चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंतर्गत वादाचा फायदा दुश्मन देशाला होवू नये याची समज ममता , मायावती सारख्या कडवट विरोधकांना आहे .म्हणून त्यांनी चीन ला फायदा होईल असे एक ही विधान आज पर्यंत केले नाही .>>>>>>

दुर्दैवाने तितकीशी समज महामहिम नरेंद्रजी मोदी दाखवू शकले नाहीत, आणि सर्वपक्षीय बैठकीत " ना कोई आया, ना कोई गया" असे विधान करून बसले,
आता चीन याचा व्यवस्थित फायदा उचलेल,

राहुल गांधी तर साधे MP आहेत, विरोधी पक्ष नेते पण नाहीत, पन पंतप्रधान पदावरील व्यक्तीने असा बेजबाबदार पणा दाखवावा हे खास आहे.

संरक्षण मंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी भारत चीन सीमेवरील जवानाबरोबर केलेल्या गुजगोष्टींचा हा फोटो. दिसतोय कुठला बडेजाव ? आहे काही अहंकार, आत्मप्रौढी व अहंमन्य माहोल. अगदी घरगुती वातावरण दिसत होते.आपल्या घरातला कोणी कर्ता माणूस आपल्याला भेटायला आला आहे असे भाव सैनिकांचा चेह-यावर दिसत आहेत.

या घटनेची आठवण द्यायचे कारण म्हणजे आज सोशल मिडीयावर प्रधान सेवकाने लेह येथे सैन्य तळाला दिलेल्या भेटीचा प्रचंड गवगवा. भेट शाही स्वरूपाची होती यात शंकाच नाही.पण रणभूमी तेथुन 250 कि.मी.दूर होती. असा काही हलकल्लोळ उडाला होता की स्वातंत्र्यानंतर सैनिक तळाला भेट देणारी ही पहिलीच व्यक्ती.अध्ये मध्ये कोणी नाही. बरं या प्रसंगाचा जो उदो उदो चालला होता त्या सर्व स्तुती सुमनांची एक सारखीच भाषा.हे बहुदा ठरवून रेशीमबागेच्या जागेवर झाले असावे.

https://www.facebook.com/100024685570583/posts/704481767051336/?sfnsn=wi...

**

विरोधी पक्ष प्रश्न विचारणार च त्यांना सत्ताधारी लोकांनी उत्तर देणे कर्तव्य आहे.
विरोधी पक्षांचे प्रश्न अंनुतरीत ठेवले की गैरसमज होतात.
सरकारी प्रवक्त्या चे हेच काम आहे देशाला माहिती देणे.

ब्लॅक कॅट
तुमची नक्की अडचण काय आहे .
मोदी लोकप्रिय होत आहेत ही तर अडचण नाही ना.
कोणाच्या तरी fb chya wall वरची पोस्ट इथे चिकट वत आहात.
कोण आहे fb wala.
त्याच्या पोस्ट ला किंमत देण्या एवढं विश्वासू आहे का

चला,
आता कंटाळा येऊ लागलाय,
एक प्रश्न विचारला तर एक ताई करोना करोना करून रोना गातायत,
दुसऱ्या बाई, चायनाच्या अर्थकारणावर बोलतायत,
2 दादा राहुल, नेहरू,पासून वाट्टेल त्या विषयावर बोलतायत,

"मोदींनी असे बोलायला नको होते त्यांची चूक झाली" इतके साधे विधान मायबोली सारख्या इन्फॉर्मल फोरम वर करायला भक्तांना अवघड वाटते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकार हे मूर्ख विधान डिफेन्ड करू शकेल याची त्यांना मनोमन खात्री वाटतेय.

एकंदरीत काळ कठीण आहे

भारतात शिरून हल्ला केला त्यावर जगात एक बातमी वगळता काही प्रतिक्रिया नाही.
हाँगकाँग प्रश्नावर युके, युएस, कॅनडा सगळ्यांच्या प्रतिक्रिया पहा, आणि आपल्या डिप्लोमसी ची किंमत ओळखा.

म्हणजे ' भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होत नाही ' हा मूळ आजार आहे का ?

पोस्ट फेसबुकची असली तरी फ़ोटो खरा आहे,

कोई आया नही , कोई गया नाही
फिर ये उधर कायकू गया?

तुमच्याकडे फक्त मोदीचे फ़ोटो आहेत, आमच्याकडे 47 पासून असे ढीगभर फ़ोटो आहेत

नेहरुही आणि मोदीजी आमचेच पंत प्रधान आहेत

मी आज हेडफोन खराब झाले म्हणून नवीन घ्यायला बाहेर पडलो.तर एक लहान मुलगा अल्फाबेट पुस्तकात बघून p फॉर पांडा बोलत होता तर मी त्याला खूप ओरडलो. इथून पुढे p फॉर पॅरट बोलायचं सांगितलं. थोडा पुढे गेल्यावर काही मुलं टीव्हीवर जॅकी चॅनचा पिक्चर बघत होते त्यांना पण दम देऊन जबरदस्ती मिथुनचा पिक्चर लावायला लावला. नन्तर पुढे गेलो तर काही मुलं चायनीज गाडी कधी सुरू होणार याची वाट बघत होते त्यांना पण वडापाव खायला लावला. आजूबाजूला कोणी चायनीज बघत, खात, ऐकत, वापरत असेल तर त्याला दम देणे आपले कर्तव्य आहे. नन्तर मेड इन चायना हेडफोन घेतले आणि घरी आलो.

पंतप्रधानांनी लेह हॉस्पिटल मधील जवानांची केलेली विचारपूस वरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस समर्थकां च्या शांती साठी शेवटी आर्मी तर्फे स्पष्टीकरण जाहीर केले गेले .
https://twitter.com/vikassh_14/status/1279393375075160064?s=19

>>यांचे एक तिसरेच,<<
फक्त दै. संध्यानंद वाचता काय? जमल्यास हाँग्काँग, तैवानच्या बाबतीत अमेरिकेची भूमिका काय आहे, अमेरिकेचं सातवं आरमार सध्या काय करतंय याची माहिती काढा. वावे, झिटिइ वर अमेरिकेने काय कारवाई केली इ. ची हि माहिती काढा. त्यानंतर काहि सेंसिबल लिहिलंत तर दखल घेइन...

आणि ती गेल्या तीन दिवसांपासुन चाललेली पिर्पिर आता बंद करा. सॅटलाइट इमेजेस पब्लिक डोमेन मध्ये असुनहि मोदि जाहिरपणे सांगतात यामागे काहितरी ठोस कारण असणार हे मान्य करुन पुढे चालायला काय जातंय? अंतर्गत कुरघोड्या करण्याची हि वेळ आहे काय? थांबा थोडे दिवस, वातावरण निवळल्यावर रागांना पुरवा अ‍ॅमो सरकारला लोकसभेत धारेवर धरायला. बघुया ते शाइन होतात कि फजिती करुन घेतात ते...

रागा ने पुन्हा एकदा निराशा केलीये काँग्रेस ची
अनेकवेळा हे स्पष्ट झालं आहे की दे दणादण आरोप करून भाजप चे काहीही बिघडत नाही उलट त्यांना फायदाच होतो निवडणुकीत
रागा पुन्हा तेच तेच करतोय
अजून काही वर्षे तरी परिपक्व होईल असे काही वाटत नाही हा माणूस
आणि मोदी ना पर्याय नाही हे चित्र भयानक आहे

तुम्ही सगळ्यांनी राहुलजी गांधीजी यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे. खरं सांगायचं तर राहुलजी गांधीजी हे दीर्घायुषी आहेत. ते जवळपास शातशे आठशे वर्षे जगतील असा माझा अंदाज आहे. त्यांचं वयोमान पुढीलप्रमाणे विभागलं गेलं आहे.
1-100- बाल्यावस्था
101-200 कुमारावस्था
201-700 प्रौढावस्था
700 पासून पुढे संन्यास
तर अजून दीडशे वर्षे तरी त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा करणे चुकीचे आहे. हे त्यांचं खेळण्या बागडण्याचं वय आहे. त्यांच्यावर पंतप्रधान पदाचे ओझं टाकून निरागस बालपण हिरावून घेऊ नका. 2200 सालानंतर पुढचे पाचशे सहाशे वर्ष त्यांना कोणीच पंतप्रधान पदापासून हटवू शकत नाही.

सॅटलाइट इमेजेस पब्लिक डोमेन मध्ये असुनहि मोदि जाहिरपणे सांगतात >>>>
यातला अंतर्विरोध लक्षात येत नाहीये का तुमच्या?

आणि जर असे सांगणे हा रणनीती चा भाग आहे तर PMO घाई घाई ने ते स्टेटमेंट सेन्सॉर का करते?

राज तुम्ही हास्यास्पद होत चालला आहात

आशु,
>>>>दणादण आरोप करून भाजप चे काहीही बिघडत नाही उलट त्यांना फायदाच होतो निवडणुकीत>>>> माबो वरची शिते पाहता पूर्ण देशातील भात कसा आहे याची कल्पना येऊ शकते,
त्यांच्या समोर फक्त आरोप काय, ट्रक भर पुरावे जरी ठेवले तरी, " मोदी असे वागले त्याला काहीतरी कारण असेल" म्हणून पुढे जातात लोक.

2200 सालानंतर पुढचे पाचशे सहाशे वर्ष त्यांना कोणीच पंतप्रधान पदापासून हटवू शकत नाही. >>>>>>
Happy
अजुन एक फॉर्म्युला आहे ना !
वय ४४ - काँग्रेस खासदार ४४
वय ५० - काँग्रेस खासदार ५०
या पद्धतीने २७२ खासदार होई पर्यंत वाट पाहायला हरकत नाही .

सॅटलाइट इमेजेस पब्लिक डोमेन मध्ये असुनहि मोदि जाहिरपणे सांगतात यामागे काहितरी ठोस कारण असणार हे मान्य करुन पुढे चालायला काय जातंय? अंतर्गत कुरघोड्या करण्याची हि वेळ आहे काय?

"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म" या उक्तीची आठवण येते.

मुंबईत ताज हॉटेल वर हल्ला झाला तेव्हा कारवाई पूर्ण संपायच्या आधीच मोदींनी मुंबईत येऊन पत्रकार परिषद घेऊन "मी यंव केले असते" मी त्यंव केले असते" असे सांगितले. अंतर्गत कुरघोड्या करण्याची ती वेळ होती काय? अशा विधानांमुळे तयार केलेल्या आपल्या लार्जर दॅन लाईफ प्रतिमेमुळे भक्तांच्याही अपेक्षा उगीचच उंचावून ठेवल्या तर रिअ‍ॅलिटी चेक आल्यावर असे होणारच. बरं चीन म्हणजे पाकिस्तान नाही की सर्जिकल स्टाईक व तीनशे अतिरेकी मेल्याची बातमी पेरून भ्क्तांना खुष करता येइल.

इटालिअय मरीन्स ना आता नाईलाजाने परत पाठवावे लागेल. इटलिअन अ‍ॅप्स वर बंदी आणणार का?

>>"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म"<<
विकुशेठ, उक्तीचा रोख/नेम चूकलाय...

सध्या भारत-चीन यांच्यातल्या तणावामुळे अंतर्गत कुरघोड्या करण्याची हि वेळ नाहि, हे इथले माझे शब्द, मोदिंचे नाहित. आणि ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात "यंव, त्यंव" ची भाषा मोदिंनी केलेली, मी नाहि. कुछ समझ मे आया?.. Wink

Please read the article Modi's Trap by Muhammad Siddiqui. It is available on dawn.com. It explains Modiji's strategy.

मला माझे अंतर्मन नेहमी सांगते राहुल गांधी ना काँग्रेस चे बाकी उपत्याप नक्की माहित नसतील.
विविध अंतर्गत संस्था त्या करतात ते दाखवायचे काम आणि खरे काम हे पण त्यांना माहित नसेल.
विविध विचारवंत जे काँग्रेस नी च पाळले आहेत त्या विषयी पण त्यांना माहीत नसेल.
हे सर्व काम करणारे समाजात फूट पडणारे हे वेगळीच मुरलेली खोड आहेत.
राहुल गांधी वर कडक शब्दात टीका मोदी साहेब पण करत नाहीत राहुल जी चे निरागस पण त्यांना सुद्धा माहीत आहे.

चला, अश्या रीतीने नरेंद्रजींच्या चुका दडवण्यासाठी चर्चा राहुल गांधींवर वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत Happy

>>>>राहुल गांधी वर कडक शब्दात टीका मोदी साहेब पण करत नाहीत राहुल जी चे निरागस पण त्यांना सुद्धा माहीत आहे.>>>>
ते राहुल व सोनिया गांधींवर केवळ नीच आणि हलकट टीका करतात, जर्सी गाय , काँग्रेस ची विधवा वगैरे

Pages