर प्रश्न जिकडे नेऊन भिजत घालून त्याला मोड आणले ते का?
त्याचं कामकाज कसं चालतं, चीन ची तिथली हिस्ट्री मान्य करून घ्याना.

मोदी चे हे वक्तव्य मीडिया मध्ये आले होते की कोणी म्हणजे चीन नी आपल्या हद्दीत अतिक्रमण केले नाही.
मग सैनिक कसे मेले?
59 ऍप का बंद केले?
काही कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्या च्या बातम्या का पसरवल्या( ह्याला बातम्या च म्हणता येईल अधिकृत पने एकतर्फी असे कॉन्ट्रॅक्ट रद्द होते की नाही हे माहीत नाही)
हे सर्व उगाचच मज्जा म्हणू केले का

चिनची भलामण कोणी केली आहे? एकही पोस्ट दिसेना. एक मोदी सोडता कोणीच केलेली दिसत नाही.
मग त्यांना बोलाताय का? नाव नसेल घ्यायचं तर आम्ही समजुन घेऊ.

लडाख मधील नागरिक काँग्रेस कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांनी सांगितलेली माहिती खोटी ठरते का?
चला मान्य करू , त्यांनी दिलेली माहिती खरी आहे .
मग एखाद्या फाऊंडेशन ला गुपचूप कोट्यावधींचा निधी घेवून ती जमीन चीन ला द्यायचा सोपा मार्ग सोडून मोदी चीन बद्दल शाब्दिक खेळ का खेळत बसलेत ते कळेनासे झाले आहे .
चिनी राजदूत बरोबर रात्रीच्या भेटीगाठी , त्यांच्या बरोबर मद्यपान करणे पेक्षा झोपाळ्यावर झुलने निंदनीय च आहे !

मी काय म्हणतो , आता रशिया मधील Vladivostok शहरावर चीन ने दावा सांगितला आहे .
तर श्रीमान राहुल गांधी नी त्यांच्या कार्यकर्त्या बरोबर चर्चा करून तो व्हिडिओ सरळ पुतीन ला ट्याग करावा .
त्या शिवाय पुतीन चीन चा दावा मान्य करणारच नाही !!!!!!

Typo

बीबी पुन्हा वाचून काढला ! चीनचे समर्थन / भलामण /सारवासारव वगैरे दूरान्वयानेही असलेली एकही पोस्ट नाही.
चीनने आपल्या भागात घुसखोरी केली हे त्या देशाचे नाव घेऊन का सांगितले नाही ? या साध्या प्रश्नाला
-राहुल गांधी.
-राजीव गांधी फाउंडेशन.
-नेहेरू चीन युनो.
-रॉबर्ट वद्रा.
-सोनिया गांधी.

असे फाटे !

भारता सारख्या खंडप्राय देशात जिथे टोकाची विविधता आहे त्या देशात अनेक मत व्यक्त होणार.
सर्व देश एकसारखा विचार करू शकणार नाही.
देशाच्या एका टोकावर असलेला मेघालय मध्ये कुत्री,साप आहारात असतात तर दुसऱ्या टोकावर त्या बद्दल किळस.
एवढी विविधता आहे.

@विकू,
अगदी बरोबर,
त्या लिस्ट मध्ये करोना चे नाव घेऊन गळे काढणे राहिलेच.

तब्बल 200 प्रतिसाद झाले तरी भक्त मोदींजींचे विधान चूक होते हे मान्य करायला तयार नाहीत.

>>चीनने आपल्या भागात घुसखोरी केली हे त्या देशाचे नाव घेऊन का सांगितले नाही ?<<
खरंच हा मिल्यन डॉलरचा प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर मोदि का देत नाहि या मागचं रॅशनाल सांगण्याची कुवत कुठल्याहि अ‍ॅक्टिव माबोकरांकडे आहे याची शक्यता शून्य. तेंव्हा यापुढे मेलेल्या घोड्याला बडवण्यात अर्थ नाहि, नॅशनल सिक्युरिटीचा सवाल आहे असं म्हणुन सोडुन ध्या...

तिकडे युके ने हॉग्कॉग नागरिकांना बीएनओ (ब्रिटिश नॅशनल ओवर्सीज, आपल्या पिआयओ सारखं) बहाल केलं. अर्थात यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. करोना, भारतातील अतिक्रमण, आंतरराष्ट्रिय दबाव इत्यादिंच्या ओझ्याने ऑलरेडि दबलेला चीनचा उंट आता ट्रंपच्या शेवटच्या स्ट्रॉने कधी खाली बसतो याची वाट पाहुया. इलेक्शन इयर आहे, ट्रंप इज होल्डिंग ऑन टु दॅट स्ट्रॉ, अ‍ॅड बिलिव मी हि वुडंट हेझिटेट टु ड्रॉप इट अ‍ॅट दि राइट मोमेंट... Wink

यांचे एक तिसरेच,
जिकडे तिकडे ट्रम्प चा प्रचार केल्याशिवाय yqnna चैन पडत नाही. Happy

पण ट्रम्पजी कसे नाव घेऊन आरोप करतात,
नरेंद्रजी नुसतेच इकडून बोलणे झाले, तिकडून बोलणे झाले करतात, आणि नाव घ्यायची वेळ आली की हात भर जीभ बाहेर काढून लाजून गप्प बसतात,

बरं चायना मातब्बर आहे म्हणून असे करतात म्हणावे, तर पाकिस्तान बद्दल पण तेच,

मोदींनी लेह इथे इस्पितळात जखमी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांना भाषण दिलं असं अधिकृत बातम्यांत म्हटलंय.

भेटीची छायाचित्रे, चलचित्रे पाहिली तर दिसतं की बहुतेक जवान मांडी घालून ताठ बसलेत. दोघांना पायाला बँडेज असून पाय सरळ ठेवावा लागलाय. आडवा पडलेला जवान दिसला नाही. बेड्स् जवळ कसलीही वैद्यकीय उपकरणे नाहीत. बिछान्यावरच्या चादरी अगदी आताच घातल्यासारख्या. एका भिंतीवर प्रोजेक्टर आणि एकीवर व्हाइट बोर्ड दिसतोय.

या सगळ्या प्रकारामुळे जवानांचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असेल.

>चीनने आपल्या भागात घुसखोरी केली हे त्या देशाचे नाव घेऊन का सांगितले नाही ?<<
खरंच हा मिल्यन डॉलरचा प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर मोदि का देत नाहि या मागचं रॅशनाल सांगण्याची कुवत कुठल्याहि अ‍ॅक्टिव माबोकरांकडे आहे याची शक्यता शून्य.>>>>>

मुद्दा समजून घेण्यात कमी पडताय राज,

अशी कोणती मजबुरी होती की महामहिम नरेंद्रजींना सर्वपक्षीय बैठकीत देशवासियांना खोटी माहिती द्यावीशी वाटली,
हा मुद्दा आहे

भरत, ऑल you know ते मिलिटरी हॉस्पिटल मध्ये तयार केलेलं मेक शिफ्ट क्वारान्टीन सेंटर असेल.

अर्थात आशा सेंटर मध्ये जाताना PPE किट घालून चमकूगिरी करायचा चान्स कोणी सोडणार नाही हे सुद्धा खरे

चीन तर करोनाबद्दल पण 'बघा काही झालेच नाही' म्हणतोय!
^^^
हे खरंच घडलंय की स्ट्रॉमॅन सम्राज्ञीची अजून एक थाप?
चिखलातून खेकडे पकडावे तसं यांच्या प्रतिसादातून खऱ्या गोष्टी शोधून काढाव्या लागतात Lol

कोरोना हा 2013 पासून या जगात आहे. तो फक्त आता काही महिन्यांपूर्वी लोकांना व्हायला सुरुवात झाली. आता तो चीनमध्ये सुरू झाला की अजून कोणत्या देशात यावर संशोधन होतंय.

रागा ने काही दिवसापूर्वी नर्सेस बरोबर संवाद केल्याची व्हिडिओ क्लिप काँग्रेस ने प्रसारित केली होती , त्यातील सर्व जण काँग्रेस चे कार्यकर्ते असल्याचे उघडकीस आले .
आता लडाख मधील अक्रमण च्या साक्षी साठी पुन्हा काँग्रेस कार्यकर्तेच वापरले .
युवराज सतत ठुक्रत वाडीच्या लोकांना का बदनाम करत सुटला आहे ते कळत नाही !!!

अंतर्गत वादाचा फायदा दुश्मन देशाला होवू नये याची समज ममता , मायावती सारख्या कडवट विरोधकांना आहे .म्हणून त्यांनी चीन ला फायदा होईल असे एक ही विधान आज पर्यंत केले नाही .
शिवाय भाजप चे कट्टर विरोधक काकांनी सुध्दा सध्या देशहित महत्वाचे सांगुन युवराज चे कान टोचण्याचा प्रयत्न केला पण grasping पावर् कमी असलेल्या ला समजलेच नाही आणि रोज एक नवीन आरोप चालूच आहे .

युवराज एकटे पडल्याची जाणीव झाली की महाराष्ट्रातील काँग्रेस च्या नेत्यांनी पण झिलगी वाजवायला सुर वात केली होती .

पण या वेळी त्यांचे टार्गेट १०० % चुकले आहे !!
ज्या काकांनी महराष्ट्रातील काँग्रेस ला स्मशान दाखवले त्या काका वर हल्ला करण्याची चूक केली महराष्ट्रातील नेत्यांनी केली .

सत्ताधारी पक्षा ला कटघाऱ्यात उभे करण्याची एक विशिष्ट वेळ असते , त्या पक्षाच्या चुकांचा हिशोब मागायचा हक्क काँग्रेस चा आहे पण प्रश्न केंव्हा आणि का विचारायचे हे आणीबाणी ची सक्ती करणाऱ्या काँग्रेस ला आणि त्यांच्या चेल्याना कसे समजणार ?

Pages