Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुढच्या मॉल वर पार्टी देईन
पुढच्या मॉल वर पार्टी देईन सगळ्यांना >>>:d
(No subject)
किरू ........! तुला कसं काय
किरू ........! तुला कसं काय कळलं? ( बरोब्बर?)
अनुभवाचे बोल अस्तिल अनिक
अनुभवाचे बोल अस्तिल अनिक कै....
है ना किरु ?
सकाळी ऑफिसला येताना डोळ्यावर
सकाळी ऑफिसला येताना डोळ्यावर चस्मा अस्ताना टि-शर्ट घातला.. :आओ: लवकर लक्शात आल्याने चश्म्याचे ३-१३ वाजता वाजता वाचले.
डोळ्यावर चश्मा ठेउन नेहमीच अस्ले उद्योग घडतात माझ्याकडुन..
उदा...
१] टि-शर्ट घालने/काढने.
२] तोंडाला फेस वॉश लाउन तोंद धुवायच्या ऐवजी चश्माच धुतला जाने.
३] डोक्याला तेल लावने...
४] अंधारात चश्मा डोळ्यावर आहे की नाही ते न समजल्याने डोळे हाताने चपापने.
५] चश्म्या सकट झोपी जाणे.
चष्मा हरवणे, विसरणे, भलत्या
चष्मा हरवणे, विसरणे, भलत्या जागी ठेवणे इ. इ. विसरलास काय?
डोक्याला तेल लावने... >>>
डोक्याला तेल लावने... >>> मल्ली डोक्याला तेल लावताना तुझा चष्मा मध्ये येतो का ?
"चश्मा लावुन मुन्डावळ्या
"चश्मा लावुन मुन्डावळ्या बान्धणे" राहुन गेले बहुतेक्.....
चपापने. >> मल्ल्या.. तुला
चपापने. >> मल्ल्या..
तुला चाचपणे म्हणाय्चय का?
डोक्याला तेल लावने... >>>
डोक्याला तेल लावने... >>> मल्ली डोक्याला तेल लावताना तुझा चष्मा मध्ये येतो का ?
चश्मा नाही येत, पण चश्म्याच्या काड्या तर येतात ना..
काल रविवार, सुट्टीचा रविवार
काल रविवार, सुट्टीचा रविवार दिवस....
दोन-चार ओळी म्हणुन झाल्यावर कळ्ळं की मी काय घोळघालतोय ते...
कम्प्युटर वर मस्त विंग्रजी गाणे लाउन कामं चालु होती. आंघोळी नंतर देवा समोर दिवा लावण्यासाठी गेलो. शांतपणे काढी ओढली नि दिवा लावत लावत मंत्र म्हणायचं सोडुन चालु असलेलं इंग्रजी गाण्याचे बोल पुटपुटायला लागलो
काल दुपारी जेवायला गेलेलो
काल दुपारी जेवायला गेलेलो मित्रमंडळी सोबत...
बाहेर येताना, मैत्रिणिने मेनुकार्ड सोबतच आणलेले. तेही पार्कींग च्या इथे गेल्यावर माझ्या लक्षात आले. मग काय नसता गोंधळच, आम्ही हसायला लागल्यावर तिला सुधरेनाच. मग गप हळुच मागे जाउन तिने वेटींग प्लेस मध्ये एका खुर्चीत ठेउन आली 
सकाळी Demat A/cला ICICIमधून
सकाळी Demat A/cला ICICIमधून online transfer करत होतो... authentication code साठी Debit Card काढले आणि 6 digit code type केला. authentication failedचे थो.फो. उत्तर मिळाले.. परत एकदा प्रयत्न केला... परत थो.फो. उत्तर
रागात ICICI कष्ट+मर Serviceला फोन केला आणि झाल्या प्रकाराची माहिती दिली... "Sir, sorry to bother you, but u hv to apply for fresh debit card" परत एकदा थो.फो. उत्तर
तडक उठलो आणि असेल नसेल तेव्हढे पैसे काढून ICICI Account बंद करू म्हणून ATM मधे गेलो... जल्ला तिथे पण Zero Balance चे थो.फो. उत्तर समोर येताच पाया खालची जमिनच सरकली... काय घोळ आहे काही कळेचना... म्हणून ATM machine मधून Card बाहेर काढले... भेदरलेल्या नजरेने card हातात घेतले तेव्हा त्यावर HDFC ची चार अक्षर झळकत होती...
त.टी. : सगळ्या कार्डांना एकच परवलीचा शब्द ठेवण्याचा असाही तोटा सहन करावा लागतो...
इंद्रा...
इंद्रा...
मल्लि .....तुम्हि तर
मल्लि .....तुम्हि तर वेन्धळेपणाची शृन्खलाच चालवलिये........
मल्ली.. तुम्ही तर एकच वल्ली
मल्ली.. तुम्ही तर एकच वल्ली आहात
तुमच्यामुळेच हा बीबी चाल्लाय 
इंद्रा (पायाखालची जमीन
इंद्रा
(पायाखालची जमीन सरकलेला तुझा चेहरा इमॅजिनला मी.. :हाहा:)
इंड्रा बावळट
इंड्रा बावळट

मल्ली इंद्रधनुष्या...... काय
मल्ली
इंद्रधनुष्या...... काय हालत झाली असेल!
काय हालत झाली असेल! >>>
काय हालत झाली असेल! >>> IDवरचे सप्तरंग उडाले होते... :p
>>>>IDवरचे सप्तरंग उडाले
>>>>IDवरचे सप्तरंग उडाले होते...
फक्त ओरिजिनल रंग उरला होता.. ओळखा पाहू??
(No subject)
काल मी वाशीला एक मित्र येणार
काल मी वाशीला एक मित्र येणार होता म्हणुन थांबले होते. इतका वेळ काय करायचं म्हणुन सेंटर वन मॉलमध्ये फिरत होते. इतक्यात मायबोलीकर अमित देसाईचा कॉल आला. समोरच 'पॅन्टालुन'चं शोरुम दिसलं तिथे गेले. अमितसोबत बोलत बोलत फिरत होते. आधी ऑफिस बॅग्ज पाहील्या, मग वॉलेट्स पाहीली, त्यानंतर लेडीज वेअर, किड्स वेअर सगळे सेक्शन फिरले. अमितचा कॉल आटपला आणि बराच वेळ झाला म्हणुन म्हटलं आता निघुया. एक्झिट शोधतेय तर सापडेनाच. सगळे सेक्शन्स परत पालथे घातले, जिथुन आले तिथुन फिरुन पाहीलं, तरी जाम भेटेचना बाहेर पडायला. काय करु न काय नको असं झालं अगदी. कूणाला विचारावं तर कमीपणा. सगळा स्टाफ बघतोय, ही अशी काय परत सग़ळे सेक्शन्स फिरतेय. शेवटी एकदाचं बॅगेज काऊंटर दिसलं. म्हटलं इथे तरी जाऊन पाहु सापडतंय का एक्झिट ते. थोडसं पुढे जाऊन पहाते तर काय वर छान पाटी लिहीलेली 'EXIT'
यो आता तिथे अजून एक पाटी
यो
आता तिथे अजून एक पाटी लागली आहे - EXIT ची पाटी तिकडे आहे.
हा मॉल पुण्यातला असता तर
हा मॉल पुण्यातला असता तर नक्किच "EXIT ची पाटी ईकडे आहे, उगाच सगळीकडे विचारत फिरू नये" अशी पाटी दिसली असती. हाहा
नुकतीच गंगटोकला जाऊन आले .
नुकतीच गंगटोकला जाऊन आले . एका ठिकाणी जेवायला गेलो तर त्या वेटरशी मी मराठीत बोलायला लागले. वेटर हैराण त्याला कळेचना मला काय सागायचय ते आणि वर मी त्याला धमकावणीच्या सुरात सांगत्ये "महाराष्ट्रात रहायच असेल तर मराठी बोलला नाहीस तरी निदान समजल तरी पाहीजेच" नवरा कसानुसा झाला .
मग थोड्या वेळानी मी भानावर आले मेरे महाराष्ट्रापासुन खुप खुप दूर आहे
आणि असे प्रसंग हल्ली माझ्या बाबतीत वारंवार घडायला लागलेत. फारच मराठी आग्रही झाल्ये
योडे, मने
योडे, मने
मने पण तुझ्या महाराष्ट्र
मने
पण तुझ्या महाराष्ट्र प्रेमाचा अभिमान आहे ! 
योडे, मने
योडे, मने
मनिषा, दक्षिण भारतात फिरायला
मनिषा, दक्षिण भारतात फिरायला जाऊ नका, नाहीतर ते तुम्हाला तिथली भाषा शिकल्याशिवाय पाठवणार नाहीत.
Pages