मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल खिडकीवर कबुतरं बसली होती...
मि त्यांना हाकलत होते तर ती मान वळवून माझ्याकडे दुर्लक्ष करत होती. तेव्हा मी त्यांना रागाने ' excuse me' म्हणाले. नंतर लक्षात आल्यावर एकटीच खुप वेळ हसत होते. Happy

आता एकटीच म्हटल्यावर कबुतरांचा काय संबंध येतो? कैच्या कैच !

वाचा 'सुलभ मराठी व्याकरण' ले.भिलारे गुरुजी. Proud

जॉइन झाल्यावर महिन्याभरात आमचे २५-३० जणांचे आठवडाभराचे induction training होते (मुंबईतच). एक आम्हाला ५ वेगवेगळ्या गटात टाकले आणि वेगवेगळ्या जागी बसून रोल प्ले करायला सांगितले..आमच्या गटाला (हैद्राबाद ब्रँच ऑफिस)जी केबिन मिळाली तिथे फोन वाजला. आम्ही विचार केला की रोल प्ले मधे महुतेक आमचे ट्रेनिंग देणारे पण सामील आहेत. फोने उचलून 'हॅलो, हैद्राबाद ब्रँच ऑफिस' असे अगदी स्टाइल मधे म्हटले...समोरचा माणुस उडाला की मुंबईतला लोकल फोन हैद्राबाद्ला कसा लागला. पण त्याने चिकाटी ठेवून 'अमुक तमुक' साहेब आहेत का विचारले...ते आम्हाला त्यादिवशी ट्रेन करायला आलेले साहेबच होते..त्यांना बोलवले,आणि ते फोनवर बोलत असेपर्यंत कसेबसे हसू दाबून धरले.
हा सामूहिक वेंधळेपणा.
आता माझा एकट्याचा. मी a/cs सांभाळायचो. आमच्या शेजारीच उघडलेल्या नवीन बँकेच्या शाखेत ऑफिसची खाती उधडली. त्यांनी पाठवलेले पत्र भिंतीवर डकवले होते.एकदा बँकेत फोन करायचा म्हणून त्या पत्रातला नंबर पाहून झीरो डायल करून तो नंबर दाबला...तर आमच्याच ब्रँच मॅनेजर कडे गेला. सॉरी म्हणून ठेवला. पुन्हा केला, पुन्हा तसेच्...मी म्हटले की इन्टरकॉम यंत्रणेत बहुधा गडबड आहे..तिसर्‍यांदा केला....पुन्हा तेच.
मग म्हटले दुसरा नंबर बघुया तेव्हा कळले की बँकेच्या पत्रात कस्टमरचा (म्हणजे आमचा )फोन नंबर नोंदवला होता. पुन्हा शाखाप्रमुखाचा डायरेक्ट नंबर त्यामुळे तो लक्षातही नाही.

एकदा फॅक्स पाठवताना,आपलाच नंबर दाबला, आणि ५-६ वेळा रिडायल पण केला.
(फॅक्स वर ज्याला पाठवायचा त्याचा नंबर, आणि पाठवणार्‍याचा नंबर हे दोन्ही टाकायची पद्धत होती.)

मुंबईत बेस्ट बसने जाताना हव्या त्या नंबरची पण उलट दिशेची बस पकडणे अनेक जण करतात (मी पण).
स्टेशनवर उतरल्यावर तंद्रीत धी कधी पूर्वेऐवजी पश्चिमेला किंवा उलट असेही होते .

मी मुंबैत नवीन आले होते ते ही हैद्राबादेस्न. टाउन मध्ये इंटरव्ह्यू ठरला म्हणून आदल्याच दिवशी कसे जायचे ते बघायला मुलुंड स्टेशन वर गेले. तिथे एका स्टॉलवाल्याला विचारले वो व्हीटी जानेवाला लोकल ट्रेन कब आयेगा? तो वैतागलाच. तो म्हणे तुमको कब जाने का है. मी: साडेदहा. तो: दस बजे आजाओ इधर हर दस मिनिट को लोकल है पहिला लोकल ३:४४ को निकलता है. ( मला हे खरेच माहित नव्हते) मग घरके बुद्दू घरको वापस. घरी पण सगळे हसले. बर नोकरी मिळाली. रोज व्हीटी ते लायन्स गेट बस ने. पहिल्या दिवशी ड्बल डेकर मध्ये चढ्ल्यावर एक क्षण गोंधळ झाला वर चढून जावे कि पुढे पळ्त जावे. तोपरेन्त मागे सराईत मुंबै कर वैतागले. एक माणूस म्हणे. "बाईंनी सेंट्र्ल अन वेस्टर्न दोन्ही जाम केलाय. " मी लहान पणी एकदाच त्या मुंबैच्या डबल डेकर मध्ये बसले होते तेव्हा बाबांनी वर बसवलेले व बसताना एक क्वालिटीचा आइस्क्रीम वाला बॉल हातात दिलेला. या अनुभवावर मुंबैची बस कशी पकडणार! आता मुंबैत हिंड्ताना मला नेहमी वरील विनोद आठवतो. Happy

"बाईंनी सेंट्र्ल अन वेस्टर्न दोन्ही जाम केलाय. "
Lol

मुंबईत बेस्ट बसने जाताना हव्या त्या नंबरची पण उलट दिशेची बस पकडणे अनेक जण करतात (मी पण).
स्टेशनवर उतरल्यावर तंद्रीत धी कधी पूर्वेऐवजी पश्चिमेला किंवा उलट असेही होते .

एक किस्सा आठवला यावरुन...
मला एकदा वेळा घाट्कोपर्ला उतरुन अंधेरी कढे कुठेतरी हुडको सोसायटीला जायचे होते. मग स्टेशन वरुन बाहेर आल्यवर बस स्टॉप वर एकाला विचारुन हुडको साठी बस पकडली. हुडको सोसायटीत थोडं आत गेल्यावर मित्राला फोन केला. त्याला सांगितले कि अमुक अमुक दुकाना जवळ मि उभा आहे घ्यायला ये. ५ मि. नि फोन आला, कुठे दिसत नाहियेस. मग मी अजुन एक दोन शेजारच्या खुना सांगितल्यावर म्हणाला अरे इथे तसलं काही नाहिय.. Sad
मग पुर्ता गोंधळ.. Sad तोच म्हनाला नंतर की तु कदाचीत मागच्या गेट जवळ असशील. थांब तिकडं येतो मिच. , परत १० मि. फोन.. अरे इकडं सुद्ध कुठं दिसत नाहिय्स.. मी वैतागुन अमुक अमुक दुकानाजवळच तर उभा आहे. मग या दिशेला काय आहे. त्या दिशेला काय आहे. थोडं इकडं चालुन बघ मी दिसतो का... वगैरे वगैरे केलं अम्ही... एवध्या सगळ्यात विस एक मिनिटं गेली... Sad
मला शंका यायला लाग्ली म्हनुन मि दुकान दाराला विचार्लं सुद्धा की हे हुडकोच आहे का म्हनुन.. Uhoh तो हो म्हनाला. परत वैताग. मित्राला विच्रार्ल कि दोन दोन हुडको आहेत का ? Angry त्याला चुक जानवल्यावर त्याने मी कोनत्या बसने कसा व कुठुन कुठुन आलो ते विचार्ले. येताना काय काय दिस्ले तेहि विचार्ले. त्यावरुन निश्कर्श निघाला कि मी दुसृया कोनत्या तरी (कुठेतरी) हुडको सोसायटीत आहे... Proud
तिथुन फिरुन परत घाटकोपर, मग फिरुन अंधेरी बस.... Proud एवढ्या सगळ्यात २ तास गेलेले.. Proud

मल्ल्या Lol

माझ्या साबा अशीक्षीत आहेत. स्वारगेटला उतरल्या की कुणाला तरी विचारुन आनंदनगरच्या बसमधे बसतात. आणि आनंदनगरला उतरतात. एकदा चुकुन कोथरुडच्या आनंदनगरला गेल्या Sad

तेव्हा आम्हाला कळाले सिंहगड रोड आणि कोथरुड असे २ आनंदनगर आहेत Angry

परवचा किस्सा

अधिक महिन्या निमित्त ननंद , नंदाइ आले होते जेवायला. आमच्याकडे पुरुषांना ओवाळताना त्यांच्या डोकावर टोपी घालतात. नंदेच्या नवर्‍याला माझा मुलगा मामा म्हणतो.

मी म्हणाले "बाळा, मामांना टोपी घाल"
मामा : " घाला मामाला टोप्याच घाला"
सगळे हसले.. मला थोडा वेळ कळालेच नाही Angry

वर्शा.. Lol

इथे दोन दोन नगर आहेत म्हनुन वेंधळेपना होतो... माझ्या मित्राचा किस्सा सांगतो थांब....
आम्ही कोल्हापुरला कॉलेजला अस्तनाचा किस्सा. कॉलेजच्या दिवाळी सुट्टीत आम्ही सोलापुरला आलेलो. नंतर सुट्टीत काही मित्र कंपनी तुळजापुर-अक्कलकोट फिरायला प्लॅन करुन आलेले. तेव्हा अजुन अमच्या कडे मोबाईल्स नव्हते. त्यांनी कोल्हापुर वरुन निघताना माझ्या मित्राच्या घरी फोन करुन सांगितले, तेव्हा मित्राने सांगितले की तुम्ही सोलापुर स्तँड्ला आल्यावर फोन करा घ्यायला येइन. मित्र कंपनिने तुळजापुर ला दर्शन वगैरे घेउन झाल्यावर सकाळी ११ वाजता तुळजापुर स्टँड्वरुन कॉईन बॉक्स वरुन मित्राच्या घरी फोन करुन सांगितले की आम्ही तुळजापुर स्टँड वर आहोत. मित्राने सांगितले की सोलापुर स्टँड वर तुळजापुर गाडी थांबते तिथं मी वाट पाहतो, तुम्ही या... Uhoh त्यांनी ठीक आहे म्हनुन फोन ठेवला... हा मित्र घराला कुलुप घालुन सोलापुर स्टँड्वर पोचला. सोलापुर स्टँड्वर तुळजापुर गाडी थांबते तिथे जाउन वाट पाहुलागला. तिकडे ते सगळे मित्र तुळजपुर स्टँड वर सोलापुर गाडी थांबते तिकडे वाट पाह्त उभे..... इकडे हा विचार करतोय की मला स्टँड वर पोचायला अर्धा तास गेला म्हंजे अजुन अर्ध्या तासात ते सोलापुर स्टँड वर येतील. तिकडे ते विचार कर्र्ताय्त कि अजुन अर्धा एक तासात तो मित्र तुळजापुरला येईल.. Uhoh
उभय मंडळी एकमेकांची वाट पाहत एकमेकांपासुन ४५ किमी दुर स्टँड वर उभे. एक तासाच्या वर झाले अजुन आला नाही म्हनुन त्यांनि परत मित्राच्य घरी फोन लावला, उचलायला घरी कोन नाही... Sad
इकडे सोलापुरातला मित्र त्यांची वाट पाहत २-४ पेपर विकत घेउन वाचले, एक मॅगेझीन घेउन वाचलं.. Uhoh तरी येत नाहीयत म्हंजे गाडीला प्रोब्लेम झाला असेल म्हणत कळ काधत होता... Proud
तिकडे ते दर एक १५ मि. नि घरी फोन ट्राय करत होते. सुदैवाने घरी मित्राचे वडील परत्ल्याने त्यांनि फोन रिसिव केला. मग त्यांचं बोलणं झालं... नंतर झालेला गोंधळ लक्शात आला. Proud तो पर्यंत संध्याकाळचे ४ वाजलेले...
इक्डे सोलापुर स्टँड वरचा मित्र वैतागुन परत घरी आल्यावर झाला प्रकार कळला... तेव्हा त्याला हसावं कि रडावं कळत नव्ह्तं.. आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा हसुन हसुन मेलेलो.. आजही या विशयातुन त्याची खेचत अस्तो आम्ही.. Happy

मल्ल्या तुझ्या मित्रांना पण _/\_
माझा नि मित्रांचा अजुन एक किस्सा आहे... सांगेन केव्हा तरी परत... Wink
दंडवत घालशील... कारण तेव्हा तर मोबाईल सुध्दा होते... Proud

काल नवर्‍याला हपिसला निघतोयस तर जाताना कचर्‍याची पिशवी बाहेर ठेवून जा असं सांगितलं तर नवर्‍याने कचरा एकत्र केला आणि पिशवी बाहेर घेऊन गेला. इकडे कचर्‍याच्या वेळेला कचरावालीनी बेल वाजवली तर मी तिला विचारते इथे ठेवली होती ना पिशवी आता काय परत... Happy
आज सकाळी नवर्‍याला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की त्याने तंद्रीत कचर्‍याची पिशवी दाराबाहेर न ठेवता हपिसापर्यंत तशीच नेली. नशीब हपिस ४ गल्ल्या पलिकडेच, ५ मिन चालत च्या अंतरावर आहे आणि नवर्‍याला कुणी बॉस नाही.

बर हे सांगताना त्याने स्वतःचा अजून एक किस्सा सांगितला.
'असं एकदा दळण घेऊन आलो होतो मी माहीतीये का! आईने घरातून निघताना दळण टाकायला दिले. मी वेस्टहून ब्रिज चढून उतरून पार पार्लेश्वरापर्यंत पोचलो तेव्हा माझ्या अचानक लक्षात आलं की एवढं जड काय हातात मग बघितल्यावर आठवलं दळण टाकायचं होतं. वैतागलो.. परत गेलो तसाच दळण टाकलं आणि परत आलो... '

Happy

नीरजा, रविवारी आडो गटगला अस आमच झालं. कचरा पिशवीत भरला आणि वाटेत टाकु कचरा कुंडीत म्हणत म्हणत घरापर्यंत आणला Proud शेवटी घरातल्या कचर्‍याच्या पिशवी बरोबर दुसर्‍या दिवशी कचरेवाल्याला दिली ती पिशवी Proud

विचार चांगला आहे..... आता मीही पाकिट न काढायचेच ठरवले आहे, इतरांना पैसे देणे - बिलं भरणे वगैरे गोष्टींमध्ये लक्ष घालू द्यावे, आपण त्या फंदातच पडू नये Proud पाकिट न हरवण्याचा, वेळेवर सापडवण्याचा आणि त्यात पैसे सतत राहण्याचा हा नामी उपाय मला आवडला Happy पर्समधून पाकिटच बाहेर न काढणे!!!!!
पण..... आता ही पर्स कुठे ठेवली बरं? Uhoh

काल संध्याकाळी चहा घेतला आणि टिव्ही पाहण्यासाठी बाहेर आले.दिवाणवर रिमोट नव्हता.त्याच्या possible ठिकाणी पाहिले...दिवाणखाली,फोनजवळ,टिव्हीमागे,वोशिंगमशिनवर्,बेडवर,किचनकट्ट्यावर,फ्रिजवर..... कुठेच नाहि मिळाला.
मग आठवले दुपारि जेवताना आपण टिव्ही पाहिला होता.मायबोलीकरांच्या अनुभवावरुन फ्रिजमधे चेक केलं,कुकरमध्येसुध्धा चेक केलं.पण रिमोट नाहि मिळाला. Sad

रात्रि टोवेल घेण्यासाठी कपाट उघड्ले. टोवेलखाली रिमोट होता.

दुपारि जेवणानंतर कपड्यांच्या घड्या घातल्या होत्या.त्यातुन जावून रिमोट कपाटात लपला होता. Happy

जयु.. Biggrin

काल एक फोन आला, मी उचलला आणि लाडात बोलू लागले 'क्यूं आज इतने दिनों बाद मेरी याद आयी..." वगैरे वगैरे...
पलिकडून काहितरी पडल्याचा आवाज, खाकरणं.... इ.
मग मी भानावर... एचडीएफसी चा की अकाऊंट मॅनेजर ने मला बॉसच्या कामासाठी फोन केला होता... आणि मी असला आचरटपणा केला Angry
इन फॅक्ट माझा थोडा घोळ झाला, त्याचं नाव आणि माझ्या एका मित्राचं फर्स्ट नेम सेम, आणि आडनावाचं पहिलं अक्षर सेम होतं. तो तर बिचारा आऊट झाला तिकडे. Uhoh

दक्शे.. Lol Rofl

माझ्या बाबांची गंमत्...त्यांना कुठेही जाताना आपल्याबरोबर कोणी आहे, याची आठवण नसते, किंवा आपली बायको आणि मुलगा आपल्यामागून निमूट चालताहेत याची खात्री असते. माझ्या लहानपणी आईबाबांबरोबर बाहेर जायचे म्हणजे रस्त्यात काही विकत घेण्यासारखी वस्तू दिसली म्हणून थांबलेल्या आईला 'चल लवकर' आणि बाबांना 'थांबा' असे म्हणून दोघांना एकत्र जोडून ठेवायचे कामे मी करणे.

काही वर्षांपूर्वी मी इंदूरला बदली होऊन गेलेलो असताना ऑफिसच्या मीटिंगसाठी मला मुंबईला यायला लागायचे. तेव्हा मी अर्थात घरी बोरिवलीलाच उतरायचो. एकदा मी परत जाताना बाबा मला एअरपोर्टवर सोडायला आले. सकाळी सहा पूर्वी आम्ही दोघे बोरिवली स्टेशनला पोचलो.माझ्या हाती एक बॅग आणि एक त्यांच्याकडे, ते तिकिट काढेतो मी वाट पाहतोय, आणि ते येताना दिसले म्हणून फलाटा(क्र.१)कडे वळलो, तर तिथे नेहमीच्या चर्चगेट लोकलऐवजी विरार लोकल्(उलट दिशेला जाणारी)लगेच पुढली चर्चगेट लोकल कुठल्या फलाटवर येणार ते बघायला मी मेन इंडिकेटरकडे वळलो, तर बाबा गायब. त्यांना १० मिनिटे शोधून, दुसरे तिकिट काढून विमानतळावर पोचलो तर तिथे हे हजर. तेव्हापासून कानाला खडा- मला फक्त घराच्या दारात निरोप द्या.

आमच्या कडे पूर्वी दोन भांड्यांचा मधे मातीचीकँडल असलेला वॉटर फिल्टर होता. एकदा बाबांना काम करायची हुक्की आली. त्यांनी पाहिले कि फिल्टरच्या वरच्या भांड्यात पाणी नाही. भरून मोकळे झाले. खालचे भांडे आधीच फिल्टर्ड पान्याने भरलेले होते ते पाहिले नाही, मग घरात छान तळे नाही तरी डबके झाले.

Pages