चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भक्तगण आता कसली कसली गणितं मांडतील याचा नेम नाही. पाचशे हजाराच्या नोटा बंद केल्यावर पाकिस्तानात नकली नोटा छापणार हार्ट अटॅक येऊन मेला तसा टिकटॉकचा मालक कधी मरणार याची वाट बघतोय.

ऍप बॅन च्या विरोधात बोलणाऱ्यांनी गलवान घटनेनंतर स्वतःहून मोबाइलमधील किती चिनी ऍप स्वतःहून डिलिट केली किंवा दक्षतेने स्वतःहून किती चिनी माल घेणे बंद केले याची एकदा विचार करावा
काही केले नाही तर काही करत नाही म्हणुन रडणार आणि आता काही केले तर याचा काही उपयोग आहे का, एवढेसे करून काय उपयोग होणार असे म्हणुन पुन्हा रडत बसणार. केवळ एका व्यक्तीला किंवा पक्षाला केवळ करायचा म्हणुन विरोध करण्यापेक्षा एक उत्तम नागरिक या नात्याने चांगल्या कामाचे कौतुकही करूयात.

परत आपण त्याच मुद्द्यावर येतोय,
चीन बरोबर व्यापारी संबंध संपवून/ संपवण्याची धमकी देऊन चीन नमेल असे जर भारत सरकार ला वाटत असेल तर त्यांनी आयातीवर निर्बंध घालावेत,

सरकार काहीच करणार नाही, मात्र सामान्य उद्योजकांनी जोखीम घेऊन कमी किमतीत मिळणारा कच्चमाल घेऊ नये अशी अपेक्षा बाळगायची हा दुटप्पीपणा आहे.

-
अ‍ॅप बॅनचा संबंध चीनशी आणि गलवान व्हॅलीतल्या भारतीय सैनिकाच्या हत्येशी जोडायला सरकारने तसे सांगितले आहे का?

पंप्र म्हणतात आमच्या हद्दीत कोणीही शिरलं नव्हतं. आम्ही काहींना उत्तर दिलं असं म्हणतात पण ते नक्की कोण याचं नाव घेत नाहीत. संरक्षण मंत्र्यांनी सैनिकांना श्रद्धांजली वाहताना एखाद्या देशाचं नाव घेतलंय का?
माहिती प्रसारण मंत्र्यांनी त्या अ‍ॅपवर बंदी घालताना दिलेलं कारणही त्यांच्या ट्वीटमध्ये आहे. त्यातही चीनचं नाव नाही. गलवान व्हॅलीशी संबंध नाही.

टिक्टॉक म्हणतंय बॅन इंटरिम आहे, आमची बोलणी चालू आहेत.

पी एम केअर फंड टिकटॉकने व इतर चीनी कंपन्यांनी दिलेली देणगी परत करणार का?

मुळात या ५९ पैकी फक्त १ किंवा २ अ‍ॅप माझ्या मोबाइलमध्ये असतील .. ती इन्स्टॉल करून मग पुन्हा अन इन्स्टॉल करायला हवी होती का?

आयातीवर निर्बंध घालूनही चीन सहजासहजी नमत नाही.
त्यामुळे देखावा निर्माण करून ' करून दाखवलं' असले पोस्टर लावले की सपोर्टरना चिअर अप वाटतं. एक मुद्दा मिळाला की चिखल चिवडत बसता येतं. तुम्ही काय केलं? थेंबे थेंबे, मा. स्ट्रोक, वाचाळ लोकांची बडबड, आकडेमोड करून पंडित लोकांचे चॅनलवर पुरावे, इतिहासात घडलेल्या घटनांवरून दोषारोप... लै धुरळा!
काही महिने जातील यात. तोवर दुसरा मुद्दा जमेल काहीतरी.
आर्थिक नाड्या आवळणे सोपं नाही. ZaL आपल्यालाही बसते, ती किती वर्षे सहन करणार त्यावर सस्टेंड मारा किती चालेल ते समजेल.

रवीशंकर प्रसाद यांचं ट्वीट
For safety, security, defence, sovereignty & integrity of India and to protect data & privacy of people of India the Government has banned 59 mobile apps.

यातल्या पूर्वार्धाचा संबंध गलवान व्हॅलीशी असेल तर नाव घ्यायला का लाजतात?
डेटा प्रायव्हसी आणि प्रोटेक्शन हे कारण असेल तर ते आताच का लक्षात आलं? भारत सरकारने स्वतः टिक्टॉकवर खातं उघडलं तेव्हा कळलं नाही का?

इथे सरकारकडून नेमकी काय अपेक्षा आहे? Apps बॅन केली ते चुकलं का? करायला नको होती का?
गलवान आता झालं पण मार्चपासून जगभर जे चालू आहे, इतके निष्पाप लोक बळी पडलेत- त्यात दोष ट्रम्प, मोदी व त्या त्या राष्ट्र प्रमुखांचा आहे हे तर मान्यच पण फक्त त्यांचाच आहे का? चायना आणि WHO चा नाही का? करोनाच्या बाबतीत चीनला दोष देऊ नका म्हणून धावून येणाऱ्यांनाही आता चीन शत्रूबित्रु तर नाही ना वाटायला लागलाय?

सरकारने नाव घ्यायला , स्पष्ट बोलायला लाजू नये. --------> हे ४ भिंडीआड बसून बोलणे सोप्पे असते कारण आपण फक्त आपल्या दृष्टीने विचार करून मत बनवत असतो.. सरकारी पातळीवर कारणे, परिणाम आणि वस्तुस्थिती याबाबत जेवढी माहिती असते तेवढी आपल्याला निश्चितच नसते. देश चालवणाऱ्यांना कोणतेही पाऊल उचलण्याआधी सर्व बाजूंचा विचार करून मगच ठरवावे लागते.
म्हणूनच म्हणालो होतो एखादी चांगली गोष्ट सरकार करतंय तर मनापासून पाठिंबा द्यावा. हे नाही केले किंवा हे आत्ताच का केले असं नेत्यांसारखं बोलून काही उपयोग नाही.

सरकारने चीनचे नाव घेऊन confront करावे आणि बॉर्डरवरची परिस्थिती escalate व्हावी अशी इच्छा आहे का? तसं होणं भारताला आज घडीला परवडणार आहे का?

की त्यापेक्षा सध्या फक्त self defense आणि परिस्थिती diffuse करणे, बोलणी- वाटाघाटी सुरू ठेवणे हे योग्य राहील?

करोना असो वा हाँग काँग चा प्रश्न असो, कोणतीही बलाढ्य फर्स्ट वर्ल्ड पॉवर आज चीनशी पंगा घेऊ इच्छित नाही हे दिसतं आहे. भारत चीन युद्ध झालं तर अमेरिकेला वगैरे बरंच वाटेल कारण स्वतःचं नुकसान न होता चीनला शह मिळेल वर भारताला weapons विकता येतील.
त्यामुळे मोदींनी भाषणातही चीनचा उल्लेख न करणं वगैरे मला पटतंय.

अहो ते मला ही पटतंय. पण नेहेमीचे फुशारक्या मारणारे बिळात शेपुट घालुन गेल्यावर त्या वल्गनांची यथेच्च टर उडवुन पुरेसे जोक तर करुदे! Rofl

रुपया प्रधानमंत्री की गरिमा होती है

आता काय मरी मॉ झाली काय ?

कोरोनाची औषध बनविलीच नाही _रामदेव
चीन घुसलाच नाही _मोदी

#हे_काय_देशाला_सांगणार ?

Proud

म्हणूनच ह्यांना कोर्ट बोलले होते - 2 जी घोटाळा झालाच नाही.

भास झाला होता म्हणे

ओके. मग मोदी आणि भाजपच्या इतर भाजपीय नरपुंगवांनी मे २०१४ पर्यंत तत्कालीन सरकार वर केलेली टीका , लाल आँख, छप्पन इंच का सीना, किसीकी जुर्रत नहीं होगी, नेहरूंचं दैनंदिन श्राद्ध या सगळ्यांचं काय करायचं?

आम्ही काही या सरकारवर टीका करत नाही. फक्त मोदी, गडकरी इत्यादींच्या तेव्हाच्या भाषणांच्या क्लिप्स छप्पन इंची सरकारला उद्देशून वाजवतोय.

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि सैन्यदल जे बोलत होते तेच ( कोणी आलं नाही, काही झालं नाही) आज मोदी बोलताना पाहून फार वाईट वाटलं. वर मोदींचं हे वक्तव्य चीनी माध्यमांनी उचलून धरलं. म्हणजे मोदी चीन की भाषा बोल रहे थे असं झालं का?

आता परिस्थिती बरीच वेगळी नाहीये का? 1962 किंवा 2008 पेक्षा?

जिथे अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया युके जर्मनी सारखे बलाढ्य देश शेपूट घालून बसले आहेत तिथे भारताने नसतं adventure कशाला करावं?

जिथे अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया युके जर्मनी सारखे बलाढ्य देश शेपूट घालून बसले आहेत तिथे भारताने नसतं adventure कशाला करावं?>>> असहमत. सध्या सगळ्यात बलाढ्य देश भारत आहे. याला कारण म्हणजे मोदीजी यांची सर्जिकल स्ट्राईक्स. मोदीजी एका रात्रीत सर्जिकल स्ट्राईक्सचा मास्टरमाइंड प्लॅन आखतात. सकाळी शत्रूराष्ट्र झोपेतून उठले की सगळं बेचिराख झालेलं असतं. विशेष म्हणजे आता पावसाळ्यात ढग भरपुर आहेत त्यामुळे मोदीजीना विमान लपवण्यासाठी आकाशात ढग येण्याची वाट पाहावी लागणार नाही.ही गोष्ट चीनच्या लक्षात आली असून ते घाबरले आहेत.

अगदी मागच्याच वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर/कटानंतर आपल्या देशात मोठा युद्धज्वर उसळला होता/उसळवला गेला होता. येथील बऱ्याच लोकांनी तेव्हा आता बस म्हणजे बस, युद्धच पाहिजे अश्या प्रतिक्रिया दिलेल्या अजूनही आठवतात. यावेळी मात्र सर्व सर्व शांत आहे. समोरील शत्रु बलाढ्य असल्याने युद्ध नको अशी भूमिका बहुतेकांची दिसते. युद्ध तर वाईटच पण मग समोरील शत्रुवरून आपली देशभक्ती कमी जास्त होत असेल तर काय उपयोग ? कारण अन्याय हा अन्यायच त्यामुळे युद्धसाठी मी आपल्या महामहीम पंतप्रधानांच्या पाठीशी आहे. त्यांनी बालाकोट सारखा स्ट्राईक आता करायलाच पाहिजे आणि चीनला वठणीवर आणलेच पाहिजे. पुढच्या महिन्यात राफेल मिळाल्यावर आमचे साहेब नक्की काहीतरी करतील. कुछ बडा होनेवाला है. ऍपबंदी तो बस झाकी है, असली खेल अभी बाकी है. जय मोदीजी, जय हिंदू राष्ट्र.

सरकार काहीच करणार नाही, मात्र सामान्य उद्योजकांनी जोखीम घेऊन कमी किमतीत मिळणारा कच्चमाल घेऊ नये अशी अपेक्षा बाळगायची हा दुटप्पीपणा आहे.>>>>> तेच ना! स्वतः काही करायचे नाही आणी वेळ मिळाला की सरकारच्या नावाने शिमगा करायचा. शिवाजी महाराज दुसर्‍याच्या घरात जन्माला यावे असल्या विचारसरणीचा हा देश ! त्यातुन उडाणटप्पु ( आय डी नव्हे ) ला वेळ मिळाला की तो एक टप्पा आउट ची प्रॅक्टिस करतच असतो.

चिनी अ‍ॅप बॅन झाले ही सुरुवात आहे. हळु हळु आपण प्रयत्न का नाही करायचे? की नुसती टिकाच करत रहायची? नाही, त्यात आपण नंबर वन आहोतच म्हणा.

<<सरकार काहीच करणार नाही, मात्र सामान्य उद्योजकांनी जोखीम घेऊन कमी किमतीत मिळणारा कच्चमाल घेऊ नये अशी अपेक्षा बाळगायची हा दुटप्पीपणा आहे.>>>>> तेच ना! स्वतः काही करायचे नाही आणी वेळ मिळाला की सरकारच्या नावाने शिमगा करायचा>>

या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे? असेल असेल!

मोदी सरकार टीका करण्यात नंबर १ आहे, याच्याशी सहमत. अजून नेहरूंवर टीका करत बसलेत. कारण स्वतःला काहीही करता येत नाही, हे कळून चुकलंय.

पुन्हा एकदा - मोदी बालाकोट नंतरच्या इम्रानची भाषा बोलताहेत. आणि चिनी प्रसारमाध्यमे त्यांचे म्हणणे उचलून धरताहेत.
देशात मारे वल्गना करायच्या , मतदारांना आपली ५६ इंची छाती दाखवायची , वेळ आली तर ती ५६ सेमी आहे हे कळू नये म्हणून पाळलेले कुत्रे सोडायचे.

मोदींनी पुन्हा एकदा सैनिकां चे हौतात्म्य निवडणुकीत वटवायचा बेत आखलाय.
हि प्र च्या प्रचारात म्हणाले तुमचे सैनिक काश्मीरमध्ये मरतात.
पुलवामाच्या हल्ल्याच्या चौकशीचे नाव नाही. त्या जवानांच्या चितांवर लोकसभा निवडणुकीची पोळी भाजली.
काश्मीरमधल्या अतिरेक्यांसोबत सापडलेल्या बड्या पोलिस अधिकार्‍यावर साधा एफ आय आर दाखल केलेला नाही.
आताचे सैनिक बिहारचे आहेत.

असा पंतप्रधान भारतातच काय, जगातही कुठे झाला असेल का याबद्दल शंका आहे.

चिनी अ‍ॅप बॅन झाले
बॅन म्हणजे नक्की काय?
- कुणाच्याकडे दिसले की दंड?
- रिपोर्टिंग करणार्याला बक्षिस?
-भारत सरकार दुसरे एक अ‍ॅप सरकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक करणार, ते चिनी अ‍ॅपस आहेत का शोधणार?
-ट्रंपशी बोलून गूगल स्टोरमधून काढायला लावणार?
- केवळ घंटानाद आहे?

भारताच्या दणक्यानंतर तिकडे चीनने चिंता व्यक्त केलीय आणि इथे चीनच्या प्रेमात पडलेले म्हणतात काहीच फरक पडणार नाही. Lol

Pages