चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅन केलेल्या ऍप ची यादी,

1. TikTok
2. Shareit
3. Kwai
4. UC Browser
5. Baidu map
6. Shein
7. Clash of Kings
8. DU battery saver
9. Helo
10. Likee
11. YouCam makeup
12. Mi Community
13. CM Browers
14. Virus Cleaner
15. APUS Browser
16. ROMWE
17. Club Factory
18. Newsdog
19. Beutry Plus
20. WeChat
21. UC News
22. QQ Mail
23. Weibo
24. Xender
25. QQ Music
26. QQ Newsfeed
27. Bigo Live
28. SelfieCity
29. Mail Master
30. Parallel Space
31. Mi Video Call — Xiaomi
32. WeSync
33. ES File Explorer
34. Viva Video — QU Video Inc
35. Meitu
36. Vigo Video
37. New Video Status
38. DU Recorder
39. Vault- Hide
40. Cache Cleaner DU App studio
41. DU Cleaner
42. DU Browser
43. Hago Play With New Friends
44. Cam Scanner
45. Clean Master - Cheetah Mobile
46. Wonder Camera
47. Photo Wonder
48. QQ Player
49. We Meet
50. Sweet Selfie
51. Baidu Translate
52. Vmate
53. QQ International
54. QQ Security Center
55. QQ Launcher
56. U Video
57. V fly Status Video
58. Mobile Legends
59. DU Privacy

यातले tiktok, शेअर it, UC ब्राउसर सोडता कोणत्याही ऍप चे नाव ऐकले नाहीये.

आपल्या पैकी किती जण , यातली कोणती app वापरत होते?

मी यातील शेअर इट आणि कॅम स्कॅनर वापरायचो. शेर इट ला पर्याय काय आहे चांगला? एअर ड्रॉप फक्त ऍप्पल डिव्हाइसलाच सपोर्ट करतय.
बायको शिन आणि क्लब फॅक्टरी वापरते. बराय आता बरीच बचत होईल माझी. Lol

Chinese internet giant Tencent has invested Rs. 740 crore in music app Gaana in 2018. Gaana belongs to Times Group venture.

Both Paytm and Gaana not in the ban list.

>>जबरदस्त<< +१
एकनामिक सँक्शन्सचा हा एक भाग धरला तर यापुढे चिनी+भारतीय प्रॉडक्टस्/सर्विसेस यांवर होणारा इंपॅक्ट विजा-वि डायरेक्ट इंवेस्टमेंट पहाणं रोचक ठरेल...

पे टी एम वर बंदी नाही म्हणून लोक निवांत राहतील व भरपूर पैसे ठेवतील

मग अचानक बन्दी घालून बेनामी पैसा आपोआप पी एम केर फंडात जाईल , अशी चिप मोदीजी पे टी एम च्या सर्वर मध्ये बसवणार आहेत

जॅक माच्या अलिबाबा ग्रुपने अंग काढुन घेतलं किंवा त्यांना वॉलंटरी (फोर्स्ड) डिसइंवेस्ट करायला भाग पाडलं तर खरा शोडाउन सुरु होइल...

बातमी ऐकून खरं तर बरं वाटलं . पण सहज playstore वर जाऊन tiktok आहे ते चेक केलं तर तिकडे तर हे apps अजून अव्हेलेबेल दाखवतायेत. मग बंदी असून काय उपयोग??

चीनचं कंबरडं मोडलं अशी खात्रीशीर बातमी आहे. तिकडची जनता गयावया करतेय बंदी मागे घ्या म्हणून. अजून ५-७ अँप वर बंदी घातली की झक मारत नकटं नाक मुठीत धरून येतोय बघा चीन

याला म्हणतात खरी छप्पन इंच छाती. भले शाब्बास

जर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला चीनशी पंगा घ्यायला परवडत नाही तर भारत काय करू शकणार?
त्यातून चायनाने भारतात भरपूर गुंतवणूक केली आहे. Paytm Zomato Bigbasket Swiggy Snapdeal Flipkart Expressbees Ola Byjus

मला नाही वाटत ह्या मुळे चीन ला काय फरक पडेल.
हा धूळफेक करणारा निर्णय आहे.
सामान्य लोक अशा निर्णयाला लगेच भुळतत.
कारण देश प्रेम दाखवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
.त्या पेक्षा भारताचा चोफेर विकास करा.
सर्वात जास्त गरीब भारतात राहतात लाज वाटली पाहिजे भारताला.
शेती पासून सर्व क्षेत्रांची वाट लागली आहे .
फक्त दोन चार उद्योगपती दर वर्षी श्रीमंत होत आहे.
रस्ते सुधारा, कमीत कमी पगार एवढं दिलाच पाहिजे ह्या कायद्याची अमलबजावणी करा.
अमेरिकेत कोणी हिम्मत करत नाही कमी पगार देण्याची इथे 8000 हजारात 16 तास काम करून घेतले जाते.
कायदा सुव्यवस्था सुधारा .
कायद्याच्या राज्याची पूर्ण वाट लागली आहे.
सरकारी यंत्रणा सुस्त झाली आहे.
हे सर्व सुधारा तेव्हा चीन सुधारेल.
ऍप वर बंदी खालून त्याला काही फरक पडणार नाही.

टिकटॉक अर्थातच ऐकलं आहे. Shein ही बहुतेक कपड्यांची साईट आहे. ह्या दोन वगळता बाकी ऐकलेल्या नाहीत. वरच्या दोनही वापरलेल्य नाहीत.

यातले एकही कधी वापरलेले नाही. तत्त्वाचा प्रश्न वगैरे नाही Happy आधीच माहीत असलेली अ‍ॅप्स इतकी वापरली जात नाहीत. त्यात ही आणखी विचित्र नावाची कोण वापरणार. फक्त इतरांनी टिकटॉक मधून तयार केलेल्या व व्हॉअ‍ॅ वर फॉरवर्ड केलेल्या क्लिप्स पाहिल्या आहेत. त्याही बहुतांश कचरा कॅटेगरीतीलच होत्या.

अमेरिकन व चायनीज अ‍ॅप्स मधला फरक म्हणजे चायनीज अ‍ॅप्स मधे आपला डेटा कधीही सरकारच्या मर्जीनुसार शेअर केला जाउ शकतो. अमेरिकेत इतके सहज होत नाही.

अ‍ॅप्स वर बंदि म्हणजे दर्या मे खसखस. चीनची नाकेबंदि करायचीच असेल तर तैवान, हॉगकाँग, तिबेट यांच्या सावंर्निटि करता पाठिंबा हि पुढची स्टेप, पण सध्यातरी चायनीज कंपन्यांची भारतातील एक्विटि डायलुट करण्याबाबत काहि प्रयत्न दिसले तर समजुन येइल हाउ सिरियस इंडियन गवर्न्मेंट इज...

Ravi Shankar Prasad
@rsprasad
· 9h
For safety, security, defence, sovereignty & integrity of India and to protect data & privacy of people of India the Government has banned 59 mobile apps.
Jai Hind!
Flag of India
--------------------
He-Who-Must-Not-Be-Named"

अगदी हेच लिहायला आलेलो,
सरकारतर्फे दिलेले कारण " data privacy" आहे.
Data privacy साठी बंदी घालणे योग्यच आहे,
भक्त त्याला " देशभक्ती" च्या कागदात गुंडाळतील, तसा मसाला ट्विट मध्ये पुरवलाच आहे.

मात्र इतर aaps ज्यांच्यावर अनधिकृतपणे डेटा गोळा करण्याचा/ युजर्स ची माहिती खाजगी न ठेवल्याचा, आरोप आहे, त्यांचे सुद्धा ऑडिट झाले पाहिजे.
कोणती अँप ते सांगितलेच पाहिजे का? Wink

tiktok1.jpg
जरा दमानं घ्या. उड्या फुकट जाऊ शकतील.

चंमतग - नोटाबंदीत उखळ पांढरं झालेल्यांतल्या मोजक्या लोकांतल्या पेटीएमच्या विजय शर्माला या निर्णयाने देशाभिमानाचं भरतं आलं आहे.

Whatsapp,fb var pan anek देशात बंदी आहे त्या मध्ये चीन पण आहे.
असले उद्योग देश करत असतात.
Tiktok चा किती कोटीचा तोटा झाला हे आता सांगायला आता suravat होईल.
ऍप हा रोजगार विरहित धंदा आहे त्या मुळे प्रत्यक्ष लोकाच्या रोजगारावर मोठ्या प्रमाणावर चीन मध्ये फरक पडणार नाही.

Pages