चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> तेच ना! स्वतः काही करायचे नाही आणी वेळ मिळाला की सरकारच्या नावाने शिमगा करायचा>>>>

चिनी माल म्हणजे नाक्यावरच्या इलेक्ट्रिक च्या दुकानात मिळणाऱ्या LED च्या माळा, आणि चुटपुट इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी इतकाच समज आहे का लोकांचा??

1) सरकारी टेंडर मध्ये(technikal स्पेसिफिकेशन पूर्ण करणाऱ्या) lowest bidder ला कॉन्ट्रॅक्ट मिळते, एका वेंडर ने चीन मधून आलेले कम्पोनेंट्स वापरून आपल्या प्रोडक्ट ची किंमत कमी ठेवली, दुसऱ्या वेंडर ने भारतीय/अमेरिकन/युरोपिअन कम्पोनेंट्स वापरल्याने त्याचे प्रोडक्ट महाग होते, भारत सरकार कोणाला कॉन्ट्रॅक्ट देणार? म्हणजे देश भक्ती दाखविण्याच्या नादात दुसरा वेंडर धंदा गमावणार, त्याचे 5-50 कामगार नोकरी गमावणार
त्या ऐवजी सरकार " चायनीज कम्पोनंट असणाऱ्या वस्तू आम्ही घेणार नाही" असा नियम का करत नाही?

2) मी भारतात बनविले जाणारे वैद्यकीय मशीन विकतो, चायना मधून हेच मशीन 25 30%कमी किमतीत येते,
T3 T4 सिटी मध्ये हॉस्पिटल्स ना त्यांची गुंतवणूक कमी झाल्याने कमी दरात सेवा देणे परवडते, त्यामुळे गरीब माणसे सुद्धा वैद्यकीय सेवेचा लाभ घेऊ शकतात. तुमचे व्हॉलेंटीअर देशप्रेम जर या लोकांच्या मुळावर उठणार असेल तर त्याचा काय फायदा?
या पेक्षा सरकारने त्या बाहेरून येणाऱ्या मशिन्स वर बंदी घालावी, मागणी वाढल्याने आपोआप भारतात ती मशिन्स तयार करणारे प्लेअर्स वाढतील आणि किमती कमी होतील.

3) कित्येक सरकारी टेंडर मध्ये वैद्यकीय मशीन FDA/CE अप्रुवड असावे ही बेसिक अट सुद्धा नसते, ती टेंडर मध्ये घालावी म्हणून झगडावे लागते, मात्र ती घातली तर स्थानिक पातळीवरील काही कम्पन्या सुद्धा बाहेर होतील म्हणून ती घातली जात नाही, आता सरकारच " आम्हाला sbstandard माल चालेल" असे खुले आवताण देऊन बसले असेल, तर स्टॅंडर्ड कंपन्यांना सुद्धा स्वस्त कम्पोनेंट्स वापरून स्वस्त मशीन बनवायचे दडपण येते.

वर दिलेल्या सगळ्या उदाहरणात, स्वतःच्या घरी शिवाजी जन्माला घालायची कितीही हौस असली तरी त्याचा परिणाम इतर देशबांधवांना त्रास होणे हाच होणार आहे.

तस्मात संकुचित बुद्धी घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापरकडे बघू नये.
उपाय करता, अपाय जास्त होण्याची शक्यता आहे

दुसरी गोष्ट,
भारत सरकार जे सबुरीचे धोरण ठेऊन आहे ते आत्ता तरी योग्य आहे. ( होपिंग, स्वतःच्या क्षमता/ अलटर्ननेट सप्लाय चेन विकसित करण्यासाठी ही सबुरी ठेवली असेल, आणि ते उद्दिष्ट्य साध्य झाल्यावर काही ऍक्शन घेतली जाईल)

इकडे रेवडी उडवली जाते आहे ती बेअक्कल भक्तांची,

आज जी कारणांची जंत्री घेऊन हे भक्त भारत सरकारचा निर्णय डिफेन्ड करत आहेत, त्यांना पूर्वी भारत गप्पा राहण्याची हीच, कदाचित याहून जास्त कारणे असतील इतपत कल्पना आली तरी हे ट्रोलिंग सत्कारणी लागले असे मी समजेन.

वर, भरत, अमित, जिद्दु यांनी या भावनेवर अचूक बोट ठेवले आहे.

@ सिंबा, माहिती उत्तम दिलीत, आभारी आहे.

माझा हा प्रश्न ( शिवाजी महाराज दुसर्‍याच्याच घरात का जन्माला यावेत? ) स्पष्ट आहे. त्याचा आधार मोदी नव्हे, तर इतक्या वर्षापासुन चालत आलेल्या आपल्या उद्योगांविषयी आहे. चीन मध्ये मनुष्यबळ स्वस्त, सलग १२ किंवा त्यापेक्षा जास्त कामाचे तास ( मध्येच बिडी-चहा न पिणे व चकाट्या न फुंकणे ) यातुन त्यांनी जगभरात नाव कमावले आहे. हेच आपल्या कडे का होत नाही? कित्येक वेळा तर डाव्या संघटनांनी कारण नसतांना संप करवुन लोकांच्या पोटावर पाय आणलाय. ममता बॅनर्जी सारख्या पोकळ बुडाच्या बाईने तर टाटाचा प्रकल्प सिंगुर मधून हलवायला लावला. का? प्रत्येक ठिकाणी खा खा केलीच पाहीजे का?

किती वर्षे झाली आपल्या स्वातंत्र्याला? का नाही इतक्या वर्षात आपण स्वतःच्याच देशाला पुढे नेऊ शकलो? राजीव गांधी अग्रेसर होते तर बिचारे तेच निघुन गेले. ज्या मोदींना आज सारखे हिणवले जातेय, निदान त्यांनी काहीतरी प्रयत्न तरी केले. इतक्या वर्षात जनता कधी जागली नव्हती ती आता जागु पहातेय तर तिथेही विरोध? कमाल आहे !

आता आनंद महिंद्रा सारख्यांना पण मोदी भक्त म्हणून हिणवणार का?

भरत, लक्षात घ्या. १२ तासाचा नियम कोणालाच नकोय, अगदी जगभरातही. तसेही चीन मध्ये मानवाधिकारांचे किती उल्लंघन होते ते जगाला माहीत आहे. मी फक्त एक उदाहरण दिलेय, तरी तुम्ही तेवढा एकच पॉईंट पकडलाय. प्रश्न दुसर्‍यावर, तेही चीन सारख्या विश्वासघातक्यावर किती अवलंबुन रहायचे हा आहे.

इकडे रेवडी उडवली जाते आहे ती बेअक्कल भक्तांची>> याचा कंटाळा नाही का आला. उन्हे उनके हाल पे छोड दो। उनका कुछ नही हो सकता ।

गांधी नेहरू आंबेडकर मनमोहन सोनिया

ह्यांनी हे का केले नाही , ते का केले , असे भाजपे सतत विचारतात,

त्यामुळे ह्यांनाही ते लागणारच

>>>>>किती वर्षे झाली आपल्या स्वातंत्र्याला? का नाही इतक्या वर्षात आपण स्वतःच्याच देशाला पुढे नेऊ शकलो?>>>>>

हा प्रश्नच चुकीचा आहे, आपण कुठून सुरू केले, आपल्या लिमिटेशन्स (लोकसंख्या, 180 अंशात दिसणारी विविधता, लोकांमध्ये खोलवर रुजलेल्या काही सांस्कृतिक असमानता), आपण स्वीकारलेली शासन पद्धती या सगळ्याचा विचार केला , तर we have come long way.
अल्पावधीत प्रगती केलेल्या देशांची उदाहरणे तुम्ही लगेच द्याल, सिंगापूर, मलेशिया, इस्राईल वगैरे, पण त्यांच्या साठी वरील फॅक्टर्स कसे होते , त्यांना बाहेरून मिळणारी मदत किती होती वगैरे चा एकदा विचार करा.

अजून भरपूर काम करणे बाकी आहे , हे मान्य आहेच पण म्हणून जे काम झाले आहे ते नाकारण्यात अर्थ नाही.

>>>>>चीन मध्ये मनुष्यबळ स्वस्त, सलग १२ किंवा त्यापेक्षा जास्त कामाचे तास ( मध्येच बिडी-चहा न पिणे व चकाट्या न फुंकणे ) यातुन त्यांनी जगभरात नाव कमावले आहे. हेच आपल्या कडे का होत नाही?>>>>
मानवी हक्कांची पायमल्ली म्हणून याच चीन चे नाव सगळीकडे घेतले जाते, हे ऐकून आहात का?
उद्या तुम्ही स्वतः, किंवा जवळचे नातेवाईकाना अशा 12 तासाच्या अमानवी शिफ्ट मध्ये काम करायला लागणार असेल तर त्याची तयारी आहे का?
उगाच आपण ज्या वर्गात मोडत नाही, तो वर्ग अंगचोरपणा करतो असा स्टँड घेऊन लिहिणे टाळा, (इकडे इंह्युमन कंडिशन मध्ये कामगारांनी काम करावे असे तुम्हाला वाटते, शिवाजी त्यांच्या घरात)

देशाच्या सो कोल्ड विकासासाठी, सहीच्या एका फटकार्याने लाखो एकर जंगल जमीनदोस्त करून त्यातले आदिवासी देशोधडीला लावणे तुम्हाला मंजूर आहे का? ( परत एकदा ,...बरबाद आदिवासींनी व्हावे, शिवाजी कोणाच्या घरात?)

एका शासन निर्णयावरून धर्म, जात सर्व रद्द केले तर चालणार आहे तुम्हाला? (तुम्हाला वैयक्तिक रित्या चालेलही कदाचित, पण याच गोष्टींचे भांडवल करून सत्ता कायम ठेवणारे पक्ष आहेत आपल्याकडे, ते ही गोष्ट होउ देतील?)
कोरोना च्या महासाथी मध्ये पण वारी झाली पाहिजे असा आग्रह धरणारे वीर आहेत आपल्याकडे.
या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन लोकशाही जपत पुढे जायचे तर वेग मंदावणारच आणि सामाजिक दृष्ट्या दुबळ्या लोकांपर्यंत विकास पोहोचावा म्हणून हा मंदावलेला वेग प्रिव्हिलेजड क्लास ने सहन केलाच पाहिजे.

पण होतेय काय , की वर सरकू पाहणाऱ्या मध्यम वर्गाला अजून वेगाने वर सरकायचे आहे, पण ते करताना सामाजिक दुर्बल लोकांना घेऊन वर सकायचे तर वेळ लागतो, त्यामुळे त्यांच्या डोक्या खांद्यावर पाय ठेऊन पुढे जायची ही त्यांची तयारी आहे. आणि त्यातून असे प्रश्न लोकांना पडत आहेत

>>>>>>. इतक्या वर्षात जनता कधी जागली नव्हती ती आता जागु पहातेय तर तिथेही विरोध? कमाल आहे !>>>>>
ही दुसरी गंमत,

अहो आता पण जनतेने स्वयंस्फूर्ती ने बहिष्कार टाकवा असेच तुम्हाला वाटतेय, मग निवडून दिलेलं सरकार काय करणार?? मन की बात?
आम्ही म्हणतोय सरकारने स्पष्ट डायरेकटीव्ह द्यावा, चीन आपली गळचेपी करतंय म्हणून आपण चोख उत्तर देणे गरजेचे आहे असे सांगावे,
जर सरकार चीन ने काही केलेच नाही असे म्हणतंय तर मी निषेध कोणाचा करू??

मला मोदींचे एक ट्विट/विधान दाखवा ज्यात ते म्हणतात चीन ने भारतावर आक्रमण केले आहे/भारताची जमीन बळकावली आहे, अगा जे घडलेची नाही त्याला नागरिकांनी रिऍक्शन का द्यावी?

मला मोदींचे एक ट्विट/विधान दाखवा ज्यात ते म्हणतात चीन ने भारतावर आक्रमण केले आहे/भारताची जमीन बळकावली आहे, अगा जे घडलेची नाही त्याला नागरिकांनी रिऍक्शन का द्यावी?$$$$$$$$$$
सही पकडे है Lol

चीन मध्ये मनुष्यबळ स्वस्त, सलग १२ किंवा त्यापेक्षा जास्त कामाचे तास ( मध्येच बिडी-चहा न पिणे व चकाट्या न फुंकणे ) यातुन त्यांनी जगभरात नाव कमावले आहे. हेच आपल्या कडे का होत नाही?
>>>>

आमच्या ऑफिसमधली काही हुशार गाढवे करतात १२-१२ तास काम.
त्यांच्यामुळे माझ्यासारख्या ८ तास काम करणारया घोड्यांना उगाच नॉनहार्डवर्किंग समजले जाते.

चीन हा माजलेला देश आहे.त्यांच्या नालायकीमुळे जग आज विनाशाच्या खाईत आहे.या चिन्यांना सगळ्यांनी अमेरिक युरोप भारत वगैरेंनी धडा शिकवला पाहिजे.यांची मोठी conglomerates तोट्यात घालून त्यांना भिकेला लावल्याशिवाय हे सुधारणार नाहीत.परत पाकड्यांना फंडींग व तंत्रज्ञान चीनच पुरवते ,त्यामुळे हे पाकडेही गप पडतील.

मानवी हक्कांची पायमल्ली म्हणून याच चीन चे नाव सगळीकडे घेतले जाते, हे ऐकून आहात का?
उद्या तुम्ही स्वतः, किंवा जवळचे नातेवाईकाना अशा 12 तासाच्या अमानवी शिफ्ट मध्ये काम करायला लागणार असेल तर त्याची तयारी आहे का?>>>> सिंबा, हे शक्य आहे का? मी १२ तासाचे उदाहरण का दिलेय हे बहुतेकांना समजलेलेच नाही किंवा मी त्याचा पुरस्कार करतीय असा समज झालेला दिसतोय. १२ तास हे चीन मध्ये सुद्धा नाहीयेत. मध्यंतरी अ‍ॅपल लाच जरुर पडली होती स्क्रिन दुरुस्तीची, त्या वेळी पुरे ४८ तास विश्रांती न घेता ( मालकाने फक्त चहा-पाणी-खाणे दिले ) तिथल्या वर्कर्सनी काम केले हे ते उदाहरण आहे. हे आपल्या कडे शक्य नाही. खरे तर असे व्हायला पण नको आहे कारण अमानवी कामामुळे पुढे जाऊन त्याचे दुष्परीणाम होतातच. पण हे १२ तास आपले लोक का काम करीत नाही असा मी अर्थ काढत नाहीये.

दुसरी गोष्ट ही पण आहे की एवढे काम करुनही चिनी वस्तुंवर जग विश्वास ठेवत नाही. आपण सुद्धा त्याची टर उडवतो, त्याच अनुषंगाने आपण त्या वस्तु आयात करुन पायावर धोंडा पाडण्यापेक्षा चांगली आणी टिकाऊ दर्जाची वस्तु बनवुन आपलाच पैसा आपल्या लोकांना का देऊ शकत नाही हे मला पडलेले कोडे आहे. त्याच मुळे चिनी मालावर बहिष्कार का घालु नये असा माझा प्रश्न आहे. बाकीच्यांपेक्षा तुम्हीच जास्त चांगल्या पद्धतीने हे समजून घेऊ शकाल आणी उत्तर देऊ शकाल.

कोरोना च्या महासाथी मध्ये पण वारी झाली पाहिजे असा आग्रह धरणारे वीर आहेत आपल्याकडे. >>>>> मुर्ख आहेत ते.

देशाच्या सो कोल्ड विकासासाठी, सहीच्या एका फटकार्याने लाखो एकर जंगल जमीनदोस्त करून त्यातले आदिवासी देशोधडीला लावणे तुम्हाला मंजूर आहे का? ( परत एकदा ,...बरबाद आदिवासींनी व्हावे, शिवाजी कोणाच्या घरात?)>>>>>> अजीबात नाही. उलट प्रकाश जावडेकरांपेक्षा काँग्रेसचे जयराम रमेश हे अतीशय सेंसिबल पर्यावरण मंत्री होते हे माझे ठाम मत आहे. जावडेकर कधी आयुष्यात प्रत्यक्ष भेटले तर तोंडावर बोलण्याचे धाडस आहे माझ्यात.

उत्तम पोस्ट सिंबा.
अपवर्ड मोबिली टी चा वेग वाढवणे सर्वंकष सत्ता हाती आल्यावर आणि जथ्याने विश्वास ठेवणारे लोक असल्यावर थोडे सोपे होते, कारण लाल फितीला बाजूला सारायची ताकद ती देते. पण फोकस त्यावर पाहिजे आणि संकुचित मनोवृत्ती नको. ते सोडून उन्मादी वातावरणात मश्गूल राहण्याचा सगळ्यात जास्त त्रास आणि राग येतो.

कम्युटरचा कच्चा माल किंवा औषधांकरता लागणारा बेसिक कच्चा माल हा चीन मधून येतो हे सर्वांना माहीत आहेच. त्याला पर्याय नाही का? भारताने ब्राझील मधून मागवयाला सुरुवात केली हे वाचण्यात आलेय. माझा मोबाईल (आताचा ३ रा. आधीचा पहिला व आताचा हा सॅमसंग आहे तर दुसरा मायक्रोमॅक्सचा होता)

परत एकदा, ज्या वस्तुंकरता आपण सर्वस्वी चीन वर अवलंबुन आहोत, त्या भारतातच का नाही बनु शकत ? अथवा बनवु शकतो का? हा माझा बेसिक प्रश्न आहे.

चीनने बनावटी मालात मास्टरी केलीय. अमेरीकेतच मागे बर्‍याच वर्षापूर्वी आणल्या गेलेल्या अ‍ॅनिमल फुड मध्ये भेसळ आढळल्याने कित्येक कुत्रे-मांजरींच्या प्राणावर बेतले होते. तेव्हा सरकारने ते बॅन केले होते.

रश्मी यांच्या पोस्ट्स अंतर्विरोधाने ठासून भरलेल्या असतात. हे त्यांचे त्यांना कळणे शक्य नाही. कोणी समजावून ही समजण्याची शक्यता कमी.
सिम्बा +१००.

<चिनी मालावर बहिष्कार का घालु नये असा माझा प्रश्न आहे>
गेल्या सहा वर्षांत आपल्या पंतप्रधानांच्या चीनच्या राष्ट्राध्यक्षासोबत किती भेटी झाल्या? दोघांचे एकमेकांच्या देशांत किती दौरे झाले?
शेवटची भेट कधी झाली? गेल्या डिसेंबरमध्ये. मोदींचा लुंगीतला फोटो आठवा.
पहिल्या भेटीत दोघे झोपाळ्यावर बसले होते तेव्हाच चीनी सैन्य आपल्या हद्दीत किती खोल शिरले होते?

या सगळ्या भेटींचं फलित काय?

भरत , तसेही तुम्ही किती एकांगी विचार करता असता हे तुमच्या अनेक पोस्टस मधुन सिद्ध झालेय. कायम अखलाख अखलाख म्हणून की बोर्ड बडवतांना पुण्यात एका लहान मुलाला पेट्रोल पाजुन कोणी मारले हे पेपर मध्ये येऊनही तुम्ही कधी त्याचा मायबोलीवर निषेध केल्याचे ज्ञात नाही. तुमचा मोदी आणी भाजप विरोध जाहीर आहे.

बुलंद शहरात तथाकथीत गोरक्षकांनी एका पोलीस ऑफिसरची हत्या केली ( ही निश्चीतच घृणास्पद गोष्ट होती ) तेव्हा तुम्ही आणी उदय ( कॅनडा रहीवासी ) कित्येक दिवस किबोर्ड बडवत होता , पण जेव्हा दिल्लीत रवी शर्मा या सिबीआय ऑफिसरची हत्या झाली तेव्हा तुम्ही दोघे तर असे गायब झाला की जसे गधे के सरसे सिंग ! तेव्हा तुम्ही कोणी त्याचा निषेध केलाच नाही उलट मायबोलीच सोडली की काय असे वाटायला लागले होते.

प्रश्न मोदी लुंगीत होते की पठाणी वेषात हा नसुन, मोदींनी संबंध सुधरावे म्हणून किती प्रयत्न केले हा आहे. पण नेहेमीप्रमाणे पिचपिचे विश्वसघातकी निघाले त्यात नवल काय? नेहेरुंचा नाही का विश्वासघात झाला?

मायबोलीवर 3000 आयडी आहेत
त्या वरच्या किंवा कोणत्याही इतर प्रकरणात निषेध न नोंदवणारे हजारो आहेत

Pages