चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही, मनेका मुळात गांधी घराण्याच्या वारसदार कधीच नव्हत्या. तसेही आई वडलांनंतर मोठा मुलगा ( मुली नसतील तर) वारसदार ठरतो. संजय गांधी तर गेलेच होते, त्यामुळे राजीव राजकारणात आले. मग ते गेल्यावर वारसदार कोण ठरणार? राहुल गांधी तर लहान होते. त्यामुळे राजमाता या सोनियाच ठरतात.

Proud

गांधी नेहरू पटेल आंबेडकर ह्यांनी अख्ख्या हिंदुस्थानचा 47 साली राज्याभिषेक केला आहे, त्यामुळे सगळेच राजकुमार , सगळ्याच राजमाता

काँग्रेसने , मै भी शहेनशहा , केले

पण लोकांना मै भी चौकीदार आवडले

स्वाती२ आणि टवणे सर लिंक्स चांगल्या आहेत.
तात्याच्या चायना पॉलिसी ला फळ धरावं असं मनोमन वाटतं होतं.

मोदींचा दणका आणि काय काय गमतीदार विडिओ न्युज नेशनवर दाखवत आहेत.
खरोखरच चीनला ठसका लागला आहे का apps उडवल्याने?

स्वाती२, टण्या चांगल्या लिन्क्स आहेत.

ट्रम्पने २-३ आठवड्यांपूर्वी हाँगकाँग बद्दल काहीतरी चांगला निर्णय घेतला होता ते लक्षात आहे. पण तो अमेरिकेतील सर्वपक्षीय बिनडोकपणात चर्चेत आलाच नाही.

>> पण तो अमेरिकेतील सर्वपक्षीय बिनडोकपणात चर्चेत आलाच नाही.<<
हे असं पाहिजे - पण तो बिनडोक लोकांच्या आवाक्यात आलाच नाहि... Proud

ट्रंपची अगदि सुरुवाती पासुनची धोरणं चीनला कंट्रोल करणारी आहेत. काहिंना ती झेपली नाहित, कारण तेच. वरचं...

एवढे काम करुनही चिनी वस्तुंवर जग विश्वास ठेवत नाही. आपण सुद्धा त्याची टर उडवतो,

अरे मामू ऐसा नही है वो.. जितके हुशार तुम्हि स्वताला ((कल्पनेत) समजता ,,त्यापेक्षा कितीतरी हुषार ते (वास्तवात ) आहेत .. ते सगळ्या प्रकारच्या लायकीच्या आणि गुण वतेच्या गोष्टी बनवतात ,, आणि ज्याची जी लायकी असेल त्याप्रमाणे ज्याला त्याला पाठवतात ..
चिनी वस्तूं वर जगात कोण विश्वास ठेवत ना ही याचा काही सर्वे वगैरे आहे का का उगाच तोंडातन निघाले 'अध्यक्षमहोदय " म्हणून पुढचे दिले ठोक्कून ..? चाळिस रुपयाची लायटिंग अख्ख्या अमेरिकेत शोधून दाखवा बघू .. इथे खेड्यापाड्यात अस्ती दिवाळीत .. बात करते है

आणि इतरांना हे चीनधार्जिणे पाकधार्जिने ज्यादिवशी बोलणे बंद कराल त्या दिवशी तुम्हाला तुमचा देश नीट कळेल .. हा आपला देश काय अमेझिंग सुंदर गोष्ट आहे हे कळले की आपो आप या हवेतल्या ५६ इंची गप्पा बंद क्जराल .देशावर असं स्वतंत्र प्रेम वगैरे करायला लागत नसत रे बावळटांनो .. आधी भूमीवर प्रेम असायला लागतं .ही भूमी नीट समजायला लागते त्यासाठी . इतरांचा द्वेश आ णि बहि ष्कार म्हणजे आप्ल्या देशा वर प्रेम नव्हे रे फाटक्या गोनपाटांनो

पण तो बिनडोक लोकांच्या आवाक्यात आलाच नाहि>> लोक परिघाबाहेर जाउन बघत नाहीत. इकडचे लोक त्यांचे काही वाचत नाहीत आणि ते यांचे. आपला बाळ्या सगळे चांगलेच करतो आणि दुसर्‍याचं कार्ट सगळं वाईट असे लॉजिक असते Happy

"देशावर असं स्वतंत्र प्रेम वगैरे करायला लागत नसत रे .. आधी भूमीवर प्रेम असायला लागतं .ही भूमी नीट समजायला लागते त्यासाठी . इतरांचा द्वेश आ णि बहि ष्कार म्हणजे आप्ल्या देशा वर प्रेम नव्हे रे.."
अगदी अगदी. 'इतर काही देशांचा द्वेष करणे म्हणजेच आपल्या देशावर प्रेम करणे होय.' ही व्याख्या पक्की रुजली आहे. त्यामुळे देशप्रेमी अथवा देशभक्त होण्यासाठी इतर काहींचा द्वेष केला की काम भागते. आणखी काहीच करायला नको.

>>आपला बाळ्या सगळे चांगलेच करतो आणि दुसर्‍याचं कार्ट सगळं वाईट असे लॉजिक असते<<
नोप. यात परिघापेक्षा अज्ञानाचा वाटा जास्त आहे. हा आता काहि मोजके ज्ञान वाढवुन परिघा बाहेर विचार करतात, त्याचं अर्थात स्वागत आहेच. असो... Wink

इतरांचा द्वेष नसावा तसंच आंधळं समर्थनही नसावं. आत्ता या धाग्यावर पोल घ्या किंवा इथे लिहिणार्‍या आयडीजच्या आधीच्या पोस्ट्स बघा.
ज्या करोनामुळे आज इतके लोक जग सोडून जात आहेत त्याच्या प्रसाराला चीन प्रामुख्याने जबाबदार आहे हे सत्य लिहिणं म्हणजे द्वेष करणं नाही. पण असं लिहिलं की काही लोकांना इतका त्रास का होतो?!
चिनी मालावर अगदी पूर्ण बहिष्कार शक्य नसला तरी शक्य तितक्या प्रमाणात मला करायचा आहे. स्वतःच्या चैनीसाठी किंवा उगाच स्वस्त आहे म्हणून चिनी प्रॉडक्ट घेताना प्रत्यक्ष आयुष्यात ओळखीचे असलेले किंवा आंतरजालामुळे, संस्थळामुळे ओळखीचे वाटणारे करोनामुळे अकाली हरवलेले चेहरे आठवल्यावर हात मागे घेतला जाईल.

जोपर्यंत चीनधार्जिणे लोक भारतात आहेत तोपर्यंत भारत चीनला नमवू शकणार नाही असं मला वाटतं.>> सनव यांच्या प्रतिसादाशी सहमत. या वाक्यात पाकिस्तानचा पण उललेख केला पाहिजे.

श्री लंका ह्यांच्या शी पण पटत नाही .>>> रश्मीजी याचे कारण म्हणजे तमिळनाडूमधून तामिळवाघांना दिलेली मदत व चीनने दिलेली लक्षावधी डॉलरची मदत. आता श्री लंकेला कळून चुकले आहे की ते चीनचे वर्षानुवर्षे गुलाम राहणार आहेत.

चीनधार्जिणे लोक भारतात अल्पसंख्य आहेत की बहुसंख्य? अल्पसंख्य असतील ह्या मूठभर लोकांमुळे भारताच्या प्रगतीचं गाडं अडून राहातंय हे काही पटत नाही. शिवाय या छोट्याशा समुदायाला कसंही करून बाजूला करता येईल. पण बहुसंख्य असतील तर मात्र विशेष कारवाईची आवश्यकता आहे. कमीत कमी इतकं तरी सुस्पष्ट शब्दांत आणि तर्कशुद्ध रूपात बहुजनांना पटवून द्यावं लागेल की चिनी मालावरचा बहिष्कार हा राष्ट्रहिताचा आहे, त्यात दुटप्पीपणा नाही, त्यामुळे चीनचे पारिपत्य होणार आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होणार आहे, देशाचं कल्याण होणार आहे.
नाही तर आहेच नेहमीची हडेलहप्पी आणि अर्थहीन सामूहिक उन्माद .

<जोपर्यंत चीनधार्जिणे लोक भारतात आहेत तोपर्यंत भारत चीनला नमवू शकणार नाही असं मला वाटतं>

सहमत. चीनधार्जिणे मोदी असेतो चीन अशाच कुरापती काढत राहणार.

चिनी वस्तू नाकारणारे चीन धार्जिणे की भारत धार्जिणे ?

चीन चा होळसेलर भारतातील होळसेलरला माल देताना पूर्ण किंमत घेतो.

मग भारतीय होलसेलर भारतीय रिटेलरला रोखीत किंवा उधारीत माल देतो

मग भारतीय ग्राहक ती विकत घेतो

चीनला पैसे आधीच पोचून तो व्यापारी फ्राईड राईस व माणचुरीयन गिळून गप घरात पडलेला असतो

मग भारतीय रिटेलर ची वस्तू पडून ठेवून नुकसान कुणाचे ?

मोदीने आयातच बंद केली तरच मुमकीन है

पाहिले हे लक्षात घेतले पाहिजे मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना बहुसंख्य जनतेनी मत देवून त्या जागेवर बसवले आहे.
त्यांचा उल्लेख आदरयुक्त शब्दात च केला गेला पाहिजे भले त्यांच्या विरुद्ध विचार असतील तरी.
चीन मधून आयात योग्य आहे की अयोग्य ह्याचा विचार करण्या अगोदर ह्या प्रश्नाचे उत्तर जगाच्या इतिहासात शोधा.
लष्करी आक्रमण करणाऱ्या देशाबरोबर व्यापारी संबंध ठेवल्याचे जगात उदाहरण आहे का?
आपण दुकानदार शी मतभेद झाले तर त्याच्या दुकानात जात नाही इथे तर लष्करी आक्रमण झाले आहे

भारतातले चीनधार्जिणे लोक २ प्रकारचे आहेत. पहिले म्हणजे मोदीला विरोध करणारे. मोदी जे काही करतील मग ते देशहिताचे असेल तरीही त्यात खुसपट काढून विरोध करणारे. सध्या मोदी चीनविरोधी पावले उचलत आहेत त्यामुळे मोदीविरोधक चीनधार्जिणे झालेत.
दुसरे म्हणजे व्यावसायिक हितसंबंध असणारे. त्यांना सीमेवर जवान मरतायत, आपली जमीन बळकावण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय याचे काहीही काही. मात्र सरकारी बंदीमुळे २ रुपये नफा कमी झाला किंवा खरेदीसाठी खिशातले २ रुपये जास्त गेले म्हणुन लगेच गळा काढणार.
आत्ता थोडा त्रास होईल पण नजीकच्या भविष्यकाळात त्याचा फायदाच होईल हे मात्र सोईस्कर विसरणार.
पण एक गोष्ट मात्र नक्की कि ५० वर्षाच्या बिनडोक आणि मतिमंद युवा जोकरच्या मानाने देशहिताचे निर्णय घेण्यात मोदी नक्कीच सरस आहेत आणि हे जवळपास सर्वच भारतीयांना माहिती आहे (अगदी जोकरला सुद्धा)

आदरयुक्त संबोधन हे फक्त पदभार सांभाळत असतानाच लावावे की पदहीन झाल्यासही लावावे? त्यांच्या हयातीत आणि नंतरही सुरू ठेवावे?

चीन चा साम्राज्य वादाचा इतिहास आहे .
आताचा जो चीन आहे तो अनेक भू प्रदेश सैन्य ताकत वापरून गिळंकृत करून तयार झालेला आहे.
भारताचा पण भू भाग गिळंकृत करण्याचा त्याचा हेतू नवीन नाही .

62 देशांनी करोना व्हायरसबद्दल enquiry करण्याची मागणी करत चीनवर ठपका ठेवलाय त्यात भारतही सामील आहे.
पण इथे करोनाबद्दल चीनचं समर्थन करायला धावून येणारे, WHO ची वकिली करणारे कोण लोक आहेत ते सर्वांनी बघितलं आहे.

वास्तू बाजारभाव पेक्षा कमी दरात विकणे हे कटकारस्थान असते .
आर्थिक तकती च्या जोरावर प्रतिस्पर्धी संपवणे आणि स्वतःचे साम्राज्य उभे करणे हाच हेतू असतो.
आणि हे साधं भाजी मार्केट मध्ये पण चालत.
पण हे सर्व माहीत असून चीन च्या स्वस्त वस्तु चे गुणगान चालू आहे.

Pages