Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टारगटच्चेय!! लले आधी खूप हसले
टारगटच्चेय!!
लले आधी खूप हसले पण ४+ मजल्याच्या बिल्डिंगीत ४+ वरच्या मजल्यावर रहात असेन तर मी हेच करेन हे लक्षात आलं मला...
किरु, नीधप
किरु, नीधप
मानुषी << नंतर हळूहळू
मानुषी << नंतर हळूहळू त्यांना(नणंदेच्या मिस्टरांना) नावही आलं >>
ललिता
हाच प्रकार मी हापिसात करुन
हाच प्रकार मी हापिसात करुन मोकळी झालेय. २ फ्लोअर समजुन पहिल्यावर उतरुन अगदी माझ्या डेस्कपर्यंत गेले होते आणि समोर LCD मॉनिटर पाहुन विचार करतेय, च्यायला कंपनी एका रात्रीत इतकी श्रीमंत झाली कि सगळीकडे LCD मॉनिटर लावलेत. थोड्या वेळाने फर्निचरचा कलर पाहिला आणि लक्षात आलं वेगळ्याच फ्लोअरला आहे ते. बाहेर पडताना सिक्युरिटी गार्डसुद्धा हसत होता..
यो
यो
(No subject)
यो
यो
योडे सेम पिंच आमच्या
योडे सेम पिंच



आमच्या प्रोजेक्टची इंटर्नल मिटींग असेल तर आम्ही नेहमीच आमच्या फ्लोअरवरची (सेकन्ड फ्लोअर) बोर्ड रूम बूक करतो. Q1 च्या मिटींगीला ३र्ड फ्लोअर बोर्ड रूम मिळाली. मी अॅरेन्जमेन्ट्स नीट झाल्यात का पहायला वर गेले, तिथे बॉस ने सांगितले ताबडतोब डेस्क वर जाऊन स्कोरकार्ड पाठव, मि निघून थेट ३र्या मजल्यावरच्या बी विंगेत प्रवेश घेतला... आणि (सो कॉल्ड)माझ्या डेस्कवर दुसरंच कोणतरी बसलेलं पाहून, त्याला दामटून रिकामी... "हॅल्लो, धिस इज माय डेस्क... "
तो खुळाच झाला...
मग माझ्या लक्षात आलं हळू हळू की आपण मजला चुकलो (केड्यासारखा) मग धावत खाली आले...
दक्षे, तू फोनवरून कोणाशीही
दक्षे, तू फोनवरून कोणाशीही लाडीक लाडीक बोलतेस
कुणालाही "धिस इज माय डेस्क" म्हणून दम देतेस
काय विचार आहे
मंद्या, दक्षी अगदी ठरवून
मंद्या, दक्षी अगदी ठरवून वेंधळेपणा करते.
गाडी चालु केली, मुली बसल्या,
गाडी चालु केली, मुली बसल्या, पत्नील बस म्हटले आणि निघालो, स्थळ आल्यावर पत्नीला उतर म्हणालो, ती उतरेना म्हणून मागे वळून बघितले तर ती जागेवर नाही. ती बसलीच नव्ह्ती.
राजेश्वर, वहिनी घाबरत
राजेश्वर, वहिनी घाबरत असाव्यात तुमच्या ड्रायव्हींगला बहुदा
दक्षी अगदी ठरवून वेंधळेपणा
दक्षी अगदी ठरवून वेंधळेपणा करते.>>> किरू... दक्षीला बघताच वेंधळेपणाचा BB आठवतो यातच काय ते आलं... :p
राजेश्वर आईआईगं इंद्रा
राजेश्वर
आईआईगं
इंद्रा
लले आणि लिफ्ट... दक्षी अगदी
लले आणि लिफ्ट...

दक्षी अगदी ठरवून वेंधळेपणा करते >> किर्या, मला तर वाटत.. ती आधी इथे वेंधळेपणा टाइपते आणि मग करते
नवर्याच्या एक काकू आहेत ...
नवर्याच्या एक काकू आहेत ... खूप म्हणजे खूपच कॉमेडी आहेत ...

त्या एक्दा आमच्याकडे आल्या होत्या ... आणि गप्पा सुरू असताना मध्येच म्हणाल्या -
"तो बघ कसा कान टवकारून बघतोय!"
सगळे गप्पान्चा विषय विसरून खो खो हसायला लागले तरीही त्यान्च्या लक्षातच आला नाही जोक बराच वेळ ...
मी शाळेत असताना वर्गातली
मी शाळेत असताना वर्गातली बहुतेक मुले शाळा असलेल्या वसाहतीत्(कॉलनीत) राहायची . लांब राहणार्या (बसने जावे लागण्याइतके) ४-५ मुलांपैकी मी एक (सध्या असे स्वर्गात सुद्धा होत नाही). मी माझ्या मित्रांच्या घरी गेलेलो, पण माझे घर कुणी पाहिले नव्हते. १०वी ची परीक्षा झाल्यावर माझा जवळचा मित्र एक दिवस अचानक माझ्या घरी! म्हणाला मला तुझी खूप आठवण येत होती, आणि तुझा पत्ता नव्हता माझ्याकडे..आधी ठरवले तुला पत्र पाठवून तुझा पत्ता विचारावा(पत्र म्हणजे पोस्टाने पाठवतात ते, इ-मेल नाही). मग शाळेत जाऊन तुझा पत्ता घेतला आणि आलो. (पत्ता नसताना मला पत्र कसे पाठवणार हे मी नाही विचारले..मला अगदी भरून आले होते). तो मित्र वेंधळा नव्हता..ते genius असण्याचे लक्षण होते हे पुढे तो IIT कानपूर ला गेला तव्हा कळले.
<< "तो बघ कसा कान टवकारून
<< "तो बघ कसा कान टवकारून बघतोय!">> मला हे काही वेळ कळलेच नाही! मग जोक लक्षात आला
हा किस्सा माझ्या नवर्याचा.
हा किस्सा माझ्या नवर्याचा. रोज सकाळी तो स्टेटस मिटींग फोन वरून अटेंड करतो.
कॉल मध्ये त्याचा नंबर एकदम शेवटचा असतो म्हणून फोन कानाला लावून घरभर फिरत असतो.
आज सकाळी कॉल चालू असताना आपण कॉल वर आहोत हे विसरून "ए जिंदगी गले लगा ले" सुरु केलं आणि एकदम शांत झाला...इकडे माझी हसून हसून पुरेवाट झाली. : हहगलो:
असच एकदा कॉल वर चहाचे भुरके मारताना गोर्या साहेबाने पकडले होते : फिदी:
हे काय माझ्या स्मायली का येत
हे काय माझ्या स्मायली का येत नाहीयेत?
गीताका तुझ्या स्मायली न
गीताका
तुझ्या स्मायली न येण्याचं कारण : नंतर स्पेस आलीये.
गीताका, तुमच्या : ह्या
गीताका, तुमच्या : ह्या चिन्हात आणि हहगलो आणि फिदी मध्ये स्पेस आहे म्हणून.
धन्यवाद
धन्यवाद
>>>>>>हे काय माझ्या स्मायली
>>>>>>हे काय माझ्या स्मायली का येत नाहीयेत?
..वेंधळेपणा
अरे हे तर काहीच नाही. (लहान
अरे हे तर काहीच नाही. (लहान मुलान्च्या जोक्स प्रमाणे हे वाक्य उपरोधात्मक नाही)
मी तर एकदा shaving cream ने दात घासले होते झोपेत.
shaving cream ने दात घासले
shaving cream ने दात घासले होते >>> ब्रश वापरला होता की रेझर
मेघनाद, श्री
मेघनाद, श्री
कालचा वेंधळेपणा. मंदारने एका
कालचा वेंधळेपणा. मंदारने एका बीबीवर मला सांगितले तुझी विपू बघ. मी तात्काळ मंदारची विपू उघडून त्यात त्याने मला काय संदेश पाठवलाय शोधू लागले!
अरुं ,दक्षी अगदी ठरवून
अरुं

,दक्षी अगदी ठरवून वेंधळेपणा करते'... Now whats next Dax???
(No subject)
Pages