चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गलवान खो र्‍यात भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले. त्यांना कोणी मारले हे अख्ख्या जगाला माहीत आहे. पण त्यांचे नाव न घेऊन त्यांना कोण पाठीशी घालत आहे हे सर्वांनी पाहिले आहे.
भारताच्या इतिहासात पाकिस्तान आणि चीनला किंवा त्यांच्या प्रमुखांना सर्वाधिक भेटलेले पंतप्रधान कोण आहेत, हेही सर्वांनी पाहिले आहेत. पंतप्रधान होण्या च्या आधीपासून ज्यांचा चीनकडे ओढा आहे ते कोण हे सर्वांना माहीत आहे. भारतीय एकात्मतेचे प्रतीक असा एक पुतळा बनवला गेला . तोही चीनच्या सहकार्याने यापेक्षा मोठी आयर्नी आणखी कोणती असु शकेल?

वीनी अ‍ॅप्स वर नाव न घालता बंदी आणणार्‍या सरकारचे त्यातल्याच मुख्य अ‍ॅपवर अकाउंट गेल्या एक दीड महिन्यातच आले आहे. इतके च नव्हे तर त्या पदावर असलेल्या व्यक्तीचे चीनी लोकांसा ठी असलेल्या सोशल मीडिया अकाउंटवर खाते होते. ते त्यांनी गेल्या दोन दिवसांत बंद केले गेले.

गलवान व्हॅलीत चीनी सैनिक घुसल्याच्या , तिथे बांधकाम करीत असल्याच्या बातम्या कधीपासून येत आहेत. त्याकडे डोळेझाक करून, इतकेच नव्हे तर असे काही झालेच नाही असे सांगत चीनी कंपनीला मेट्रो रेल्वेचे कंत्राट कोणी दिले?

चीनी सैन्य भारतात कधी नव्हे इतके आत शिरले असताना नेमक्या त्याच वेळी चीनी राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर कोण बसले होते?

अशा व्यक्तीला चीन धार्जिणा का म्हणू नये?

जर कोण्या भारतीयाला हे विशेषण लावणे शिष्टसंमत ठरते तर पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीला ते लावल्याने त्याचा अपमान कसा होतो?

Purn जगाला कारोणा चीन नी भेट दिला आहे .
किट च काय सर्व उपचार चा खर्च चीन कडून वसूल केला पाहिजे.
फक्त सिद्ध होणे बाकी आहे corona virus nirman kela gela आहे.
मग चीन ची जग मिळून कशी वाट लावेल ते माहीत पडेल.

Corona virus ha chin madhye निर्माण केला गेला आणि प्रगत राष्ट्रात पसरवला गेला अशी शंका संबंधित राष्ट्रांना आहे.
फक्त ठोस पुरावे येणे बाकी आहे.

जो देश कामगार ना वेठबिगारी पद्धती नी राबवून उत्पादन कॉस्ट कमी करतो.
आणि सरकारी हस्तक्षेप करून स्वस्तात त्याच्या वस्तू जगात विकतो आणि बाकी देशातील उद्योग धंद्यांना नुकसान पोचवतो तो देश बाकी देशांच्या अर्थव्यवस्था धोक्यात याव्यात म्हणून व्हायरस पण निर्माण करू शकतो.

कृपया कोणीही अप प्रचार करू नका,

"भारताच्या सीमे मध्ये कोणीही घुसले नाही, आणि कोणीही भारताचा भूप्रदेश बळकावला नाही" असे श्री नरेंद्रजी मोदी यांनी संसदेत ठासून सांगितले असताना, सतत भारतावर आक्रमण झालंय असे म्हणणारे लोक देशद्रोहीच म्हणायला पाहिजेत.

पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आज लडाख ला भेट देत आहेत,
काही कारण नसताना युद्धासाठी आसुसलेल्या भारतीय सैनिकांचे मनोधैर्य चांगलेच वाढेल.

जानेवारी पासून रुग्ण आढळल्यास सुरवात झाल्यावर मार्च पर्यंत हातावर हात ठेऊन बसून राहणारा दूरदर्शी नेता आपल्याला मिळाला आहे.
2 महिने लॉक डाऊन लावून कोरोना फ्री देश चे गाढव आणि आर्थिक प्रगती चे ब्रह्मचर्य दोन्ही गमावून, " आम्ही कदाचित चूक केली असेल पण राहुल गांधी ने काय केले?" असे विचारणारे बाणेदार गृहमंत्री मिळाले आहेत या बद्दल आपण देशाच्या बहुसंख्य जनतेचे ऋणी राहिले पाहिजे.

कोरोना व्हायरस निर्माण केल्या बद्दल चीन ला आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचता येणार असेल तर, काहीही उपाय योजना न करता 130 करोड जनतेला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या सरकारवर सुद्धा खटला भराता यायला हवा

आंतरराष्ट्रीय कोर्टावरून इटालियन मरिन्सची आठवण झाली.
त्यांच्यावर भारतात खटला चालवायची गरज नाही, असं पंप्र सोनिया गांधींनी ठरवलं.
मागे संबित पात्रा पंतप्रधान होते तेव्हा इटलीच्या राजदूताला अडवलं होतं.

देशाच्या भावी पंतप्रधानांच्या भाषणातून पूर्वी केलेली काही महत्वपूर्ण विधाने. आत्मनिर्भर भारत योजनेत कदाचित याचा नक्की उपयोग होऊ शकेल
https://www.youtube.com/watch?v=4fXarBOzWPc

भारताने रशियाबरोबर अडीच बिलियन डॉलरचा लढाऊ विमाने खरेदीचा करार केलाय. राफेल तर येईलच या महिन्यात. महामहिम आज लेहला भेट द्यायला गेलेत. आता चीन आणि पाकिस्तानचा एकाचवेळी कोथळा बाहेर येणार. पण महत्वाचे म्हणजे आता देशातील चीनधार्जिणे आणि पाकधार्जिणे यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आलीये. खाल्ल्या मीठाला न जगणाऱ्या या सर्व नतद्रष्टांचा बंदोबस्त करण्यासाठी भरतखंड-नृपती मोदीजी, त्यांचे सेनापती शहाजी आणि गुप्तवार्ता प्रमुख डोवालजी नाझी गेस्टापोच्या धर्तीवर गुप्त पोलिसखाते तयार करणार आहेत. अमेरिकन प्रिज्म प्रोजेक्ट सारखा मुंबईसम्राट मुकेशजींच्या जिओच्या माध्यमातून एक सीक्रेट सर्व्हेलन्स प्रोजेक्ट तयार होत आहे. समाजमाध्यमांवर पाक-चीनची तळी उचलणाऱ्या गद्दारांचा माग या प्रोजेक्टमधून काढला जाईल. सीक्रेट पोलीस मग या सर्वांची विल्हेवाट लावणार. हळूहळू निवडणूक आयोग, वर्तमानपत्रे-मीडिया( रिपब्लिक वगैरे वगळता), न्यायालये ही देशाच्या संपत्तीला गळती लावणारे उद्योग बंद केले जातील. सर्वत्र दिल्लीच्या आदेशाने नियमबद्ध कारभार हाकला जाईल. पुढच्या दशकाच्या शेवटी मोदीजी आशियाखंड नृपती झालेले असतील. जय जिओ, जय मोदी !!

सर्वोच् न्यायालय वर अविश्वास दाखवणारी आणि त्यांच्या सचोटी विषयी जाहीर शंका घेणारी मोजकीच उदाहरणे भारतात आहेत.
ते शंका घेणारे कोण होते हे पण तपासून पाहा.

जिद्दु तुम्ही म्हणताय ती परिस्थिती येऊ शकते हो
आधीच मोदी विरोध म्हणजे देश विरोध असा स्टँड घेताना दिसत आहेत

करोना व्हायरस जगभर पसरण्यातील चीन आणि WHO च्या रोलबद्दल लिहिल्यावर ठराविक लोकांच्या ठराविक बचावात्मक प्रतिक्रिया शेपटीवर पाय दिल्यागत येतातच Happy
बाकी ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. एकीकडे गलवानवरून राजकीय मुद्दा बनवण्यासाठी चीनचं खोटंखोटं ट्रोलिंग करायचं आणि दुसरीकडे करोनाचा विषय काढला की एकदम नवीन भूमिकेचं बेअरिंग विसरून 'जिनपिंग तो गंगा की तरह पवित्र है जजसाब.' Biggrin

सनव, तुम्ही स्ट्रॉमन आर्ग्युमेंट शिवाय दुसरं काहीही करू शकत नाही. करोनावरून चीन, जिनपिंगचं समर्थन, बचाव केल्याची माझी एक तरी पोस्ट दाखवून द्या. करोनाबाबतही मोदी दीड महिने झोपले होते हेही तुम्ही लपवू शकत नाही.

उलट तुम्हीच गलवानवर मोदींच्या मौनाचा बचाव करण्यासाठी करोनाचा नसलेला विषय इथे आणताय.

रच्याकने - "भारताबाबत लिहायचं मी थांबवलंय " असं तुम्ही लिहिल्याला फार दिवस झाले नसतील अजून.

श्री नरेंद्रजी मोदी यांनी आज निमू येथे जवानांना भाषण दिले,
त्या भाषणात सुद्धा चायना चा उल्लेख नव्हता असे ऐकले,
खरे आहे काय हो ?
खरे असेल तर ही खरी कसरत,
सीमेवर जायचे, ज्यांचे 20 कलीग मारले गेलेत आशा समूहाचे समोर उभे राहून कोणी आगळीक केली याचे नाव सुद्धा न घेता भाषण देणे,
काबिले तारीफ...

* कमीतकमी "इशान्येची स्वारी " म्हणून तरी उल्लेख करायचा आपल्या झोपाळा पार्टनर चा

शी जिनपिंग ने गेल्या १५ दिवसात भारता चा उल्लेख केलाय का ?
चीन चा शुल्लक दर्जाचा प्रवक्ता आणि ग्लोबल टाइम्स आपल्याला ढोस देत आहे पण आपले सन्मान नीय राहुल गांधीजी आणि काही मध्यम
मोदींनी चीन चा उल्लेख करण्याची अपेक्षा ठेवत आहेत .

शी जिनपिंग ने गेल्या १५ दिवसात भारता चा उल्लेख केलाय का ?>>>>>
सायबा, आधी आपल्यावर आक्रमण झालंय की नाही हे निःसंदिग्धपणे सांगा पाहू,

भरत, मी तुमचं नाव घेतलेलं नसताना तुमच्याचबद्दल लिहिलंय असं तुम्हाला का वाटतंय याचा तुम्ही विचार करा.

करोना हा 'strawman' किंवा 'नसलेला विषय' असा तुम्ही उल्लेख केलात . I disagree. मला करोना हा आजचा सर्वात महत्वाचा व omnipresent विषय वाटतो. गलवान किंवा साऊथ चायना सी किंवा ऑस्ट्रेलिया सायबर हल्ला अशा चीनच्या aggression ला तोंड देण्याची जगाची क्षमता मुळात करोनामुळेच hamper झाली आहे.

आमचे एक परिचित करोनामुळे गेले. अजून एक जवळची व्यक्ती आज करोना पॉझिटिव्ह-इन हॉस्पिटल-श्वास घ्यायला त्रास या परिस्थितीत आहे. एक मायबोलीकर सदस्य महिला आपण गमावल्या आहेत. It's a big attack on humanity and role of both China and WHO is questionable. Anyone defending these two- I have nothing to say to that person.

. Anyone defending these two- I have nothing to say to that person.>>>>

फक्त कोरोना भारतात दाखल झाला असताना लाखभर लोक जमवून नमस्ते ट्रम्प करणाऱ्या माणसाचे मी गोडवे गाणार.
कुणाच्यातरी प्रसिद्धी च्या हव्यासापोटी अहमदाबादेत कोरोना चे थैमान चालू आहे, तो ह्युमॅनीती वरचा असॉल्ट वगैरे अजिबात नाही. त्याबद्दल मी एक शब्द बोलणार नाही.

ब्रावो.

चीन नीच हा व्हायरस प्रयोग शाळेत बनवला अशी शंका फक्त भारताला नाही तर अनेक देशांना आहे.
एकाद्याच्या घराला आग लावायची आणि आग त्याला आग विझली नाही म्हणून ज्याचे घर जळाले आहे त्यालाच दोष द्यायचा.
चांगली निती आहे ही

सायबा, आधी आपल्यावर आक्रमण झालंय की नाही हे निःसंदिग्धपणे सांगा पाहू ? >>>>

वेग वेगळे संदर्भ पाहता चीन ने अतिक्रमण केल्याची दाट शक्यता आहे , पण त्याबद्दल उपाय करण्यासाठी आपले लष्कर आणि सरकार समर्थ असताना त्यांच्या क्षमतेवर संशय घेण्या इतपत माझी औकात नाही .

ना कोई आया , ना कोई गया बद्दल मोदींनी केलेले वक्तव्य हे कदाचित चीन ने दिलेल्या धोक्या बद्दल संभाव्य कारवाई ला वेळ मिळावा म्हणून केले असेल असे वाटते .
जेवणाबद्दल व्हिडिओ टाकणारे जवान आपल्या आर्मी मध्ये असताना , गलवान मध्ये नक्की काय घडले सांगणारा एक ही जवान का पुढे नाही आला ?
कारण त्यांना समजतंय चीन दादागिरी करतोय म्हणून ते प्राणपणाने देशाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ना कोई आया , ना कोई गया बद्दल मोदींनी केलेले वक्तव्य हे कदाचित चीन ने दिलेल्या धोक्या बद्दल संभाव्य कारवाई ला वेळ मिळावा म्हणून केले असेल असे वाटते .>>>>>

आता चीन हेच विधान उचलून "बघा काही झालेच नाही" म्हणते आहे. ऑफिशियल मंचावर केलेल्या विधानाचा असा उपयोग होऊ शकतो हे आपल्या दूरदर्शी, धूर्त, राजकारणात मुरलेल्या इत्यादी इत्यादी असणाऱ्या नरेंद्रजींना उमगले नसेल का?

आणि जर हेतुपुरस्पर ते विधान केले होते तर PMO ने ऑफिशियल यु ट्यूब चॅनेल वरून तो भाग सेन्सर का केला?

जवान प्राणपणाने संरक्षण करतच आहेत, काही चीन च्या कच्छपी लागलेले देशद्रोही लोक आहेत जे अधिकृत मंचावरून कोणी आत घुसलेच नाही असे म्हणतात.

आग त्याला आग विझली नाही म्हणून ज्याचे घर जळाले आहे त्यालाच दोष द्यायचा.
चांगली निती आहे ही>>>>
उपमा चुकतेय, छतावर ठिणग्या दिसत असताना मालक फायर ब्रिगेड ला बोलवायचे सोडून गप्पा हाकत राहिला ( वर अजून पेट्रोल चे 2 कॅन आणून घरात ठेवले), तर त्याला दोष नाही द्यायचा तर कोणाला द्यायचा?

Pages