चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदींच्या सगळ्या परदेश भेटी आणि परक्या नेत्यांचं त्यांनी केलेलं आदरातिथ्य यांचा एकमेव उद्देश - स्वप्रतिमानिर्मिती.

भारताचे परराष्ट्रांशी संबंध सुधारायला त्याचा किती उपयोग झालाय ते दिसतंय. पहिल्या रा ज्याभिषेकाला शेजारी राष्ट्रां च्या प्रमुखांना बोलवलं होतं. आज त्या सगळ्यांशी संबंध बिघडलेत.

चीनच्या क्षी बरोबर आपले संबंध वैयक्तिक पातळीवर किती आपुलकीचे आहेत .. भल्याभल्यांना हे कळणार नाही असे मोदींचे शब्द आहेत
आज त्यांचं त्यांना कळलं असेल. पण त्यांच्या भक्तांना कळणार नाही.

चीन चा विषय निघाला की तिकडे स्वस्तात काम करून घेतात अस सांगितले जाते.
भारतात कोणते लाखा नी पगार आहेत कामगार ना.
8 ते 12 हजारात इथे सर्रास राबवून घेतात ते पण वेळेत पगार न देता.
चीन मध्ये जो कामगार ना पगार मिळतो त्या मध्ये त्यांच्या बेसिक गरजा आरामात भागतात.
आपल्यासारखे अर्ध पोटी कामगार नक्कीच नसतात.
चीन मध्ये मध्ये कमी पगार आहे असे पद्धतींनी सांगतात जसे इथे कामगार लाखात पगार घेत आहे.
कामगारांचे शोषण करून सरकार ला श्रीमंत करायची काही गरज नाही.

जोपर्यंत चीनधार्जिणे लोक भारतात आहेत तोपर्यंत भारत चीनला नमवू शकणार नाही असं मला वाटतं.
हे तेच लोक्स आहेत जे करोना व्हायरसबद्दल चीन आणि WHO ची बाजू घेऊन भांडायला धावून येतात. जगभर इतके बळी जात आहेत तरी यात चीन सोडून बाकी सगळ्यांचाच दोष आहे असं त्यांना वाटत असतं.
आत्ताही मोदींवर टीका करायला काहीतरी कारण म्हणून चीन चा इश्यू करत आहेत पण यांचं चीनधार्जिणेपण आधी दिसलेलं आहे.

गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय राजकारण व संबंध या विषयातील तज्ज्ञांचे अभ्यासू लेख प्रकाशित झाले आहेत.
स्तीफन ली मायर्स यांचा न्युयॉर्क टाइम्समधील लेख वाचनीय आहे.
सर्वात महत्वाचा लेख लिहिला आहे एम के नारायणन यांनी हिंदू मध्ये. त्यातले वाक्य 'नेविल चेंबरलेन' हे समिट डिप्लोमसीचे बळी होते हे वाक्य शहारा आणते. कारकिर्दीची सुरुवात सर्व शेजारी राष्ट्रांच्या प्रमुखांना बोलावून करणार्‍या मोदींच्या ७व्या वर्षातच जवळपास प्रत्येक शेजारी राष्ट्राबरोबरचे संबंध ताणलेले आहेत यातच त्यांच्या परराष्ट्रीय नितीचे एक मोठे अपयश दिसून येते. याला बॅलन्स करण्यासाठी क्वाड व इतर पाश्चिमात्य देशांबरोबरचे संबंध प्रत्यक्षात किती कामी येतील हे अजून तरी निश्चित नाही.

हँग इन फॉर अ लाँग हॉल. चीन विरुद्ध इतर असे पुढली किमान २०वर्षे तरी चालणारे नवे शीतयुद्ध सुरू झाले आहे. या 'इतर' धृवात कोणते देश अ‍ॅक्टिव्हली सहभागी होतील याबद्दल अजून तरी खात्रीने सांगता येणार नाही. भारत व हिंदी महासागर मात्र या खेळातली रणभुमी असणार यात शंका नाही.

भारताचे सर्व च शेजारी देशांशी काही ना काही मतभेद आहेत.
त्या मध्ये चीन आणि पाकिस्तान बरोबर तीव्र मतभेद आहेत.
पाकिस्तान विषयी तीव्र मतभेद असणे समजू शकतो इथे धार्मिक कारण पण आहे आणि
सीमा वाद पण आहे आणि पाकिस्तान आक्रमक भूमिका घेत आहे भारत नाही.
पण चीन,बांगलादेश,नेपाल,श्री लंका ह्यांच्या शी पण पटत नाही .
काय कारणे असतील.

काल चीनने तातडिने हाँग्काँग मधे नविन नॅशनल सिक्युरिटी कायदा आणला; तैवान बहुतेक नेक्स्ट. झि जिनपिंगने स्वत:ला जवळजवळ हुकुमशहा म्हणुन घोषित केलेलं असल्याने नो सरप्राइज देअर. चीनची अर्थव्यवस्था ढासळत असतानांच तिथल्या कम्युनिस्ट रेजिमबाबत सर्वसामान्य जनतेत साठलेल्या असंतोषाला मोकळी वाट मिळण्याची वेळ आली आहे का? या वस्तुस्थितीचा फायदा भारत+अमेरिका कितपत करुन घेउ शकतील? फायदा करुन घेतल्यास पुढे पिआरसी, युएसएसआरच्या मार्गाने जाइल का? वि लिव इन इंटरेस्टिंग टाइम्स...

अमेरिका - ट्रम्प - हे स्वतः काही न करता परस्पर भारताला चीनवर सोडण्याची स्ट्रॅटेजी राबवत आहेत असं वाटतं. स्थानिकांमध्ये भांडण लावण्याची जुनी इंग्रज परंपरा आहेच. पण मोदी ट्रम्पचं dirty work फुकट करून देतील असं वाटत नाही.

>>Indian Army lacks ammunition and cannot fight a war longer than 10 days, says CAG report<<
शिळी बातमी...

पण चीन,बांगलादेश,नेपाल,श्री लंका ह्यांच्या शी पण पटत नाही .
काय कारणे असतील.>>>> हेमंत, बरीच कारणे आहेत.

१) चीन शी संबंध ठीक आहेत आणी नाहीत पण अशी स्थिती असतांनाच करोना उदभवला. ऑस्ट्रेलियाने चीनवर करोनाविषयी सत्य काय ते सांगा अशी सक्ती केली मग भारताने ऑस्ट्रेलीयाला मम म्हणले. त्यातुन अमेरीकेने जी-७ मध्ये भारताने यावे म्हणल्यावर चीनचा तीळपापड झाला. मग करोनावरुन सगळे जग चीनला एकटे पाडायला निघाले पाहुन चीनने घुसखोरी व अमानवी परंपरेची जुनी खेळी चालू केली. आपला कमांडर मारला गेल्यावर संबंध सुरळीत कसे रहातील?

२) बांगलादेश- याच्याशी आपले संबंध कधीच सुरळीत नव्हते. अगदी त्याच्या जन्मापासुन सुद्धा. उलट बांगलादेशी जास्त धोकादायक आहेत पाकीस्तानपेक्षा. पाकीस्तान उघड शत्रु आहे, तर बांगलादेश छुपा शत्रु. घुसखोरीत हे अव्वल आहेतच. आपण सिद्ध करुनही आम्ही तुमच्या देशात येत नाही असा कांगावा ते सातत्याने करतात.

३) नेपाळ - एकमेव हिंदु राष्ट्र म्हणून जगात मिरवणार्‍या नेपाळ मध्ये चीनने लाखो डॉलर्सची मदत देऊन कम्युनीस्ट, चीन धार्जिणा पक्ष निवडुन आणला. लाखो डोलर्सच्या मदतीमुळे याच सरकारने भारताविरुद्ध आगपाखड करायला सुरुवात केली. सैन्याला ( नेपाळी ) हाताशी धरुन काही करता येते आहे का ते पाहीले, पण त्यांच्याच लोकांनी आणी विरोधी पक्षांनी भारताची बाजू घेऊन त्यांच्या सरकारचे थोबाड फोडलेय.

४) श्रीलंका-माहीत नाही.

एवढे सारे माहीत आहे तरी काही लोक डोळ्यावर पट्टी बांधुन म्हणतात, मोदींनी संबंध बिघडवले. अरे तुमचा भारतातला गावा- शहरातला शेजारी , तुम्ही चांगले वागुनही तुमची विनाकारण कुरापत काढत असेल तर तुम्ही काय त्याला पप्पी द्यायला जाता का? इथे तर कारण नसतांना चीन्,पाकीस्तान , बांगलादेश विरोधात आहेत. तरी म्हणे मोदी जबाबदार.

मोदी कशालाच जबाबदार नाहीत. सगळ्याला नेहरू जबाबदार आहेत>>>> बरोबर आहे. कडवी लेकीन सच्ची बात बोलने के लिए जो जिगर चाहीये वो आपके पास मौजुद है. तहेदिलसे शुक्रिया !

इतकं सगळं लिहूनही चीनची भक्ती करणाऱ्या लोकांच्या वृत्तीत फरक पडणार नाही.
करोनामुळे इतकी आयुष्ये उध्वस्त झाली. पण चीनला हे लोक डिफेन्ड करतच आहेत. WHO अगदी जूनमध्येही वादग्रस्त स्टेटमेंट करणं, मग ते मागे घेणं असे प्रकार करत आहे. पण यांच्यामते WHO चाही काही दोष नाही.

राहुलजी गांधीजी हे तरुण बाघी आहेत. म्हणजे बाघी पिक्चर बघून ते टायगर श्रॉफ सारखी फायटिंग करायला शिकलेत. ते जर पंतप्रधान झाले तर एकटेच चीनवर हमला करून सगळ्या चीनी सैनिकांना मारू शकतात. तसेच त्याच्याकडील बंदुकीच्या गोळ्या संपल्या तरी ते आपल्या कातिल नजरेने डोळे मारून समोरच्यांना घायाळ करू शकतात.

मला वाटलं मोदी खूप पॉवरफुल आहेत. पण इथे त्यांचे समर्थक या अमक्यामुळे, त्या तमक्यामुळे आणि शेवटी नेहरूंमुळे मोदी काही करू शकत नाहीत असं म्हणता ना दिसत आहेत. नेहरू तर मोदींपेक्षा कित्येक पट पॉवरफुल आहेत. ते मरून ५६ वर्षं झाली तरी अजूनही त्यांचा प्रभाव दिसतोय.

गेल्या काही वर्षांत बांग्लादेशशी आपले संबंध सी ए ए , एन आर सी येईतो बर्‍यापैकी चांगले होते. तिथले लष्करशहा पाकिस्तानच्या लष्करशहांसारखेच असल्याने भारताशी त्यांचंही पटत नसे. पण शेख हसीना या भारताच्या मित्र आहेत. त्या शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या.

नेपाळशी संबंध प्रथम गेल्या बिहार निवडणुकीच्या वेळी केलेल्या नाकाबंदीमुळे बिघडले. चीन तिथे हात पाय पसरायला वाट पाहतच होता. पण नाकाबंदीमुळे जनमतही भारताच्या विरोधात गेले. नेपाळमध्ये कम्युनिस्ट विचाराचे सरकार आल्याने आणि त्यांनी देश सेक्युलर घोषित केल्याने भाजपचा पापड मोडला .

लंकेची आर्थिक परिस्थिती बिकट होते आहे. भारताकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड काही काळ स्थगित करायची मागणी त्यांनी केली. तिथे चीन त्यां च्यासाठी कर्ज उपलब्ध करून त्यांना कर्जाच्या विळख्यात अडकवायला सज्ज आहे.

प्रज्ञा सिंह ठाकुर आजारी आहे म्हणून. नाहीतर तिने आपल्या मंत्रशक्तीने चीनचा केव्हाच नायनाट केला असता.

अनुराग ठाकुरही चीनबद्दल गोली मारो सालों को म्हणेनात.

कपिल मिश्रा अमेरिकेतल्या ब्लॅक लाइ ह्ज मॅटर आंदोलकांमुळे चिडलेले आहेत.

आम्ही तीन दिवसांत सैन्य उभारू शकतो असं म्हणणारी सांस्कृतिक संघटना कुठे आहे? या संघटनेचा रोख स्थापनेपासूनच देशाच्या शत्रूपेक्षा देशातील त्यांनी स्वतः ठरवलेल्या शत्रूंवरच असतो म्हणा.

तो लडाख चा बोलका खासदारही दिसत नाही.

आज तक के किसीं भी पंतप्रधान ने लडाख और लडाखी को अपना नही माना था, पहिली बार भाजपा और मोदी ने हमारी बात सुनी

असे तत्सम काहीतरी संसदेत बोलला होता, की संघ ड्रेस घालून आता हा लढायला गेला ?

४) श्रीलंका-माहीत नाही.>> असेच बांगलादेश-माहीत नाही. असे लिहिले असते तर बरे होते. काहीच ठाऊक नसताना काहीही ठोकून द्यायचे म्हणजे कमाल आहे. कहासे आता है ये कॉन्फिडन्स आज्जीबई? Wink

असेच बांगलादेश-माहीत नाही. असे लिहिले असते तर बरे होते. काहीच ठाऊक नसताना काहीही ठोकून द्यायचे म्हणजे कमाल आहे. कहासे आता है ये कॉन्फिडन्स
>>>>>>

मलाही यातली सत्य परीस्थिती नेमकी माहीत नाही.
पण यावरून आठवले
मागे बहुधा रश्मी यांनीच कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानला ५५ कोटी देणारा शाहरूख आता कुठे गेला अशी विचारणा केली होती. अर्थात ती अफवाच होती.
पण लोकांचे जनरल नॉलेज हल्ली फॉर्वर्डेड व्हॉटसप पोस्टवरून तयार होते.
आणि सतत त्याच त्याच पोस्टचा मारा करून एकदा का तुमचा ब्रेनवॉश झाला आणि नकळत तुम्ही मनोमन एखाद्या पक्षाचा झेंडा हाती घेतला की तुम्हाला या सर्व पोस्ट खरया वाटू लागतात.

मला वाटते की आपण चर्चा करून अश्या गोष्टी खरया खोट्या केल्या पाहिजेत. एखाद्याने अशी खोटी बातमी वा माहिती दिली म्हणून त्याच्याशी तलवार उपसून भांडू नये आणि आपले वैयक्तिक संब्ंध तसे सामाजिक सलोख्याचे वतावरण बिघडवू नये. प्रत्यक्षात ते लोक सडक्या राजकारणाचे बळी असतात हे समजून घ्यायला हवे आणि चर्चेचा उद्देश त्यांना खोटे पाडणे नसून माहिती खरी खोटी करणे हा असावा.

कहासे आता है ये कॉन्फिडन्स आज्जीबई?>>>>>> नातवा, तुझ्यासारखे भ्रष्ट गांधी परीवाराचे अंध भक्त भेटले ना नेटवर की हा कॉन्फिडन्स उसळुन येतो. Proud

बाळ ऋ, अंड्यातुन बाहेर नीट आलास ना की मग बोलु आपण, शहाणं आमचे बाळ ते !

अमा, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना का?

अप्रगत लोकशाही,दोलायमान समाज,
पूर्वोत्तर राज्यातील विघटन वादी संघटनांना बांगलादेश कडून पाठबळ.
ही कारण असावीत बांगलादेश शी संबंध प्रेमाचे न राहण्याची.
घुसखोरी आणि ती रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दला कडून होणार गोळीबार,भारतीय स्वस्त वस्तू मुळे बांगलादेशी उद्योगाला होणारे नुकसान(हे भारत चीन सारखच कारण आहे)
ही सर्व कारणे असावीत.

कोण , मनेका व वरुण का ?>>>>>> Proud नही, आपके दुलारे आपके प्यारे प्यारे युवराज और उनकी राजमाता.

Pages